नमस्कार मिपाकरहो,
श्रीमान मुक्त विहारि यांच्या वनंतीने मी या कट्ट्याचा व्रूत्तांत लिहीत आहे, मिपावर लिहीण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न. (काही चूक झाल्यास माफ करावे, ही विनंती.)
ठरल्याप्रमाणे हाही कट्टा अगदी व्यवस्थित पार पडला, सगळे म्हणजे श्री. व सौ. हेमांगीके, अजया, मुक्त विहारि, सुबोध खरे, रामदास काका, सूड, भटक्या खेडवाला, भाते इ. माझ्याअगोदर आले होते आणि मी जरा उशीराच गेलो, स्पा कट्टा संपतांना आले.
हेमांगीके यांचे लेख वाचले होतेच त्याना भेटण्याची उत्सुकता होती, हेमांगीके म्हणजे कोणीतरी वयस्कर व्यक्तिमत्व असावे असे वाटले होते, त्यांना भेटल्यावर या मुलीने इतके सुंदर लेखन केले आहे, हे खरेच वाटेना, असो. सुरवातीला ओळख परेड झाली, फोटो सेशन झाले.(खाली फोटो चिकटवले आहेत.सदर काम मीच केल्यामुळे बर्याच फोटोत मी त्यात दिसत नाही.) नंतर गप्पा रंगल्या.नेहमीप्रमाणेच डॉ. सुबोध खरे, रामदास, भटक्या खेड्वाला, मुवि व अध्येमध्ये आम्ही इतर त्यामध्ये रंगलो होतो. सोबतीला खानपान होतेच ते खालील फोटोत दिसत असेलच.
हेमांगीके यांच्याशी हितगुज सुरु झाले.त्यांचे नवे लेखन व इतर विषय चर्चेत आले. कट्ट्याला डोंबिवलीकरांची उपस्थिती जास्त असल्याने डोंबिवलीमधल्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. डॉ. सुबोध खरे व रामदास आपले इतर अनुभव शेअर करत होते, भटक्या खेड्वाला याना एका खाजगी कार्यक्रमाला जायचे असल्याने ते निघुन गेले. नंतर डॉ.खरे यांनी स्पाला फोन केला ते त्याप्रमाणे आले. या कट्ट्यामध्ये सर्वसाधारण अवातर गप्पा झाल्या.
श्री. रामदासानी डॉ. सुबोध खरेना पुस्तकरुपाने आपले अनुभव शब्द्बद्ध करण्याविषयी आग्रह धरला.तसेच मुंबईत काळाघोडा महोत्सव चालु आहे त्या संबंधी बोलले. तसेच जमल्यास तिकडे जाण्यास सुचविले. काहीनी त्यास अनुमोदन दिले. एकुणच फड चागला रंगला होता.
डॉ. अजया, श्री. रामदास याना जायचे असल्याने कट्टा आवरण्याची वेळ आली. इतक्यात मु.वि.नी जवळच असलेल्या डॉ. आंबेडकर सभाग्रूहामध्ये सुरु असलेल्या 'वन्यजीव फोटो प्रदर्शन' पाहण्यासंबधी विचारले. तिकडे जाण्यासाठी सगळेच तयार झाल्याने, सर्वानी तिकडे प्रस्थान केले. हे एक अतिशय सुंदर असे प्रदर्शन होते.
आजचा हा कट्टा श्री. व सौ. हेमांगीके यांनी प्रायोजित करुन एक नविन पायंडा पाडला त्याबद्दल त्यांना धन्यवाद.
आता काळा घोडा फेस्टिवल कट्ट्याला परत भेटू या.
प्रतिक्रिया
3 Feb 2014 - 9:49 pm | श्रीरंग_जोशी
नेटका व सुट्सुटीत वृत्तांत. फटु पण चांगले आहेत.
हेमांगीचे लेखन वाचून तिच्या वयाबद्दल माझाही असाच गैरसमज झाला होता.
विनोदराव - आता मिपावर लेखनाचा श्रीगणेशा झालाच आहे तर कृपया थांबू नका, अजून लिहा.
3 Feb 2014 - 9:59 pm | डॉ सुहास म्हात्रे
अरे वा ! मस्त झाला की कट्टा !! सुंदर वृत्तांत आणि फोटो.
त्यांचे अभ्यासपूर्ण लेखन वाचून हेमांगीकेंच्या वयाबद्दल लेखात लिहील्याप्रमाणेच (गैर)समज झाला होता :)
3 Feb 2014 - 10:01 pm | रेवती
वृत्तांत व फोटू आवडले.
3 Feb 2014 - 10:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>>>हेमांगीके म्हणजे
कोणीतरी वयस्कर व्यक्तिमत्व असावे असे वाटले होते,
असेच समजत होतो. :)
-दिलीप बिरुटे
3 Feb 2014 - 10:10 pm | सानिकास्वप्निल
छान झाला कट्टा.
वृत्तांत आवडला :)
3 Feb 2014 - 10:29 pm | प्यारे१
वृ आवडला.
बाकी हेमातै वरील रिपोर्ताज वाचून 'अरे, हम लहान हुए तो क्या हुआ, फुल्लटु अभ्यासू हय अभ्यासू' म्हणणार!
(अवांतरः व्यक्तीची लांबी रुंदी झटकन बदलण्याचे क्लासेस डोंबिवलीत सुरु झालेत काय? ;) )
4 Feb 2014 - 6:52 am | पाषाणभेद
लहान है वो!
4 Feb 2014 - 10:50 am | खटपट्या
लहान हय वह !
3 Feb 2014 - 10:30 pm | मुक्त विहारि
आवडला.
4 Feb 2014 - 1:47 am | प्रभाकर पेठकर
मलातरी हेमांगी के फार वयस्क वगैरे असतील असे वाटले नव्हते. त्याचे एकमेव कारण म्हणजे टिव्ही मालीकांमधील माझी आवडती अभिनेत्री 'हेमांगी कवी'.
प्रत्येक कट्टा यशस्वी होतो आहे ही आनंदाची बातमी आहे. असेच वरचेवर कट्टे होऊ द्यात. (निदान मी येई पर्यंत.)
4 Feb 2014 - 4:29 am | अर्धवटराव
असे खर्चीक पायंडे घालण्याविषयी.... एकदा चर्चा करायची आहे =))
बाकी कट्ट्याला सारे हुज-हु हजर असताना कट्टा रंगला असणाअर यात संशय नाहि.
अवांतरःच्यायला स्पा...एकदम फुलटु रौडी राठोड का बे...
4 Feb 2014 - 2:11 pm | स्पा
खिक्क .... :P
5 Feb 2014 - 12:48 am | कवितानागेश
असलं कसलं रे तुझं लाजणं... शी बै! :D
असो. कट्टा छान झालेला दिसतोय.
4 Feb 2014 - 8:26 am | अजया
क्षणचित्रे
कट्ट्याला रामदासकाकांनी खरच जान आणली! त्यांचे एकेक भन्नाट किस्से ऐकुन मजा आली! गायनॅककडचा तर खासच!एक दीड तास कधी गेला अक्षरश: कळाले नाही.
काका आणि डॉ. खरे यांची परप्रांतीय पदार्थ खाण्यासाठी तिथली बायको करणे बरे की स्वैपाकी अशी रोचक चर्चा एका अनाहितेसमोर झाल्याने ड्वळे पाणावले!
मुविनी १९९१मध्ये मॉडर्न कॅफे मध्ये ते का आले होते तो किस्सा सांगितला ;)
मध्येच सर्वांना आठवण झालीकी हा कट्टा हेमांगीसाठी होता,ती सोडुन सगळे बोलत होते!
काही व्यक्तिमत्वे प्रथमच पाहाण्यात आली,ज्यांच्यावर कविता लिहिल्या जातात ते,अनाहितांना हडळीकुंकवाला पाठवणारे, खविस शिमगा जवळ आला असतानाही कट्ट्याला पायधूळ लावुन गेले ते एक(सूड घेण्यात आल्या आहे)
आणि एक..ज्यांच्यासाठी कट्टा आयोजीत करायचा त्यांनीच तो स्पॉन्सर करायचा! व्हेरी फन्नी इंडीड!!
आता हे शेवटचे! भाजलेल्या जवळ्याच्या वासाने तोंडाला पाणी सुटणारे कोब्रे पण मी पाहिले ;)
मुवींचा पुढचा कट्टा माशांचा वास येणारी ठिकाणं असाही असु शकेल! आगाऊ नोंदणी चालू पण झाली असेल एव्हाना!
(क्रु. ह. न. घेणे) ;)
4 Feb 2014 - 10:42 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>> सर्वांना आठवण झालीकी हा कट्टा हेमांगीसाठी होता,ती सोडुन सगळे बोलत होते !
जेवणाचे बील त्यांनी देऊनही त्यांना बोलू दिले नाही. छान...!!! :)
-दिलीप बिरुटे
4 Feb 2014 - 1:50 pm | मुक्त विहारि
अहो,
रामदास काका आणि सुबोध खरे हे आपल्या अनुभवाच्या पोतडीतून इतके किस्से काढत होते की बस्स.
मी फक्त कट्टा आयोजीत केला.
पण गाजवला तो ह्या दोघांनी.
आता तुम्ही कधी येत आहात ते सांगा.
परत एकदा छान गप्पांचा फड जमवू.
(आपला, गप्पा ऐकण्यात पटाइत) मुवि.
6 Feb 2014 - 7:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मिपावर वाचक म्हणून कितीतरी कट्ट्याचा साक्षीदार आहे, पण मला काही जमलं नाय एखादाही कट्टा अटेंड करायला.
ठाण्यात एखादा कट्ट्याला मी हजेरी लावेन.
-दिलीप बिरुटे
6 Feb 2014 - 8:12 pm | मुक्त विहारि
ओके.
नाहीतर असे करू या.
तुम्ही ठाण्याला येण्यापुर्वी धागा काढा (जसा नीलकांत साहेबांनी काढला ना तस्सा)....आपण लगेच गप्पांचा फड जमवू या.
(कट्टेकरी) मुवि
7 Feb 2014 - 9:01 pm | प्रभाकर पेठकर
फक्त गप्पांचा? ब्वॉरं..! शुभेच्छा!
7 Feb 2014 - 9:34 pm | मुक्त विहारि
दादा जसे स्वर्ग म्हटला की...अप्सरा.यक्ष.गंधर्व,किन्नर आणि अम्रुत ओघाओघाने येतेच तसे...
तुम्ही आणि आम्ही जमलो की पक्षी-तीर्थावर स्वारी आलीच ना?
छे बाबा. आजकाल मिपाकर बिघडले आहेत की, आम्हीच सुधारलो?
कदाचित दादा खुंटा हलवून बळकट पण करत असतील...
या हो तुम्ही... मस्त पक्षीतीर्थाला जावून येवू....
8 Feb 2014 - 2:04 am | प्रभाकर पेठकर
हा: हा: हा: किती तो मनकवडा स्वभाव.
4 Feb 2014 - 2:00 pm | सूड
>>ज्यांच्यावर कविता लिहिल्या जातात ते,अनाहितांना हडळीकुंकवाला पाठवणारे, खविस शिमगा जवळ आला असतानाही कट्ट्याला पायधूळ लावुन गेले ते एक(सूड घेण्यात आल्या आहे)
अर्रर्र!! कधी नव्हे ते लाजलो ना मी!! *blush* किती कवतिक कराल!!
4 Feb 2014 - 2:11 pm | स्पा
सूड लाजुषा :D
5 Feb 2014 - 10:08 pm | पैसा
की लाजुक्षी?
बाकी कट्टा भन्नाटच झालेला दिसतोय. करा मजा लोकहो!
5 Feb 2014 - 10:14 pm | सूड
>>की लाजुक्षी?
का आठवण काढताय बिचारीची? हल्ली दिसतही नाही. कुठे असेल, काय करत असेल फार्फार चिंता वाटते हो !! *cray2*
5 Feb 2014 - 10:36 pm | पैसा
आपला नानबा ऑस्ट्रेलियाला चाललाय. तो नक्की शोधून काढील तिला!
5 Feb 2014 - 10:45 pm | सूड
बरं झालं सांगितलंत!! आता माहेरची (ती माहेरचीच देवरुखकर असं समजतोय, तिकडलं आडनांव विचारेस्तवर गायबली) म्हणून एक ओटी पाठवतो त्याच्यासोबत. भेटलीच तर दे म्हणेन. ;)
4 Feb 2014 - 8:40 am | दिपक.कुवेत
कट्टा छान झालेला दिसतोय. वॄत्तांतहि छान, नेटका आणि सुटसुटित. बाय द वे हा कट्टा जिच्यासाठि अॅरेंज केलेला ती उत्सवमुर्ति काय म्हणाली?......जाता जाता.......स्पा ला फारच उशीर झालेला दिसतोय!!! आजुबाजुला कोणीच दिसत नाहिये :)
4 Feb 2014 - 9:44 am | सुबोध खरे
स्पा आला नव्हता म्हणून मी त्याला फोन केला तर तो म्हणाला मी अजून थोड्या वेळाने येतो. मी त्याला लगेच सांगितले आम्ही तोवर खाउन घेतो तू बिल द्यायला ये.
पण दुर्दैवाने हेमांगी ताईनि बिल आधीच हस्तगत केले आणि भरले.त्यावेळेस स्पा आपल्याला बिल द्यायला लागते काय या चिंतेत होता तोच हा फोटो.
5 Feb 2014 - 12:19 am | अत्रुप्त आत्मा
@स्पा आपल्याला बिल द्यायला लागते काय या चिंतेत होता तोच हा फोटो. >>> =))
तरीच म्हटलं इतका कसा निरागसतेकडे झुकला हा पांडुब्बा! =))
4 Feb 2014 - 9:50 am | मदनबाण
वॄतांत आवडला. :)
4 Feb 2014 - 9:50 am | यशोधरा
छान वृ आणि फोटो.
4 Feb 2014 - 10:25 am | प्रमोद देर्देकर
आ @ अजया :-प्रतिसाद आवडला.
>>मुविनी १९९१मध्ये मॉडर्न कॅफे मध्ये ते का आले होते तो किस्सा सांगितला>>>
ओ मु.वि. साहेब आम्हाला पण सांगाना कि काय केलेत १९९१ मध्ये तिकडे.
सहाव्या फटु मध्ये सगळे आपापल्या नादात आहेत. रामदासकाका बहुतेक शेयर मार्केट बद्द्ल टीप पहात
आहेत. तर सुडसाहेब डोक्याला हात का लावुन बसाले आहेत. असे काय वोलणे झाले?
भटक्या खेडवाले साहेब आणि भाते साहेब कशात तरी तल्लीन झाले आहेत.
तर मु.वि साहेब गालातल्या गालात हसत आहेत.
>>स्पा ला फारच उशीर झालेला दिसतोय!!>>>> आहो तो व्हॅलेंटाईन डे ची तयारी करत असेल जोरात.
बाकी फटु आणि वृत्तांत आवडेश.
4 Feb 2014 - 10:43 am | प्रचेतस
कट्टा वृत्तांत आवडला.
कट्टा वृत्तांताच्या निमित्ताने मुवि लिहिते नसणार्या मिपाकरांनाही लिहिणे भाग पाडत आहेत याबद्दल त्यांचे खास आभार.
4 Feb 2014 - 11:18 am | मुक्त विहारि
पहिली गोष्ट ===> खरं तर प्रत्येक व्यक्तीकडे लेखनाचा गूण असतोच.पण शाळेत असतांना त्या गुणाचे म्हणावे तसे चीज़ होत नाही. आणि आपली शालेय संस्कुती त्या पैलूला झळाळी आणण्यासाठी जास्त मदत पण करत नाही.
व्यावहारीक शिक्षणानंतर. लेखन काम होते ते फक्त ऑफीसच्या कामासाठी किंवा कौटुंबिक कार्या साठी.
दुसरी गोष्ट =====> अशी की, कट्टा आयोजन हा एक भाग झाला,आयोजकाचे काम हे फक्त कट्ट्याची संकल्पना लोकांपुढे मांडण्या पुरते आणि किती जण नक्की येणार ह्याची यादी करण्या इतपतच असावे.कट्ट्याचे मार्गदर्शन (जसे जिजामाता कट्टा, ह्याच आठवड्यात होणारा "काळा घोडा कट्टा",एप्रिल्/मे मध्ये होणारा "ओरिगामी कट्टा"...मार्गदर्शक "सुधांशू नुलकर") एकाने करावे आणि ज्याने/जिने अद्याप एक पण लेख लिहीला नाही, त्याने/तिने व्रुत्तांत लिहावा..अशी साधारण योजना आहे.
कट्टा हा नेहमीच लोकांच्या सहभागाने यशस्वी होतो.
4 Feb 2014 - 11:30 am | प्रचेतस
अगदी सहमत.
4 Feb 2014 - 11:37 am | सुहास..
स्पा कट्टा संपतांना आले. >>
आले ??
स्पा काकांना उशीर का झाला याची विचारणा केली नाही का ;) कदाचित काकुंची परवानगी मिळायला त्यांना उशीर झाल असेल ..
पहिल्या लिखाणाला संभाळुन घेणारा
आजोबा ;)
4 Feb 2014 - 11:48 am | भाते
सविस्तर कट्टा वृत्तांत आणि फोटो, दोन्हीही छान.
डॉ खरे आणि रामदास काका यांची समोरासमोर बसुन अनेक विषयांवर झालेली सविस्तर चर्चा आवडली.
विनोद१८, आता लिहिते झालाच आहात तर येऊ दे आणखी लेख. होऊ दे शाब्दिक खर्च!
4 Feb 2014 - 1:47 pm | शैलेन्द्र
वा मस्तं...
अगदी आग्रहाचं आमंत्रण असुनही यायला जमलं नाही, खरच अपराधी वाटतय..
बाकी, कट्टा नी फोटो.. बेश्ट.. :)
4 Feb 2014 - 2:02 pm | सूड
पहिलाच वृत्तांत आहे म्हणताना बर्यापैकी बरा लिहीलाय.
4 Feb 2014 - 2:12 pm | स्पा
छान आटोपशीर वृतांत :)
ते फोटो जरा आकारात आणेल का कोणी , अमळ ताणले गेलेत
4 Feb 2014 - 2:21 pm | सूड
मी पण तेच म्हणणार होतो. पण आधीच व्याकरणाच्या चूका काढणारा म्हणून नाव झालंय माझं, म्हटलं गप बसावं. ;)
6 Feb 2014 - 11:27 am | बॅटमॅन
अं.ह. झालो.
बाकी वृत्तांत छान जमलाय. हेमांगीके हे एक वयस्कर व्यक्तिमत्त्व असावे असे वाटले होते, त्याला सुखद धक्का मिळाला.
4 Feb 2014 - 3:27 pm | डॉ सुहास म्हात्रे
अरे किती वेळा लिहायचं की "फोटो टाकताना फक्त हवी ती रूंदी टाका, पण उंची रिकामी ठेवा... योग्य ती उंची आपोआप ठेवली जाते आणि चित्रे योग्य आकारमानात दिसतात."
जबरदस्तीने चपटे अथवा बुटके केलेले लोक आणि वस्तू बघायला बरे वाटत नाहीत ;)
(कृहघ्या... पन उप्पर लिखेला मुद्दा बराबरच हाय बर्का ! :) )
4 Feb 2014 - 8:56 pm | श्रीरंग_जोशी
वरील फोटोज लहान करताना आकारमानाचे गुणोत्तर पाळले गेलेले नाहीये. इथे डकवताना रुंदी x लांबी हे बदललेलेच नाहीये. मूळ प्रती उपलब्ध झाल्यास दुरुस्ती करणे काही अवघड नाही.
6 Feb 2014 - 3:05 pm | डॉ सुहास म्हात्रे
चित्रावर राईट क्लिक करून "ओपन इमेज इन न्यु टॅब" निवडले की मूळ प्रत त्वरीत हजर होते. हाकानाका ! :)
4 Feb 2014 - 8:34 pm | किसन शिंदे
भारीच झाला ब्वॉ तुमचा कट्टा!! हेमांगी के यांच्या वयाबद्दल इतर मिपाकरांप्रमाणे माझाही अंदाज सपशेल चुकला. :)
तो दुसरा एक डोंबिवलीकर शैलेन्द्र का नाय आला ब्वॉ??
5 Feb 2014 - 12:58 am | यशोधरा
वयाबद्दल अंदाज करायचाच कशाला मी म्हणते! :P
5 Feb 2014 - 1:16 am | प्रभाकर पेठकर
Men are always Men.
5 Feb 2014 - 9:34 am | इरसाल
बाई असो की बाप्या पयल्यांदा लोकं मनात अंदाज लावत्यातच की ह्यो लिवनारा "असा असा लिवतो" म्हंजे याची पातली काय असनार ?
6 Feb 2014 - 3:46 pm | किसन शिंदे
तेच की..
यशोधरा आयडीवरून मला वाटलं कोणीतरी आज्जीबै असतील, पण तू तर निघालीस काकूबै. :-D
6 Feb 2014 - 3:47 pm | स्पा
खवचट काकूबै :D
6 Feb 2014 - 6:37 pm | यशोधरा
बोल्ले ठाकुर्लीकर!
6 Feb 2014 - 6:39 pm | यशोधरा
चल्ल पळ्ळ ए!
5 Feb 2014 - 12:08 pm | शैलेन्द्र
मी का? नाशिकमध्ये अडकलो होतो..
5 Feb 2014 - 10:34 am | जेपी
*clapping* *BRAVO* :BRAVO: :bravo: :clapping:
6 Feb 2014 - 6:35 pm | विनोद१८
प्रतिसादाबद्दल ...मिपाकरहो.
वरच्या इमेजवर राइट क्लिक करुन 'व्यु इमेज' केले कि मुळ प्रतिमा दिसेल. पहिल्यान्दाच इमेज लोड केल्या, जरा चुकलेच. पुढच्यावेळी सुधारणा होइल. मला कोणी इथे लोडीन्ग्ची साइझ सान्गेल का ??
धन्यवाद.
विनोद१८
6 Feb 2014 - 7:43 pm | डॉ सुहास म्हात्रे
प्रथम उंची-रुंदी न टाकता चित्राचे पूर्वपरिक्षण करून बघावे. चित्र लेखनाच्या चौकटीत बसत असल्यास तसेच ठेवावे.
जर फार मोठे होत असेल (लेखनाच्या चौकटीबाहेर जात असेल) तर:
अ) लॅंडस्केपसाठी ६०० किंवा ६८० पैकी जी आवडेल ती रूंदी ठेवावी..... महत्वाचे म्हणजे ऊंचीची जागा नेहमीच मोकळी ठेवावी, सॉफ्टवेअर योग्य ती उंची वापरून चित्र प्रमाणबद्ध ठेवते.
आ) पोर्ट्रेटसाठी २००, २५०, ३०० अशी उंची टाकून प्रयोग करावा... यावेळेस रूंदीची जागा नेहमीच मोकळी ठेवावी, सॉफ्टवेअर योग्य ती रुंदी वापरून चित्र प्रमाणबद्ध ठेवते.
6 Feb 2014 - 7:48 pm | विनोद१८
धन्यवाद.
7 Feb 2014 - 5:22 pm | सुहास झेले
मस्तच... वृतांत आवडला :)