ग बाई तुन्ह नाव शे सुपडाबाई

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
14 Jul 2013 - 3:39 am

मंडळी खालील गीत हे अहिराणी भाषेत (खानदेशी नव्हे) लिहीण्याचा प्रयत्न केला आहे. ही भाषा मला ऐकून ओळखीची आहे परंतु त्यावर माझे प्रभुत्व नाही. यास्तव काही शब्द कमीजास्त असतील तर ते सांगावेत. (अहिराणी भाषेबद्दल येथे माहीती आहे.)

ग बाई तुन्ह नाव शे सुपडाबाई
तू मन्हाकडे का पाहत नाही?
ग बाई तुन्ह नाव शे सुपडाबाई ||

तुन्हा गळा मा सोनानी माळ
तू पायमा बांधस चाळ
तू लाजत लाजत जाई
ग बाई तुन्ह नाव सुपडाबाई ||

तुन्हा घरावर मी मारस चकरा
तुन्हा बाप व्हई का मना सासरा?
मन्ह प्रितेम का तुले दिसत न्हाई
ग बाई तुन्ह नाव सुपडाबाई ||

तुले पाहीनसन व्हयनू मी येडा
तुन्हासाठी मी बाजार धंदा सोडा
जीव जळस मन्हा थोडा थोडा
एखादडाव मनाकडे जरा लय पाही
तुन्ह नाव शे सुपडाबाई ||

तु सकाळ सकाळ बकर्‍यान्सामांगे जास
मी तठे तुन्हा मांगे मांगे येस
तूले तरीबी मना पत्ता कसा लागत नाही
तुन्ह नाव ग सुपडाबाई ||

तुन्हा भावाले मी मित्र करी लेस
तो पैलवान गडी शे मी घाबरस
आप्ला कार्यमा त्यानी ढनढन परवडणार नाही
तुन्ह नाव ग सुपडाबाई ||

आते पाऊसपानी बरा व्हयेल शे
डांळींबनी बाग मी आता लावेल शे
कांदास्ना पैसाबी मना खिसामा शे
यंदा मोसममधार लगीनले मन्ही काही हरकत नाही
तुन्ह नाव ग सुपडाबाई ||

- पाभे

कविताअहिराणी

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Jul 2013 - 10:21 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान. आवडली कविता. तुमच्याकडे लाख पैसे येऊ दे, पण सुपडाबाईला तुम्ही आवडले पाहिजे ना. :)
भाषा आवडली. वाचतांनाही मजा आली. लिहित राहा.

-दिलीप बिरुटे

चित्रगुप्त's picture

14 Jul 2013 - 10:43 am | चित्रगुप्त

लकरच अशी एकादी सीडी येणार म्हणायची:
h

अत्रुप्त आत्मा's picture

14 Jul 2013 - 5:13 pm | अत्रुप्त आत्मा

ढिंड...ढिंड...ढिपांग...ढिंड...ढिंड...ढिपांग...ढिपांग..टिपांग ढांग...!!!

पाभे इज बॅक! :)

प्रभाकर पेठकर's picture

14 Jul 2013 - 6:44 pm | प्रभाकर पेठकर

मस्त.. अहिराणी भाषेचा लहेजा..मराठी, हिन्दी, गुजराथी भाषांचा प्रभाव ऐकायला/वाचायला चांगला प्रेमळ वाटतो. बहिणाबाईंच्या रचना अहिराणी भाषेत आहेत असे वाटते. अशाच अजून कविता येऊ द्या. अभिनंदन.

प्रचेतस's picture

14 Jul 2013 - 7:40 pm | प्रचेतस

अतिशय छान झालीय कविता.
भाषेचा गोडवा पुरेपूर उतरलाय.

निवेदिता-ताई's picture

14 Jul 2013 - 8:06 pm | निवेदिता-ताई

मस्त

लगीनले मन्ही काही हरकत नाही>>क्या बात!!!

पाभेजी, कविता मस्तच शे, अहिराणी मना येस ना पण कविता खूपच आवडे शे!!!!!! जबरीच एकदम.

पैसा's picture

14 Jul 2013 - 8:51 pm | पैसा

आवडली!

सुधीर's picture

14 Jul 2013 - 10:22 pm | सुधीर

कविता आवडली. काही ठिकाणी थोडी गुजराथी सारखी वाटली.

स्पंदना's picture

15 Jul 2013 - 8:04 am | स्पंदना

व्वा पाभे! मस्त!

पाषाणभेद's picture

15 Jul 2013 - 8:20 am | पाषाणभेद

प्रतिसादांबद्दल सर्व रसिक वाचकांचे मन:पुर्वक आभार.

मराठीत अनेक बोलीभाषा आहेत जसे मालवणी, आगरी, वर्‍हाडी, अहिराणी आदी. खानदेश परिसर म्हणजेच जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा व नंदूरबार जिल्हा तसेच या जिल्ह्यांलगत असलेल्या नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालूका (सटाणा), मालेगाव तालूका, कळवण तालूका आदी जिल्ह्यांमध्ये ही बोलीभाषा बोलली जाते. या भागांमध्ये गुजरात तसेच मध्यप्रदेशातील काही भागही येतो. ह्या भाषेवर गुजराती भाषेचे काही संस्कार आढळतात. ऐकायला गोड वाटणारी ही बोलीभाषा प्रमाण मराठी बोलणार्‍याला सहज समजू शकते.

वर उल्लेखलेल्या प्रांतांमध्ये या भाषेचे पोटभेद देखील आहेत. नाशिक जिल्ह्याच्या उत्तर भागात, तसेच नंदूरबार धुळे जिल्ह्यात अहिराणी बोली आढळते. जळगाव जिल्ह्यात खानदेशी बोलीचा प्रभाव आढळतो. या भागांमध्ये आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात वास्तव्य करून आहे. येथील निसर्ग अजूनही संपन्न आहे. नागर संस्कृतीचे अतिक्रमण या भागांमध्ये कमी प्रमाणात आहे. सर्वसाधारण पुर्वपरंपरा, देवआचरण, रितभात या भागातले लोक पाळतांना आढळतात.

ही बोलीभाषा लिहीण्यासाठी मराठी वर्णमाला वापरली जाते.

बोलीभाषांना स्वत:चे असे व्याकरण, शब्दांचे भांडार, उच्चारण शैली असते. असे असतांना प्रमाणभाषेचे बोलीभाषेवर प्रभुत्व जाणवते. बोलीभाषा साधारणत: एखाद्या प्रदेशात बोलली जाते. ती भाषा बोलणारे लोक इतर सरकारी, व्यावहारीक, शैक्षणिक व्यवहार पार पाडतांना प्रमाणभाषेचे सहाय्य घेतात. प्रमाणभाषा कायम बोलणारा व्यक्तीसमूहात मात्र बोलीभाषा बोलणारा व्यक्ती गावंढळ, गावठी, अशिक्षीत आहे असा समज होतो. असे पायंडे पडणे हे बोलीभाषांना मारक आहे.

बोलीभाषांचा योग्य सन्मान हाच भाषाविकासाचा पाया आहे.

गंगाधर मुटे's picture

15 Jul 2013 - 8:49 am | गंगाधर मुटे

मन्हे अहिराणी भाषा अजिबात छमज्यत नै शे.
पण कविता छमज्यली.

मला वाटलं समदा सुपडा साफ यावर कविता केली की काय ! ;) पण कविता आवडली.
आगरी स्त्रीयांच्या नावामधे बर्‍याचदा "बाई" हा शब्द आठळुन येतो...उदा.शांताबाई इ.इ.तसेत भय्या स्त्रीयांमधे "देवी" हा शब्द आढळुन येतो उदा.राबडीदेवी. इ. :)

मदनबाण's picture

15 Jul 2013 - 12:53 pm | मदनबाण
चाणक्य's picture

15 Jul 2013 - 1:18 pm | चाणक्य

मजा आली वाचताना.

इरसाल's picture

15 Jul 2013 - 3:17 pm | इरसाल

प्रयत्न छान आहे.
काही ठिकाणी काही बदल आवश्यक आहेत. महत्त्वाचे म्हणजे अहिराणी भाषेत 'ळ' नाही.
तरी सटाणा-नाशिक भागामधील अहिराणीत ळ वापरला जातो.वेळ मिळताच अजुन टायपतो.