मंगेश पाडगावकरांची माफी मागून
झोपेत वर्गात येणे, अन येऊन पुन्हा झोपणे
ओळखून आहेत सारे , presenty साठी तुझे फक्त येणे
भर दुपारी लेक्चर ला, पेंग तुला का यावा
लागताच डोळा तुझा, प्रश्न नेमका तुलाच विचारावा
तुझ्याच पेंगुळलेल्या डोळ्यांनी तुझ्याशी असा दगा का करावा
तुझ्या निर्भत्सनेचा अर्थही तुला न उमगावा
फेकलेल्या खडूचा नेमही चुकावा
झोपेतल्या बरळण्याला तुझ्या, कोणी आपला अपमान का समजावा
घेता छोटी डुलकी तू, अचानक यावा मोठा वारा
अन जागी होऊन तू, करावास कुठे आहे मी चा देखावा
अन वर्ग सारा हास्य कल्लोळात बुडावा
प्रतिक्रिया
22 Oct 2013 - 3:39 pm | ज्ञानोबाचे पैजार
लाजुन हासणे चे हे विडंबन असेल तर अजून मस्त करता आले असते.
दुसरे कोणते गाणे असले तर पास.
22 Oct 2013 - 3:51 pm | पल्लवी मिंड
लाजुन हासणे चेच विडंबन आहे...अजून मस्त करता आल असत , पण मला काही जमुच नाही......
22 Oct 2013 - 4:25 pm | ज्ञानोबाचे पैजार
कोई बात नही, फिरसे ट्राय करो, नक्कीच जमेगा,
22 Oct 2013 - 4:46 pm | भडकमकर मास्तर
मी ट र
मी ट र
मी ट र
22 Oct 2013 - 5:00 pm | पल्लवी मिंड
???????
22 Oct 2013 - 6:07 pm | मुक्त विहारि
आवडले...
22 Oct 2013 - 6:17 pm | पल्लवी मिंड
मनापासून आभार...
22 Oct 2013 - 6:19 pm | मुक्त विहारि
लिहीत रहा...
22 Oct 2013 - 6:09 pm | सूड
कोणत्या गाण्याचं विडंबन म्हणे हे??
22 Oct 2013 - 6:11 pm | मुक्त विहारि
https://www.youtube.com/watch?v=XA_0pjEM0Dk
22 Oct 2013 - 11:51 pm | सूड
मी 'चला सख्यांनो हलक्या हाती नखानखावर रंग भरा' च्या चालीत वाचून पाहात होतो.
22 Oct 2013 - 10:16 pm | भटक्य आणि उनाड
धमाल लिहिले आहे..