गर्भपात होतोय तुझ्या आठवणीचा
२-३ रात्रीची अखंड भेट आपली,
आज मात्र आठवणींचा गर्भ धरतो न् धरतो तोच पडतो..
अशा या उघड्या डोळ्यांनी भोसकलेल्या रात्री..
मी टक्क जागा
कोण कुठली तू
कानी किणकिणतेय तुझी गझल...
'कसली आहेस ग तू'
नुसती गझल..
आलीस कधी गेलीस कधी कळलचं नाही
गेलीस???
नाहीच
तू येतेस आणि भोसकून जातेस या रंगेल रात्रीला...
आरपार ...
प्रतिक्रिया
20 Sep 2013 - 2:12 am | जेनी...
ह्म्म !
समजली नाहि माफ करा !
थोडा सारांश साण्गाना फुंटी काकु
20 Sep 2013 - 11:50 am | संजय क्षीरसागर
>२-३ रात्रीची अखंड भेट आपली,
आज मात्र आठवणींचा गर्भ धरतो न् धरतो तोच पडतो..
= गर्भात गडबड दिसते.
>अशा या उघड्या डोळ्यांनी भोसकलेल्या रात्री..
मी टक्क जागा
= गर्भलींग निदान आवश्यक! (कवितेच्या भूमिकेचे)
>कोण कुठली तू
कानी किणकिणतेय तुझी गझल...
'कसली आहेस ग तू'
नुसती गझल..
= मायला! गझलेचा गर्भपात आहे होय!
>आलीस कधी गेलीस कधी कळलचं नाही
गेलीस???
नाहीच
= म्हणजे नक्की काय? गर्भपात होतोयं का नाही?
>तू येतेस आणि भोसकून जातेस या रंगेल रात्रीला...
आरपार ...
= धिस इज नॉट अलाऊड. गर्भपाताच्या ऐवजी भोसकाभोसकी? बरं एवढं करून कविता कशी बाळंत झाली? हा प्रश्न उरलाच!
20 Sep 2013 - 12:19 pm | फुंटी
पूजा आजी,अहो,कळलीच पाहिजे असं कुठाय??
20 Sep 2013 - 12:29 pm | फुंटी
संजय ,जगता तेच लिहिता त्यामुळेच एकूण सगळ अवघड आहे.(हलकेच घ्या);-)
20 Sep 2013 - 1:08 pm | संजय क्षीरसागर
एकतर नांव इकारांत त्यामुळे पूजाचा गैरसमज. `पुरुषाचा गर्भपात' हा त्याहून मोठा झोल. आणि गर्भपात होऊन कविता बाळंत झाली हा पुन्हा क्लायमॅक्स!
20 Sep 2013 - 1:50 pm | अत्रुप्त आत्मा
@आणि गर्भपात होऊन कविता बाळंत झाली हा पुन्हा क्लायमॅक्स!>>>> =)) =)) =))
20 Sep 2013 - 2:31 pm | फुंटी
संजय, जे न् देखे रवी..मध्ये जगतो तेच लिहायचं म्हटल्यावर असे गोंधळ होणारच..असो..आपल्या बहुमुल्य गर्भलिंग निदानाबद्दल धन्यवाद.
20 Sep 2013 - 6:46 pm | जेनी...
अग्गं फुंटी काकु रागाव्तेस काय गं अशी :-/
20 Sep 2013 - 7:42 pm | फुंटी
नाही ग पूजा आजी, पोर लहान आहेत..धिंगाणा घालणारच...बळेबळे ओरडावं लागत...चड्डीत सुसू करायचे दिवस आहेत...असो.
20 Sep 2013 - 11:15 pm | चिगो
बिभत्सरसातले प्रेमकाव्य.. पहील्या ओळीतच हादरलो..
21 Sep 2013 - 3:06 am | अग्निकोल्हा
हम्म आठवण बाळसं धरते हिच एक अल्हाददायक भावना आहे अन तिची अशि कृ विटंबना घडते ? क्या बात है पहिल्या ओळित फिदा.
दॅट्स वे बिगर दॅन मिअर वन नाइट स्टँड
शरिर असो वा मन थकवा येणारच इलाज नाही.
पुन्हा पुन्हा वाचावे अशिच रचना. इथेच थांबु नका लिहीत रहा.
21 Sep 2013 - 5:14 am | टिवटिव
शरदिनीताईंची आठवण झाली.
22 Sep 2013 - 6:13 pm | पैसा
प्रेमकाव्य? कविता चांगली आहे पण भयानक प्रेमकाव्य वगैरे काहीतरी क्याटेगरी पायजे होती.
22 Sep 2013 - 9:40 pm | पाषाणभेद
jabaraa kaavya. ekadam gungun gelo. mast.
22 Sep 2013 - 10:32 pm | फुंटी
सर्वांच्या बऱ्यावाईट प्रतिसादाबद्दल धन्यवाद..._/\_...माझ्या चुका नक्कीच काढा...टीकाही करा....सुधारणा सुचवा...पुन्हा एकदा धन्यवाद.
23 Sep 2013 - 5:12 am | स्पंदना
lahanapani ek kavita mhanayacho amhi.."kona aal? koNa aal? ghaaTaavarachee jaakhiNa aalee, piMpaLaavarchaa muMjaa aalaa.." tyaachee aaThavaN aalee.
kavitaa Chaan aahe. baakichyaa kavitaapaN vaachaayalaa aavaDateel.
23 Sep 2013 - 5:38 pm | फुंटी
धन्यवाद अपर्णा अक्षय ..
23 Sep 2013 - 6:22 pm | कवितानागेश
न कळण्यासारखे काही नाही कवितेत. येऊ देत अजून कविता
23 Sep 2013 - 8:50 pm | सस्नेह
कविता वाचून गर्भगळीत झाले....
30 Sep 2013 - 5:55 am | स्पंदना
यालाच गर्भपात सुद्धा म्हणु शकते स्नेहांकिता. असो.
कविता ही आशयाला धरुन वाचतात. अन तो उलगडणे मह्त्वाचे. शब्दाला शब्द धरुन वाचली तर ती कविता कसली?
1 Oct 2013 - 5:44 pm | निश
कविता आवडली, अजुन कवितांच्या प्रतिक्षेत.