नमस्कार.
आपण सर्वांनी मिपाकर जयंत कुलकर्णी म्हणजेच आपले लाडके जकुकाका यांच्या रसाळ अन अभ्यासपूर्ण अशा युध्दकथामालांचा आनंद घेतला असणार. मीहि त्यांच्या लेखनाचा मोठा फॅन आहे. या युध्दकथा त्यांच्या आगामी "युध्दाचे वादळ" या मोठ्या ग्रंथउपक्रमाचा भाग आहे हे त्यांनी नमूद केलेलेच आहे. तसेच या ग्रंथासाठी मुखपृष्ठ कसे असावे किंवा चोखंदळ मिपाकरांकडून काही कल्पना आहेत का यासाठी त्यांनी धागा पण काढलेला होता. त्यालाच प्रतिसाद म्हणून याचे डिझाइन्स मी स्वतः करावे असे वाटले. जयंतरावांशी संपर्क साधता त्यांनी तत्काळ मंजुरी व उत्तेजन दिले.
आधी डोक्यात काही कच्चे आराखडे होतेच, त्यानुसार तात्काळ काम चालू केले. जयंतरावांनी त्यांच्या पध्दतीने कव्हर असे सादर केले होते
जयंतराव स्वतः निष्णात फोटोग्राफर, शिवाय त्यांनी केलेला कथाविषयाचा दांडगा अभ्यास याचे दडपण होतेच, त्याच्यावर मिपाकरांनी दिलेल्या प्रतिक्रियांचे पण ओझे होते. मी स्वतः आर्टिस्ट कमी अन प्रिंटर जास्त आहे. त्यामुळे माझे कलात्मक दृष्टिकोनापेक्षा तंत्राकडे जास्त लक्ष जाते. मग हे काम करता करता पत्रिकेच्या धाग्यात जशी थोडीशी ओळख करुन दिली होती तशीच या छपाईची पण थोडीशी ओळख करुन द्यावी. व हे काम कशा पध्दतीने पार पडले हे मिपाकरांना कळावे यासाठिच हा धागाप्रपंच.
.......................................................
आद्यपुस्तके, ताडपत्री, भूर्जपत्रे वगैरे स्वरुपात असताना त्याला दोरीने बासनात बांधले जाई. अगदी सध्याच्या पुस्तक या स्वरुपात येताना त्याचे मुखपृष्ठ व मलपृष्ठ ह्या गोष्टी विकसित झाल्या. अगदी सुरुवातीला कातडी वा रेक्झीन बांधणीतील पुस्तके असत. पुस्तकातील पानांना क्रमाने घड्या घालून त्यांची ८, २४ अशा संख्येने पुडकी दोर्याने शिवून बांधली जात. ती सर्व पुडकी एकत्र करुन त्यावर जाड पुठ्ठ्याचे आवरण तेसुध्दा कातड्याने अथवा रेक्झीनने मढवले जाई. कातड्यावर छपाईला मर्यादा असल्याने त्यावर छपाई ही फक्त पुस्तकाचे व लेखकाचे नांव एवढीच ठसठशीत सोनेरी अथवा चंदेरी रंगात एम्बॉसिंग करुन केली जाई. जसजसा पुस्तकांचा प्रसार वाढू लागला तसे खर्च मर्यादित ठेवण्यासाठी, बांधणीचे मानवी कष्ट वाचवण्यासाठी केवळ जाड कागदी मुखपृष्ठांचा वापर वाढला. त्यावर ऑफसेट तंत्राने विविधरंगी छपाई करणेहि शक्य झाले. सध्याच्या कॉफीटेबल बुकांची आकर्षक, गुळगुळीत कव्हर्स ऑफसेट, ग्रेव्हिअर, स्पॉट युव्हि, एम्बॉसिंग, मेटल फॉइल्स अशी वेगवेगळ्या तंत्रांचा एकत्रित वापर करुन केली जातात. आतील पाने हि एकदम प्रिंट करुन एकत्र जुळणी करुन मशीन द्वारेच बाईंड केली जातात.
.........................................................
आता या आधुनिक तंत्राने जयंतरावांचे पुस्तक मुद्रित होणार आहे म्हणजे त्याच्या साईजचा, कथाविषयाचा व ईतर आवश्यक गोष्टींचा (मलपृष्ठ, ब्लर्ब, टायटल, स्पाईन म्हणजे पुस्तकाची जाडीची पट्टी, रंग, फॉन्ट) विचार करुन मी दोन डिझाइन्स बनवले. यासाठी कोरलड्रॉ व फोटोशॉप या सॉफ्टवेअरचा वापर केला. काही जालावरच्या इमेजेसचा पण रेफरन्स म्हणून वापर करण्यात आला आहे.
हे काम करताना माझ्या डोक्यात खदखदत्या लाव्हासारख्या देशांच्या सीमारेषा अशी काहीतरी आयडीया उतरवण्याचा प्रयत्न केला होता. हे डिझाइन्स जयंतरांवांना पाठवल्यानंतर लगेच त्यांचा प्रतिसाद आला. त्यांना जास्त ग्राफीकल किंवा इमेजेस असलेले डिझाइन नको होते. एखादे सोबर आणि गंभीर लुक असणारे डिझाइन हवे होते.
फोनवरुन बर्याच संवादातून आणि बर्याच आयडीयांच्या देवाणघेवाणीतून
हि दोन डिझाइन त्यांच्या मनासारखी उतरली. तीच खंड १ व खंड २ ला अशी वेगवेगळी वापरता येतील असे मत पडले.
अर्थात याचा मला खूपच आनंद झाला. जरी या कामाला खूप उशीर होत गेला तरी जयंतरावासारख्या सिध्दहस्त लेखकाच्या पुस्तकाचे कव्हर डिझाइन करायला मिळाले आणि ते त्यांना आवडले याचा खूप आनंद आहे. आता ते छपाईला जाऊन मुद्रीत स्वरुपात लवकर समोर यावे अर्थात जयंतरावांचे पुस्तकप्रकाशन लवकरात लवकर व्हावे एवढीच शुभेच्छा.
मला आशा आहे कि मिपाकरांना पण हे डिझाइन्स आवडतील.
धन्यवाद.
प्रतिक्रिया
6 Feb 2014 - 3:56 pm | सौंदाळा
सुंदर.
जयंत कुलकर्णींचे पुस्तक आणि त्याला अभ्याने केलेले डिझाईन म्हणजे दुधात साखर.
आवर्जुन आमच्याशी शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
पुस्तक प्रकाशनासाठी मनःपुर्वक शुभेच्छा.
6 Feb 2014 - 4:06 pm | आदूबाळ
तळाचं डिझाईन खूप आवडलं!
6 Feb 2014 - 4:16 pm | किसन शिंदे
शेवटची दोन्ही डिझाईन्स जाम आवडलीत.
6 Feb 2014 - 4:19 pm | ऋषिकेश
शेवटची दोन्ही उत्तम आहेत याच्याशी सहमत. दुसरेही आवडले.
दोघांना शुभेच्छा!
6 Feb 2014 - 4:26 pm | अत्रुप्त आत्मा
३नंबरला पसंती.
6 Feb 2014 - 6:43 pm | सुबोध खरे
+१
तिसरे सर्वात जास्त आवडले.
परंतु लेखकाला काय आवडते ते जास्त महत्त्वाचे.
6 Feb 2014 - 11:08 pm | पिवळा डांबिस
पुस्तकाचे नांव 'युद्धाचे वादळ' असल्याने ३रे डिझाईन मलाही समर्पक वाटले आणि आवडले. अर्थात,
सहमत!!
7 Feb 2014 - 12:05 am | प्यारे१
+१ असेच.
आनि आम्चं अभ्या हायेच गुनी!
ते तेव्डं सायबांच्या बड्डेच्या फ्लेक्स्चं बग बर्का तिवडं.
आँ? पैशे? हालो...
हा काय म्हनला?
द्यायचेत काय?
कुनी?
कशाचं?
आरं देतू की! काय च्यायला सार्कं पैसं पैसं.
पुस्तकाचं बेष्ट कवर केलायसा की. मोप पैका मिळाला आसंन.
बर्मग्ठिव्का?
10 Feb 2014 - 8:18 am | पाषाणभेद
अरे काय हे!!!
दोन्ही डिझाईन छानच आहे. यातून कोणते निवडावे याचा प्रश्नच आहे.
6 Feb 2014 - 4:30 pm | आतिवास
तिसरे आणि चौथे क्रमाने आवडले.
चांगलं केलंय डिझाईन.
6 Feb 2014 - 4:34 pm | मृत्युन्जय
जयंत काका आणी अभ्या दोघांचेही अभिनंदन. मुख्पृष्ठ सुरेखच झाले आहे. जयंत काकांचे पुस्तक म्हणजे सुरेख असणारच यात तर वादच नाही,
6 Feb 2014 - 4:44 pm | मुक्त विहारि
पुस्तक प्रकाशन कधी आहे?
6 Feb 2014 - 5:00 pm | मधुरा देशपांडे
मुखपृष्ठ आवडले. प्रकाशनासाठी शुभेच्छा.
6 Feb 2014 - 5:07 pm | बॅटमॅन
अभ्या द आर्टिस्ट!!!! मस्त डिझाईन रे. :)
जयंतकाकांचाही दांडगा अभ्यास दिसतो आहेच.
6 Feb 2014 - 5:41 pm | कवितानागेश
खरं तर सगळीच डिझाईन्स आवडली रे अभ्या. मस्त.
:)
6 Feb 2014 - 6:33 pm | यशोधरा
मलाही.
6 Feb 2014 - 6:33 pm | जोशी 'ले'
झक्कास रे अभ्या, सिलेक्ट केलेली दोन्ही तर मस्तच आहेत शिवाय तुझं पहिलं सुध्दा मस्तच झालयं
6 Feb 2014 - 6:40 pm | सानिकास्वप्निल
मला दुसरे आणी तिसरे मुखपृष्ठ जास्तं आवडले.
अभ्या यु आर ग्रेट!!
पुस्तक प्रकाशनासाठी खूप खूप शुभेच्छा.
6 Feb 2014 - 7:10 pm | गणपा
मस्तच रे भौ.
सगळीच मुखपृष्ट आवडली.
जयंत कुलकर्णीयांना येऊ घातलेल्या पुस्तकां बद्दल शुभेच्छा अन अभिनंदन.
6 Feb 2014 - 8:15 pm | सोत्रि
सगळीच डिझाइन्स आवडली!
- (सॉफ्टवेयर डिझायनर) सोकाजी
6 Feb 2014 - 8:21 pm | सूड
सगळीच झकास !! गंभीरपणा तिसर्यात जास्त जाणवतोय.
6 Feb 2014 - 9:19 pm | ह भ प
अभिदा द ग्रेट.. मला सगळीच्या सगळी आवडली..!
6 Feb 2014 - 10:12 pm | प्रचेतस
कलाकार आहेस अभ्या.
सर्वच चित्रे सुरेख.
6 Feb 2014 - 11:11 pm | मदनबाण
मला ३ रे डिझाइन सगळ्यात जास्त आवडले.
6 Feb 2014 - 11:28 pm | सस्नेह
मुखपृष्ठे पाहून !
6 Feb 2014 - 11:34 pm | सुवर्णमयी
शेवटची दोन मला
जास्त आवडली.
7 Feb 2014 - 10:21 am | जयंत कुलकर्णी
अभ्याचे आभार मानतो ! कारण आमचे एकदाच बोलणे झाले आणि त्याला मला काय पाहिजे आहे ते अचूक कळले हे महत्वाचे. तसेच सर्वांचे आभार मानतो. बहुसंख्य प्रतिसादकांना जे आवडले म्हणजे तिसरेच छापायला घेतले आहे. चौथे आहे ते "१० युद्धकथा" या नवीन पुस्तकासाठी वापरायचे डोक्यात घोळते आहे.
सर्वांच्या शुभेच्छांसाठी मनापासून आभार !
7 Feb 2014 - 10:27 am | स्पा
अभ्या सुपर काम रे
लय आवडेश
7 Feb 2014 - 10:40 am | फिरंगी
अत्यंत सुंदर .......वा !!!!
7 Feb 2014 - 10:45 am | चौकटराजा
मला तर तीनही आवडली. शेवटचे का आवडले जास्त जणाना . कारण आपल्या मनावर मिलीटरी ( कॅमोफ्लाज कलर ) चे असलेले राज्य. दुसरे असे की कथा या जुन्या असतात. सबब आपल्याला त्या कथांचा चित्ररूप मुखवटा हा थोडयाशा विटक्या
रंगात असला की आपण भूतकाळात शिरणे सोपे असते. जकुंची मागणी व अभ्या यांची कल्पना व मांडणी मला वाटतं यातून आली असावी. दोघांचेही याबद्द्ल अभिनंदन! खूप वेळा मुखपृष्ठ हे साहित्यमूल्य असलेले पहायला मिळते. त्यातीलच हे एक !
7 Feb 2014 - 10:52 am | जेपी
*clapping* *BRAVO* :BRAVO: :bravo: :clapping:
7 Feb 2014 - 11:40 am | ज्ञानोबाचे पैजार
मस्त रे अभ्या,
शेअर केल्या बद्दल धन्यवाद. जयंतकाकांनी या विषयी पहिला लेख लिहीला तेव्हाच कुतुहल चाळावले गेले होते.
अभ्याच्या या कामा मुळे प्रकाशित व्हायच्या आधिच या पुस्तका बद्दलची उत्सुकता कमालीची वाढली आहे.
नक्की विकत घ्यावेच लागणार.
जयंतकाका प्रकाशन पूर्व नोंदणीला सवलत जाहिर करता येते का बघा. धडाक्यात नोंदणी होइल.
पुस्तक यशस्वी होणार यात काहीच शंका नाही. अनेक शुभेच्छा.
7 Feb 2014 - 5:18 pm | सुहास झेले
शेवटचे आवडले.... :)
7 Feb 2014 - 5:42 pm | अनन्न्या
तुमचे अभिनंदन आणि पुस्तक प्रकाशनाला शुभेच्छा!
9 Feb 2014 - 10:59 pm | पैसा
जयंत कुलकर्णींचे अभिनंदन! आणि अभ्या, तुझं कौतुक करायला शब्द नाहीत. चित्रं तर मस्त झालीत पण त्याबरोबर जी माहिती दिलीस ती पण खूप छान! बिझी असशीलच पण वेळ काढून अजून जरा लिहीत जा रे!
10 Feb 2014 - 8:33 am | चित्रगुप्त
जयंतरावांचे आणि अभ्याचे अभिनंदन.
मला सर्वात आवडलेले डिझाईन:
12 Feb 2014 - 4:19 pm | चिगो
आणि तिसरे डिझाईन आवडले.. जयंतकाका, कधी प्रकाशताय पुस्तक? शुभेच्छा..
12 Feb 2014 - 2:36 pm | अभ्या..
ह्या कामाची संधी दिल्याबद्दल जयंतरावांचे आभार.
भरपूर कौतुक करून प्रोत्साहन दिल्याबद्दल सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मिपाकर, सम्पादक मंडल, आणि माझे काम नेहमीच आवडणारे मित्र मिपाकर यांचे खूप खूप आभार.