पुन्हा नव्याने फुलती स्वप्ने
पुन्हा नव्या उलगडती वाटा
पुन्हा नवी अधरांवर लिहिली
नाविन्याची लोभस गाथा
अस्तित्वाचा नवा अर्थ अन्
जगणे सारे नवेच झाले
बुरसटलेले पाश तोडुनी
नवे पाखरू नभी उडाले...
नव्या नव्याची नवलाई ही
व्यापुन घेते सारे जीवन
नव्या नभीची नवीन बिजली
छेदून जाते जुने कृष्ण घन
नव्या सुरांची नवी भुपाळी
नवी सुगंधी पहाट गाते
अधीर राधा पुन्हा नव्याने
श्यामनिळ्याची होऊन जाते!!
© अदिती जोशी
11.6.13
प्रतिक्रिया
20 Oct 2013 - 3:49 pm | चाणक्य
छान झालीये कविता.
20 Oct 2013 - 3:55 pm | प्रचेतस
परत एकदा जयदेव कवीचे कौतुक वाटून गेले.
20 Oct 2013 - 7:53 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
सुरेख रचना...
पुलेशु
20 Oct 2013 - 8:01 pm | BONGALE SANTOSH...
खुप छन
20 Oct 2013 - 9:39 pm | आनंदमयी
माझी ही इथे पोस्ट केलेली पहिलीच कविता ...तुम्हा सर्वांच्या प्रतिक्रीया वाचून आनंद झाला! धन्यवाद!!
20 Oct 2013 - 10:29 pm | अत्रुप्त आत्मा
@पुन्हा नवी अधरांवर लिहिली
नाविन्याची लोभस गाथा>>> जबरदस्त...! :)
20 Oct 2013 - 11:40 pm | आनंदमयी
मनापासून आभार...
21 Oct 2013 - 4:19 am | स्पंदना
फारच उत्कट!
मस्त!
21 Oct 2013 - 8:50 am | इन्दुसुता
आवडली.
तुमच्या आणखी कविता वाचायला आवडतील.
21 Oct 2013 - 10:09 am | आनंदमयी
आपणास माझी कविता आवडली हे वाचून आनंद झाला!! माझ्या आणखी कविता वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला http://unaadpaus.blogspot.com अवश्य भेट द्या
अदिती जोशी
21 Oct 2013 - 12:06 pm | रुमानी
सुरेख.....!
21 Oct 2013 - 6:29 pm | सुधीर
कविता आवडली.
21 Oct 2013 - 9:03 pm | पद्मश्री चित्रे
कविता आवडली.
22 Oct 2013 - 10:17 am | ज्ञानोबाचे पैजार
अतिशय आवडली.
नवी स्वप्ने जुनी झाली की पुन्हा
नव्याने नवी स्वप्ने पहायची
हा क्रम अव्याहत सुरु ठेवायचा
न संपणार्या गोष्टी सारखा
न थकता,न कंटाळता,न वैतागता
जो पर्यंत कुडीत प्राण आहे तो पर्यंत
22 Oct 2013 - 2:58 pm | मेघवेडा
आह्हा! सकस काव्य. :)
22 Oct 2013 - 5:19 pm | आतिवास
वा! सुरेख!!
22 Oct 2013 - 5:25 pm | आनंदमयी
_/\_ मनापासून आभार...