दोन आठवड्यापूर्वी सकाळी हिंदुस्थान टाईम्सची कॅफे पुरवणी चाळत असताना जहांगीर आर्ट गॅलरीतल्या एका चित्र प्रदर्शनाचा फोटो पाहीला.
फोटो पाहिल्यावर मी मंत्रमुग्ध झालो.पाच दहा मिनीटं माझ्या डोळ्यासमोर रंगपट उलगडत गेला.
तपशील वाचल्यावर कळलं की ही चित्रं प्रदर्शनाचं नाव सौरंगी आहे आणि कलाकाराचं नाव आहे शंकर देवरुखे.
त्या चित्राची मोहीनी एव्हढी जबरदस्त होती की त्या दिवशीचे बाकी सर्व कार्यक्रम रद्द करून मी जहांगीर आर्ट गॅलरीकडे पळत सुटलो.
मनात अनेक शंका होत्या.
आर्टीस्ट भेटेल का?
आपण जर दाद दिली तर ऍकनॉलेज करेल का?
जहांगीरच्या प्रदर्शनाची एक खासीयत असते. आर्टीस्ट फार व्यस्त असतो. आजूबाजूला वार्ताहारांची गर्दी असते.कॅटलॉग संपलेले असतात.त्याला रसीकांशी बोलायला वेळ मिळत नाही.चार शब्द बोलायचे म्हटले तरी ताटकळत थांबायला लागतं.
मी नशीबवान .मी गेलो तेव्हा पाहुण्यांचा एक थवा येउन गेला असावा. पेपरमध्ये फोटो पाह्यल्यामुळे मी शंकर देवरुखे यांना ताबडतोब ओळखलं.
मी अभिवादन करून त्यांना विचारलं की माझ्यासाठी थोडा वेळ ते देऊ शकतील का?
उतार अनपेक्षीत आणि हवंहवंस वाटणारं होतं.
"काका, हे प्रदर्शन रसीकांसाठीच आहे. आणि गॅलरीचा सगळा वेळ मी आस्वादकांसाठीच ठेवला आहे."
त्यानंतर सगळंच सोपं होतं. आमच्या दोघांमध्ये एक समान दुवा पण आम्हाला मिळाला.
मी मिपावर एक लेख लिहीण्याचा प्रस्ताव समोर ठेवला.
"आजच देतो तुम्हाला इमेजेस ".ताबडतोब मान्यता मिळाली.
= = = = = = = = = = =
पंडीत भीमसेन जोशींच्या भाग्यदा लक्ष्मी बारम्माची आठवण झाली हे चित्र पाहताना.या भजनात एक सुंदर ओळ आहे. मज्जीगे योळगेन बेण्णे यंते.
(हे आई, जसे दही घुसळल्यावर लोणी अलगद तरंगायला लागते तशी तू माझ्याकडे ये. )
या चित्रातल्या मातेच्या कुंकुमांकीत कपाळकडे पहा.
पहाटेचं आकाश.प्रभावळ उदयाला येण्यार्या सूर्यासारखी दिसते आहे.
ते आश्वासन देणारे डोळे.कमळाला भार होणार नाही अशा आसनात बसलेली ही देवी.
कुंकुमांकीते पंकज लोचने ...
या चित्रकाराची कमाल आहे.त्याला अनेक रुपं एकाच वेळी दिसली आहेत.
ही ब्रह्मवादीनी सरस्वती.
ही चित्रं रंगातून , मांडणीतून बोलत राहतात.
इथे चार शब्दं लेखकानी लिहीणं म्हणजे रसग्रहणात व्यत्यय आणणं.
शंकर देवरुखे यांनी आणखी काही इमेजेस पाठवल्या आहेत. त्यांची ओळख पुढल्या भागात.
प्रतिक्रिया
29 Sep 2008 - 9:13 pm | लिखाळ
फार सुंदर.. चित्रांतील रंग एकदम मस्त आहेत. मला लाल्-पिवळी रंगसंगती आवडते. जास्त संस्कारित रंग तयार करण्यापेक्षा साधे रंग मला आवडतात.
शेवटचे चित्र फारच सुंदर. सर्व स्त्रियांचे डोळे सारख्या शैलितले दिसतात. टपोरे, भावपूर्ण. आवडले.
रामदासबुवांचे आभार. पुढच्या भागाची वाट पाहतो आहे.
--लिखाळ.
29 Sep 2008 - 9:13 pm | रेवती
३ अप्रतिम! वरची दोन्ही चित्रे दंडवत (चित्रे आणि चित्रकाराला) घालण्याजोगी!
रेवती
29 Sep 2008 - 9:16 pm | प्राजु
अतिशय सुरेख..
खरंच त्या चित्रकाराला दंडवत..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
29 Sep 2008 - 9:49 pm | यशोधरा
सुरेख!!
29 Sep 2008 - 9:54 pm | सहज
तीसरे चित्र सर्वात जास्त आवडले. सर्व चित्रात रंगसंगती जबरदस्त.
पहील्या चित्रात हात जरा वेगळेच दिसत आहेत मला. :-( तसेच त्या देवीचे वस्त्र नक्की काय आहे, निळ्या उभ्या रेषा काय आहेत?
अहो चित्रकला आमच्यासारख्या अरसिकांना कळावी म्हणुन जितके जास्त शब्दात समजवता येईल तितके उत्तम.
29 Sep 2008 - 10:08 pm | भाग्यश्री
तिसरं चित्र मलाही खूप आवडलं! रंगसंगती सहीच आहे!!
इथे आणल्याबद्दल धन्यवाद! :)
29 Sep 2008 - 11:34 pm | विसोबा खेचर
चित्रं केवळ "क्लासिक" आहेत...
देवरुखेसाहेबांच्या कुंचल्यात असलेल्या कलारुपी सरस्वतीस माझे वंदन...!
धन्यवाद रामदासराव...
तात्या.
30 Sep 2008 - 1:13 am | मृदुला
मस्तच आहेत चित्रं. रंगमाध्यमे, शैली याबाबतही माहिती द्यावी.
30 Sep 2008 - 12:20 pm | मदनबाण
अप्रतिम...
व्वा, काका तुम्हाला धन्यवाद.. !!
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
30 Sep 2008 - 2:40 pm | ऋषिकेश
अतिशय अप्रतिम चित्र.. रंगसंगती हरखून टाकणारी.. अत्यंत सुंदर...
३रे चित्र तर अहाहा! भन्नाट!!!!
रामदासजी,
आपले अनेक आभार... यावर माझ्यासारख्या अज्ञजनांसाठी चित्रांवर अधिक भाष्य केलंत तर आवडेल
-('मिसळ'लेला) ऋषिकेश