नास्तिक - भाग २ !!

फिझा's picture
फिझा in जे न देखे रवी...
4 Mar 2013 - 6:36 am

नास्तिक - भाग २ !!

कुठे आहेस तू, नाही दिसला मला कधी
जे मानणारे आहेत खूप, त्यांना तरी भेट कधी
“सगळीकडे आहे मी.. हे आकाश, ही धरती, हे विश्वच मी …..
एकदा "समुद्र" म्हणून बघ मला,
या लाटाच देतील सगळी उत्तरे तुला ......"

फिझा ने जब दरिया में पानी को सेह्लाया,
तो जितने बल्खाके पानी किनारोंसे से टकराया,
उतनी बार....... अए खुदा तू याद आया !!

तुझे अमरत्व फक्त पुराणकथांमध्ये आहे,
मृत्यू चे भय इथे प्रत्येक सजीवाला आहे,
"दगडाला मूर्ती बनवणाऱ्या हातातले 'देवपण' मी,
कधी तहानलेला अतृप्त वाळ्वंट, तर कधी,
वठलेल्या झाडाचा अंकुरही मीच आहे ..."

जब बारीश की बुंदो ने धरती को चुमा,
हम ने जमीन पर बिखरते सितारोंको पाया,
जितने सितारोंको सावन ने बरसाया,
उतनी बार....... अए खुदा तू याद आया !!

नास्तिकांना नाही पटत तुझी एकही खुण,
आस्तिक ही दमतील कधीतरी हे ओझे वाहून,
" कधी फुलपाखराचे रंग, तर कधी फुलांचा सुगंध मी,
कधी कोकिळेचे गीत मी,कधी बासरी ने बनवलेले हवेचे संगीत मी,
बघ चंद्राकडे डोळेभरून, दाखव एकदा यांपासून अलिप्त राहून ..... "

फिझा ने जब गुलशन में फुलोंको मेह्काया ,
तो जितनी बार मेहेक को हमने अपनी जिंदगी मे पाया ,
उतनी बार....... अए खुदा तू याद आया !!

मानले जरी तुझे अस्तित्व, नसून असलेले,
मग माझेच का नेहमी, असून नसलेले...
"तुझ्या नसण्यात मी आहे,तुझ्या असण्यातही मी आहे,
तुझे श्वासही मी आणि दोन श्वासातले अंतरही मी आहे ....."

फिझाओंको आज हमने अपने सासोंमे भर लिया,
तेरे होने के यकीं के साथ ,अपने होने का एहसास पाया,
जितनी बार इन सासोंको हमने 'फिझा ' का नाम दिया,
उतनी बार....... अए खुदा तू याद आया !!

नास्तिक - भाग १ !!

कविता

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

4 Mar 2013 - 7:08 am | स्पंदना

अहं ब्रम्हास्मी?

जणु गीता वाचते आहे अस वाटल.

पुन्हा एकदा.."छान लिहिता तुम्ही".

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

4 Mar 2013 - 8:36 am | मिसळलेला काव्यप्रेमी

__/\__

कवितानागेश's picture

4 Mar 2013 - 1:57 pm | कवितानागेश

छान :)

हा तुमचा स्वतःचा अनुभव असेल तर मग...क्या बात है!

अत्रुप्त आत्मा's picture

6 Mar 2013 - 1:08 pm | अत्रुप्त आत्मा

दोन्ही बाजूंचे वर्गीकरण करणारी ,एक अनोखि धडपड . :-)