प्रत्यक्ष कट्टाकारांनी अनुमोदन दिल्याने शिर्षकात आवश्यक तो बदल करण्यात आला आहे :)
तर मंडळी, आम्ही पुढे सरकलो आणि लगोलग स्टेट बँकेच्या इमारतीला अडकलो. बॅलार्ड पिअर, फोर्ट वगैरे ठिकाणी दिसणार्या दगडी इमारती मला अतिशय आवडतात. स्टेट बँक म्हणजे पूर्वीची ईंपिरियल बँक. ही बहुधा भारतातील सर्वात जुनी वाणीज्य बँक. स्टेट बॅंकेची स्थापना १९२१ सालची असली तरी तिचा उगम आहे तो १८०६ सालच्या बँक ऑफ कलकत्ता मध्ये. १९५५ साली राष्ट्रियीकरणात इंपिरियल बँक ऑफ ईंडिया चे नाव भारतिय स्टेट बँक - स्टेट बँक ऑफ ईंडिया असे झाले. जेव्हा सर्व दस्तऐवज, कागदपत्रे वगैरे समग्र हस्तांतरण झाले तेव्हा माझा मामा स्टेट बँकेत होता आणि इथे या इमारतीतच होता. ही इमारत १९२४ सालची, आपले जन्मवर्ष अभिमानाने मस्तकावर धारण केलेली
ताशीव चिर्यांच्या भिंती, प्रचंड असे भक्कम खांब, कमानदार प्रशस्त खिडक्या आणि दणकट जोतं असलेली ही इमारत देखणी आहे.
दगडी बांधकामातल्या कमानदार, प्रशस्त खिडक्या मला फार आवडतात. खिडकी पाहताना खाली आय आय बी (इंडियन इंपिरियल बँक) ही अक्षरे कोरलेली दिसतात.
प्रवेशद्वार रुबाबदार आहे. विशेषतः रोमन शैलीची बसकी त्रिकोणी कमान
आम्ही स्टेट बँकेचे चित्रण संपवुन पुढे निघालो, रस्ता ओलांडला आणि रामदासांनी माहिती दिली 'या इमारतीच्या तळघारात अस्सल सोनं साठवलं जातं'. नकळत सर्वांनी माना वळवल्या आणि मागे बघितले.
रस्ता ओलांडत असताना नजर गेली ती एका चौरस इमारतीवर.
इमारत मूळची रहिवासी आणि आता बव्हंशी व्यापारी स्वरुपाची असावी. खास भिंतीवर तोललेली इमारत, मजबूत उभ्या विटांच्या भिंती, त्यावर लोखंडी रुळ आणि छत व छ्ज्जाच्या आधारार्थ सागवानी वासे/ कोन. या इमारतीकडे पाहताना लक्षात आले की सर्व मजल्यांवरील कठड्याच्या लोखंडी आधारजाळीची नक्षी मजल्यागणीक वेगळी आहे. पहिल्या मजल्याच्या छज्जाखाली लाकडी कोनांवर काचेच्या हंड्या लटकत होत्या, अजुनही बर्याच शाबुत होत्या. अशी इमारत पाडायची म्हटली की विकत घेणारा पहिला हिशेब करतो तो निघणार्या सागवानाचा.
आम्ही होमी मोदी रस्त्याला लागलो.
सवयीने नजर डावीकडे गेली तर कॉफी हाऊस अजुनही होते, स्वरुप बदललेले होते पण मूळ हॉटेल शिल्लक होते. अनेक वर्षात इथे गेलो नाही. इथे दाक्षिणात्य कॉफी झकास मिळायची. भिंतीवर 'भारतिय कॉफीबोर्ड मान्यताप्राप्त' अशी पाटी असायची. जरा पुढे गेलो तर उजवीकडे दोन इमारतींमधल्या फटीतुन सेंट थॉमस चर्च दिसले आणि मुविंनीही तिथे थांबुन ते दाखविले.
डावीकडे पुन्हा एकदा दगडी भिंत आणि 'कमनिय' खिडक्या. मात्र या खिडक्या अगदी इंग्रजी पद्धतिच्या होत्या. लगतच्या पदपथावर छोटेखानी खांब आणि त्यांना जोडणार्या साखळ्या. ठराविक अंतरावर शोभेचे पथदिवे. मस्त वाटले.
उजवीकडे टाटा साम्राज्याचे मुख्यालय 'बॉम्बे हाऊस', इथे चित्रणाला मनाई होते. असो. जरा पुढे जातो तो काय!
मिपा कट्टेकर्यांच्या स्वागतला चक्क रोषणाई करण्यात आली होती
भाते आणि सौ मुवि अचंब्याने रोषणाई पाहत होते तर रामदास आणि मुवि प्रसन्न चेहेर्याने स्मित देत कॅमेर्याकडे पाहत होते.
तिथेला सेंट्रल बँकेचा भारदस्त लाकडी दरवाजा अर्थातच नजरेतुन सुटला नाही. दगडी भिंतीवर उन्हाची तिरीप खेळविणारा दरवाजा आवडला.
दरवाजा टिपत असताना त्या रस्त्याने जाणारे एक मध्यमवयीन सद्गृहस्थ कसलीही ओळख नसताना आवर्जुन थांबले आणि बॉम्बे हाऊस कडे बोट दाखवत संतापाने म्हणाले 'अहो या लोकांकडे एक अप्रतिम असा नक्षीदार लाकडी दरवाजा होता, तो कुठे नेला की काय केला कुणास ठाऊक. युसलेस साले!'.याला म्हणतात अस्सल मुंबईकर! दोन अनोळखी मुंबईकरांना क्रिकेट सामना आणि मुंबईतल्या जुन्या वास्तु हे जन्मोजन्मीची ओळख असल्यागत एकमेकांशी बोलायचे विषय आहेत.
होमी मोदी मार्ग संपवुन नगीनदास मास्टर पथ म्हणजे मूळची मेडोज गल्ली डावीकडे टाकत आम्ही समोर आलो आणि बरोबर समोर हाँगकाँग बँक आणि बँक ऑफ ईंडीयाच्या इमारती एकमेकीला खेटुन उभ्या होत्या.
बँक ऑफ इंडियाची वास्तु दगडी असली तरी स्थापत्य बरेच वेगळे होते. खांब वेगळे होते आणि कमानीही भौमितीक महिरपीच्या होत्या.
लगतची स्टॅन्डर्ड चार्टर्ड बँकेची इमारत पुन्हा बसक्या त्रिकोणी कमानीची.
हे चित्रण ज्या इमारतीखाली उभे राहुन करत होतो, त्या न्यु इंडिया अश्युरनसची. दगडी इमारतीच्या दर्शनी भागावर दोन सशस्त्र पहारेकरी कोरलेले होते.
इमारतीच्या खांबांवर श्रमिक महीला कोरलेल्या होत्या.
पुढे काळ्या घोड्याच्या दिशेने चालु लागलो आणि कंदिल च्या पुढे डाव्या गल्लीत पलिकडची बीसई ची म्हणजे मुंबई समभाग विनिमयाची इमारत दिसली. या इमारतीच्या परिसरातुन तिचे चित्रण सुरक्षेच्या कारणास्तव प्रतिबंधीत आहे.
एव्हाना दिड दोन तास रवडणुक झाली होती. समोर अन्ना चहा ढवळताना दिसला आणि क्षणभर विश्रांती घ्यायचे ठरले.
समोरच मूंबई विद्यापिठाची इमारत होती.
आता घोडामैदान जवळ आले होते. तरीही दिसेल ती इमारत टिपण्याचा सोस संपत नव्हता. उजव्या कोपर्यात ए डिमेलो मार्ग आणि म. गां. रस्त्याच्या कोपर्यावरचे हे एस्प्लनेड हाउस - एकेकाळचे 'वॉटसन एस्प्लनेड' - होय जिथे टाटांचा अपमान झाल्याची आणि त्यातुन प्रेरणा घेत टाटांनी 'ताज' उभे केल्याची दंतकथा अस्तित्वात आली तीच ही इमारत. पुढे वॉट्सन चे एस्प्लनेड झाले, पहिले चलचित्रपट इथे दाखविले गेले.
पुढे रांगेने उभ्या असलेल्या आर्मी-नेव्ही, डेविड ससून आणि एल्फिन्स्टन महाविद्यालयाच्या डौलदार इमारती - आलोच म्हणायचे आम्ही मुक्कामावरः)
लक्ष वेधुन घेणारी चौरंगी भिरभिरी दिसली आणि समजले - आम्ही महोत्सव स्थळी पोचलो!
क्रमशः
प्रतिक्रिया
11 Feb 2014 - 10:03 pm | शिद
+११११११११११११
हा भाग सुद्धा मस्त झाला आहे... पुढचा भाग देखील पटकन टाका ही विनंती.
11 Feb 2014 - 10:24 pm | पैसा
मुंबईतल्या त्या जुन्या इमारती खर्याच देखण्या आहेत. इतिहासाच्या मूक साक्षीदार!
पुढचा भाग लवकर येऊ द्या!
11 Feb 2014 - 10:47 pm | मुक्त विहारि
आठवा...
ती तांबडी सुर्वा आणि कुर्डी (गोवा) येथील शंकराची मंदिरे आणि रत्नागिरीतील थिबा पॅलेस....
अर्थात वल्लीं इतका नसला तरी आमचा इतिहास थोडासा ठाक-ठीक आहे.
....
(मिपावर खरे बोलायला मी लाजत नाही.)
12 Feb 2014 - 6:12 pm | पैसा
प्रत्येक ठिकाणी असं काही ना काही बघायला मिळतंच! मात्र तांबडी सुर्ला आणि कुर्डी इथल्या देवळांची तुलना या इमारतींबरोबर करता येणार नाही, ती निदान १००० ११०० वर्षे जुनी आहेत आणि आणि सुंदर शिल्पकलेचे नमुने. मात्र थिबा राजवाडा ब्रिटिश काळातला. त्याची शैली या मुंबईच्या इमारतींबरोबर तुलना करण्यासारखी जरूर आहे. दोन्हीचं आपलं वेगळं सौंदर्य!
12 Feb 2014 - 6:13 pm | प्रचेतस
येऊ द्या की त्या तांबडी सुर्ला आणि कुर्डी येथील मंदिरांवर लेख.
11 Feb 2014 - 10:27 pm | आदूबाळ
है शाबाश! अगदी तुम्हा लोकांबरोबर भटकंती केल्यासारखं वाटलं. बॉम्बे हाऊससमोर फोटो काढायला बंदी आहे हे नव्यानेच समजतं आहे.
एक बारीक सुधारणा - पी डिमेलो मार्ग?
11 Feb 2014 - 10:36 pm | मुक्त विहारि
लगे रहो....
11 Feb 2014 - 10:54 pm | विजुभाऊ
साक्षीजी
अशीच एखादी ओळख व्हीटी स्टेशनची करुन द्या ना.
मला वाटते ती मुम्बैतील सर्वात सुंदर वास्तु असेल
12 Feb 2014 - 11:24 am | भाते
ओ विजुभाऊ,
एकतर स्थानकाचे मुळचे नाव 'बोरीबंदर' म्हणा किंवा आत्ताचे नाव 'छत्रपती शिवाजी टर्मिनस' घ्या. हे व्हीटी स्टेशन काय आहे?
तुमच्या मागणीला मात्र बाडिस.
11 Feb 2014 - 11:00 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्त. मुंबैचे सचित्र इमारतपुराण खूप आवडले ! पुभाप्र.
11 Feb 2014 - 11:04 pm | अजया
कट्टा हुकल्याची जळजळ फोटोंनी जरा कमी झाली! पु.भा.प्र.
11 Feb 2014 - 11:32 pm | नंदन
तुमच्यासोबत आमचीही भटकंती होतेय. हाही भाग मस्त.
अगदी, अगदी!
12 Feb 2014 - 12:48 am | रेवती
सगळे फोटू व माहिती छान सांगताय. धन्यवाद!
12 Feb 2014 - 1:05 am | अत्रुप्त आत्मा
मस्त!
12 Feb 2014 - 1:32 am | मदनबाण
सर्व फोटो आवडले,फ्रेमिंग आणि अँगल्स तर सुंदरच ! :)
12 Feb 2014 - 1:36 am | प्यारे१
चोक्कस!
हेचामंदी तर आमचा कम्पणीने बनवलेला बिलडींग छे! बॉम्बे स्टॉक एक्स्चेन्ज अना सेन्ट्रल बिल्डींग बी हाय भौतेक.
शापूरजी पालनजी नी लय कन्ट्रकशन केला हाय सावूत बॉम्बे मंदी!
ते रामदास डिकरा ला समदा ठावक हाय. इचार तेला!
- प्यारमुझ बाटलीवाला
12 Feb 2014 - 1:42 am | खटपट्या
मस्तय !!!
12 Feb 2014 - 1:59 am | मराठे
जुन्या इमारती बघताना एक गोष्ट सारखी खटकते , ती म्हणजे त्या जुन्या इमारतींच्या सौष्ठवाला विद्रूप करणार्या खिडकडाग,त्याबाहेर आलेले ए.सी.युनीटस्, सांडपाण्याचे पाईप्स आणि त्यामुळे भिंतीवर पडणारे डाग. एखाद्या सुंदर चेहर्याच्या मुलीचे दात पडलेले किंवा किडलेले कसे दिसतीत असं वाटतं. त्या इमारतीला काय शोभून दिसेल काय नाही याचा कोणीच अजीबात विचार करत नाही.
(खरं तर नव्या इमारतीसुद्धा यातून सुटलेल्या नाहीत. घर आतून छान दिसावं म्हणून चिक्कार पैसे खर्च करणारी मंडळी इमारत बाहेरून कशी दिसते याबाबत उदासीनच असतात.)
12 Feb 2014 - 10:30 am | सुहास झेले
सहीच.. आता पुढे? :)
12 Feb 2014 - 11:01 am | संजय क्षीरसागर
फोटो आणि वर्णन एकदम दिलखुष!
12 Feb 2014 - 11:16 am | दिपक.कुवेत
हा फोर्ट परीसरात कितीहि फिरलं तरी थकवा जाणवत नाहि आणि समाधान तर त्याहुन होत नाहि. आता प्रत्यक्ष महोत्सवाचे फोटो बघण्याची ओढ लागली आहे
12 Feb 2014 - 11:18 am | दिपक.कुवेत
लेखमाला क्रमशः भागात आहेच तर प्रत्येक नविन भागात आधीच्या भागांची पण लिंक देत जा जेणेकरुन नविन वाचणार्यांना पण आधीच्या भागांचा आनंद घेता येईल.
12 Feb 2014 - 12:39 pm | कुसुमावती
दोन्ही भाग मस्त जमलेत. पुभाप्र
12 Feb 2014 - 1:13 pm | प्रमोद देर्देकर
१९९८ /१९९९ साली मोतीलाल ओस्वालच्या ऑफिसमध्ये तिथेच फोर्टला कामाला होतो म्हणुन या सगळ्या परिसरातल्या आठवणी ताज्या झाल्या.
पु.भा.प्र.
12 Feb 2014 - 1:22 pm | तिमा
रामदास यांच्याबरोबर फिरुन पायाचा पिट्टा पडला होता. आता कसं, निवांतपणे घरच्या घरी मुंबई दर्शन झाले! बरोबर ना मिका ?
12 Feb 2014 - 2:50 pm | सानिकास्वप्निल
उत्तम वर्णन आणी क्लास फोटो
पुभाप्र
12 Feb 2014 - 3:30 pm | प्रभाकर पेठकर
इतके माहितीपूर्ण आणि जिवंत कट्टे उपभोगण्यापासून वंचित राहतो आहे ह्या सारखं दु:ख नाही.
सर्वसाक्षीजी, कट्ट्याचे, किल्ला परिसराच्या भटकंतीचे वर्णन आणि छायाचित्रांची मेजवानी अत्यंत सुखकारक आहे.
12 Feb 2014 - 5:11 pm | इरसाल
कदाचित चित्र-बादलीमुळे मला चित्रे दिसत नाहीएत.
12 Feb 2014 - 5:16 pm | सर्वसाक्षी
आतापर्यंत दिसणारे चित्रे आता बव्हंशी गायब आहेत व तिथे संदेश आहे. खरेतर काल सर्व चित्रे चढविल्यानंतर मी मला उपलब्ध जागेपैकी केवळ ४% जागा भरली आहे असे दर्शविले होते. आज एक मेल होती की जागा संपत आली अहे तेव्हा व्यावसायिक श्रेणी स्विकारा पण सर्व चित्रे व्यवस्थित दिसत होती. पुन्हा बादली तपासून पाहतो.
12 Feb 2014 - 5:28 pm | सर्वसाक्षी
बादलीत डोकावलो असता एकीकडे साठवणुक क्षमतेच्या ४% असे दिसते तर दुसरीकडे 'या महिन्याचा १० जीबीचा' साठा संपला असे दिसत आहे, चित्रे २०० ते ५०० केबी ची. म्हणजे अगदी २०० चित्रे डकवली तरीही १०० एम्बी. एक जीबी म्हणजे १००० एम बी मग जागा भरली कशी? की एकाएकी हालचाल सुरु झाल्याने पैसे काढायचा 'बादली' चा विचार आहे? कुणी माहितगार यावर प्रकाश टाकु शकेल काय?
12 Feb 2014 - 6:09 pm | पैसा
मला सगळी चित्रे दिसत आहेत!
12 Feb 2014 - 6:13 pm | मदनबाण
मला सगळी चित्रे दिसत आहेत!
ते बहुधा Browser's-Cache मुळे असेल ते क्लीअर करुन परत बघ जरा !
12 Feb 2014 - 6:46 pm | पैसा
खरंच की! "अपग्रेड" चा मेसेज दिसतोय आता!
12 Feb 2014 - 5:46 pm | डॉ सुहास म्हात्रे
गुगलफोटो वापरा. ३२ जीबी चकटफू मिळतात आणि चित्रे सर्वांना दिसतात.
12 Feb 2014 - 5:12 pm | ऋषिकेश
हा भागही छान.. रंगीत
12 Feb 2014 - 5:28 pm | लव उ
मला फोटोच दिसत नहियेत...कशामुळे बरे?
12 Feb 2014 - 5:42 pm | विनोद१८
कट्टा हुकल्याची हुरहुर लागली. उत्तम वृत्तांत.
विनोद१८
12 Feb 2014 - 8:28 pm | पिंगू
साक्षीशेठ,फोटोअबकेट ची बँडविडथ संपली वाटते. फोटो दिसत नाहीयेत..
13 Feb 2014 - 8:21 am | सुधीर कांदळकर
काय करावे?
14 Feb 2014 - 12:15 am | अत्रुप्त आत्मा
परत फोटू बगाया आलू..पन काय उपेग??? :(
सगळे फोटू बकेट मदीच हाय्ती अजून! :(
धूउन काडा ना यक डाव! :)
14 Feb 2014 - 1:02 am | सर्वसाक्षी
मोठा उपद्व्याप करावा लागणार आहे, पण करतो.