यायचे कुठुनसे तेव्हा
ढग दाटुन एकाएकी
स्पर्शून जायची मजला
प्रीतीची लाट अनोखी
उधळीत पेटता श्वास
'तो' कवेत मजला घेई
परि आर्त क्षणांना तैशा
कधि मेघ बरसला नाही..!
अन् आज दाटले मेघ
ही सांज कोंडली आहे ..
अन् आज अधिर श्वासात
ही प्रीत मांडली आहे
अन् अवचित आज खुळासा
नभि मेघहि बरसुन जाई...
पण कवेत मजसी घेण्या,
आज 'तो' राहिला नाही!
© अदिती जोशी
11.6.2013
http://unaadpaus.blogspot.com
प्रतिक्रिया
21 Oct 2013 - 4:36 pm | कवितानागेश
छान. :)
22 Oct 2013 - 12:06 am | अत्रुप्त आत्मा
निर्मळप्रेमी करुणं रसिकं काव्य! :)
22 Oct 2013 - 12:12 am | एस
तिसरे कडवे किंचित ओढूनताणून आणल्यासारखे वाटले. बाकी सर्व मस्तच. विशेषतः गेयता व नादोमयता, मीटर चांगले आहे.
खूपखूप शुभेच्छा.
22 Oct 2013 - 3:22 pm | psajid
छान कविता आहे. आवडली
22 Oct 2013 - 3:30 pm | पल्लवी मिंड
आवडली , मस्त आहे
22 Oct 2013 - 5:27 pm | आनंदमयी
_/\_ मनापासून आभार...