निरोप

यशोधरा's picture
यशोधरा in जे न देखे रवी...
12 Sep 2013 - 3:50 pm

मंडळी, जरा साताठ दिस म्या येला ट्रेकला जाऊन येतू, तंवर नीट करुन र्‍हावा, जास्त धूमशान करु नगा. मिपा बंद पाडू नका. मी ही ग्येले आन ही परतून आलेच! काय बाय मनात आल्येलं लिवल्यालं हाये. यमकं आणि बिमकं मिळेल का; न्हाईती तवा शोदू नये! ~ हुकूमावरुन (कोनाच्या म्हंजी? माज्याच की!)

येत्येच की म्यां जाऊन
तंवर नीट र्‍हावा
गप्पागोष्टी कराल तवा
माजीबी याद काडा
*
दूरची हाय वो वाट
चाल तर व्हनार इक्ती
कुडी अक्षी गळनार
मन भिर्र पाखरावानी!
*
आनभव जगायेगळे
पदरी मीबी बांदीन
सूर्य बगीन, चंद्र बगीन
आभाळ माथा धरीन
*
आसंल कदी चांदनी
सोबतीला येकुलती
वाटंल तिला बगून
आमी जल्माच्या मैतरनी!
*
गोळा करीन आटवनी
आन् गठुडं त्येंचं बांदीन
आन् न्हेमीच मनात जपीन
मपली शिरीमंतीची लेनी
*
वाट चालता चालता
दिस सरुन जात्याल
मुक्कामाला सोबतीनं
अल्लाद आनून सोडत्याल
*
जसा सरंल प्रवास
समदं रितं रितं वाटंल
धा दिशांमदून कसा
बांध मनाचा फुटंल
*
पुन्ना कधी, केव्हा, कुटं
बगायाला ह्ये गावंल?
परतताना नगाधिराजाला
साकडं मग मी घालंल
*
येऊ दे की रं मला
वर्साला दर येकदा तरी
काळजात साठवीन तुला
मन व्हईल समाधानी
*
तर, भ्येटूच आपन लौकर
ती खात्री हायेच मला
आले की उलगडीन
निसर्गाअंगीच्या कळा
*
आता घेत्ये रजा
मागून येक मागनं
यारी दोस्ती इसरु नगा
आपुलकीचं लेनं

कविता

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

12 Sep 2013 - 3:56 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

काय वो हे? जौन जौन कुटं जानार तुमी आसं?

गोळा करीन आटवनी
आन् गठुडं त्येंचं बांदीन
आन् न्हेमीच मनात जपीन
मपली शिरीमंतीची लेनी

यशोधरा's picture

12 Sep 2013 - 4:04 pm | यशोधरा

हिमालयात चाललू न्हवं का.

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Sep 2013 - 4:08 pm | डॉ सुहास म्हात्रे

लै ब्येस... म्हंजी आक्शी जंक्शनच म्हना की वो !

पैसा's picture

12 Sep 2013 - 5:30 pm | पैसा

परत आल्यावं त्ये गठुडं त्यवडं उघडून दावा मंजी झालं. येवा निचिंतीनं!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Sep 2013 - 5:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

निचितीनं जावा....इकडची काय काळजी करु नका. इथं काय घडलं बिघडलं ते आम्ही तपशीलवार इथं लिहू बघा.
हिमालयातून आल्यावर तेवढं वृत्तांत खंग्री लिहा.

प्रवासासाठी शुभेच्छा....!!!

-दिलीप बिरुटे

मोदक's picture

12 Sep 2013 - 6:34 pm | मोदक

+१

स्पा's picture

12 Sep 2013 - 9:39 pm | स्पा

+२

आनन्दिता's picture

13 Sep 2013 - 9:20 am | आनन्दिता

+३

मूकवाचक's picture

13 Sep 2013 - 6:16 pm | मूकवाचक

+४

सोताला सोडून या त्या हिमालयात.

शुभेच्छा!

प्रचेतस's picture

12 Sep 2013 - 6:37 pm | प्रचेतस

हॅप्पी जर्नी.
फोटोसकट वृत्तांताच्या प्रतिक्षेत.

किसन शिंदे's picture

12 Sep 2013 - 10:18 pm | किसन शिंदे

मनाच्या एका कोपर्‍यात साठवा त्याला डोळे भरून बघणं...एवढं एक करा फक्त.

सस्नेह's picture

12 Sep 2013 - 10:31 pm | सस्नेह

आमचाबी नमस्कार सांगा बरं हिमालयाला !

लय हौस फोटुची तू नग करु सये
आधी भरावी नदर मग काळीज ही बये
कुणी उघडावी सांग फडताळीची ही पोथी
काळजाच्या नदरेची आठवण लय मोठी

र्‍हा जपुन ग जीवा नगो अधीर ते भाव
र्‍हा लोकांना धरुन नगो एकांताची हाव
घट्ट धरुन जिमिन घ्यावा आभाळाचा ठाव
काय सांगाव मी यशो तुझामाझा एक गाव.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Sep 2013 - 6:53 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

र्हा जपुन ग जीवा नगो अधीर ते भाव
र्हा लोकांना धरुन नगो एकांताची हाव
घट्ट धरुन जिमिन घ्यावा आभाळाचा ठाव
काय सांगाव मी यशो तुझामाझा एक गाव.

छान.......!

यशोधरा's picture

22 Sep 2013 - 8:22 pm | यशोधरा

किती सुरेख लिहिलं आहेस गं! :)

अग्निकोल्हा's picture

13 Sep 2013 - 9:27 am | अग्निकोल्हा

.

रुमानी's picture

13 Sep 2013 - 5:30 pm | रुमानी

आपल्या प्रवासास शुभेच्छा !!

कवितानागेश's picture

14 Sep 2013 - 1:45 am | कवितानागेश

हायला!! हिमालयात?
येताना माझ्यासाठी एक यति घेउन ये.

यशोधरा's picture

22 Sep 2013 - 8:04 pm | यशोधरा

धन्यवाद! :) आत्ताच परत आले काही वेळापूर्वी! अगदी सुरेख झाला ट्रेक. जीव सुखावला...
करु आता गप्पा बैजवार. :)

स्पंदना's picture

30 Sep 2013 - 5:58 am | स्पंदना

अरे? वापिस भे आ गये आप?
चलो। अभी इत्मिनानसे बाते करेंगे।