गाणं की खाणं?

बुडबुडा's picture
बुडबुडा in जनातलं, मनातलं
13 Dec 2013 - 10:26 am

काल दि.१२/१२/१३ पासून सुरु झालेल्या सवाई गंधर्व महोत्सवामध्ये 'गानप्रेमी' रसिकांपेक्षा 'खाणं'प्रेमी रसिकच जास्त होते असं मला वाटत.पोट भरण आणि ते रिकाम करण हे नैसर्गिकच आहे त्याबद्दल काहीच वाद नाही पण त्याचा गाजावाजा किती आणि कुठे करावा याचे मात्र भान राखले पाहिजे. जर या दोन्ही पैकी एकही गोष्ट होत नसेल तर गाजावाजा करण ठीक आहे. :P
मध्यंतरामध्ये निवेदक काही जाहिराती वाचून दाखवत होते आणि माझ्या शेजारी बसलेल्या टिपिकल पुणेरी नाकात बोलणा-या कुटुंबातील एक जण 'वाह.. व्वा.. Heaven' अस ओरडला. आता जाहिरातीमध्ये याला काय भारी वाटले म्हणुन त्याच्याकडे बघितले तर महाशय थालिपिट खात होते..बर तो मराठी नसता.. त्याला थालिपिट म्हणजे काय हे माहित नसते तर ठीक होते.. पण तसेही नाही.. याच्या घरी आई आजीने कधी थालिपिट केलं नव्हतं कि काय असाच मला प्रश्न पडला .. मी हेच माझ्या दुस-या बाजूला बसलेल्या माणसाला म्हटलं तर तो म्हणाला, "करते ना.. याची आई थालिपिट करते.. फक्त चव वेगळी असते.. याची आणि माझी आई एकच आहे.. तो माझा भाऊ आहे.." :P
आता बोला..

कार्यक्रमानंतर जागोजागी पडलेला कचरा हा सर्वांच्याच 'खाणं'प्रेमाची साक्ष देत होता. माझी सर्व रसिकांना एकाच विनंती आहे कि आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या या कार्यक्रमाची पातळी सांभाळण्याची जबाबदारी आपलीही आहे. जस आपण आपल्या चीज वस्तू सामान बरोबर नेतो तसेच केलेला कचराही योग्य ठिकाणी टाकावा आणि पुणेकर म्हणून स्वत:चा मान राखावा आणि महोत्सवाची उंची अजून वाढवावी.

कलाविचार

प्रतिक्रिया

ज्ञानव's picture

13 Dec 2013 - 10:35 am | ज्ञानव

बरोबर. सवाईलाच मी एकदा पहिले होते कि एक जर्मन पिता-पुत्र दोन कार्यक्रमांच्या मध्ये मागे जाऊन काहीतरी खायला घेऊन आले त्यांनी भारतीय बैठक मांडली होती तिथे बसून त्यांनी ते खाऊन घेतले आणि कागद वगैरे सर्व गुंडाळून एका पिशवीत भरून ती पिशवी परत आपल्या शबनम मध्ये ठेऊन पुढचा कार्यक्रम पाहण्यात दंग झाले.
तुमच्या मुद्द्यावर मी एका पुणे काराबरोबर इतका भांडलो कि पोलीस आले आणि मला म्हणाले "जाऊ द्या हो दंगा करू नका " आणि पुणेकर (सपत्नीक असल्याने )"येतोस कशाला त्रास होतो तर..?"
तेव्हा तुमचा दर्द मी समजू शकतो. असो यंदा जमले नाही दुर्दैवाने.

राजेंद्र मेहेंदळे's picture

13 Dec 2013 - 3:06 pm | राजेंद्र मेहेंदळे

दंगा करणे कि सवाईला हजेरी लावणे? *lol* *LOL*

सवाईला जाणे जमले नाही नाहीतर एखादा "शहाणा" दिसतोच मला "वेडा" ठरवणारा मग दंगाही झाला असता पण.......

दर्यावर्दी's picture

13 Dec 2013 - 4:44 pm | दर्यावर्दी

नुसते बघुन ते पिता पुत्र जर्मन होते हे आपण ताडलेत, व्वा क्या बात है तुमच्या अंतर्यामी मनाची...

ज्ञानव's picture

13 Dec 2013 - 6:33 pm | ज्ञानव

हा माझा लेख वाचा उलगडा होईल राव
(माझ्याबरोबर आणि कुणी होते जे त्यांच्याशी बोलत होते त्यांनी माहिती दिली.)सगळे डी ट्टेल लागते बुवा सगळ्यांना ....

अत्रुप्त आत्मा's picture

13 Dec 2013 - 10:59 am | अत्रुप्त आत्मा

काल माझ्याशेजारी बसलेला एक कोल्हा... येणार्‍या/जाणार्‍यांना अजिबात वाट न देता..यांच्यामुळे "रसभंग" होतो,म्हणून बोंबलत होता..आणी स्वतःच्या ऑफिसमधले फोन आल्यावर अतिशय निर्लज्जपणे १०/१० मिनिटं फोनवर बोलत होता. मी दोनचार वेळा त्रासिक नजरेनी त्याच्याकडे पाहिल्यावर सुद्धा त्याचा नूर बदलला नाही. नंतर मधे चहा आणायला उठला,तेंव्हा बाकिच्या लोकांनी त्याच्या नावानी यथेच्छ शिव्या मोजल्या...आणी मी सॅकमधली टाचणी काढून त्याच्या बसायच्या जागी जाजमात लावती, नंतर ती त्याच्या मांडीला टोचली,आणी तो हंगामा करत पुढे बसायला निघून गेला. =)) (शेवटी जसराज सुरु झाले होते..तेंव्हा!)

प्रचेतस's picture

13 Dec 2013 - 7:07 pm | प्रचेतस

.आणी मी सॅकमधली टाचणी काढून त्याच्या बसायच्या जागी जाजमात लावती, नंतर ती त्याच्या मांडीला टोचली,

ते आधी मिरच्या लावून नंतर त्यावर रक्तचंदन लावलं तसंच का? ;)

अत्रुप्त आत्मा's picture

13 Dec 2013 - 9:32 pm | अत्रुप्त आत्मा

अगोबा ढगोबा हत्ती
http://www.pic4ever.com/images/voodoodoll_2.gif
आत्माराम मेणबत्ती

बॅटमॅन's picture

14 Dec 2013 - 12:39 am | बॅटमॅन

अगागागागागागागा =)) =)) =)) :yahoo:

दु दु दु आत्मा =))

अत्रुप्त आत्मा, भले शाब्बास :)
आवडले आपल्याला. लोका सांगे ब्रम्हज्ञान आपण कोरडे पाषाण.

शीर्षक वाचून चपापलो ! पुन्हा पुन्हा बघितलं...
त्यातला अनुस्वाराचा अभाव अनर्थ करतोय शीर्षकाचा :D :) :P
तेवढं जरा सांभाळा बरं का :D

आतिवास's picture

13 Dec 2013 - 11:19 am | आतिवास

शीर्षकात "गाणं की खाणं" अशी दुरुस्ती तेवढी करा बरं संपादकांना विनंती करुन ....

बाकी पुण्यात पीएमटीसारखी सवाईची पण तीच कहाणी आहे वर्षानुवर्षं!

बुडबुडा's picture

13 Dec 2013 - 11:27 am | बुडबुडा

वेल्लाभट, आतिवास

मिपा वरती नवीन आहे आणि त्यात मराठी टाइप करताना जरा गोंधळ होतोय.. पहिलेच लेखन आहे.. यावेळी समजून घ्या.. पुढच्या वेळी अशी चूक नाही होणार..
कृपया अर्थाचा अनर्थ न करता वाचावे हि विनंती :)

सदर शीर्षक एडिट कसे करावे हे सांगितले तर बरे होईल..

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Dec 2013 - 11:38 am | बिपिन कार्यकर्ते

केलं.

आतिवास's picture

13 Dec 2013 - 11:47 am | आतिवास

तेवढं 'कि'चं 'की' पण करा हो!
अवांतरः बाकी या निमित्ताने तुम्ही संपादक (देखील) आहात ही भर पडली ज्ञानात :-)

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Dec 2013 - 2:04 pm | बिपिन कार्यकर्ते

केलं ’की’! ;)

बादवे, आम्ही संपादक नाही! :ड

वेल्लाभट's picture

13 Dec 2013 - 11:41 am | वेल्लाभट

होता है !

चूक बिक कसली मोठी त्यात! बाकी लिहिलंयत ते आवडलं; पटलं. मी सहमत.

विजुभाऊ's picture

13 Dec 2013 - 6:22 pm | विजुभाऊ

मिपा वरती नवीन आहे
अरेच्चा कायतरी गोंधळ होतोय. मस्तकलंदर या नावाची एक व्यक्ती इथे चार वर्षापूर्वी वावरत होती. ती बेंगलुर ला असायची.

बुडबुडा's picture

13 Dec 2013 - 11:40 am | बुडबुडा

धन्यवाद.
पण कस केल?

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Dec 2013 - 11:41 am | बिपिन कार्यकर्ते

तपस्येने मिळणारी सिद्धी आहे ती. सामान्य सदस्यांना बहुतेक उपलब्ध नसावी! ;)

बुडबुडा's picture

13 Dec 2013 - 11:49 am | बुडबुडा

गुरुमहाराज आपण कृपा केलीत तर आम्हालाही हि सिद्धी प्राप्त होऊ शकते.. कृपया या पामरास कसे केले ते सांगून उपकृत करावे ;)

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Dec 2013 - 2:05 pm | बिपिन कार्यकर्ते

ती सुविधा केवळ संपादक इ. लोकांना उपलब्ध आहे. :)

बुडबुडा's picture

13 Dec 2013 - 2:10 pm | बुडबुडा

हो.
ते लक्षात आलच माझ्या.
सांभाळून घेत रहा :)

चित्रगुप्त's picture

13 Dec 2013 - 11:44 am | चित्रगुप्त

असे होय? आम्ही समजत होतो की पुणेकर म्हणजे जगातील सर्वात जास्त सुसंस्कृत लोक होत...

ज्ञानव's picture

13 Dec 2013 - 11:45 am | ज्ञानव

+ १

सुबोध खरे's picture

13 Dec 2013 - 12:35 pm | सुबोध खरे

एके काळी पुण्यात असताना "तुंम्ही सवाई ला जात नाही?" (म्हणजे तुमची अभिरुची किती हीन आहे) किंवा "मी फक्त भीमसेन ऐकतो. बाकीचे काय आहेत असे तसे" असे बर्याच "रसिक आणी प्रतिष्ठित" लोकांकडून ऐकत असे. सुदैवाने तेंव्हा भ्रमणध्वनी नव्हते.
आता काय परिस्थिती आहे ते जरा विस्ताराने कळेल काय?

मधुरा देशपांडे's picture

13 Dec 2013 - 11:37 pm | मधुरा देशपांडे

हो, अजूनही असा एक वर्ग आहे, ज्यांच्या मते सवाई ला न जाणे हे अत्यंत अरसिकपणाचे लक्षण आहे. आणि यापैकी खरोखर गाण्याची आवड असणारे किती आणि केवळ रसिकता दाखवण्यासाठी जाणारे किती हे देवच जाणे.

आदूबाळ's picture

13 Dec 2013 - 12:39 pm | आदूबाळ

याची आई थालिपिट करते.. फक्त चव वेगळी असते

:)) फुटलो वाचून. त्या आईसाहेब आसपास नव्हत्या ना?

बुडबुडा's picture

13 Dec 2013 - 2:28 pm | बुडबुडा

ते बघायला थांबलाय कोण..
पिशवी उचलली आणि जागा बदलली.. नाहीतर माझच थालिपिट झालं असतं ;)

मारकुटे's picture

13 Dec 2013 - 1:00 pm | मारकुटे

पुणेकरांना हल्ली घरी खायला मिळत नाही असल्या हपापलेपणाने बाहेर खात असतात. कित्येक दळभद्री रस्त्यावर हातात घेऊन चालत चालत खातात.

राजेंद्र मेहेंदळे's picture

13 Dec 2013 - 3:13 pm | राजेंद्र मेहेंदळे

शनिवार रविवार घरी जेवायला करत नाहीत म्हणे...मग काय करणार हो? सगळी हॉटेले ओसंडुन वाहात असतात वीकेंडला

तुमचा अभिषेक's picture

13 Dec 2013 - 6:50 pm | तुमचा अभिषेक

पुणेकरांना हल्ली घरी खायला मिळत नाही असल्या हपापलेपणाने बाहेर खात असतात. कित्येक दळभद्री रस्त्यावर हातात घेऊन चालत चालत खातात.

हि मूळ स्टाईल मुंबईकरांची, पुण्याने अनुकरण करायला सुरुवात केली असेल तर कल्पना नाही.
हा पण मुंबईत यात दळभद्रीपणा किंवा हपापलेपणा दिसत नाही हे हि खरे, सूट होते, स्टायलिशच वाटते !

पुणेकरांना हल्ली घरी खायला मिळत नाही असल्या हपापलेपणाने बाहेर खात असतात. कित्येक दळभद्री रस्त्यावर हातात घेऊन चालत चालत खातात.>>>

=)) =)) =)) =)) =))

आयच्च्या गावातं ......काय प्रतिसाद आहे !!!!!!!!!

मस्त कलंदर's picture

13 Dec 2013 - 1:16 pm | मस्त कलंदर

गाणं आणि खाणं दोन्हीही लोकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न असतात, अर्थातच त्यांनी एकमेकांचा रसभंग करू नये याचं सर्वांनाच तारतम्य असायला हवं.

असो, नामसाधर्म्याचं थोडं आश्चर्य वाटलं.. आता जशी मी अर्धवट आणि अर्धवटराव यांच्यामध्ये गोंधळते तसं होईलसं वाटत होतं पण आता लेखनशैली पाहिल्यावर ती शंका राहिली नाही. हुश्श!!

(ओरिगिनल) मक/मकी

पण आता लेखनशैली पाहिल्यावर ती शंका राहिली नाही. हुश्श!!

मलाही आश्चर्य वाटलं होतं चूक आणि एकंदर लेख पाहून - आता 'ती मी नव्हेच' हा खुलासा झाला ..
हुश्श :-)

मस्त कलंदर's picture

13 Dec 2013 - 1:35 pm | मस्त कलंदर

मला इथं मुंबईत आवाज ऐकू आला.. जीव भांड्यात पडल्याचा.. :-)

मिपा वरती नवीन आहे आणि त्यात मराठी टाइप करताना जरा गोंधळ होतोय.. पहिलेच लेखन आहे.. यावेळी समजून घ्या.. पुढच्या वेळी अशी चूक नाही होणार.. हे वाचल्यावर जरा गोंधळ उडाला होता, बर्‍याच दिवसांनी 'मक'चं लिखाण दिसतंय म्हणून वाचलं तर बाईसाहेब चेष्टा करताहेत असं वाटलं, पण नंतर 'कलन्दर' हे 'कलंदर' पेक्षा वेगळं आहे कळलं.

लेखातील तळमळीची टीका पटली. सवाईतील रसिक श्रोते सिंगापुरातल्या कचराफेकू दंगलखोर कामगारांपेक्षा सुसंस्कृत असतील अशी आशा होती.

(अवांतरः मस्त कलंदर् - तुमच्या लिखाणाची वेळ उलटून गेलीये, कधी लिहिताय?)

>>दिवसांनी 'मक'चं लिखाण दिसतंय म्हणून वाचलं तर बाईसाहेब चेष्टा करताहेत असं वाटलं
अनुस्वाराबद्दलचे प्रतिसाद वाचून मलाही प्रश्न पडला मकमावशी शुद्धलेखनात कशी काय चुकली!! ते 'कलन्दर' वाचून ट्युब पेटली.

ऋषिकेश's picture

13 Dec 2013 - 2:15 pm | ऋषिकेश

:) खरोखरच हुश्श!!

मके, अगं जाम गोंधळ झाला माझा. म्हटलं हिला झालं तरी काय? ;)

दर्यावर्दी's picture

13 Dec 2013 - 1:18 pm | दर्यावर्दी

बहुतांश पांढरी चिपाडं आलेली... गाण्यातलं ओ की ठो कळत नसावे...
स्टॉलवर भिकार्यासारख्या नजरेने पदार्थांकडे बघत होते ...काही पांढरे गेंडेपण होते...सवाई म्हणे PBCA लोकांचा मेळावा वाटायला लागला आहे..

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Dec 2013 - 2:12 pm | बिपिन कार्यकर्ते

!!!

किती किती ते पूर्वग्रह? आणि असं एका वाक्यात पार निकाल लावायचं एक अप्रतिम उदाहरण. चालू द्या. शुभेच्छा.

अत्रुप्त आत्मा's picture

13 Dec 2013 - 3:18 pm | अत्रुप्त आत्मा

@सवाई म्हणे PBCA लोकांचा मेळावा वाटायला लागला आहे.. >>> :D http://www.sherv.net/cm/emoticons/eating/popcorn.gif

आदूबाळ's picture

13 Dec 2013 - 10:51 pm | आदूबाळ

ये सब क्या हय?

अत्रुप्त आत्मा's picture

13 Dec 2013 - 11:08 pm | अत्रुप्त आत्मा

कुछ नही .. हम पॉपकॉर्न ल्ये के बैठा है| लगता है,अब .. राग "अवांतर" शुरू हो जाएगा | :D

दर्यावर्दी's picture

13 Dec 2013 - 11:26 pm | दर्यावर्दी

राग अवांतरसाठी आधी अतिअवांतर आलाप ऐका ,मगच राग अवांतर

कवितानागेश's picture

13 Dec 2013 - 2:35 pm | कवितानागेश

हुश्श्य.... विषय बदलला! :)

मकीचा धागा म्हणुन घाई घाईनं उघडला. पुढले काही प्रतिसाद आणि ती विश्वविख्यात स्वाक्षरी न दिसल्याने गोंधळही उडाला .
पण पुढे डायरेक्ट 'घोडी'च्या तोंडुनच खुलासा आल्याने आमचाही जीव भांडयात पडला हो. :)

बुडबुडा's picture

13 Dec 2013 - 4:16 pm | बुडबुडा

अहो माझे नाव बदलायची सोय करा हो कुणीतरी .. :(

मस्त कलन्दर हे नाव घेऊन काहीतरी घोर पाप केल्यासारख वाटतय मला. ;)

अत्रुप्त आत्मा's picture

13 Dec 2013 - 4:44 pm | अत्रुप्त आत्मा

मी सुचवू नाव??? ;)

चित्रगुप्त's picture

13 Dec 2013 - 4:57 pm | चित्रगुप्त

नाव सुचवायचे म्हणता तर हा धागालेखकाने हेही धागे डोळ्याखालून घालावेत असे सुचवतो:
http://www.misalpav.com/node/24707
http://www.misalpav.com/node/24801

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Dec 2013 - 1:08 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

थोडं जास्त लिहीत जा, प्रतिक्रिया, लेख, खरडी काहीही. कलंदर आणि कलन्दर यांच्यातला फरक जाणवायला लागेल.

बाकी लेखाच्या मतितार्थाशी सहमत.

होत अस सुरवातीला पण काही वर्ष येत राहिलात कि आपण आणि गाणं यात एकदा डोळे मिटुन घेतले कि कोणीही येत नाही.

उपास's picture

13 Dec 2013 - 7:53 pm | उपास

मोबाईलमुळे आणि मुख्यत: बेजबाबदार प्रेक्षकांमुळे नाटके/ गाण्यांच्या कार्यक्रमाना रसभंग होतोच. मागे दिवाळीच्या आसपास शिवाजी मंदिरला नाटकाला गेलो होतो आणि पब्लिक पूर्ण वेळ खॉक खॉक करत खोकत होतं, एकही मिनिट असं नाही की कुणी खोकलं नाही... सगळाच विचका नाटकाचा :(
अगदी तान्ह्या पोरांना घेऊन येणार्‍या रसिकांबद्दलतर विचारायलाच नको. 'मी सवाईला गेलो होतो' हे मिरवण्यालाच येतात बरेचजणं..
अवांतर - २००४ मध्ये अण्णांनी भैरवी आळवली होती, त्यानंतर काही योग जमला नाही अजूनपावेतो!:(
- उपास

काय ठरले मग, गाणं की खाणं?

अत्रुप्त आत्मा's picture

13 Dec 2013 - 9:37 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.pic4ever.com/images/157fs837411.gif

यशोधरा's picture

13 Dec 2013 - 11:23 pm | यशोधरा

मिपावर स्वागत. सवाईबद्दल, कोणी कोणी हजेरी लावली, कोणाचे गायन/ वादन कसे झाले? डिटेल्समधे लिहिणार? जायला जमले नाहीये पण वाचायला आवडेल.

आदूबाळ's picture

14 Dec 2013 - 4:24 pm | आदूबाळ

ये बात! वेफर्ससारखं कुरकुरण्यापेक्षा बटाटेवड्यासारखं भरीव काम करण्याचा सल्ला आवडल्या गेल्या आहे!

बॅटमॅन's picture

14 Dec 2013 - 12:42 am | बॅटमॅन

साला एक पर-सवर्ण क्या क्या लघुशंकाओं को जन्म देता है =))

खटपट्या's picture

14 Dec 2013 - 3:41 am | खटपट्या

मस्त कलंदर हा स्त्री आय डी आहे …. आता कळालं

वर बरीच चर्चा गाण्या खाण्या वर झाली आहे आणि विशेषत: कार्यक्रम चालू असताना खाणे यावर लिहिले गेले आहे. त्यात नवीन भर अशी की कार्यक्रम चालू असताना रागांच्या नावाने बनवलेली खास अत्तरेही आता वास घेण्यासाठी उपलब्ध होणार आहेत. आत्ता पर्यंत रागांच्या नावाच्या नऊ अत्तरांची निर्मिती झाली आहे.
वाचा ---
http://www.loksatta.com/pune-news/perfumes-based-on-music-ragas-294943/

तिमा's picture

14 Dec 2013 - 8:42 pm | तिमा

पोट भरण आणि ते रिकाम करण हे नैसर्गिकच आहे त्याबद्दल काहीच वाद नाही पण त्याचा गाजावाजा किती आणि कुठे करावा याचे मात्र भान राखले पाहिज
आधी हा मकीचा लेख आहे असे वाटल्यामुळे, वरील वाक्याचा भलताच अर्थ घेतला. (म्हणजे बटाट्याची भाजी जास्त खाल्ल्यामुळे जो गाजावाजा होतो तो!)