माझ्या ओठांच्या कळीवर फुलंलेल हसु म्हणजे तु...
माझ्या बंद पापण्या मधे तु....
मी डोळे बंद न करता पाहिलेले स्वप्न म्हणजे तु...
माझ्या श्वासात भिनलेला गंध म्हणजे तु...
माझी प्रेरणा तु....
माझा आत्मा तु... मी म्हणजे फक्त तु अणि तुच...
माझ्या ओठांच्या कळीवर
फुललेल हसु म्हणजे तु
माझ्या बंद पापण्या मधे तु
मी डोळे बंद न करता
पाहिलेले स्वप्न म्हणजे तु
माझ्या श्वासात भिनलेला गंध
म्हणजे तु
माझी प्रेरणा तु
माझा आत्मा तु
.
मी म्हणजे तु
आणि फक्त तुच
माझ्या शब्दांच्या मोळीवर
ओतलेल रॉकेल म्हणजे तु
माझ्या कुन्द पिपाण्यांमधे तु
मी पाय न ओढता
खेळ्लेला हुतुतू
माझ्या श्वासात अड्कलेला शब्द
फक्त हुतुतू
माझी हौस हुतुतू
माझा फंडा हुतुतू
मी म्हणजे तू
तू म्हनजे हुतुतू
प्यारे त्यांना चांगले सांगितले होते. तुमच्या बीएसेनेल मधल्या प्रीती, दिपीका वर कविता करा. नाय म्हणले. :(
म्हणले आता सिब्बलाचा जमाना हाय. त्यांचाच बाजार ऊठला, आता कुठली आलीय किरपा? ;)
प्रतिक्रिया
9 Jul 2013 - 2:57 pm | अभ्या..
वोव, मस्त एकदम, मिश यु आत्मा ;-)
9 Jul 2013 - 3:05 pm | रसिका तिलेकर
धन्यवाद...
9 Jul 2013 - 3:06 pm | निनाव
chhan! lihit raha..! shubhechha.
9 Jul 2013 - 4:23 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
कदाचित अशी मांडणी केली तर अजुन वाचनीय होईलः
9 Jul 2013 - 5:50 pm | निनाव
aNik , tumhi kharach khoop vinamra ahaat..! a great poet is always a great human being.. !
9 Jul 2013 - 4:52 pm | चित्रगुप्त
तु की तू ?
9 Jul 2013 - 5:19 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
ओ काका, जाउद्या हो, सुरवात आहे.
9 Jul 2013 - 5:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कवितेत अशी सूट घेता येते.
*कवितेमधे र्हस्व-दीर्घाचे बंधन पाळता येत नसल्यामुळे वृत्तानुसार र्हस्वदीर्घ लिहावे.
[पाहा: सुगम मराठी व्याकरण-लेखन. मो.रा.वाळंबे. पृ.क्र. २००]
-दिलीप बिरुटे
9 Jul 2013 - 5:20 pm | तुषार काळभोर
मस्त
9 Jul 2013 - 10:53 pm | संजय क्षीरसागर
`हुतूतू' घातलं की मजा येईल.
9 Jul 2013 - 11:58 pm | कवितानागेश
आपका हुक्म सरआंखोपर .
माझ्या शब्दांच्या मोळीवर
ओतलेल रॉकेल म्हणजे तु
माझ्या कुन्द पिपाण्यांमधे तु
मी पाय न ओढता
खेळ्लेला हुतुतू
माझ्या श्वासात अड्कलेला शब्द
फक्त हुतुतू
माझी हौस हुतुतू
माझा फंडा हुतुतू
मी म्हणजे तू
तू म्हनजे हुतुतू
10 Jul 2013 - 12:23 am | मोदक
क्लिष्ट शब्दांच्या भिंतीवर
मारलेल्या निरर्थक पिंका "मी"
विषयांतराच्या भाऊगर्दीत
हुकलेले लॉजीक "मी"
"माझी" गुणगुण "माझी" फुणफुण
"माझी" भुणभुण "मी"च्च्च्च्च
"माझी" हौस "मी"
"माझा" फंडा "मी"
"माझा" सोस "मी"
"मी" म्हणजे "मी"च्च्च्च्च
10 Jul 2013 - 12:30 am | अत्रुप्त आत्मा
10 Jul 2013 - 12:42 am | मोदक
हसताय काय.. सामील व्हा. ही घ्या माझ्याकडून सुरूवात.
विचारलेल्या प्रश्नाला
लावलेला थुक्का "मी"
10 Jul 2013 - 12:49 am | कवितानागेश
हरलेल्या डावातला
मारलेला एक्का 'मी'
10 Jul 2013 - 4:35 pm | बॅटमॅन
पडक्या माझ्या घराला
आज माझा मीच हात देतो
रडक्या माझ्याच गजला
माझा मीच दाद देतो.
सौजन्य -ललित मासिकाचा दिवाळी अंक-साल १९७०-८० मधले कुठलेसे.
9 Jul 2013 - 11:47 pm | कवितानागेश
चांगलं लिहिताय.
कविता वाचण्याचाही सराव ठेवला तर लिहिण्यात अजून सुट्सुटीत्पणा येइल.
9 Jul 2013 - 11:49 pm | अत्रुप्त आत्मा
मला ''तु'' या एका अक्षरामुळे परचंड उमाळ्या येतायत!!! =)) आगोबा आहेस ना रे तू!!! =))
10 Jul 2013 - 9:29 am | प्रचेतस
कसले उमाळे येताहेत म्हणे?
10 Jul 2013 - 12:26 am | मोदक
आणखीही येवूद्यात. हळूहळू लिखाणात सफाई येईलच!
शुभेच्छा!
10 Jul 2013 - 7:10 am | वेल्लाभट
`पहिली' कविता छान.
'तू' दुसरा असतो.
बाकी मस्त.
10 Jul 2013 - 9:23 am | रसिका तिलेकर
धन्यवाद..
10 Jul 2013 - 4:31 pm | Bhagwanta Wayal
पहिल्याच कवितेला एवढ्या प्रतिक्रिया, वा..!वा..! छान.
कविता आवडली.
10 Jul 2013 - 4:56 pm | प्यारे१
तुम्ही पण कविता करा नि भगवंता ऐवजी 'अमुकतमुक' देवी नाव लिहून छापा.
किर्पा प्राप्त होगी. ;)
10 Jul 2013 - 5:06 pm | अभ्या..
प्यारे त्यांना चांगले सांगितले होते. तुमच्या बीएसेनेल मधल्या प्रीती, दिपीका वर कविता करा. नाय म्हणले. :(
म्हणले आता सिब्बलाचा जमाना हाय. त्यांचाच बाजार ऊठला, आता कुठली आलीय किरपा? ;)
10 Jul 2013 - 5:08 pm | Bhagwanta Wayal
किर्पा तो पहले ही प्राप्त हो चुकी हैं, उनकी किर्पा से ही तो यँहा पर हुँ जनाब !
10 Jul 2013 - 5:29 pm | अभ्या..
खरच झालीय राव सिब्बलांची किरपा ;)
10 Jul 2013 - 5:11 pm | प्यारे१
कविता छान आहे हो.
11 Jul 2013 - 11:17 am | Bhagwanta Wayal
कृपा सिब्बलची नाही किंवा कुठल्या देवीची नाही तर कृपा एका सद्गुरुची आहे म्हणुनच मी येथे आहे अस म्हणायचे आहे.