सेन्टी - मेन्टी : वो शाम कुछ ...........

सुहास..'s picture
सुहास.. in जनातलं, मनातलं
7 Dec 2013 - 2:40 pm

एखाद्या पहाडावर, रणरणत्या उन्हात , पायी चालुन शरीर थकलेले असताना , त्याच पहाडावरच्या शिवालयात, नाजुक घंटानाद चालु असताना , फुलांचा सुंगध श्वासात शिरत असताना , पिंडीसमोरच्या , काळ्या कातळाचा पायाच्या तळव्यांना स्पर्श झालाय कधी ? कस वाटत त्यावेळी ? ती मनात येणारी भावना बोलुन लिहुन दाखवता येते ?? येईल ही कदाचित .......पण पुन्हा दुसर्‍या एखाद्या साध्याच मंदीरात गेल्यावर ती अनुभुती येते ? माझ उत्तर आहे ... नाही !! पण मन मात्र त्या अनुभुतीच्या अनुभुतीसाठी कासावीस होतो का ? थांबलोय या देवापुढे आणि डोळे गच्च मिटुन स्मरण करतो आहे त्या शिवालयाच्या पायथ्याशी ...दोन्ही भावना...माझ्याच मनाच्या ...खेळ आहे स्साला !!

वो शाम कुछ अजीब थी, ये शाम भी अजीब है
वो कल भी पास पास थी, वो आज भी करीब है

दहावीच्या वर्षातले ते दिवस, हिवाळ्यातल्या धुंद आणि धुकट , पण सोनेरी सकाळी, हात जोडुन प्रार्थनेला थांबलो आहे, एकरूप व्हायचा प्रयत्न करतो आहे, अचानक तिच्या वेणी तल्या मोगर्‍याच्या सुगंधानी ह्रदय व्यापुन जाते, डोळे आपोआप त्या दिशेला उघडले जातात , ती ही आपल्याकडे बघुन थट्टेखोरपणे हसते आहे असे वाटते , मन ना तिथे एकरुप होत ना इथे ...भासमय.....आभासी ... की ....मनाच्या खोलवर कोंदटलेलं भुत..... नाही .... नाही सांगता येणार ....पुन्हा कधीतरी जबरदस्ती च्या खरेदीतील वधस्तंभाकडे निघालेला चारूदत्त झालेला असताना, तुळशीबागेत अगदी तस्साचा तस्सा सुगध येतो ....बावरं मन पुन्हा तरसत जात, त्या सुगंधाच्या शोधात ...थांबलोय ईथे आणि जगतोय तिथे !!

झुकी हुयी निगाहों में, कही मेरा ख़याल था
दबी दबी हंसी में, एक हसीं सा गुलाल था
मैं सोचता था, मेरा नाम गुनगुना रही हैं वो
न जाने क्यों लगा मुझे के मुस्कुरा रही हैं वो

गुलजार ने १९६९ साली असित सेन च्या खामोशी साठी लिहीलेले हे गाणे, काय विचार करुन लिहीले असेल ! खास करुन पेशंट क्रमांक #२४ साठी . राजेश खन्ना आणि धर्मेन्द्र साठी ...हेमंतदा ने स्वता न गाता द गोल्डन व्हॉईस किशोरकुमार ला का गायला लावला असेल !! सनसनाट म्हणतात ते याला ...शेक्सपियर लिहीतो ......" By your absense , such a good means that I gain, that in my dreams, I embraced you and kissed , same time I enjoyed and missed " एकाच वेळी मी तुझ्या स्पर्शाच्या केवळ स्वप्नरंजनाने रोमांचित ही झालो आणि विरहाने व्याकुळ ही ......

मेरा ख़याल है, अभी झुकी हुयी निगाहों में
खिली हुयी हँसी भी है, दबी हुयी सी चाह में
मैं जानता हूँ, मेरा नाम गुनगुना रही हैं वो
यही ख़याल हैं मुझे के साथ आ रही हैं वो

जीव जातो दररोजच्या रूटीन मुळे ...शेवटचं कधी मनमोकळ हसलो होतो याचा विचार करावा लागतो.....विकांत ही असाच काहीसे ( विषेशतः सणासुदीची) खरेदी नावाची ओंगळ तडजोड करण्यात घालवायच्या बेतात येतो ..खरेदी संपवुन कधी अचानक एखादा जुना शाळकरी मित्र भेटला तर........चांगल्या श्या लाईट-लाईट मोड मध्ये तासभर भेट घडळी तर .....मस्त वाटते .....शाळेमध्ये असणारी क्रेझ नसते त्यावेळी .....पण एकमेकांच्या यशाचा पाढा न वाचता मस्त मनमोकळ्या गप्पा रंगल्या तर ....तो एक तास , पुन्हा त्या विश्वात रमते मन ....पण पुढे चालुन येणार्‍या रूटीनचा ताण वाटत नाही ....मन रिफ्रेश झाल्यासारखे वाटते ....जग आणि जग रहाटी तिच असते ...फक्त दर्ष्टीकोन बदलेला ....

केवळ दोन कडव्यांमध्ये मनाच्या भावनाकल्लोळाची स्थिती गंभीरपणे मांडणारे हे अप्रतिम गाणे, त्याला वाहिदाच्या अभिनयाची जोड ...केवळ निशब्द करणारी .....एक मिसळ बनते ....१८ वेगवेगळ्या गोष्टी पडतात त्यामध्ये ... १९ वा पाव ...त्याची परफेक्ट चव येण्याकरिता , त्या १८ गोष्टींनी स्वता: चा ईसेन्स दिलेला असतो ...या गाण्याच ही असच !! ....गीतकारापासुन ते कोरस पर्यंत सर्वानी आपला ईसेन्स दिला आहे. पुढच्या सर्व पिढ्यांसाठी रिदम म्हणजे काय असते, संगीत म्हणजे काय असते याची जाणीवपुर्वक जाणीव ठेवावी याकरिता ...नक्की ऐका !!

वो शाम कुछ अजीब थी, ये शाम भी अजीब है
वो कल भी पास पास थी, वो आज भी करीब है

काही विग्लींश शब्दांना मराठी प्रतिशब्द न सापडलेला
पेशंट क्रमांक #४८
वाश्या

संगीतप्रकटन

प्रतिक्रिया

प्यारे१'s picture

7 Dec 2013 - 3:05 pm | प्यारे१

आवडला लेख.

(कुणाची तरी आठवण का आली पण? ;) )

नॉन रेसिडेन्षियल मराठी's picture

7 Dec 2013 - 4:01 pm | नॉन रेसिडेन्षिय...

मस्तच आहे हे गाने.अगदि आवडिचे आहे माझ्या!खुप सुन्दर भावना आहेत गान्यात.

प्रकाश घाटपांडे's picture

7 Dec 2013 - 4:06 pm | प्रकाश घाटपांडे

मस्त रे सुहास. हवा हवासा वाटणारा भावना कल्लोळ

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Dec 2013 - 4:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेख आवडला. सुहास काळजी घे. :)

-दिलीप बिरुटे

पैसा's picture

7 Dec 2013 - 4:36 pm | पैसा

सुरेख!

जेपी's picture

7 Dec 2013 - 4:39 pm | जेपी

आवडल .

अनुप ढेरे's picture

7 Dec 2013 - 4:54 pm | अनुप ढेरे

लेख आवडला

एखादा जुना शाळकरी मित्र भेटला तर........चांगल्या श्या लाईट-लाईट मोड मध्ये तासभर भेट घडळी तर .....मस्त वाटते

सहमत !

ज्ञानोबाचे पैजार's picture

7 Dec 2013 - 4:59 pm | ज्ञानोबाचे पैजार

सुहास,
गाणे बर्‍याच वेळा ऐकले होते. पाठही होते पण आज परत ऐकल डोळे बंद करुन एकट्याने ऐकल.
त्या वेळी डोळ्या समोरुन बरेच काही सरकुन गेलं.
आजच्या या अनुभवासाठी धन्यवाद.

प्रचेतस's picture

7 Dec 2013 - 5:12 pm | प्रचेतस

सुरेख लिहिलंयस रे.

भटक्य आणि उनाड's picture

7 Dec 2013 - 7:21 pm | भटक्य आणि उनाड

मस्त लिहिला आहे..

निमिष ध.'s picture

7 Dec 2013 - 7:46 pm | निमिष ध.

खामोशी मधिल सर्वच गाणी सुन्दर आहेत. पण हे गाणे अगदी कळजाला भिडते. लेख आवडला. अजून गाणी येउ द्यात.

मुक्त विहारि's picture

7 Dec 2013 - 8:02 pm | मुक्त विहारि

आवडला...

मैत्र's picture

8 Dec 2013 - 3:17 pm | मैत्र

सुहास.. बरेच दिवसांनी.. आणि इतकं सुंदर गाणं घेऊन.. तितकंच छान लिहिलंयस..
जरा लिहिता हो परत.

बहुगुणी's picture

8 Dec 2013 - 6:24 pm | बहुगुणी

गाण्याच्या निवडीला, रसग्रहणाला आणि आणखी लिहिण्याला...

दिनेश सायगल's picture

8 Dec 2013 - 3:22 pm | दिनेश सायगल

अ प्र ति म!

सोत्रि's picture

8 Dec 2013 - 4:44 pm | सोत्रि

वाश्या,

भारी रे एकदम,ये चेन्नैत पुन्हा टासमाक मध्ये बसू आणि ह्या गाण्यावर बोलू:)

-(सेँटी मेंटी झालेला) सोकाजी

कवितानागेश's picture

8 Dec 2013 - 6:31 pm | कवितानागेश

अतिशय सुंदर. :)

मी_आहे_ना's picture

9 Dec 2013 - 12:40 pm | मी_आहे_ना

अगदी आवडीचं गाणं, त्या अनुभूतीची आठवण करून दिल्याबद्दल धन्स्!

रुमानी's picture

9 Dec 2013 - 12:49 pm | रुमानी

गाणे व लेख दोन्ही सुरेख.......

कुसुमावती's picture

9 Dec 2013 - 1:35 pm | कुसुमावती

आवडता चित्रपट आणि आवडते गाणे दोन्हीची आठवण करुन दिलीत.