आस मिटे ना मन हो चातक थेंब मिळे ना स्वाती
तृषा पाशवी अंतर्यामी असून पाणी भवती
फिरे एकटा मेघ अंबरी आतुर सुकली माती
छळते सावट रंध्रे अनवट ठाव न लागे चित्ती
अंकुर चिंतातूर; दिसे ना किरण सोबती अवती
गुदमर विळखुन विरह दाटला स्तब्ध जाहली नाती
एक साद पवनास विनवते छेड बांधले मोती
झुलव आपला झुला; तोषव ध्यासबावळी धरती
…………………. अज्ञात
प्रतिक्रिया
5 Sep 2013 - 8:04 am | स्पंदना
तोषव ध्यास बावळी धरती........__/\__
5 Sep 2013 - 1:04 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
ध्यासबावळी... हा शब्दच सुंदर आहे, आवडली.
5 Sep 2013 - 4:58 pm | अत्रुप्त आत्मा
+१ टू मि.का.
5 Sep 2013 - 4:09 pm | सुधीर
आवडली.
6 Sep 2013 - 9:24 am | इन्दुसुता
कविता आवडली.