… खूप दिवसांनी एक खल्लास सिनेमा बघितला. लंच बॉक्स. मस्त आहे. आजवर मी बघितलेल्या लव स्टोरी मधली एकदम हळुवार स्टोरी आहे. अगदी अंगावरून मोरपीस फिरवणारी. गुदगुल्या आणि रोमांच. यांचा एकत्रित लेप धमाल आणतो की नाई? अगदी तसं वाटतं लंच बॉक्स बघताना .रितेश बत्रा नावाचा कुणीतरी दिग्दर्शक आहे. नवखा आहे. त्याचा पहिलाच पिक्चर. या पिक्चरची आणखी एक गंमत आहे. नट नट्या पेक्षा निर्मात्यांची संख्या ज्यास्त आहे.
इरफान खान मला जाम आवडतो. त्यामुळे त्याचा सिनेमा बघायला जायच्या आधी आज काही तरी चांगले बघायला मिळणार याची खात्रीच असते. इरफान भोवती फिरते लंच बॉक्सची गोष्ट. हा साजन फर्नांडीस - म्हंजे इरफान - मुंबईत एका सरकारी खात्यात नोकरी करत असतो. जवळपास निवृत्तीला पोहोचलेला. सहाच महिन्यांनी रिटायर होणार असतो. विधुर असतो. बायको काही वर्षांपूर्वी वारलेली. लोकलचा प्रवास, हॉटेलचा डबा, सरकारी खाते, फायली, दृष्टीक्षेपात निवृत्ती, वगैरे … एकूण रटाळ आणि निसंवादी भोवरा फिरत असतो.
निम्रत कौर आठवते … ? बहुतेकांना नसेलच! २००२ साली कुमार साणु याच्या (त्याला घरघर लावलेल्या दिवसात) "तेरा मेरा प्यार" नामक एका विडीयो मध्ये दिसली होती. तो तिचा पहिला प्रयत्न! त्यानंतर अलीकडे डेरी मिल्कच्या जाहिराती मध्ये . निम्रत लंच बॉक्स मध्ये इला ची भूमिका करते आहे . इला टिप्पिकल मुंबईची गृहिणी. सक्काळी लवकर उठून पोरीला तयार करून तिचा डबा तयार करून शेकडो सूचना देत पोरीला शाळेत पाठवणारी. पोरीला टाटा करणारे हात खाली येताच ऑफिसला गेलेल्या नवा-याचा डबा तयार करायला पळणारी. डबेवाला डबा घेऊन गेला की लगेच घरातल्या अन्य कामांकडे वळणारी. वाशिंग मशीन मध्ये कपडे धुवायला टाकताना करमणूक म्हणून रेडीओवर लागणा -या पाककृती ऐकत पुढल्या डब्याचे प्लानिंग करणारी. तिच्या घराच्या वरच्या मजल्यावर राहणा-या देशपांडे बाईंबरोबर स्वयंपाक करता करता साधलेला संवाद ही तिची आणखी एक करमणूक. संध्याकाळी नवरा घरी आला की तिला त्याच्याशी बोलायचे असते. नटून दाखवायचे असते. पण नवरा ना तिच्याशी गप्पा मारतो ना तिची दखल घेतो. एकूण चरफड, रटाळ आणि निसंवादी भोवरा फिरत असतो.
स्टोरी मध्ये मज्जा येते ती मुंबईतल्या डबेवाल्यांमुळे हार्वर्डने नावाजलेले आणि इंग्लंडच्या राणीचा पाहुणचार झोडून आलेले डबेवाले इलाने पाठविलेला डबा तिच्या नवा-याला न देता न चुकता साजन फर्नाडीसला देतात. खानावळीचे जेवण जेवून पकलेल्या साजनच्या आयुष्यात इलाकडून चुकून न चुकता येणा-या डब्यामुळे खमंग मसाला भरला जातो आणि मग सुरु होतो इला आणि साजन मधला संवाद . डब्यांमधून चिठ्या पाठवून सुरु झालेला संवाद त्या दोघांनाच काय पण सिनेमा बघणा-यांना ही सतत अधीर ठेवतो आणि त्या अधिरतेतून उमलत जाते प्रेम, पडद्यावर इला साजन मध्ये आणि पडद्या समोर इला साजन विषयी प्रेक्षकांमध्ये. पडद्यावरली आणि पडद्या समोरची ही गुंतवणूक कमालीची बहरत जाते.
इरफानवर मी पुनश्च फिदा. कसला इनोसंट अभिनय केलाय गड्याने, लाजवाब. पडद्यावर इला - निम्रत कौर आली की तिच्या विषयी असं खूपखूप, म्हंजे असं भरभरून वाटत रहातं. म्हंजे असं काहीही. म्हंजे तिच्याशी जाऊन खूप गप्पा माराव्यात. वगैरे. कम्माल केलीय पोरीने. क-स-दा र ! नवाजुद्दिन सिद्दिकीची भूमिका पण एकदम चाबूक आहे. नवाजुद्दिन आला ना लक्षात? बिद्या बालनच्या कहानी मधला आय बी अधिकारी किंवा आमिरच्या तलाशमधला लंगडा तेहमुर.
सिनेमाची तांत्रिक बाजु मस्त आहे. विशेषत: एडिटिंगने मी पागल झालो. संपूर्ण सिनेमा दोनच गोष्टींनी नटवलाय - संवाद आणि शांतता. शब्द नि:शब्दांच्या खेळात आपण एकतास पन्नास मिनिटे मश्गुल होऊन जातो. चुकीची गाडी सुद्धा कधीकधी योग्य ठिकाणी पोहोचवते या संवादावर पूर्ण चित्रपटाचा रोख आहे. …मला या सिनेमाची एकूण संकल्पना भावली कारण आयुष्यात संवादाचे महत्व अधोरेखित करणारी या सिनेमाची साधी सोपी लुसलुशीत कथा. अन्न वस्त्र निवारा वगैरे ठीक आहे, त्याची गरज माणसाला जगण्यासाठी आहेच. पण जगणा-या माणसाला माणूस म्हणून जगायला आवश्यकता असते ती व्यक्त होता येईल अशी जागा. संवाद ही प्रेमाची सुरुवात तर असतेच पण प्रेम जिवंत ठेवायला संवादाचे इंधन नसेल तर माझ्या मते प्रेम ही नादुरुस्त थांबलेली गाडी आहे.
आहे पण निरुपयोगी !!
प्रतिक्रिया
22 Sep 2013 - 9:26 pm | भ ट क्या खे ड वा ला
बाकी पर ते क्ष पाहिल्यावर लिहू
यादीत समाविष्ट केला आहे.
22 Sep 2013 - 9:48 pm | जॅक डनियल्स
"नवाजुद्दिन आला ना लक्षात ? बिद्या बालनच्या कहानी मधला आय बी अधिकारी किंवा आमिरच्या तलाशमधला लंगडा".....
वासेपुरच्या "फैजल खान" ला कसे काय विसरला तुम्ही ?
बदल घेईल तो तुमचा...;)
23 Sep 2013 - 12:50 am | बॅटमॅन
sabakA badalA legA ye phaijal!!!!
sala marathi type hoina gelay mayla :(
23 Sep 2013 - 5:40 pm | मालोजीराव
तात्पुरता गुगलचा हात पकड
22 Sep 2013 - 9:52 pm | लॉरी टांगटूंगकर
उत्तम परीक्षण, सिनेमा नक्की पाहिला जाईल.
22 Sep 2013 - 10:31 pm | चाणक्य
तुम्ही उत्सुकता वाढवलीत
22 Sep 2013 - 10:49 pm | अत्रुप्त आत्मा
पहाणार होतोच...! आणी आता तर नक्कीच...!
22 Sep 2013 - 11:02 pm | पैसा
सिनेमा इर्फांनखान साठी बघितला असताच. आता तिहेरी कारण आहे.
23 Sep 2013 - 2:00 am | रेवती
Cinema baghaNarach.
23 Sep 2013 - 3:41 am | शिल्पा ब
नक्की बघणार.
23 Sep 2013 - 3:46 am | स्पंदना
kaalach aikala maitreeNee kaDun yaa baddal. aataa pahaaNaarach.
(winglish?)
23 Sep 2013 - 9:22 am | आदूबाळ
बघणार म्हंजे बघणारच!
.
अवांतर: नवाजुद्दीन सिद्दिकीचं पहिलं दर्शन "सरफरोश" मध्ये झालं होतं. कोणाला 'तो' शीन आठवतोय का?
23 Sep 2013 - 10:41 am | जे.पी.मॉर्गन
jo insapekTar saleemanee goLee chaalavlyaavar bhaDaabhaDaa maahitee saaMgato. aayalaa! aajaparyaMta kadhee lakShaat aala navhata :)
je.pee.
23 Sep 2013 - 11:13 am | आदूबाळ
Ek number, JP!
23 Sep 2013 - 8:42 pm | जॅक डनियल्स
हा बघा नवाज सरफरोश मधला
23 Sep 2013 - 12:17 pm | भुमन्यु
23 Sep 2013 - 3:18 pm | rain6100
परीक्षण वाचून सुमारे पाच वर्ष नंतर हा पहिला चित्रपट पाहण्याचे ठरले . आम्ही बाकी हॉलीवूड आणि अंतरराष्ट्रीय गाजलेले चित्रपट ( torrent ) च्या कृपेने बघतो
23 Sep 2013 - 4:39 pm | सुधीर
फक्त ५ वर्ष नाही पण फार महिने झालेत हिंदी शिणेमा पाहून. परीक्षण वाचून चित्रपट पाहण्याचे ठरविले आहे. तसेच "अ गुड रोड" विषयी पण उत्सुकता आहे. कुणीतरी जमल्यास परिक्षण लिहा.
23 Sep 2013 - 8:29 pm | सानिकास्वप्निल
attach baghitlay.... Nimrat Kaurcha abhinay sundar , Irfaan Khan tar BESTACH....prachanda aawadla
avaantar: marathi type hot nahiye.........
23 Sep 2013 - 8:45 pm | सस्नेह
लंच बॉक्स टेस्टी असणार. अवश्य खाल्ला...आपलं, पाहिला जाईल !
23 Sep 2013 - 8:54 pm | शिवोऽहम्
चाबुक परीक्षण!
इरफानमुळे बघितलाच असता हा पिक्चर, पण आता नक्की बघणार लवकर.
24 Sep 2013 - 6:55 am | भाग्यश्री कुलकर्णी
भारती आचरेकरांचा आवाज आहे का यात?कालच त्या रेडीओ एफ एम वर आपल्या न दिसणार्या भुमिकेबद्दल बोलत होत्या.आणी त्या रितेशचा चित्रपट आहे मी लगेच हो म्हणाले असेही म्हणाल्या. म्हणजे ह्या दिग्दर्शकाने अजुन काही चित्रपट केलेत का दिग्दर्शीत? नक्की बघणार.
24 Sep 2013 - 10:30 am | सुधीर मुतालीक
भारतीचा आवाज आहे का ? मस्त !!
खुपच मजा आणलीय या अदृश्य व्यक्तिरेखेने. दिग्दर्शकाची कमाल आहे.
2 Oct 2013 - 4:10 pm | क्रेझी
हो तो आवाज भारती आचरेकरांचाच आहे :) खूप दिवसांनी ऐकला पण अगदी खणखणीत आणि प्रत्येक एक्सप्रेशन एकदम ठळक! म्हणजे पहिल्यांदा डब्यासोबत आलेल्या चिठ्ठीमधे 'थँक्स' लिहीलेलं नाही म्हणून रागवणं असो किंवा अंकलबद्दल केलेले जोक्स असो, खरंच लंचबॉक्स मधे मोजून ४-६ व्यक्तिरेखा आहेत पण सगळ्या अगदी चपखल बसवल्या आहेत.
इरफान च्या शेजारी बसणा-या माणसाचे डब्याकडे आणि इरफानकडे बघणे सुध्दा भारी दाखवले आहे lol
24 Sep 2013 - 10:34 am | garava
नवाजुद्दीन सिद्दिकीचं पहिलं दर्शन "सरफरोश" मध्ये झालं होतं. कोणाला 'तो' शीन आठवतोय का?..
नाही आठवते. कुठल्या रोलमधे होता?
30 Sep 2013 - 5:37 pm | सुधीर मुतालीक
हा लेख गायब झाला होता !
30 Sep 2013 - 5:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मीही नक्कीच पाहीन. चित्रपट परीक्षण आवडले.
-दिलीप बिरुटे
30 Sep 2013 - 5:52 pm | प्रसाद गोडबोले
अतिषय सुंदर परिक्षण !!
चित्रपट उत्तमच आहे !!
४.५ / ५
30 Sep 2013 - 6:22 pm | सूड
दोन तारखेच्या सुट्टीत पाहून घ्यावा म्हणतोय!!
1 Oct 2013 - 5:55 am | मुक्त विहारि
नक्की बघणार.
1 Oct 2013 - 12:41 pm | स्वाती दिनेश
परीक्षण आवडले, सिनेमा बघेन.
स्वाती
2 Oct 2013 - 1:06 am | अग्निकोल्हा
आधि यु हॅव गॉट अ मेलचे मॉडिफाय वर्शन असावे का असा प्रश्न मनात होता. परिक्षण वाचले अन मना ब्लु प्रिंट तयार झाली (होते होते... अति चित्रपट पाहिले की हे ही होते) अन ठरवुन टाकलं चित्रपट हमखास टिवीवर बघितल्या जाइल. याच्यासाठि थेटरात जाणे होणार नाही!
3 Oct 2013 - 3:14 pm | धन्या
मलाही राहून राहून वाटत होतं की अशा मध्यवर्ती संकल्पनेवर आधारीत कुठलातरी इंग्रजी चित्रपट पाहीला आहे. फक्त नाव आठवत नव्हते.
रच्याकने, तुम्ही आत्मशून्य किंवा ग्लिफ किंवा शिवाजी द बॉस यापैकी कुणाला ओळखता काय? ;)
7 Oct 2013 - 1:06 am | अग्निकोल्हा
ग्लिफ बद्दल माझे प्रोफाइलच काहि बोलुन जाते. परंतु आत्मशून्यसारख्या बावळट माणसाशी ओळख वगैरे असण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. (प्रतिसाद एखाद्या सदस्यावर वैयक्तिक हल्ला वाटत असल्यास जरुर उडवावा).
2 Oct 2013 - 1:58 am | प्रभाकर पेठकर
परिक्षणात (की चित्रपटांत?) भयंकर घोळ आहे.
रोज रोज डबा चुकून साजन फर्नांडिसला जातो. मग तिचा नवरा घरी तिला विचारत नाही की डबा का पाठवला नाही? ह्या चित्रपटात अनेकवेळा डबा पाठवला आणि परत आला असणार. त्यातून म्हणे त्यांची चिठ्यांची देवाणघेवाण होते. म्हणजे आज 'चुकून' कुणा भलत्याला डबा पोहोचून त्याने चिठ्ठी पाठविली त्याला तिने उत्तर दिले असेल तर रोजच डबेवाला चुकणार हे तिने गृहीत धरलेले दिसते आहे. एखाद दिवशी 'चुकून' डबा बरोबर पत्त्यावर पोहोचला असता तर तिची चिठ्ठी नवर्याचा हाती पडली असती. मग काय झाले असते?
पण विवाहीत महिलेने परपुरुषा बरोबर प्रेम केले (भलेही फक्त चिठ्या-चपाट्यातून असेल) तर त्याला प्रेम म्हणावे की 'व्यभिचार'? की 'व्यभिचारालाच' उदात्त रुप दिले आहे?
ह्याची उत्तरे परिक्षणातून मिळत नाहीत. कदाचित चित्रपट पाहिल्यास चित्र अधिक स्पष्ट होईल. पण परिक्षण लिहीताना ह्यावर भाष्य अपेक्षित होते.
2 Oct 2013 - 12:19 pm | सुधीर मुतालीक
प्रभाकर बरोबर आहेत तुमच्या शंका . मला आवडले तुमचे प्रश्न. धन्यवाद . उर्वरीत शंकाचे उत्तर चित्रपटात आहे, पण लग्न आणि प्रेम या संबंधातील उत्तर मला मोह होऊनही इथे देता येत नाही. कधी भेटायचा वा बोलायचा प्रसंग आला तर हा मुद्दा मी मुद्दाम ध्यानात ठेवेन. माझ्या एका भारतीय वंशाच्या अमेरिकन मैत्रिणीने याच विषयावर मला झापलंय, ( त्याची गोड आठवण या निमित्ताने झाली. )
2 Oct 2013 - 3:47 pm | प्रभाकर पेठकर
धन्यवाद सुधीर मुतालीक साहेब,
लग्न आणि प्रेम हा विषय २-४ वाक्यात संपणारा नाही. बहुआयामी आहे तसेच प्रत्येक केस मध्ये त्यातील सामाजिक आणि नैतिक प्रभाव वेगळे असतात असे मलाही वाटते. असो.
प्रत्यक्ष भेटीचा योग आल्यास मलाही चर्चा करायला आवडेल.
2 Oct 2013 - 4:36 pm | वेल्लाभट
मला बाबा 'जमला' नाही हा चित्रपट. अपेक्षा खूप होत्या; पूर्ण थोड्याच झाल्या.
2 Oct 2013 - 5:37 pm | मारवा
खुप सुंदर समीक्षा केली हो तुम्ही आता बघितला च पाहिजे हा चित्रपट!
3 Oct 2013 - 3:07 am | प्यारे१
थोडा कमी रिलेट होतो.
अपेक्षांपेक्षा वास्तविकता दाखवली आहे नि ती प्रत्येकानं आपापल्या मगदुरानुसार घ्यावी अथवा तशी व्यक्तिनिष्ठ असावी अशी बहुदा दिग्दर्शकाची अपेक्षा असावी.
3 Oct 2013 - 6:04 am | निनाद मुक्काम प...
अहो प्रभाकर काका
तुम्ही विचारलेले प्रश्नांची उत्तरे त्याने परीक्षणात लिहिली तर सिनेमा काय पहायचा
उलट परीक्षण वाचून डोक्यात काही प्रश्न निर्माण झाले तर सिनेमा पाहून त्याची उत्तरे आपसूक मिळवणे हा मार्ग असतो ,आणि सिनेमा पाहून आपल्याला अपेक्षित उत्तरे मिळाली नाहीत तर सिनेमाच्या व त्यावर परीक्षण लिहिण्याच्या नावाने खडे फोडायला आपण मोकळेच आहोत.
3 Oct 2013 - 10:32 am | प्रभाकर पेठकर
निनाद,
मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद.
माझं मत असं आहे की चित्रपटाचे सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही मुद्दे परिक्षकाने मांडावेत. चित्रपटाची संपूर्ण चिरफाड करावी असे मी म्हणत नाहीए. पण दोन्ही बाबींवर स्वतःचे मत देऊन आणि तरीही वाचकाची उत्कंठा वाढती ठेवून चित्रपट पाहायचा की नाही ह्याचा निर्णय वाचकावर सोडून द्यावा. चित्रपटाचा शेवट किंवा परमोच्च क्षण ह्या बद्दल गुप्तता बाळगावी पण तांत्रिक बाबींवर मत प्रदर्शन जरुर करावे. असो.
3 Oct 2013 - 12:28 pm | डॉ सुहास म्हात्रे
सिनेमा पाहून आपल्याला अपेक्षित उत्तरे मिळाली नाहीत तर सिनेमाच्या व त्यावर परीक्षण लिहिण्याच्या नावाने खडे फोडायला आपण मोकळेच आहोत.
:)3 Oct 2013 - 6:06 am | निनाद मुक्काम प...
तुझा आवडता खान कोणता असा भारतात कुणी प्रश्न विचारला तर पूर्वी व आता मी इरफान असेच उत्तर देतो
त्याच्यासाठी डी डे पहिला व त्याच्यासाठी हा सिनेमा सुद्धा पाहणार
काही लोकांना प्रमोशन ची गरज नाही एवढे मोठे ब्र्यांड ते बनतात
3 Oct 2013 - 10:42 am | अमोल केळकर
छान परिक्षण . नक्के बघू हा सिनेमा !
अमोल
3 Oct 2013 - 1:37 pm | भाते
+१
भारतात आवडता नट/खान कोणता यावर शा.खा. पेक्षा भारताबाहेर इरफान खान जास्त लोकप्रिय नट आहे असे ऐकुन आहे. खरे-खोटे माहित नाही.
7 Oct 2013 - 10:39 am | चाणक्य
अभिनय , एडिटिंग, दिग्दर्शन,कथा, पटकथा,व्यक्तिरेखा सगळंच लाजवाब. पण तरीही मला शेवट विशेष कळला नाही.
आता स्पॉयलर अलर्ट:-
ईरफान शेवटी तिचा शोध घेत तिच्यापर्यंत पोचणार असं दाखवल आहे का? शिवाय तिचं नव-यावर फक्त शर्टच्या वासावरून त्याचं अफेअर चालू आहे निष्कर्षाप्रत येणं हे ही जरा खटकलं.
29 Apr 2020 - 1:30 pm | सुधीर मुतालीक
भीषण नुकसान !
29 Apr 2020 - 1:40 pm | यश राज
भावपुर्ण श्रद्धांजली...
वाईट बातमी.
एक हरहुन्नरी अभिनेता हरपला.
29 Apr 2020 - 1:41 pm | कुमार१
एक चांगला माणूस आणि तितकाच चांगला अभिनेता गेला
आदरांजली.
29 Apr 2020 - 5:12 pm | Prajakta२१
भावपूर्ण श्रद्धांजली
जो आवडतो सर्वांना तोचि आवडे देवाला ह्या ओळी आठवल्या
17 Jan 2025 - 1:41 am | अमरेंद्र बाहुबली
सिनेमा पाहिला. शेवट कळला naahi
17 Jan 2025 - 9:09 am | चौथा कोनाडा
चांगल्या सिनेमाची एक खुण आहे, वर्षानंतरही सिनेमा लक्षात राहतो, त्यातलं कथानक पुसट आठवत राहतं, .. पण सिनेमांनं छान अनुभव दिला हे मनाच्या एका कप्प्यात रुजुन राहतं ...
लंच बॉक्स हा त्यातलाच !