प्रियकर : प्रीये, तुझा चेहरा तर एखाद्या आरक्त कमळावर पडलेल्या दवबिंदू सारखा टवटवित दिसतो आहे. आणि मावळत्या सूर्याची कोवळी किरणे हलकेच त्याच्याशी लडिवाळपणा करीत आहे. आहाहा हा.. तुझ्याकडे पाहताना माझे भान कसे हरपून जाते आहे !
प्रेयसी : राजा, तुझे हे साहित्यिक बोलणे मला भारी आवडते. तुला या असल्या उपमा सुचतातच कश्या ते मला कळत नाही.
प्रियकर : ते पहा प्रीये, तळ्यातल्या कमळफुलांनी कसा सुगंध या वातावरणात कोंदून भरला आहे. कमळाभोवती गुंजारव करणारे ते भ्रमर पहा कसे या कोमल समयाला उचित असा नाद करत आहेत.
प्रेयसी : होय ना ! त्यांच्या पूर्वजावर कमळात अडकून रहायची वेळ आली होती आणि तुझ्यासारख्या कुणा साहित्यिकाने एका हत्तीला त्यात आणून ते कमळ तोडायला लावले. आता उगीच कुठेही हळहळ वगैरे वाटावी असे वाटले की नवसाहित्यिक त्यात या रुपकाचा वापर करुन आपण मोठे व्यासंगी असल्याचा आव आणत असतात.
प्रियकर : खरंच प्रीये ! पण आजही हे भुंगे कमळाच्या सुगंधाने धुंद होऊन सायंसमयी त्या फुलातच शिरत असतात. प्रीये खरी प्रीति अशीच असते गं! पहा पहा, कमळदळावर विश्रांती घेत असलेल्या त्या बेडकाने आताच पाण्यात हलके सूर मारला आणि त्यामुळे उत्पन्न झालेले तरंग माझ्याच मनात जणू काही पसरत आहेत असा मला भास होतो आहे.
हा संवाद पुढे वाढवाया की रखवालदाराला आणून या जोडप्याला वाटेस लावायचे ते तुम्ही ठरवा ;)
--लिखाळ.
प्रतिक्रिया
22 Sep 2008 - 4:47 pm | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
हे कुजन ३० मिनिटावर चालले असेल तर ह्या बुवाच्या **वर लाथ घालुन हाकलुन द्यावे. हे काम तिनेच करावे. रखवालदाराची गरज नाही.
वि.प्र.
22 Sep 2008 - 5:17 pm | भडकमकर मास्तर
खरंतर प्रियकर हे उठता लाथ बसता बुक्की या धोरणाच्याच लायकीचे असतात असे प्रख्यात स्त्रीवादी लढाऊ कार्यकर्त्या लवंगलतिका कुरतडकर बाई म्हणाल्या होत्या
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
22 Sep 2008 - 5:39 pm | विजुभाऊ
लवंगलतिका कुरतडकर
याच का त्या ज्यानी चार प्रियकर कुरतडुन खाल्ल्या होत्या
22 Sep 2008 - 6:47 pm | लिखाळ
>>लवंगलतिका कुरतडकर
याच का त्या ज्यानी चार प्रियकर कुरतडुन खाल्ल्या होत्या<<
ही ही ही.. हे लै भारी :)
22 Sep 2008 - 5:12 pm | विजुभाऊ
सहमत ++१ हे असले लाळघोटे बोलणे काय वाचणेही सहन करण्यापलिकडे
एक नाड असेल तर लग्न जमवत नाहीत. तात्पर्य लग्न ठरवायचे असेल तर पायजम्यात निदान तीन चार नाड्या असाव्यात
22 Sep 2008 - 5:15 pm | अवलिया
त्याच्या नाड्याच्या गाठी जाम अडकल्या असतील
मग सुटे पर्यंत काय बोलायाचे म्हणुन साहित्य चर्चा चालु
एक नाड असेल तर लग्न जमवत नाहीत. तात्पर्य लग्न ठरवायचे असेल तर पायजम्यात नाडीच नसलेली बरी
22 Sep 2008 - 9:19 pm | सखाराम_गटणे™
>>त्याच्या नाड्याच्या गाठी जाम अडकल्या असतील
त्या साठीच ईलास्टिक वापरा म्हणुन सांगतोय.
-----
नाडीला घाबरु नका, ज्योतिषाला पैसे देउन पटवा.
22 Sep 2008 - 9:24 pm | लिखाळ
त्यात विजूभाऊ म्हणतात की दोन नाड्या वापरा.. म्हणजे प्रेमालाप पहाटे पर्यंत चालू ठेवायला लागतील :)
23 Sep 2008 - 7:05 pm | अवलिया
त्या साठीच ईलास्टिक वापरा म्हणुन सांगतोय.
अरे खरेच तु लहान आहेस अजुन....
नाडी अडकली तर कात्रीने तोडता येते... ईलास्टिक काय नुसते कीती ताणले जाते हेच पहाणार रे तु?
लुंगी वापरा लुंगी - सुटसुटीत अन वायुविजन पण चांगले होते
22 Sep 2008 - 5:37 pm | भडकमकर मास्तर
अहो प्रियकर लोकच ते... असलं काहीबाही बोलावं लागतं बर्याचदा...
हे बघा...
आंब्याची कोवळी पालवी ही देखील काहितरी आनन्दाने गुणगुणत असते असेच वाटते. तल्लीन होऊन गाणारा गायक , स्वत:च्याच नादात मग्न होऊन बाहुलीशी खेळणारी लहान मुले , स्वत: घडवलेल्या घाटदार माठाकडे तृप्तीने पहाणारा कुंभार ही त्या क्षणी एकदम सुंदर दिसत असतो.
_____________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
22 Sep 2008 - 5:40 pm | विजुभाऊ
आबाबाबाबाबाबाबाबाबाबा....आमी बा!!!!!!!!!!!स
तुमची प्यान्ट ढील्ली होत असेल तर जाडी कमी झाल्याची तारीफ करू नका, हे मान्य करा की प्यान्टची नाडी ज्योतिषा कडे विसरलात
प्यान्ट सावरणारा विजुभाऊ
22 Sep 2008 - 6:50 pm | लिखाळ
>>आंब्याची कोवळी पालवी ही देखील काहितरी आनन्दाने गुणगुणत असते असेच वाटते. <<
वा वा .. हे मस्त ! फांदी गुणगुणते..भुंगे गुंजारव करतात.. एकंदर अब्यांच्या झाडाखाली 'गडबडच' जास्त ;)
22 Sep 2008 - 9:23 pm | चतुरंग
नुसते अंबा शब्द आला तरी लिखाळांची 'अब्यांच्या' झाडाखाली भबेंरी उडाली! ;)
चतुरंग
22 Sep 2008 - 5:19 pm | सखाराम_गटणे™
प्रेम करताना, साहीत्य चर्चा कसल्या डोबंलाच्या करतात काय माहीत?
-
नाडी सतत विसरत असेल तर इलास्टीक वापरावे.
22 Sep 2008 - 5:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
रखवालदाराला आणून या जोडप्याला वाटे लावावे.
नवसाहित्यिक त्यात या रुपकाचा वापर करुन आपण मोठे व्यासंगी असल्याचा आव आणत असतात.
आम्हाला यातला खालील प्रकार महाभयंकर वाटतो.
१) : जी.ए. वाचला का ?
२) : नाही बॉ !
१): जरुर वाच.
पुढील भेटीत
१): काय वाचत आहेस.
२) : जी.ए.
१) : कमाल आहे. जयवंत दळवी वाच.
पुढील भेटीत
२): जयवंत दळवी वाचत आहे.
१) :वपु वाच काय लिहितो, जबरदस्त....
नंतर भेटूच नये असे वाटते, असे वार्तालाप करणार्यांना :)
22 Sep 2008 - 6:53 pm | लिखाळ
>>१) :वपु वाच काय लिहितो, जबरदस्त...>>>
ह्म्म ! वपुंचे नाव आले की मी सुद्धा पळच काढतो.
बरं सर एक सांगा..
तुम्ही कौंतेय/मृत्युंजय वाचले आहे का? कर्णाबद्दल काय बाजू मांडली आहे. ते वाचल्या पासून मला कर्ण आवडायला लागला.. त्याच्या आयुष्यातले कारुण्य..... नसले वाचले तर वाचाच !
--लिखाळ.
22 Sep 2008 - 6:16 pm | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
आपला तर झट म्हण्ता फट म्हण्ता ठ्यांव वर भयंकर विश्वास. आपला उगाच गुळ काढ्ण्याला विरोध.
वि.प्र.
22 Sep 2008 - 10:42 pm | विसोबा खेचर
लिखाळकाका,
संवाद मस्त आहेत...
प्रियकरातला सखाराम गटणे आवडला! :)
आपला,
('केतकी पिवळी पडली..'चा लेखक) तात्या.
23 Sep 2008 - 3:49 am | लिखाळ
लिखाळकाका?? ह्म्म !
'केतकी पिवळी पडली..' हे आवडले.
--लिखाळ कुडचेडकर.
22 Sep 2008 - 11:35 pm | बिपिन कार्यकर्ते
ह्या प्रियकराला पण 'बोळायटीस' ह्या असाध्य व्याधीने ग्रासलेलं दिसतंय... रखवालदाराला बोलवून वाटेला लावण्याऐवजी तेवढा बोळा काढला की झाले. हाय काय अन् नाय काय.
बिपिन.
23 Sep 2008 - 7:01 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
बोळायटीस!
=))
23 Sep 2008 - 12:04 am | धनंजय
ती त्याला प्रश्न विचारते, तो उत्तरे द्यायचे सोडून आपलेच चालू ठेवतो आहे...
ती त्याला अजूनपर्यंत हाकलत नाही त्याची कारणे :
१. ती त्याच्या मोटरसायकलवर डबलसीट बसून डबक्यापाशी आली आहे. बोलता बोलता बाईकची किल्ली कशी लंपास करावी, त्याला बेडकांसोबत सोडून एकटीनेच परत जावे असा कट ती करते आहे.
२. फक्कड कोल्हापुरी मिसळ खिलवण्याच्या बोलीवर त्याने तिला रंकाळ्यावर आणले आहे. बकवासाने बकाबक-आस अजून मारलेली नाही.
३. १+२
23 Sep 2008 - 12:12 am | यशोधरा
=))
23 Sep 2008 - 12:27 am | प्रियाली
प्रियकर : खरंच प्रीये ! पण आजही हे भुंगे कमळाच्या सुगंधाने धुंद होऊन सायंसमयी त्या फुलातच शिरत असतात. प्रीये खरी प्रीति अशीच असते गं! पहा पहा, कमळदळावर विश्रांती घेत असलेल्या त्या बेडकाने आताच पाण्यात हलके सूर मारला आणि त्यामुळे उत्पन्न झालेले तरंग माझ्याच मनात जणू काही पसरत आहेत असा मला भास होतो आहे.
प्रेयसी: राजा, त्या बेडकाने पाण्यात नाही माझ्या मनाच्या डोहात सूर मारला. एक चुकार विचार मनात आला की तो बेडुक तू असतास तर रे प्राणसख्या!
प्रियकरः लावण्यलतिके, तुझ्यासाठी बेडुक होणंही मला मान्य आहे. त्या बेडकाच्या बटबटीत डोळ्यांनी तुला डोळेभरून पाहतानाचा आनंद अवर्णनीय असेल. त्या बेडकाच्या आवाजात तुझ्याशी प्रेमालाप करण्यासाठी जीव कासाविस होतो आहे.
प्रेयसी: बेडकाच्या आवाजात, लाडक्या?
प्रियकरः हो हो, बेडकाच्या... हे बघ असे हृदयेश्वरी...रिबिट रिबिट रिबिट!
प्रेयसी: आता मलाही साद द्यायला हवी ना राजा, ड्रांव ड्रांव ड्रांव!
प्रियकरः रिबिट रिबिट रिबिट!
प्रेयसी : ड्रांव ड्रांव ड्रांव!
प्रियकरः रिऽब्बिट...रिऽब्बिट
प्रेयसी: डरांव...डरांव
रखवालदारः ए फुटा लेकांनो... क्रिप्टिक बोलण्यासाठी दुसरी जागा शोधा. ;)
23 Sep 2008 - 12:29 am | लिखाळ
रखवालदारः ए फुटा लेकांनो... क्रिप्टिक बोलण्यासाठी दुसरी जागा शोधा.
या संवादावर हा कळस आहे... अतीउत्तम !
मी गडबडा लोळून हसतो आहे.
--लिखाळ.
23 Sep 2008 - 12:35 am | चतुरंग
रिबिट्..रिबिट्..ड्रांव..ड्रांव..
ए फुटा लेकांनो, क्रिप्टिक बोलण्यासाठी दुसरी जागा शोधा!!
प्रेमालापाचे एकदम भयालापात झालेले रुपांतर बघून थक्क झालो! :O
(खुद के साथ बातां : प्रतिभा, प्रतिभा म्हणतात ती हीच का रे रंग्या? B) )
चतुरंग
23 Sep 2008 - 7:05 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
(खुद के साथ बातां : प्रतिभा, प्रतिभा म्हणतात ती हीच का रे रंग्या? )
नाही नाही, ही प्रतिभा नाही, ही तर आपली 'खत्तरनाक' भयाली, आपलं ... प्रियाली!
23 Sep 2008 - 6:27 pm | भडकमकर मास्तर
पाल बेडूक आणि ट्रक एकदा नदीकाठी क्रिप्टिक बोलत बसलेले असतात...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
23 Sep 2008 - 6:48 pm | प्रियाली
पाल, बेडूक, ट्रक यांच्या जोडीला काही अस्वले येऊन मास्तरांचे क्लासेस जॉईन करायचे ठरवतात. ;)
23 Sep 2008 - 7:19 pm | लिखाळ
>>पाल बेडूक आणि ट्रक एकदा नदीकाठी क्रिप्टिक बोलत बसलेले असतात...<<
:)
प्रियकराने असे (म्हणजे प्रेमालापात लिहिले आहेत तसे शाब्दिक) तारे तोडल्यावर पालीकडे चुकचुकण्याशिवाय काय पर्याय राहणार !!
--लिखाळ.