~~~ तुझीच मी ~~~

प्रिया ब's picture
प्रिया ब in जे न देखे रवी...
18 Nov 2013 - 2:15 pm

असशील का तू स्वप्नातला माझ्या?
असेन का मी ही मनातली तुझ्या?
असतील का आपल्या आवडी सारख्या?
जरी नसल्या, तरी त्या आपण स्विकारुया!!!

असे… आणि ह्या सारखे अनेक प्रश्न होते डोकावत
पहिल्या भेटीनंतरचे माझे अस्वस्थ मन… नव्हते काही कळत
अनेक प्रश्नांनी तू देखील गेला असशील भांबावून
हीच असेल का "ती"? घेईल का सर्वांना सांभाळून?

काही भेटीनंतर निर्णय पक्का केला शेवटी
दोन जीव आलो एकत्र, होतो थोडे अनोळखी
सगळच नवीन असेल, कदाचित सगळ्या नाही पटणार आपल्याला गोष्टी
मात्र समजून घ्यायची आहे ना आपली तयारी?

ही तर आहे फक्त एक सुरुवात...
घर करून राहू आपण एकमेकांच्या मनात
दर जन्मी असेच भेटू, पुढचे जन्म सात

--प्रिया

शृंगारकविता

प्रतिक्रिया

संजय क्षीरसागर's picture

18 Nov 2013 - 2:55 pm | संजय क्षीरसागर

.
घरच्या घरी

शैलेन्द्र's picture

18 Nov 2013 - 3:10 pm | शैलेन्द्र

अरे वा, खुप दिवसांनी मि पा वर :) आपण परत लिहीत्या झालात, आनंद आहे..