तुही नाही मीही नाही ………….
प्रेमाची रुजुवात झाली होती मनात, पण
बोललो हिमतीने कधीच ….तुही नाही , मीही नाही ………
पावसाची रिप रिपही चिंब करणारी, पण
भिजलो आकंठ कधीच … .तुही नाही , मीही नाही ………
सहजच घडते अशी असते भेट, पण
साधला योगायोग कधीच …. .तुही नाही , मीही नाही …
डोळ्यातली नीरओळ संथ वाहत राहिली, पण
बुडालो पुरात कधीच .… .तुही नाही , मीही नाही ……
समांतर चालत राहिलो एकाकी वाट, पण
थांबलो वळणावर क्षणभर कधीच … .तुही नाही , मीही नाही ………
आठवणींची उजळणी करत राहिलो आयुष्यभर, पण
प्रश्नांना सामोरे गेलो कधीच … .तुही नाही , मीही नाही ………
चढलेल्या वयाचे उतारपण बघत राहिलो , पण ….
कोवळे मन सांभाळले कधीच …..तुही नाही मीही नाही …।
..............तुही नाही मीही नाही …
...........……। फिझा
प्रतिक्रिया
26 Aug 2013 - 11:59 am | संजय क्षीरसागर
म्हणायचंय तुम्हाला?
26 Aug 2013 - 12:38 pm | psajid
काठावर बसून नाही, प्रेम मनसोक्त डुंबून करावे पण ते ….
झोकून,स्व - हरवून केले कधीच…. तुम्हीही नाही आणि त्यांनीही नाही
26 Aug 2013 - 1:24 pm | नित्य नुतन
जीवनाच्या रहाट्गाड्यात अशा किती तरी महत्वाच्या गोष्टी करायच्या राहून जातात.. या कवितेने त्याची आठवण करून दिली ... मनात आले .. आज ऑफिस मधून घरी गेल्यावर पुन्हा एकदा नवर्याला I love you म्हणावे ;-)
26 Aug 2013 - 4:03 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
हे मस्तचं!!
आवडली रचना.
27 Aug 2013 - 4:58 am | स्पंदना
मला तुमच्या सगळ्याच रचना आवडतात फिझा.
सुरेख.
बरच काही वाहुन गेलं, पाला पाचोळा उडवुन गेलं
ओंजळ भरायची राहुनच गेली...