वर्ष २०००. .. कसा तरी मेक्यानिकॅल डिप्लोमा झालो. पुढे काय? (हा प्रश्न माझ्या घरच्यांना पडला होता मला नाही). घरच्यांना वाटले होते १० वि मध्ये ८४ % मिळाले म्हणजे पोरगा इंजिनीर वैगेरे होईल.पण मला तेव्हा हि समजत नव्हते आणि खरे सांगायचे तर आजही माहित नाही मला काय पाहिजे, मला काय आवडते, मला काय करायचे आहे. असो .... काही मित्रांनी BE ला admission घेतली, तर काही जन नोकरी करू लागले. मित्रांचे बघून मी पण BIO data बनवला. कुठून तरी application लेटर ढापले आणि जोब साठी apply करू लागलो. पण interview call येवील तर शपथ. . . मला अजून हि नाही समजले कि त्यांना कसे समजले होते कि हा काय दिवा लावणार आहे.
आमचे गावामध्ये छोटेसे दुकान आहे.(पुण्यात पेठांना गाव म्हणतात) काहीच करत नसल्या मुळे घरच्यांनी सांगितले कि दुकानात तरी बसत जा.मला हि काम नसल्या मुळे दुकानात बसू लागलो. दुपारी दुकान बंद असायचे. मग दुपारी काय करावे हा प्रश्न.कॉलेज मध्ये असताना इंटरनेट वापरले होते, पण ते होते १०० रुपये प्रती तास. गावात एका ठिकाणी चौकशी केली तर तिथे ५० रुपये तास होता. मग काय सकाळी दुकान . . दुकानातून ५०/- ची लेवेल करायची आणि दुपारी internet कॅफे.एक तास बाबांची साईट.कुठले बाबा ते सुन्ज्ञ वाचकास समजले असेल.
एका दुपारी नेहमी प्रमाणे कॅफे वर पोहचलो. नेहमीचे कोपऱ्यातले मशिन घेतले. पण काही केल्या कुठलीच साईट उघडेना. कॅफे ओनर ला विचारले कि काय प्रोब्लेम आहे, तो म्हणाला कि स्पीड खूप कमी आहे. साईट ओपेन नाही होणार पण तुम्ही चाट करू शकता. मी विचारले म्हणजे काय? तो हसला आणि म्हणाला कि तुम्हाला chatting माहित नाही? थांबा मी दाखवतो. असे म्हणून त्याने MIRC नावाचे कुठले तरी एक software ओपेन केले. आणि सांगितले कि कसे chatting करयचे.
माझ्या शाळेत मुली नव्हत्या, mechanical मध्ये हि नव्हत्या. त्यामुळे वयाच्या २१ व्या वर्षा पर्यंत कधी हि मुलींशी (बहिण सोडून) बोलायचं संबंध आला नव्हता. आणि मला मुलींशी कसे बोलायचे ह्याचे manners नाहीत. मी विचार केला चात्तिंग साठी ५०/- रुपये म्हणजे खूपच आहे. मी त्याला सांगितले कि मी इंटरेस्टेड नाही आहे. तो म्हणाला कि तुम्ही चात्तिंग करायचे पैसे देवू नका. शेवटी फुकट ते पौस्टिक असा विचार करून chat करायचे ठरवले. त्याने phillipines वैगेरे चाट रूम लावून दिली आणि मला सगळे समजवले. खरे सागायचे तर मला बिलकुल इंटरेस्ट नव्हता, कारण मुली पटवणे आपले क्षेत्र नाही हे मला पूर्ण पाने माहित होते. तरी हि फुकट होते म्हणून बसलो. एक दोन जणांना "Hi" केले आणि काय आश्चर्य मला त्यांचा रेप्ली आला. आयुष्यातला पहिला reply. I was Litterally shocked कि मला कुठली मुलगी HI म्हणू शकते. काय बोलायचे ते माहित नव्हते कारण अनुभव नव्हता. जे मनात होते ते बोललो. तिच्याशी खूप वेळ गप्पा मारल्या. तिने विंचारले उद्या पण चाट करशील? आईचा घो …मला मुलगी विचारते आहे कि उद्या येशील. मी खरे तर तेव्हा स्वर्गात होतो. मी लगेच होकार दिला. खरे सांगायचे तर त्या रात्री झोपे पर्यंत फक्त तिचे आणि तिचेच विचार डोक्या मध्ये होते. ती कशी दिसत असेल, ती आत्ता काय करत असेल, तिला मी खरच आवडलो असल का ? आणि कहर म्हणजे मी तिच्याशी लग्न करू शकेल का? तिच्या विचारांमध्ये असताना कधी झोप लागली समजले नाही.
दुसर्या दिवशी सकाळ पासून दुपार कधी होते हयाची वाट पाहत होतो. कॅफे मध्ये पोहचल्या पोहचल्या कॅफे ओनर ला सांगितले कि चाट लावून दे. मग रोज तिच्याशी चाट चालू झाले. खरे सांगायचे तर मी तिच्या साठी अगदी वेडा झालो होतो. मी तिला कधी हि पहिली नव्हती, कि तिच्याशी कधी फोनवर बोललो नवतो. पण मला ती आवडली होती. हि फीलीनग्स किती चान असते कि कोणी तरी तुमची वाट बघते आहे … तुम्हल मिस करते आहे … तुमचा विचार करते आहे. ती फक्त माझी होती आणि मी तिचा . …. तिच्या साठी काहीही करायची माझी तयारी होती …. मला प्रेम झाले होते , माझे पहिले प्रेम. कसली झकास फ़ॆलिङ्ग्स होती ती . मला तिच्या शिवाय काही हि सुचत नव्हते …. मला फक्त आणि फक्त तिच्याबद्दल बोलायचे असयचे. रोज न चुकता तिला E-ग्रीटींग्स पाठवायचो. रोज मेलची देवन घेवाण. जर एक दिवस जरी तिचे मैल नाही आले कि काळजी वाटायची कि तिला काय झाले असेल.… मग दिवस भर तिची काळजी करण्यात जायचा. दुसर्या दिवशी तिच्या वर खोटे खोटे ओरडणे आणि तिने ते ऐकून घेणे. . झकास लाइफ चालले होते.
एका रविवारी विजयचा फोने आला कि बिडी मारायला जावूयात. कॉलेज सोडल्या नंतर तो काही भेटला नव्हता. तसे पहिले तर तो माझा guide पण होता. आणि विचार केला कि तिच्या बद्दल मी ह्याच्याशी सगळे बोलू शकतो. आम्ही भेटल्यावर त्याला मी सगळी स्टोरी सांगितली … तसा तो जोर जोरात हसू लागला म्हणाला "साल्या तू अडानचोट आहेस…. अरे तू काय स्वताला शाहरुख खान समजतो का मुली तुझ्या मागे लागतील. दुसर्या देशात मुलेच मुलीच्या चाट करतात. Gay असतात ती. तू साल्या मुलाच्या प्रेमात पडला आहेस"
माझा चेहरा खाडकन पडला. म्हणजे मी चाट मुलाशी करत होतो. आईला…. मलाच माझा राग यायला लागला. ठरवले कि हया पुढे चाटिंग नाही करायचे. तनतनत घरी आलो …माझ्या बरोबरच असे का ह्वावे. मी एका गे शी चाट करत होतो, मला माझी किळस येत होती. काय काय विचार केले होते मी…तरी हि एक मन मानत नव्हते. पण नंतरच्या आठवड्यात कॅफे मध्ये गेलो नाही. हळू हळू लव फिवर कमी होऊ लागला होता. पण मनात कुठे तरी वाटू लागले होते कि आपली कोणी तरी असवि.पुन्हा कॅफे मध्ये जायचा निरयन घेतला
क्रमश:
प्रतिक्रिया
11 Jul 2013 - 6:52 pm | पैसा
मिपावर स्वागत! मजेशीर विषय आहे. पुढचा भाग लवकर येऊ द्या!
11 Jul 2013 - 7:38 pm | किसन शिंदे
हाहाहाहा...
या विषयात पीएचडी केलेले आमचे परिक्रमावासी विलासराव कुठे गेलेत कोणास ठाऊक?!
11 Jul 2013 - 10:13 pm | धमाल मुलगा
मायला! त्यांचं तर झोकात कॉन्व्होकेशनही झालं होतं अन मानद फेलोशिपही झाली होती की. ;)
12 Jul 2013 - 4:01 pm | आदिजोशी
ते सद्ध्या त्यांनी सुरू केलेल्या युनिव्हर्सिटीचा व्याप सांभाळण्यात आणि वाढवण्यात मग्न आहेत. नुकतीच त्यांच्या युनिव्हर्सिटीची १९ व्या देशातील ४२ वी शाखा सुरू झाल्याने कळले.
11 Jul 2013 - 7:52 pm | jaypal
लगे रहो अमित भाय.
11 Jul 2013 - 7:59 pm | अग्निकोल्हा
अर्थातच "स्वदेशि" बाबा असणार. दुसरे माहितच काय होत ? पुजाभट यामुळेच तर फेमस झालि होती.
बाकि एमायार्सिवर लाँगटर्म चाट केले म्हणजे तुम्हि नक्किच... महान आहात. येउदे अजुन येउदे.
11 Jul 2013 - 10:47 pm | शिल्पा ब
पटकन स्क्रोल करताना माझे चावट जीवन असं वाचुन काय प्रकार आहे बघायला आले...तसाच चावट प्रकार वाटला.
11 Jul 2013 - 10:57 pm | कवितानागेश
गमतीदार.
11 Jul 2013 - 11:39 pm | संजय क्षीरसागर
पुढचा चॅट लवकर टाक
12 Jul 2013 - 12:06 am | जॅक डनियल्स
तुम्ही एक मोठा चान्स गमावला. ;)
युरो ट्रीप नावाच्या सिनेमा मध्ये तो मुलगा एका जर्मन मुलीशी चाट करत असतो, तिचे चाटचे नाव माईक असते. त्यामुळ त्याला (ती) माईक मुलगा वाटत असते. त्याला त्याचा लहान जर्मन शिकलेला भाऊ सांगतो की ते Mike नसून Mieke आहे. हे जर्मन मधले मुलीचे नाव आहे..नंतर तो त्या मुलीला कसे मिळवतो....इ.
12 Jul 2013 - 12:15 am | बॅटमॅन
युरो ट्रिप वरून आठवला तो बोगद्यातला शीन- "मिस्कूऽझी!!!" =)) =)) =))
12 Jul 2013 - 5:59 am | देवांग
मी इतका हुशार असतो तर काय विचारायचे …. आणि मला कोणी लहान भाऊ पण नाही … :(… तिने नंतर मला बरेच मैल पण पाठवले होते पण मी विश्वास नाही ठेवला
12 Jul 2013 - 4:56 am | स्पंदना
चट चट लिहा!
12 Jul 2013 - 7:02 am | वेल्लाभट
हाहाहाहाहा! गुड. चालू दे.
१९८० ते १९९० आणि त्या पुढे जन्म असलेल्या बहुतेकांना 'चॅट' चा अनुभव असेलच ही खात्री आहे.
12 Jul 2013 - 8:12 am | निवेदिता-ताई
मस्त
12 Jul 2013 - 8:52 am | ब़जरबट्टू
येऊ द्या अजून !!
12 Jul 2013 - 11:37 am | चेतन माने
:D:D:D
छान... मज्जा आली,
पुलेशु आणि पुभाप्र :):):)
12 Jul 2013 - 1:03 pm | चौकटराजा
माझे पोष्टिक जीवन , माझे खाद्य जीवन याचालीवर माझे चाट जीवन म्हणजे पाणी पुरी, रगडा पुरी चा शौक कसा जडला असे काही असेल तर ह्ये काय भल्तच ? असो ! पयलाच परयत्न आहे.परत गाववाला आहे अतः पु ले शु !!
12 Jul 2013 - 1:42 pm | अभ्या..
क्रमशः ???????
मग आता काय लिव्हणार पुढच्या भागात? फेस्बुक व्हाया रेडीफ्बोल, ऑर्कुट काय?
औघड आहे. :(
12 Jul 2013 - 2:13 pm | देवांग
आपण कथेत सध्या २००० ते २००५ या काळात आहोत …मी FB २०१० जॉईन केले राव …. पण त्यात काय मज्जा नाय …तिथे माझे मार्केट डाऊन आहे :(
12 Jul 2013 - 5:28 pm | अभ्या..
ते सुपरस्टार वगैरे कसे व्हायचे? काही आयडीया आहे का? ;-)
12 Jul 2013 - 3:31 pm | दिपस्तंभ
छान....
12 Jul 2013 - 5:33 pm | कपिलमुनी
ब्रम्हेंच्या वाटेने जाउ नका बघा !
फट् म्हणता लेखकाची भ्रुणहत्या व्हायची ..
लेखन छान आहे ..पुलेशु !
12 Jul 2013 - 5:34 pm | अमितसांगली
आमचही अगदी असच होत..........