आमचेही (देशी) गणगोत

सुनील's picture
सुनील in जनातलं, मनातलं
23 Sep 2008 - 10:55 am

आमची प्रेरणा - मुक्तसुनीत यांचे http://www.misalpav.com/node/2920

"मने मने, अशी वेंधळ्यासारखी इकडे तिकडे काय बघतेस? ती बघ गावची चावडी. आणि तो जो माणूस उभा आहे ना, तो आहे गावचा सरपंच, तात्या अंमळ्नेरकर! "

"काय म्हणालीस? त्याच्या हातातली काठी जनरल डायरच्या हंटरसारखी दिसते?"

"अग, त्याच काय आहे - तात्यानं आता दुसरा घरोबा केलाय. तेव्हापासनं पहिलीच्या कडच्या काहीनी त्यांच्यावर डूख धरलाय. ते येतात कधी मधी त्याला त्रास द्यायला. त्यांना हाकलण्यासाठी ही काठी, बरे?"

"तसा तात्या एकदम व्यवहारी हां. आपण कसे चार-आठ आणे असे सहजपणे उच्चारतो ना तसे तो बे-त्रण लाख असे सहजच म्हणून जातो. पण त्याचं बुधवार-शनिवारच व्रत मात्र भलतच कडक! झेपणार नाय आपल्यासारख्याला!"

"हं आता त्या झाडाखाली बघ. तो माणूस कसा ध्यानस्थ बसलाय. त्यांच नाव आचार्य विनायक महाराज."

"काय म्हणालीस? ही कसली विचित्र पोझ घेतलीय? अग, त्याला समुपदेशासन असे म्हणतात. त्यांनी भारतीय योगशात्राला दिलेली अमूल्य देणगी. आणि ती पालकांची गर्दी पाहिलीस? त्यांच्या समुपदेशासनाचे धडे घेण्यासाठी कोण धडपड त्यांची!"

"आता सांभाळून ग मने, माझा हात अगदी घट्ट पकडून ठेव हो".

"अग, का म्हणून काय विचारतेस? तो समोरचा बोवा दिसला नाही काय तुला? तो बहुरुपी रामदास बोवा! कधी अगदी नवकवी सारखा झोळी घेऊन येतो तर कधी एकदम कडक वर्दीतला पोलीस पाटील. कधी कधी तर अगदी धोतर घालून सटोडियाच्या वेशातदेखिल येतो म्हणतात. मुलांना पळवून नेतो अशी वदंता आहे. काही म्हणतात के तो बहिरुपी नाहीच, चार-पाच वेगळी वेगळी माणसे आहेत. खरे खोटे देव जाणे. आपण आपले सांभाळून रहावे, काय?"

"तो झब्ब्या-लेंग्यातला माणूस कोण असे विचारतेस? अग तो गावचा दादा. राम दादा म्हणतात त्याला. पण नुसताच नावाचा दादा बरे! पूर्वी परटाचा धंदा करीत होता. तेव्हा दुसर्‍याचे कपडे स्वतःचेच म्हणून घालू लागला. गाववाल्यांनी बडव बडव बडवला. तेव्हा परटाचा धंदा सोडून कौलाचा धंदा सुरू केला. आता लोक त्याला कौलारू राम दादा असे म्हणतात!"

"शू. तिकडे बघ. तो भगवी कफनी घातेलेला संत महात्मा दिसतोय? त्यांचं नाव आनंदमार्गी. नेहेमी आनंदाच्या यात्रेला जाणार्‍या फोलपट संप्रदायाचे जनक."

"अग, आता हा फोलपट संप्रदाय म्हणजे काय ते मला नको विचारू हां. कारण मलाही ते धड ठाऊक नाही."

"आणि ती त्या आनंदमार्गीच्या मागे ढोल बडवत जाणारी चष्मेवाली बाई बघितलीस की नाही?"

" काय म्हणालीस, बाई नाही मुलगी आहे? "

"अगं, काय सांगू तुला? ती जादूगार आहे. सध्या एक शष्ठांश झाल्यामुळे मुलगी वाटते पण आहे आज्जीबाई!"

"काय म्हणतेस काय, तिच्या चष्म्याचं भिंग एकदम जाड - अगदी दूर्बिणीसारखं वाटतय?"

"असेल हो, असेल.."

"त्या दुकानातली ती धीर-गंभीर व्यक्ती पाहिलीस?"

"ते आहेत डॉ नानासाहेब!"

"फारच चुरूचुरू बोलतेस हां तू मने, कसले डॉ म्हणून काय विचारतेस? अग, त्यांना कोणताही विषय वर्ज्य नाही. कोणत्याही विषयावर अगदी पैज लावून अधिकारवाणीने बोलतात!"

"त्या दुकानदाराचा चेहरा असा त्रासलेला म्हणून काय विचारतेस? एक तर तो पुण्यातला दुकानदार म्हणजे कपाळावर आठी असणारच त्यातून नानासाहेबांसारखे चेंगट गिर्‍हाइक असल्यावर तो त्रासणारच."

ते असो, तर मी काय सांगत होतो - त्यांच्या व्यासंगाबद्दल! परवाच्या दैनिक मध्यरात्रमध्ये त्यांनी लिहिलेला वेंगुर्ल्यातील सुपारी उत्पादनाचा नौरूच्या अर्थव्यवथेवरील परिणाम हा लेख तू वाचला असशीलच. आणि आता उद्या शिवथरघळ विकास प्रतिष्ठान तर्फे आयोजित ज्ञानेश्वरीतील उभयान्व्ययी अव्यये आणि दासबोधातील शब्दयोगी अव्यये - एक तौलनीक अभ्यास या विषयावर व्याख्यान आहे. आपण जाऊ बरे!"

"दमलीस बाळ? आता थांबू हां. ही डावीकडे जाते ना त्याला म्हणतात क्रमशः गल्ली. गल्लीच्या तोंडाशीच ते विश्रामगृह दिसतय तुला? ते म्हणजे पूर्वीच्या इराण्याच्या हॉटेलसारखे. कितीही वेळ टेका. कोणी काही बोलणार नाही. क्रमशः गल्लीत जाणारे सगळे पांथस्थ त्या विशामगृहातच जातात. बसून बसून कटाळा आला की क्रमशः गल्लीत एक फेरफटका मारून येतात."

"आपण किती वेळ बसायच? काही सांगता येत नाही. मने. बघू प्रयत्न करू लवकर निघायचा. अजून पुष्कळ काही बाकी आहे ना बघायचं!"

स्पष्टीकरण - सदर लेख काल्पनिक नसून त्यातील व्यक्तीरेखांचे कुणाशी साधर्म्य आढळल्यास तो योगायोग समजू नये!

विनोदविरंगुळा

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

23 Sep 2008 - 12:05 pm | विसोबा खेचर

पण त्याचं बुधवार-शनिवारच व्रत मात्र भलतच कडक! झेपणार नाय आपल्यासारख्याला!"

ठीक आहे. आम्ही शिकवू तुम्हाला ते व्रत! :)

आणि ती पालकांची गर्दी पाहिलीस? त्यांच्या समुपदेशासनाचे धडे घेण्यासाठी कोण धडपड त्यांची!"

अरे कसलं आलंय समुपदेशन वगैरे! हा आचार्य विनायक स्वत:च एक सुविचारात भलभलते अर्थ शोधणाणारा वात्रट शिक्षक आहे! :)

बाकी फोलपट संप्रदाय हा शब्द मस्तच! :)

वा सुनीलराव! छानच लिहिता राव तुम्म्ही! येऊ द्यात पुढचेही भाग भराभर! अजून सर्किट, प्रियाली, गटणे, डिलिट चिरुटे, इज्जूभाऊ, इत्यादी बरीच मंडळी बाकी आहेत...:)

आपला,
तात्या अंमळनेरकर.

आनंदयात्री's picture

23 Sep 2008 - 12:13 pm | आनंदयात्री

मस्त .. आवडले.. आन दो और भी !

>>"आणि ती त्या आनंदमार्गीच्या मागे ढोल बडवत जाणारी चष्मेवाली बाई बघितलीस की नाही?"

=))

>>"अग, आता हा फोलपट संप्रदाय म्हणजे काय ते मला नको विचारू हां. कारण मलाही ते धड ठाऊक नाही."

या दिक्षा घ्यायला.

आपलाच,

आद्य हलकट उर्फ हलकटाचार्य उर्फ आंद्या हलकट

हलकट संप्रदाय
मु.पो. मिसळपाव डॉट कॉम

*संस्कृत आणी शुद्धलेखन आमचे ऍड्रिनलिन आहे*

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Sep 2008 - 12:13 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

ह.ह.पु.वा.

... ही कसली विचित्र पोझ घेतलीय? अग, त्याला समुपदेशासन असे म्हणतात ...
... त्यांचं नाव आनंदमार्गी. नेहेमी आनंदाच्या यात्रेला जाणार्‍या फोलपट संप्रदायाचे जनक....
... आता लोक त्याला कौलारू राम दादा असे म्हणतात!
.... ती जादूगार आहे. सध्या एक शष्ठांश झाल्यामुळे मुलगी वाटते पण आहे आज्जीबाई ....
(पंचवीस सक दीडशेचा हिशोब अगदी जुळतो हा!)
... कोणत्याही विषयावर अगदी पैज लावून अधिकारवाणीने बोलतात
=))
काय तडाखेबंद फलंदाजी आहे .... मान गये मुघल-ए-आझम!
आणि आणखी गणगोतांची प्रतिक्षा करत आहेच!

(ढोल बडवणारी) अदिती

विनायक प्रभू's picture

23 Sep 2008 - 12:28 pm | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
मजा आली. तात्यानंतर मानाचा दुसरा गणपती आमचा. सिनिऑरिटी ने जावे राव. इतर कळाकार मंड्ळीना वाईट वाटेल. आणि मापात पाप ठेउ नका. जरा खोलात शिरा.
क्रिप्टीजम मध्ये गुंतलेला
वि.प्र.
केल्याने होत आहे रे
आधी केलेच पाहिजे
(ल का ळ ते तुमचे तुम्ही ठरवा)

आनंदयात्री's picture

23 Sep 2008 - 12:33 pm | आनंदयात्री

केल्याने होत आहे रे
आधी केलेच पाहिजे
(ल का ळ ते तुमचे तुम्ही ठरवा)

लै भारी .. क्रिप्टीक टुकारी !!

*संस्कृत आणी शुद्धलेखन आमचे ऍड्रिनलिन आहे*

जैनाचं कार्ट's picture

23 Sep 2008 - 12:37 pm | जैनाचं कार्ट (not verified)

जबरा !!!!!!!!!!

=))

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

ऋचा's picture

23 Sep 2008 - 12:40 pm | ऋचा

लै भारी!!!
=))
=))
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

अवलिया's picture

23 Sep 2008 - 2:52 pm | अवलिया

उत्तम लेख

आता पुढे कोणाचा नंबर बरे ? :?

बापु देवकर's picture

23 Sep 2008 - 3:01 pm | बापु देवकर

गणगोताची ओळ्ख पट्ते हो...

अनिल हटेला's picture

23 Sep 2008 - 4:30 pm | अनिल हटेला

चलो आगे बढो !!

अजुन बरेच गणगोत शिल्लक आहेत !!

( मापात पाप नाय करायच !!)

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Sep 2008 - 6:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुनील, सदस्यांच्या स्वभावावर मस्त रेवड्या उडवल्या, आवडल्या.
तितकं ते फोलफट संप्रदायाऐवजी 'बोरकरी संप्रदाय' पाहिजे होतं (ह. घ्या )

-दिलीप बिरुटे
(बोरकरी संप्रदायाचा गाढा अभ्यासक )

झकासराव's picture

23 Sep 2008 - 6:48 pm | झकासराव

चलो आगे बढो !!

अजुन बरेच गणगोत शिल्लक आहेत !!

( मापात पाप नाय करायच !!)
>>>>>>>..
हेच म्हणतो :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

रेवती's picture

23 Sep 2008 - 6:52 pm | रेवती

चांगलं लिहिलयं.

रेवती

सुनील's picture

23 Sep 2008 - 9:55 pm | सुनील

सर्व संबंधितांनी ही किंचितशी थट्टा खेळीमेळीने घेतली, याबद्दल धन्यवाद!

अजून बरीच "रत्ने" राहीली आहेत याची जाणीव आहेच. पुढच्या खेपेस त्यांच्यावरही काही लिहू....

सुनील खणखणपाळ

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Sep 2008 - 9:57 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> सर्व संबंधितांनी ही किंचितशी थट्टा खेळीमेळीने घेतली, याबद्दल धन्यवाद!

बस क्या? मज्जा आली वाचायला! आणि इथे येतोच आपण थट्टा-मस्करी करायला मग तुम्ही थोडी मस्करी केली तर रागवायचं का हसायचं?
आणि त्या क्रमशःच्या गल्लीतून लवकरच बाहेर या!

अनामिक's picture

23 Sep 2008 - 10:24 pm | अनामिक

आणि त्या क्रमशःच्या गल्लीतून लवकरच बाहेर या!

कोण बोलतय?
एलियनायटीसेलिया भाग ६ येऊ द्या लवकर...

बाकी सुनीलराव... भाग मस्तं जमलाय...

मुक्तसुनीत's picture

23 Sep 2008 - 10:15 pm | मुक्तसुनीत

सुनीलराव !
थ्री चिअर्स म्यान ! मझा आ गया ! अरे अजून बरेच अतिरथी महारथी शिल्लक आहेत की :-)
लगे रहो खणखणपाळ !!

यशोधरा's picture

23 Sep 2008 - 10:28 pm | यशोधरा

मस्त लिहिलेय! मजा आली वाचायला :)

चतुरंग's picture

23 Sep 2008 - 11:15 pm | चतुरंग

टोप्यांची उडवाउडवी मस्तच.
क्रमशः गल्ली आवडली! ;)

चतुरंग