आयटीच्या गोष्टी - ऑन द बेंच

धन्या's picture
धन्या in जनातलं, मनातलं
19 Feb 2013 - 10:00 pm

आयटीच्या गोष्टी - नमन

कल्पना करा, तुमच्या ऑफीसमधील तुमचं आधीचं काम संपलंय. पुढचं काम केव्हा मिळेल याबद्दल सध्यातरी कोणालाच माहिती नाही. किंवा अशी कल्पना करा की, तुम्ही नुकतीच तुमची नोकरी बदलली आहे. सध्याच्या कंपनीत नविन काम येणार आहे, त्यासाठी तुमची नेमणूक केली आहे. आता जोपर्यंत हे पुढचं काम येत नाही तोपर्यंत तुम्हाला कुणीच कधी येता कधी जाता, ऑफीसमध्ये काय करता हे विचारत नाही. कंपनीची अपेक्षा एव्हढीच असते की तुम्ही ऑफीसला नऊ तास भरायचे. तुम्ही सकाळी नऊ वाजता ऑफीसला जाता. दहा वाजेपर्यंत तुमच्या एखादया त्रागा किंवा वैताग करणार्‍या मित्राबरोबर चहा आणि मसाला डोश्याबरोबर अध्यात्म, धर्म, जागतिक महायुद्धे, मानसशास्त्र असले विषय चघळता. दहा ते बारा या वेळात यच्चयावत वृत्तपत्रांच्या आंतरजालीय आवृत्त्या चाळता. बारा वाजता सबवे काउंटरवर जाऊन मस्त एक फुट लाँग हाणता. जमलं तर बाहेर येऊन मोसंबीचा रस वगैरे पिता. डोळे मिटू लागले आहेत याची जाणिव होताच डॉर्ममध्ये अगदी संध्याकाळचे चार वाजेपर्यंत ताणून देता. चार वाजता उठून फ्रेश होता. कँटीनला येऊन मस्त एक चहा घेता. थोडा वेळ जिमला जातात. नंतर क्रिकेट ग्राऊंडला एखादा फेरफटका मारता. साडे सहा वाजायला थोडा वेळ असेल तर एखादा बकरा पकडून त्याला पकवत बसता. आणि साडे सहा वाजताच बाईकला किक मारून घरी सुसाट सुटता. एव्हढं सारं करुनही तुम्हाला महिना अखेरीस पुर्ण पगार मिळतो.

कशी वाटली कल्पना?

आता अ़जून एक कल्पना करा, तुमच्या ऑफीसमधील तुमचं आधीचं काम संपलंय. पुढचं काम केव्हा मिळेल याबद्दल सध्यातरी कोणालाच माहिती नाही. तुम्ही ऑफीसला येऊन नुसती हजेरी लावण्याला प्रचंड कंटाळले आहात. अचानक एक दिवस एचारचा फोन येतो. तो किंवा ती तुम्हाला सांगते की वूई हॅव सम प्रोजेक्टस इन पाईपलाईन बट वुई आर नॉट शुअर व्हेन दे विल गो ऑन फ्लोअर. जोपर्यंत पुढचा प्रोजेक्ट येत नाही तोपर्यंत तुम्ही ऑफीसला येऊ नका. कदाचित अजून दोनेक महिने तुम्हाला घरी राहावं लागेल. महिना अखेरीस तुमचा पुर्ण पगार तुमच्या खात्यात जमा होईल. तुमच्यासाठी काम आलं की आम्ही तुम्हाला बोलावून घेऊ.

कशी वाटली कल्पना?

आता तिसरी कल्पना करा, तुमच्या ऑफीसमधील तुमचं आधीचं काम संपलंय. पुढचं काम केव्हा मिळेल याबद्दल सध्यातरी कोणालाच माहिती नाही. किंवा अशी कल्पना करा की, तुम्ही नुकतीच तुमची नोकरी बदलली आहे. सध्याच्या कंपनीत नविन काम येणार आहे, त्यासाठी तुमची नेमणूक केली आहे. एक दिवस एचारचा फोन येतो. तो किंवा ती तुम्हाला सांगते की वूई हॅव सम प्रोजेक्टस इन पाईपलाईन बट वुई आर नॉट शुअर व्हेन दे विल गो ऑन फ्लोअर. जोपर्यंत पुढचा प्रोजेक्ट येत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला अमुक अमुक ट्रेनिंगला नॉमिनेट करतो. तुम्ही आनंदाने उडया मारायला लागता. हे तेच ट्रेनिंग असतं जे त्याची फी जास्त असल्यामुळे आणि ऑफीसमधून एक महिना सुटटी मिळणे शक्य नसल्यामुळे तुम्ही पुढे ढकललेलं असतं. आणि इथे तर कंपनी चक्क त्यांच्या पैशाने ते ट्रेनिंग द्यायला तयार असते. ते ही तुम्हाला महिन्याचा पुर्ण पगार देऊन.

कशी वाटली कल्पना?

तुम्ही जर नॉन आयटी इंडस्ट्रीत असाल तर या कल्पना कल्पनाच राहतील. पण तुम्ही जर आयटीत असाल तर मात्र या कल्पना वास्तवात उतरू शकतात. नव्हे, मोठया आयटी कंपन्यांमध्ये जवळपास वीस ते तीस टक्के कर्मचार्‍यांना हे भाग्य (किंवा दुर्भाग्य; कसे ते पुढे पाहू) लाभण्याची दाट शक्यता असते.

आयटी कंपन्यांमध्ये काही कर्मचारी राखीव असतात. या कर्मचार्‍यांना बेंच रीसोर्सेस असं म्हणतात. मोठया आयटी कंपन्यांमध्ये तर अगदी एकुण कर्मचारी संख्येच्या वीस ते तीस टक्के कर्मचारी राखीव असतात. हे राखीव कर्मचारी सहसा उत्पादक काम करत नसल्यामुळे कंपनीला त्यांच्यापासून थेट उत्पन्न असे नसतेच. आणि तरीही या राखीव कर्मचार्‍यांना कंपनीला महिना अखेरीस पुर्ण पगार द्यावा लागतो.

आयटीतील बेंच ही संकल्पना सांघिक खेळांमधील बेंच या संकल्पनेवर आधारीत आहे. काही सांघिक खेळांमध्ये प्रत्यक्ष खेळणार्‍या खेळाडूंबरोबर न खेळणारे पण गरज पडली तर खेळू शकणारे खेळाडू संघात ठेवावे लागतात. आयटीतील बेंच असाच आहे. आयटी कंपन्यांना प्रत्यक्ष काम न करणारे परंतू गरज पडल्यावर लगेच काम करु शकणारे काही राखीव कर्मचारी ठेवावे लागतात.

हे सारं आपण जरा अधिक विस्ताराने पाहूया.

आयटी कंपन्या दोन प्रकारच्या असतात.

१. स्वतःची विशिष्ट संगणक प्रणाली निर्माण करणार्‍या (प्रोडक्ट बेस्ड)
२. ग्राहकाच्या गरजेनुसार संगणक क्षेत्रातील सेवा पुरवणार्‍या (सर्व्हीस बेस्ड)

प्रोडक्ट बेस्ड कंपन्या म्हणजे स्वतःचे सॉफ्टवेअर अ‍ॅप्लिकेशन बनवून ते बाजारात विकणार्‍या कंपन्या. उदा. मायक्रोसॉफ्ट जी एमएस ऑफीस, एमएस विंडोज असे प्रोडक्ट्स बनवते. किंवा टॅली सोल्युशन्स ही भारतीय आयटी कंपनी जी टॅली नावाचं प्रोडक्ट बनवते.

सर्व्हीस बेस्ड कंपन्या म्हणजे ग्राहकाच्या गरजेनुसार संगणकीय सेवा देणार्‍या आयटी कंपन्या. बर्‍याचशा भारतीय आयटी कंपन्या आणि भारतातू काम करणार्‍या बर्‍याचशा परदेशी कंपन्या या प्रकारात मोडतात.

काही वेळा एकच आयटी कंपनी प्रोडक्ट बेस्ड आणि त्याच वेळी सर्वीस बेस्ड असू शकते. पण अशा कंपन्या खुपच कमी असतात.

सर्व्हीस बेस्ड आयटी कंपन्यांचे तेल आणि नैसर्गिक वायू, औषध निर्माण, दुरसंचार, मिडीया अशा इतर विविध उद्योगक्षेत्रातील कंपन्यांबरोबर संगणकीय सेवा पुरवण्याचे करार असतात. इथे आयटी कंपनी सर्व्हीस प्रोव्हायडर असते आणि कोअरमधील कंपनी क्लायंट. आयटी कंपनीसाठी ते एक प्रकारचं खातंच असतं. म्हणून या कराराला अकाऊंट म्हणतात. एका अकाऊंट मध्ये म्हणजेच एका क्लायंटकडे त्याच्या व्यवसायाचे सेल्स, मार्केटींग, एचार, प्रोडक्शन असे अनेक विभाग असतात. आणि या वेगवेगळ्या विभागांना सर्व्हीस प्रोव्हायडरकडून त्यांचे काम संगणकीकृत करायचे असते. त्यासाठी अनेक छोटया मोठया संगणक प्रणाल्या बनवल्या जातात. सर्वसाधारणपणे एक संगणक प्रणाली बनवण्याचे काम किंवा बनवल्यानंतर तिची देखभाल करण्याचे काम म्हणजे एक प्रोजेक्ट असा हीशोब असतो. या प्रोजेक्टवर अ‍ॅप्लिकेशन डीझाईन, प्रोग्रामिंग, टेस्टींग, डेटाबेस असे विविध कौशल्य असणारी एक किंवा एकापेक्षा अधिक माणसं कार्यरत असतात.

बरेच वेळा होतं काय, सर्व्हीस प्रोव्हायडर आयटी कंपनीकडे एखादा नवा क्लायंट येतो. किंवा जुन्या क्लायंटला त्याच्या एखाद्या विभागासाठी एखादी अदययावत संगणक प्रणाली बनवून हवी असते. किंवा त्या क्लायंटला त्याचा आधीचा सर्व्हीस प्रोव्हायडर चांगल्या दर्जाची सेवा देत नाही म्हणून दुसर्‍या सर्व्हीस प्रोव्हायडरकडून ते काम करुन घ्यायचे असते. ईथपर्यंतही ठीक आहे. पण ह्या क्लायंटला त्याचे काम आज आणि आताच सुरु व्हायला हवे असते. कारण त्यासाठी तो भरमसाट किंमत मोजायला तयार असतो. जर एखाद्या सर्व्हीस प्रोव्हायडरने काम लगेच सुरु करण्यात असमर्थता दाखवली तर क्लायंट लगेच दुसर्‍या सर्व्हीस प्रोव्हायडरकडे जाण्याची शक्यता असते.

क्लायंट लाख म्हणेल की मी जर एव्हढे पैसे मोजतोय तर माझे काम आज आणि आताच सुरु व्हायला हवे. पण सर्व्हीस प्रोव्हायडरने त्या कामासाठी आवश्यक असणारे कौशल्य असणारी माणसे अगदी आताच कुठून आणायची? आयटी मधला नोकर भरती हा प्रचंड वेळखाऊ प्रकार आहे. नविन भरतीची जाहीरात देणे, उमेदवारांचे नोकरीच्या अर्जांची छाननी करुन त्यातल्या त्यात योग्य वाटणार्‍या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावणं, मुलाखतीत निवड झालेल्या उमेदवारांशी पगाराची घासाघीस करुन त्यांना निवडपत्र देणं, तो उमेदवार आधीच दुसर्‍या आयटी कंपनीत काम करत असल्यामुळे त्याच्यासाठी दोन तीन महिने थांबणं याच्यात कधी कधी अगदी सहा महिनेसुद्धा जातात. बरं एहढं सारं केल्यानंतर तो उमेदवार दुसर्‍याच कंपनीत जाण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. मग क्लायंटला आज आणि आताच नविन माणसं कुठून द्यायची.

या समस्येवरचा उपाय म्हणजे बेंच.

प्रत्यक्षात कर्मचार्‍यांची गरज नसतानाही नविन भरती करुन ठेवायची. जसे काम येईल तशी ही नविन भरती केलेली माणसं त्या कामावर रुजू करायची. मोठया आयटी कंपन्यांमध्ये वर्षाचे बारा महिने नोकर भरती सुरु असते ती यामुळेच.

बरेच वेळा एखादा चालू असलेला प्रोजेक्ट संपतो. त्या प्रोजेक्टमधल्या माणसांना दुसरे काम मिळेपर्यंत ती माणसेही बेंचवर जातात.

ही बेंचवरची माणसे वर कल्पना म्हणून वर्णन केलेल्या सोयींचा लाभ घेऊ शकतात. अर्थात ते बरंचसं कंपनीवर अवलंबून असतं सार्‍याच कंपन्यांत हे असं होतंच असं नाही. किंवा होत असलं तरी अगदी असंच होतं असंही नाही.

बेंचवर असलेल्या कर्मचार्‍यांना पुर्ण पगार द्यावा लागत असल्यामुळे आयटी कंपन्यांसाठी बेंच हा प्रकार "असून अडचण नसून खोळंबा" असा असतो.

ही झाली कंपनीची बाजू. बेंचवर असलेल्या कर्मचार्‍यांचं काय?
ते ही पाहूया. वरच्या तीन प्रकारच्या बेंच वर्णनांवरुन नॉन आयटीवाल्यांना आयटीवाल्यांचा नक्कीच हेवा वाटेल. पण आयटीत बेंचवर येणं ही तितकीशी चांगली गोष्ट नाही.

१. सुरुवातीचे एक दोन महिने चांगले जातात. पण नंतर प्रचंड कंटाळा यायला लागतो. दिवसभर काय करायचे हा प्रश्न पडतो.
२. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी हा असा प्रकार आहे की जर तुम्ही एक दोन महिने त्यापासून दूर राहीलात तर ते सारं तुम्ही विसरुन जाण्याची दाट शक्यता असते. महिनाभर रीयाज केला नाही तर गायकाला त्याचा गळा साथ देत नाही तसंच काहीसं आहे हे.
३. बरेच वेळा बेंचवर असल्यानंतरही नको असलेला प्रोजेक्ट नाकारण्याचा अधिकार असला तरी कधी ना कधी प्रोजेक्ट घ्यावाच लागतो. बरेच वेळा समोर येईल तो प्रोजेक्ट घ्यावा लागतो. आपली कामाच्या वेळा, आपल्याला काम करायची ईच्छा असलेली टेक्नॉलॉजी यात तडजोड करावी लागते.
४. खुप दिवस बेंचवर राहील्यास कंपनी आपल्या दुसर्‍या शहरातील ऑफीसला बदली करु शकते. केव्हा केव्हा टेक्नॉलॉजीमधल्या माणसाला कंपनीच्या बीपीओ आर्मलाही पाठवले जाते.
५. सर्वात महत्वाचे म्हणजे, आर्थिक मंदीच्या काळात पहिली तडी बेंचवरील कर्मचार्‍यांवर पडते.

वरवर चांगला वाटणारा हा प्रकार तसा कर्मचार्‍यांसाठीही वाईटच असतो. एक दोन महिन्यांसाठी बेंचवर येऊन लगेच हवा तसा प्रोजेक्ट मिळाल्यास मात्र मज्जानू लाईफ. पण असे खुपच कमी वेळा होते. वर्ष - दिड वर्ष बेंचवर असलेले किस्से आयटीत ऐकायला मिळतात.

आता समारोपाच्या काही ओळी लिहून हे प्रकरण आटोपतं घेतो. शंभराच्या आतबाहेर कर्मचारी संख्या असलेल्या आयटी कंपन्यांमध्ये बेंच हा प्रकारच नसतो. त्याचे क्लायंटही कधी घोडयावर येत नाहीत. हजाराच्या आसपास कर्माचारी संख्या असलेल्या कंपन्यांमध्ये खुपच कमी कर्मचारी बेंचवर असतात. कारण त्यांना बेंच परवडतच नाही. आणि मोठया आयटी कंपन्या बेंच ठेवतात कारण ती त्यांच्या व्यवसायाची गरज असते.

तंत्रमाहिती

प्रतिक्रिया

श्री. धन्याश्वर राव, सांगाच ओ कोण आहेत असे मित्र ? किंवा ' चहा डोश्यातलं अध्यात्म' असा धागा तरी काढा.

धन्या's picture

20 Feb 2013 - 7:55 pm | धन्या

बिचारा आधीच खुप सार्‍या गोष्टींना वैतागला आहे. त्यात आम्ही असा काही धागा काढला आणि त्यातला आमच्या मुक्ताफळांनी त्याचा अधिक त्रागा झाला तर?

वरील काही प्रतिसादांबाबतः-
बेंचमुळे करिअरची, रेझ्युमेची वाट लागते असे काही वर लिहिलेले दिसले.
किती जण रेझ्युमीवर मी दोन्-चार महिने बेंचवर होतो असे लिहितात? (माझ्या पाहणयत असा एकही रेझ्युमे नाही. सो चिल.)
.
बेंचसाठी सात जन्माचा उपाशी

बेंचमुळे करिअरची, रेझ्युमेची वाट लागते असे काही वर लिहिलेले दिसले.
किती जण रेझ्युमीवर मी दोन्-चार महिने बेंचवर होतो असे लिहितात?

बेंचवर गेल्याने तंत्र कौशल्याची वाट नक्कीच लागते. कारण विशिष्ट सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीचं ज्ञान कापरासारखं उडून जाणारं असतं. जर एखादया संगणक तंत्रज्ञानावर तुम्ही महिना दोन महिना काम केले नाहीत तर ते तुम्ही विसरु शकता.

नविन नोकरीसाठी अर्ज करताना सहसा दोन महिन्यांपेक्षा जास्त बेंच कालावधी दाखवला जात नाही. कारण दोन महिने मॅनेजेबल असतात. किंबहूना गेले दोन महिने बेंचवर आहे म्हणून दुसरी नोकरी शोधतोय अशी मखलाशी केली जाते. खरं कारण असतं, एवीतेवी बेंचवर आलोय तर थोडं नॉलेज रीफ्रेश करुन बाहेर ट्राय करायला काय जातंय. मिळाली दुसरी नोकरी तर तीस टक्के पगारवाढ कुठेच जात नाही. पंचवीस टक्के तर डोळे झाकून देते समोरची कंपनी.

दोन महिन्यांपेक्षा जास्त बेंच कालावधी रीझ्युमेवर दाखवणं म्हणजे आपल्याच पायावर कुर्‍हाड मारून घेण्यासारखे आहे. ही व्यक्ती दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी बेंचवर आहे याचा अर्थ बरेच वेळा ही व्यक्ती प्रोजेक्ट मिळण्यास लायक नाही असा सरळ सरळ अर्थ घेतला जातो.

राजेश घासकडवी's picture

20 Feb 2013 - 10:35 pm | राजेश घासकडवी

मिळाली दुसरी नोकरी तर तीस टक्के पगारवाढ कुठेच जात नाही. पंचवीस टक्के तर डोळे झाकून देते समोरची कंपनी.

तुमच्या दुःखांची यादी वाचून मला आणखीनच भरून येतं आहे. म्हणजे बेंचवर दोन महिने काढून आधीच वर्षाचा १६ टक्के पगार फुकट घ्यावा लागतो. त्यात फक्त २५ टक्के पगारवाढीची नोकरी शोधायला वेळ मिळतो.

ही व्यक्ती दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी बेंचवर आहे याचा अर्थ बरेच वेळा ही व्यक्ती प्रोजेक्ट मिळण्यास लायक नाही असा सरळ सरळ अर्थ घेतला जातो.

आणि मग काय, नाइलाजाने फक्त १० टक्के पगारवाढीची नोकरी स्वीकारावी लागते? इतके दुःखप्राय अनुभव गाठीशी नसल्याने 'सहानुभूती' देणं शक्य नाही.

आजानुकर्ण's picture

20 Feb 2013 - 9:06 pm | आजानुकर्ण

मुळात किती लोक खरे रेझ्युमे लिहितात ते पाहावे. आयटीमधील खोटे रेझ्युमे (आमीरपेट, बेगमपेट मु.पो. हैद्राबाद येथील विद्यापीठे) याबाबतही एखादा लेख यावा.

आयटीमधील रेझ्युमेंचा खरेपणा हा संशोधनाचा विषय ठरावा. एखादयाला या विषयात पीएचडीही मिळू शकेल. या विषयावरही नक्कीच लिहिण्याचा प्रयत्न करेन.

बाळ सप्रे's picture

20 Feb 2013 - 1:47 pm | बाळ सप्रे

बेन्च १५% च्या आसपास असावा. ज्यायोगे नवीन प्रोजेक्ट सुरु करायलाही प्रॉब्लेम नसतो आणि मार्जिन्सही योग्य रहातात. १५% च्या खाली असेल तर रिक्रुटमेन्ट वाले जोरात कामाला लागतात. बेंच २०-३० % झाले तर सेल्स वाल्यांना आणि टॉप मॅनेजमेंटला रेड अलर्ट असतो. रेव्हेन्यु असुनही ग्रॉस मार्जिन्स २५-३०% च्या खाली आल्यास शेअर चा भाव लगेच कोसळतो.

च्यायला हे बेंच म्हंजे साल डोक्याला शॉट असतो.
मी आधी मुंबई मध्ये एका टेलिकॉम कंपनी मध्ये होतो, पगार मनासारखा वाढत नव्हता म्हणून कुठून दुर्बुद्धी सुचली आणि हिंजवडी मधल्या एका नामवंत आय टी कंपनी मध्ये गेलो .
त्यावेळी पगार चांगला मिळाला पण साला एक नंबर टुकार काम दिले होते (अंडर व्ह्यालू म्हणतात तसे).
तसे पण आय टी कंपनी मध्ये सध्या काहीच काम नसते,नुसते सपोर्ट चे काम असते, ८-१० वर्षापूर्वी भरपूर आणि चांगले काम होते
तो प्रोजेक्ट संपल्यावर बेंच वर,१५ दिवसात डोक्याचा नुसता भुगा झाला
मग एक महिन्यातच एचारचाने अचानक मिटिंग साठी बोलावले, मला वाटले नवीन प्रोजेक्ट असेल तर म्हणाला कंपनीची पॊलिसि बदलली आहे पुढच्या एका महिन्यात नवीन प्रोजेक्ट शोध नाहीतर नोटीस दिली जायील .
रिसोर्स एचार म्हणे सध्या कंपनी कडे नवीन प्रोजेक्टच नाही आहेत.
मग म्हंटल काशी करा मी चाललो १५-२० दिवसात परत दुसऱ्या टेलिकॉम कंपनी मध्ये रिसर्च आणि देव्हलपमेन्त मध्ये नोकरी मिळवली.
सध्या मजेत डोक्याला जास्त शॉट नाही, वर्षातून एक दोनदा परदेशात ऑनसायीट काम आणि परत आल्यावर इकडचे काम.

आता आय टी वाले चांगले काम नाही म्हणून रडणारे मित्र बघितले कि कॉलेज चे दिवस आठवतात; आय टी कंपनी चा कॅम्पस अटेंड केला नाही म्हणून आम्हाला युसलेस आणि टाकावू म्हणायचे लेकाचे.
पुण्यात असताना हिंजवडी मधल्याच दुसर्या एका नामवंत आय टी कंपनीतला ८ महिने बेंच वर असलेला मित्रपण बघितला होता.

च्यायला मी तरी इथे गाढवासारखा राबतोय. अजून बेंच म्हणजे काय तो अनुभवच नाही.

- पिंगू

nishant's picture

20 Feb 2013 - 6:53 pm | nishant

मस्त झाला आहे हा भाग... ;) वाचताना मजा वाटली

तुमचा अभिषेक's picture

20 Feb 2013 - 8:49 pm | तुमचा अभिषेक

बाकी लेख कडक लिहिलाय.. चर्चा देखील त्याला अनुसरून..

बेंच प्रकार खरेच कंटाळवाणा आणि धोकादायक असावा.. कितीही एसीची हवा खा, नेटसर्फिंग करा, गपशप करा आणि या सार्‍याच्या बदल्यात फुकट पगार खा.. तरीही आयुष्यात जोपर्यंत सतत काही काम नाही करत तोपर्यंत आयुष्य सरकतच नाहिये, कुठेतरी अडकले आहे अशी भावना मनात येत असणारच..

सहा आठ महिने सरकारी नोकरीत तासाभराचेही काम न करता फुल्ल पगार घेऊन अन तरीही कंटाळून बाहेर पडलेला,
एक माजी सहाय्यक अभियंता - बांधकाम विभाग.

आनंदी गोपाळ's picture

20 Feb 2013 - 9:07 pm | आनंदी गोपाळ

साधारण कितपत पगार असतो हो आय्टी वाल्या विंजिनेर लोकांस्नी?
-(जळावे की नको या आनंदात) गोपाळ

धन्या's picture

20 Feb 2013 - 9:38 pm | धन्या

आता थोडक्यात लिहितो.

"आयटी" ही अंब्रेला टर्म आहे. आयटी या नावाखाली हजार भानगडी येतात. यातल्या कुठल्या भानगडींशी तुमचा संबंध आहे यावर तुमचा पगार अवलंबून असतो. नॉनवाल्यांसाठी आयटी म्हणजे सॉफ्टवेअर निर्मिती असंच समिकरण असतं. ते तसं नाही. सॉफ्टवेअर निर्मिती हे आयटीचं प्रमुख अंग आहे. सॉफ्टवेअरची निर्मिती (डेव्हलपमेंट), त्याला वापरात आणणं (इंम्प्लिमेंटेशन) आणि नंतर वापर चालू असताना त्याची देखभाल करणं (मेंटेनन्स / सपोर्ट) आणि अशाच बर्‍याच बाबी असतात. तुम्ही यातलं कुठलं काम करता, त्या कामाचा तुम्हाला किती वर्षांचा अनुभव आहे यावरही बरेचसं अवलंबून असतं.

तुम्ही "विंजिनेर" शब्द वापरला आहे प्रतिसादात. त्याबद्दल थोडंसं. आयटीत काम करणार्‍याला सर्वसाधारणपणे आयटी ईंजिनीयर म्हटले जाते. परंतू हे सारेच शिक्षणाने ईंजिनीयर (बीई/बीटेक, एमई/एमटेक) असतातच असे नाही. काही जण बीएस्सी, एमएस्सी, बीसीए, एमसीए (काही वेळा चक्क बीए, बिकॉमही) या पदव्या मिळवलेले असतात. बर्‍याचशा आयटी कंपन्यांमध्ये पगार देताना शिक्षणाने ईंजिनीयर आहे का हा मुद्दा विचारात घेतला जातो. बीई/बीटेक, एमई/एमटेक या पदवीधारकांना बर्‍याच वेळा झुकते माप दिले जाते.

साधारण कितपत पगार असतो हो आय्टी वाल्या विंजिनेर लोकांस्नी?

पोटापाण्याची सोय होण्याईतकापासून ते कितीही. (या कितीहीच्या जागी तुम्हाला जो मोठयात मोठा आकडा वाटेल तो टाका. कदाचित एखादया आयटीवाल्याला तुमच्या आकडयापेक्षाही जास्त पगार असू शकेल.)

मोदक's picture

20 Feb 2013 - 10:44 pm | मोदक

काही जण बीएस्सी, एमएस्सी, बीसीए, एमसीए (काही वेळा चक्क बीए, बिकॉमही) या पदव्या मिळवलेले असतात

यातल्या "बीए बीकॉमला" चक्क का केले ते कळाले नाही.

आयटी / आयटीईस / सर्व्हिस बेस्ड / प्रॉडक्टबेस्ड कंपन्यांमधल्या लोकांचा परफॉर्मन्स ट्रॅक करणारी / प्रोजेक्ट रेव्हेन्यू कॅल्क्यूलेट करणारी व्यक्ती बीकॉम वाली असू शकते.

गारेगार एसीमध्ये, गुबगुबीत खुर्चीवर बसून, फारसे कष्ट न करता मिळालेला पगार एखाद्या बीकॉम वाल्याने प्रोसेस केलेला असू शकतो. ;-)

धन्या's picture

20 Feb 2013 - 11:45 pm | धन्या

तो "चक्क" शब्द आयटीशी थेट संबंध असण्याच्या संदर्भात आहे. एचार, फॅसिलीटी, फायनान्स वगैरे विभागात काम करणार्‍यांचा थेट आयटीशी संबंध नसतो.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

21 Feb 2013 - 1:54 am | विश्वनाथ मेहेंदळे

यातल्या "बीए बीकॉमला" चक्क का केले ते कळाले नाही.

अगदी अगदी !!!

हे सो कॉल्ड इंजिनीअर्स पण भारी असतात. हल्लीच एक इंटरव्यू घेतला. साडेपाच वर्षे अनुभव. आणि Array searching चे प्रकार सांग असे म्हटल्यावर कॉलेजनंतर ते कधी लागले नाही असे सांगितले. ही ज्ञानाची पातळी असेल तर बीए-बीकॉमलाच कशाला १२वीतील अनेक पोरांना जास्ती चांगले काम करता येईल.

(इंजिनीअर्स या जमातीवर एकदा लिहायचे आहे)

(नॉन इंजिनीअर्स) विमे

इंजिनीअर्स नाही पण डेव्हलपर्स वरती हारोचक लेख सापडला.

आजानुकर्ण's picture

21 Feb 2013 - 2:42 am | आजानुकर्ण

बीए-बीकॉमलाच कशाला १२वीतील अनेक पोरांना जास्ती चांगले काम करता येईल.

मुळात भारतीय सर्विस इंडस्ट्रीमधील आयटी कंपन्यांमध्ये ८० ते ९० टक्के कामासाठी इंजिनियर (बीई) वगैरे लोकांना बसवणे हेच मोठे अंडरयुटिलायझेशन आहे. सपोर्ट, मेंटेनन्स, ticket resolution वगैरेसाठी Data Entry Operator levelचे प्राथमिक ज्ञान असलेला कोणताही ग्रॅज्युएट चालेल. डेवलपमेंट वगैरे कामे सुद्धा अशा लोकांना गूगल सर्च किंवा वेगवेगळ्या टेक्निकल फोरम्स वरील सॅम्पल कोड वापरुन करता येतील.

नाहीतरी बऱ्याच आयटी कंपन्या बीएस्सी बीकॉम वगैरेंना घेऊन चारचार वर्षाच्या बाँड्सवर ही कामे करुन घेतच आहेत. माझ्या आठवणीनुसार पाचसहा वर्षापूर्वी अशा 'सॉफ्टवेअर इंजिनिअर्सना' आठएक हजार रुपये महिना पगार मिळत असे. आताची कल्पना नाही.

आजानुकर्ण's picture

21 Feb 2013 - 2:50 am | आजानुकर्ण

एका कंपनीच्या २०१३ च्या अधिकृत माहितीनुसार ११५००/- पहिल्या वर्षी व त्यात तीन चार हजारांची वाढ प्रतिवर्षी.

http://careers.wipro.com/pdfs/WASE_brochure_2013.pdf

श्रीरंग_जोशी's picture

21 Feb 2013 - 2:50 am | श्रीरंग_जोशी

अच्युत गोडबोले जवळ जवळ अशीच मते मांडत फिरत असतात.

भारतात या क्षेत्रात नव्याने काम करत असताना मलाही असेच काहीसे वाटले.
अमेरिकेत येऊन एकाहून एक आव्हानात्मक कामे अंगावर पडल्यावर ते मत बदलले.

असो, हा मुद्दा या लेखमालिकेच्या पुढील भागांत येईलच तेव्हा रोचक चर्चा होईल.

आजानुकर्ण's picture

21 Feb 2013 - 3:11 am | आजानुकर्ण

अच्युत गोडबोल्यांचे माहीत नाही. पण मी एका प्रोजेक्टवर दहा बारा नवशिकी बीएससी मुले घेऊन काम केले आहे. काहीही अडचण येत नाही. उलट ही मुले आपल्याला सर-सर वगैरे म्हणतात, सांगेल ते काम झटून करतात आणि कंपनीला भरपूर पैशे मिळवून देतात. शिवाय त्याचा फायदा मॅनेजर लोकांना (कमी खर्चात जास्त फायदा मिळवून घेतला वगैरे) अप्रेजलमध्ये होतोच. त्यांच्या जागी चारपाच वर्षाचा अनुभव असलेला इंजिनियर बसवला की त्याला 'मला एवढे येते', 'मला अमुकतमुकच करायचे' असा इगो असतो. पुन्हा तो बाहेर नोकऱ्याही शोधत असतो आणि सोडून जाईन अशा धमक्याही देत असतो.

असो. या विषयावर तुमच्याशी एकदा चर्चा होईलच ;)

दादा कोंडके's picture

23 Feb 2013 - 8:21 pm | दादा कोंडके

आमच्या इथंही जगातल्या विविधं ठिकाणी उत्पादन करणार्‍या प्लांटला सपोर्टसाठी आधी इंजिनीअर होती आता बिएससी इलेक्ट्रॉनिक्स घेतात. या लोकांना मस्ती कमी असते. आणि काम पण छान करतात.

हे बहुतांशी आयटीत होत असेल असं वाटतं कारण माझे बरेच मित्र आयटीत जाउन आता दहा-बारा वर्षे झालियेत. त्यांना झकत म्यानेजरीयल क्यारीयर पाथ घ्यायला लागतोय. कारण तेव्हडा अनुभव असणारी इंजिनीअर्स आपल्याकडे लागतच नाहीत.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

21 Feb 2013 - 3:30 am | विश्वनाथ मेहेंदळे

मुळात भारतीय सर्विस इंडस्ट्रीमधील आयटी कंपन्यांमध्ये ८० ते ९० टक्के कामासाठी इंजिनियर (बीई) वगैरे लोकांना बसवणे हेच मोठे अंडरयुटिलायझेशन आहे.

परत तेच. मुळात या इंजिनियर लोकांना फार काही येत नसेल तर त्यांना अशी कामे दिली तर ते अंडरयुटिलायझेशन कसे ?? कठीण कामे दिली तर काय तीर मारणार आहेत हे ? की इंजिनियर ही डिग्री आहे म्हणून त्यांना भारी मानायचे ?? (एक वैयक्तिक प्रश्न :- तुम्ही इंजिनियर आहात का, शिक्षणाने?? )

सपोर्ट, मेंटेनन्स, ticket resolution वगैरेसाठी Data Entry Operator levelचे प्राथमिक ज्ञान असलेला कोणताही ग्रॅज्युएट चालेल. डेवलपमेंट वगैरे कामे सुद्धा अशा लोकांना गूगल सर्च किंवा वेगवेगळ्या टेक्निकल फोरम्स वरील सॅम्पल कोड वापरुन करता येतील.

विचारांची पातळी लक्षात आली..... आधी कीव वाटली मग खाली वाचून कळले की आपण मॅनेजर आहात. तेव्हा तुम्हाला माफ. चालू द्या जे काही चालू आहे ते.

आजानुकर्ण's picture

21 Feb 2013 - 3:43 am | आजानुकर्ण

हो मी इंजिनियर आहे. अगदी ट्युरिंग मशीन, ऍडवान्स्ड युनिक्स प्रोग्रॅमिंग, कंपाईलर कन्स्ट्रक्शन, एन पी हार्ड प्रॉब्लेम वगैरे शिकलेला कॉम्प्युटर इंजिनियर. मात्र गेल्या बारा वर्षात एकदाही मला सर्चिंग अल्गोरिदम वापरावा लागलेला नाही आणि केवळ दोनतीन वेळा सॉर्टिंग अल्गोरिदम वापरून शून्यापासून कोड लिहावा लागला आहे. याचे कारण भारतातल्या आयटी कंपन्यांमध्ये package customization, enhancements, वगैरेच कामे होतात. त्यामुळे एवढे सगळे शिकूनही या ज्ञानाचा कुठेही practical उपयोग झाला नाही.

विचारांची पातळी लक्षात आली..... आधी कीव वाटली मग खाली वाचून कळले की आपण मॅनेजर आहात. तेव्हा तुम्हाला माफ. चालू द्या जे काही चालू आहे ते.

यात पातळीचा काय संबंध आहे? भारतात ज्या कंपन्यांना आयटी लीडर्स वगैरे म्हटले जाते तिथली ऐंशी नव्वद टक्के कामे सपोर्ट आणि मेंटेनन्सची असतात. ती कामे हाताळण्यापुरते ज्ञान आजकाल गूगलवर सहज मिळते. असो तुमची माफी मिळाल्याने धन्य झालो. माफ केल्याबद्दल शतशः आभारी आहे.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

23 Feb 2013 - 7:45 pm | विश्वनाथ मेहेंदळे

हो मी इंजिनियर आहे....... शून्यापासून कोड लिहावा लागला आहे.

ते ठीक आहे पण म्हणून ते न येण्याचे समर्थन करता कामा नये. हे म्हणजे एखाद्या फिजिक्स शिकलेल्याने मला न्यूटन चा नियम येत नाही कारण तो मला कधी थेट वापरावा लागला नाही असे म्हणण्यासारखे झाले.

याचे कारण भारतातल्या आयटी कंपन्यांमध्ये package customization, enhancements, वगैरेच कामे होतात. त्यामुळे एवढे सगळे शिकूनही या ज्ञानाचा कुठेही practical उपयोग झाला नाही.

सपोर्ट, मेंटेनन्स, ticket resolution वगैरेसाठी Data Entry Operator levelचे प्राथमिक ज्ञान असलेला कोणताही ग्रॅज्युएट चालेल. डेवलपमेंट वगैरे कामे सुद्धा अशा लोकांना गूगल सर्च किंवा वेगवेगळ्या टेक्निकल फोरम्स वरील सॅम्पल कोड वापरुन करता येतील.

तुमचे मत बदलल्यात मला व्यक्तिश: रस नाही पण तिथे माझ्या प्रोफेशन बद्दल चुकीचा संदेश जात आहे म्हणून लिहितो आहे. यातले कुठलेही काम गूगल सर्च ने करता येत नाही. गूगल सर्च बद्दल बोलायचेच झाले तर ते Development साठी पण करता येते. कसलेले प्रोग्रामर्स सुद्धा online reference शोधतात आणि वापरतात. आणि त्यात काहीही गैर नाही. नक्की काय आणि कुठे शोधायचे आणि ते कसे वापरायचे हेच माहित नसेल तर काय करणार? शिवाय reinventing wheel चा प्रकार कशाला करायचा? हे म्हणजे hardware मध्ये काहीतरी नवीन करणाऱ्याला तू डायोड किंवा IC स्वतः तयार करतोस का असे विचारण्यासारखे आहे*

अजूनही मुद्दा कळला नसेल तर एक आव्हान आहे. मी काही बिसिनेस प्रोब्लेम्स देतो. त्यांची उत्तरे मला द्या. पण अट अशी की गुगल करूनच प्रोग्राम शोधून दाखवायचे. स्वतः १०% पेक्षा जास्त कोड लिहायचा नाही किंवा बदल करायचे नाहीत. स्वीकारताय ???

अंडरयुटिलायझेशन बद्दलच्या प्रश्नांना शिताफीने बगल दिलीत ते लक्षात आले हं माझ्या :-) त्यांना मुळात काहीच फारसे येत नसते हे एकदा कबुल केले की अंडरयुटिलायझेशनचा मुद्दा रद्दबातल होतो.

* उदाहरण चुकले असेल पण आशय समजून घ्या.

आजानुकर्ण's picture

23 Feb 2013 - 8:58 pm | आजानुकर्ण

ते ठीक आहे पण म्हणून ते न येण्याचे समर्थन करता कामा नये. हे म्हणजे एखाद्या फिजिक्स शिकलेल्याने मला न्यूटन चा नियम येत नाही कारण तो मला कधी थेट वापरावा लागला नाही असे म्हणण्यासारखे झाले.

न येण्याचे समर्थन कुठे आहे? मी अमुकतमुक गोष्ट शिकलो होतो. ती मला त्यावेळी चांगली येत होती हे माझ्या तत्कालीन गुणांवरुन वगैरे वगैरे कळू शकते. मात्र माझ्या प्रोफेशनमध्ये मी ती कधीही वापरली नाही त्यामुळे मला ती आता तितकीशी चांगली किंवा अजिबातच येत नाही हा साधा कार्यकारणभाव आहे. शिकलेली एखादी गोष्ट जर वापरली नाही, वारंवार आठवली नाही (recite), तर मेंदू ती विसरतो हे साधे फंक्शन आहे. मात्र तुम्ही प्रत्येक गोष्ट डिफेन्सिवली घेतली तर तुम्ही दुसऱ्या माणसाची नक्की काय क्वालिटी आहे हे तपासू शकणार नाही.

उदा. मी सुद्धा फिजिक्स शिकलो आहे. दोनवर्षे हायर सेकंडरी आणि एक वर्षे इंजिनियरिंगच्या पहिल्या वर्षाला. मलाही न्यूटनचे जे काही चार नियम आहेत ते पूर्णपणे येत नाहीत. न्यूटनचा नियम येण्याने किंवा न येण्याने मी आता जे काम करतो आहे त्याच्या क्वालिटीमध्ये काहीही फरक पडत नाही. तीच गोष्टऍरे सर्चिंग आणि सॉर्टिंगची. या गोष्टी कशा केल्या जातात याची थियरी मी शिकलो होतो ती मला माहीत होती. मात्र तो अल्गोरिदम मी स्वतः इंप्लिमेंट करण्यासाठी क्वचितच वापरला आहे. त्यामुळे जर तो पुन्हा वापरायचा असेल तर मला तो एकदा घासूनपुसून घ्यावा लागेल. आता मी दहा वर्षापूर्वी फिजिक्स किंवा अँरे सॉर्टिंग शिकल्याने दर सहा महिन्याला (किंवा जी काही स्मरणशक्तीची क्षमता असेल त्यानुसार मला रोजच्या कामासाठी आवश्यकता नसूनही) मी न्यूटनचा नियम किंवा अँरे सॉर्टिंग पाठ करत राहावे अशी अपेक्षा वेडगळपणाची आहे. त्याऐवजी माझ्या क्षेत्रात जे काही नवे चालू आहे ते शिकत राहणे मला फायद्याचे वाटते.

तुमचे मत बदलल्यात मला व्यक्तिश: रस नाही पण तिथे माझ्या प्रोफेशन बद्दल चुकीचा संदेश जात आहे म्हणून लिहितो आहे. यातले कुठलेही काम गूगल सर्च ने करता येत नाही. गूगल सर्च बद्दल बोलायचेच झाले तर ते Development साठी पण करता येते. कसलेले प्रोग्रामर्स सुद्धा online reference शोधतात आणि वापरतात. आणि त्यात काहीही गैर नाही. नक्की काय आणि कुठे शोधायचे आणि ते कसे वापरायचे हेच माहित नसेल तर काय करणार? शिवाय reinventing wheel चा प्रकार कशाला करायचा? हे म्हणजे hardware मध्ये काहीतरी नवीन करणाऱ्याला तू डायोड किंवा IC स्वतः तयार करतोस का असे विचारण्यासारखे आहे*

तुमचे प्रोफेशन जर टिकेट रिझॉल्युशन, सपोर्ट आणि मेंटेनन्स प्रकारचे असेल आणि तुम्ही गूगल सर्च वगैरे वापरत नसाल तर तुम्ही work smart ऐवजी work hard करत आहात एवढेच म्हणेन. तुमचे प्रोफेशन मी याआधी लिहिलेल्या कामापेक्षा जर थोड्या वेगळ्या प्रकारचे असेल तर तशी जरा बरी १०-१५ टक्के कामे भारतात होतातच की. मी ते कुठे नाकारले आहे? तरीही तुम्हाला वाटत असेल की भारतातील आयटी प्रोफेशन हे अगदी उच्च दर्जाचे innovational आणि ground breaking वगैरे काहीतरी आहे आणि तिथे अतिउच्चशिक्षित व्यक्तीच लागतात तर तुम्ही तो गैरसमज दूर करुन घेतल्यास तुम्हालाच फायदा होईल.

शिवाय reinventing wheel चा प्रकार कशाला करायचा? हे म्हणजे hardware मध्ये काहीतरी नवीन करणाऱ्याला तू डायोड किंवा IC स्वतः तयार करतोस का असे विचारण्यासारखे आहे*

एक्झॅक्टली. कसे बोललात. सगळ्या न्यू जनरेशन लँगवेजेस हे अत्यंत एफिशियंट सर्चिंग आणि सॉर्टिंग एपीआय देतात. नव्या ३-४-५ जी एल प्रॉग्रॅमिंग लँगवेजेसच्या लायब्ररीजचा अभ्यास करुन ऑलरेडी ट्राईड अँड टेस्टेड एपीय लगेच वापरता येतो. साडेपाच वर्षे अऩुभव असलेल्या इंजिनियरला 'तुला हे एपीआय वापरता येतात का? असल्यास कसे वापरायचे ते एक्सप्लेन कर' वगैरे प्रश्न विचारणे मला सयुक्तिक वाटते. मात्र त्याला सर्चिंग अल्गोरिदम सांग हे reinventing wheel आहे. मात्र नुकताच कॉलेजमधून पासआऊट झालेल्या मुलाला अधिक थिअरेटिकल असा अल्गोरिदमबाबतचा प्रश्न विचारला तरी चालेल.

अजूनही मुद्दा कळला नसेल तर एक आव्हान आहे. मी काही बिसिनेस प्रोब्लेम्स देतो. त्यांची उत्तरे मला द्या. पण अट अशी की गुगल करूनच प्रोग्राम शोधून दाखवायचे. स्वतः १०% पेक्षा जास्त कोड लिहायचा नाही किंवा बदल करायचे नाहीत. स्वीकारताय ???

तुम्ही अजूनही माझ्या प्रतिसादाचे मर्म समजावून घेतलेले नाही. बिझिनेस प्ऱॉब्लेमची उत्तरे ही support, maintenance, ticket resolution. server availability, data failure वगैरे जी ब्रेड अँड बटर म्हणतो त्या स्वरुपाची कामे आहेत का? भारतात जशी टीसीएस, इन्फोसिस, विप्रो, पटनी, वगैरे बॉडी शॉपिंग कम कन्सल्टन्सी करणाऱ्या कंपन्या आहेत तशाच थॉटवर्क्स, मॅथवर्क्स, इंट्यूट वगैरे कंपन्याही आहेत. मात्र एकूण आयटी एम्पलॉईजचा रेशो पाहिला तर जास्त प्रकारची कामे कोणती चालतात हे तुमच्या लक्षात येईल. बिझिनेस प्रॉब्लेमची उत्तरे गूगल करुन मिळतात हे मी कुठे लिहिले होते ते दाखवावे. ज्या स्वरुपाची लो-एंड कामे मुख्यत्वे होतात त्याची उत्तरे गूगलवर सहज मिळतात हा माझा दावा होता.

मुळात या इंजिनियर लोकांना फार काही येत नसेल तर त्यांना अशी कामे दिली तर ते अंडरयुटिलायझेशन कसे ??

अंडरयुटिलायझेशनच्या मुद्द्याला बगल दिलेली नाही. इंजिनियर लोकांना फार काही येत नाही हे तुमचे इंटरप्रिटेशन साडेपाच वर्षाचा अनुभव असलेल्या व्यक्तीला साडेपाच वर्षापूर्वी शिकलेला अँरे सर्चिंग अल्गोरिदम येत नाही या गृहितकावर अवलंबून असल्याचे मला दिसले. त्या इंजिनियरला इतर काही येते की नाही याबाबचा अधिक डेटा तुम्ही दिलेला नाही. जर त्या इंजिनियरला दुसरे काही येत नसेल तर त्याला ही कामे देणे अंडरयुटिलायझेशन नाही.

मैत्र's picture

27 Feb 2013 - 10:31 am | मैत्र

दोन प्रोजेक्टसमध्ये बीई आणि बीएस्सी अशा दोन्ही प्रकारच्या डेव्हलपर्स बरोबर काम केलं आहे. (मी टेक्निकल / प्रोजेक्ट मॅनेजर नाही). बीएस्सी बद्दल कसलाही आकस / कमी भाव नाही.
एका पातळीपर्यंत दोन्ही ग्रॅड्स एकाच दर्जाने काम करतात. काही विशेष अवघड लॉजिक आले की बरेचदा बीएस्सी ग्रॅड्सना झेपत नाही असा अनुभव आहे. क्लायंट अजिबात हँडल करता येत नाही. काही प्रॉब्लेम आला की बावरून जातात.
नॉन टेक्निकल - फंक्शनल / अ‍ॅनालिस्ट ने सांगितलेले तांत्रिक परिभाषेत सहजपणे करता येत नाही. मध्ये परत एक तंत्रज्ञ लागतो टेक्निकल फ्लोचार्ट सांगणारा.
अर्थात हा विदा दोन प्रोजेक्ट्सच्या आणि भारतातील पहिल्या दोन मोठ्या कंपन्यांच्या प्रत्यक्ष अनुभवावर आधारित आहे.
म्हणून तो सर्वच बीएस्सी ग्रॅड्स आणि सर्व ठिकाणी लागू होईल असे नाही.
सपोर्ट मध्ये बरेचदा हे ग्रॅड्स मनापासून काम करतात आणि बीई लोक जेमतेम चार वर्षात ६-८ लाखाची स्वप्ने पाहत चांगलं काम आणि अगदी बेसिक अनुभव असूनही रोज ब्रेकफास्टला नवीन जॉबचीच चर्चा करतात हा अनुभव आहे.
काम गळ्याशी असताना प्रोजेक्ट पूर्ण करण्याऐवजी थापा मारून इंटरव्ह्युला जाणे हे नेहमीच पाहिले आहे.
पीएमला काम नाही. फंक्शनल ला टेक्निकल माहीत नाही पण पगार मिळतो. मला मिळाला पाहिजे हे असते पण जबाबदारीची जाणीव या मधल्या वयातल्या इंजिनिअर्समध्ये कमी दिसते. ती जबाबदारी घेणारे झपाट्याने पुढे जातात.
पण हे विश्व असं आहे की अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले किंवा खोटा अनुभव सांगणारे अनेक लोक वर्ष काढत तरून जातात.
इतरत्र कोणी म्हटल्याप्रमाणे आयटी मध्ये रिस्क आणि त्रास कमी आहे. कित्येक तासांचं काम तर आता अनेक क्षेत्रात आहे पण सर्व ठिकाणि आयटी प्रमाणे पैसा/सोयी सुविधा/मान मिळत नाही. वैयक्तिक रिस्क कमी असते.
जेव्हा कंपन्यांना गरज असते तेव्हा घाईमध्ये लोक उचलले जातात यात अनेक कमी दर्जाचे लोक भरती होतात.
१ लाखाहून जास्त कर्मचारी असलेल्या कंपन्यांमद्ध्ये असे असंख्य लोक दिसतात.
कँपस मधून जेव्हा ५०-१००+ उचलले जातात तेव्हा असे ओले सुके पुष्कळ घुसतात.

अगदी सरसकटीकरण नाही करायचं म्हटलं तरीही बीएस्सी वाले बीई झालेल्यांच्या पुढे तुम्ही म्हणतात तसा बरेच वेळा कमी पडतात हे वास्तव आहे.

एमसीए झालेले मात्र तांत्रिक ज्ञानाच्या बाबतीत खुपच चांगले असतात असा माझा स्वतःचा अनुभव आहे. कदाचित म्हणूनच आयटी इंडस्ट्री एमसीए ही पदवी बीईला समकक्ष समजते.

नानबा's picture

20 Feb 2013 - 9:15 pm | नानबा

पेटलाय धागा... आय.टी. वाले आपापसांतच भांडायला लागले तर आम्ही नॉन आय.टी. वाल्यांनी काय प्रतिक्रिया द्यावि??

धन्या's picture

20 Feb 2013 - 9:24 pm | धन्या

तुम्ही आयटीवाल्यांच्या भांडणाची मजा घ्यायची. ;)

विनोदाचा भाग बाजूला ठेवूया. या भांडणातूनही नॉन आयटीवाल्यांना एकाच गोष्टीकडे पाहण्याचे वेगवेगळे दृष्टीकोन वाचायला मिळतील.

निखिल देशपांडे's picture

20 Feb 2013 - 10:21 pm | निखिल देशपांडे

या धाग्यावर प्रतिसाद द्यायचा होता. मी लिहीपर्यंत बरीच चर्चा झाली आहे.
माझ्या बाबतीत उदाहरण द्यायचं तर मी बेंचवर बराच काळ घालवला आहे. मी कंपनी ऑक्टोबर मधे जॉइन केली. त्यानंतर साधारण माझी ट्रेनिंग संपायला डिसेंबरचा मध्य उजाडला. डिसेंबर ह्या महिन्यात वर्षअखेर आणि ख्रिसमस या दोन्ही गोष्टिंमुळे फारसे नवीन प्रोजेक्ट येत नाहीत. प्रोजे़क्ट चालू व्हायला साधारण दोन महिन्याचा काळ गेला. या काळात नॉन आय टी बॅग्राउंड मधुन आलेलो असल्यामुळे काय शिकायचे ह्या बाबत संभ्रमच होता. ह्याकाळात टेबल टेनिस खेळणे, कॅरम खेळणे, लायब्ररीत जाऊन सगळे पेपर वाचून काढणे असेच दिवस काढले.
ह्या नंतर हातात आलेले प्रोजेक्ट मधे बिलेबल असुन सुद्धा आम्ही बेंचवरच होतो. त्याचे कारण म्हणजेच जास्त रिसोर्सेस दाखवुन क्लायंट कडुन जास्त बिलिंग उकळणे असेच होते. हे इतके पद्धतशीर होते की आमच्या डेडलाईन सुद्धा जास्त बिलिंग साठी अ‍ॅडजस्ट केलेल्या होत्या. या काळात सगळ्यात मोळा अ‍ॅडव्हांटेज होता. इ-लर्निंग पोर्ट्ल चा अ‍ॅक्सेस. त्यातुन बर्‍याच चांगल्या प्रकारे स्किल्स बिल्ड करता आल्या.
ह्यानंतर कंपनीच्या गरजेनुसार आम्हाला काम करत असलेली टेक्नोलॉजी बदलायची संधी मिळाली. मी प्रोजे़क्ट मधुन रिलीज झाल्यावर साधारण पंधरा दिवसांनी ट्रेनिंग सुरु होणार होती. तिथे परत एकदा बेंच अनुभवायला मिळाला. या ट्रेनिंग नंतर साधारण २-३ दिवसातच मला नवीन प्रोजे़क्ट मिळाला. पण माझ्या सोबतच्या पंधरा लोकांना प्रोजे़क्ट न मिळाल्यामुळे बळजबरी बंगळुरू ला हलवले.
अजुन एक प्रकारचा बेंच अनुभवायाला मिळाला आहे तो म्हणजे BGC Bench. या प्रकारात क्लायंट स्वतः प्रत्येक रिसोर्स चा एका थर्ड पार्टी कंपनी कडुन बॅक्ग्राउंड तपासुन घेते. ह्या प्रोसेस ला साधारण दोन ते तीन आठवडे जातात. आणि त्या काळात क्लायंटचे काम जिथुन होते त्या आपल्याच कंपनीच्या ऑफिस मधे आपल्यालाच अ‍ॅक्सेस नसतो. माझ्या केस मधे BGC झाल्याचा निरोपाचा मला फोन आला त्याबेळेस माझा साखरपुडा चालू होता. सो बेंच चा असाही वापर करता येतो. :-)

यानंतरच्या सर्व प्रोजेक्टमधुन बाहेर पडताना पुढ्ची सोय अधिच करुन ठेवलेली असायची ओव्हरऑल म्हणाल तर मी बेंच एन्जॉय केलाय. यापुढे आयुष्यात अनुभवावा लागेल का माहित नाही आणि इच्छा हि नाही.

सध्या छोट्या कंपनीत काम करातान बेंच हा शब्दच बाद झालाय. आठ तास पुरेल एवढे काम नक्कीच प्रत्येकाकडे असते.

जाता जाता :- आय टीतल्या फेक रेझ्युमे बद्दल हैद्राबादचा उल्लेख आला आहे. माझा सगळ्यात वाईट अनुभव म्हणजे एका दिवसात चाळीस फेक रेझ्युमे वाल्यांचा सामना करावा लागला होता. त्यातल्या चार लोकांनीच फक्त कबुल केले की त्यांचा रेझ्युमे खोटा आहे.

बेंच चा धागा पहाताच आम्हाला आमचे मित्र धमालरावांची आठवण झाली. त्यांच्या आणि आमच्या बेंचच्या काळातल्या आमच्या खरडसंवादाच्या आठवणीने आमचे डोळे पाणावले.

नाना चेंगट's picture

20 Feb 2013 - 11:09 pm | नाना चेंगट

मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी.

माझे ६ महिन्यांचे ट्रेनिंग झाले. मग १ महिना बेंच, पण इंटर्नल काम असल्याने त्रास झाला नाही. आणि त्यानंतर जो सपाटा चालू झालाय तो आजतागायत थांबयचे नावच घेत नाही. मध्यंतरी ३ प्रोजेक्ट बदलूनही झालेत. एकदा तर २ प्रोजेक्टवर १ महिना एकसाथ काम केले. (मी >१,००,००० कर्मचारी वाल्या कं.त आहे.) माझा अनुभव असा राहिला आहे कि तुम्ही जर चांगले काम करत असाल तर शक्यतो बेंच वर नाही बसू देत. (स्वतःची स्तुती करत नाहिये :) )
पण रोज चहावर भेटणारे बेंचवाल्या मित्रांचे त्रासिक चेहरे बेंचची भितीच घालत असतात. ते दिवसभर मौजमजा करत असतात पण त्यांना कुणीतरी काम करणारा भेटला कि त्याला तासभर यांचे रडगाणे ऐकावे लागते. (आम्हाला टोमणे मारायची सोय असते "तुझ्यासारखा मी बिनकामाचा नाहिये, चल निघतो" वगैरे वगैरे)
बाकी लेखाशी पुर्ण सहमत.

-----------
जातवेद

मी >१,००,००० कर्मचारी वाल्या कं.त आहे.

तुम्हाला बेंचवर येऊ देत नाहीत तेच चांगलं आहे. एकदा आलात की कुठून झक मारली आणि प्रोजेक्टमधून रिलीज घेऊन बेंचवर आलो असं होऊन जाईल. :)

> १,००,००० कर्मचारीवाल्या कंपन्यांचा बेंच २५,००० च्या आसपास असतो. या पंचवीस हजारात माणूस कुठे हरवून जातो त्याचं त्यालाच कळत नाही.

या पंचवीस हजारात माणूस कुठे हरवून जातो त्याचं त्यालाच कळत नाही.

एकदम बरोबर.

पिवळा डांबिस's picture

21 Feb 2013 - 12:03 am | पिवळा डांबिस

धागा मस्त आहे...
अगदी अद्भुत आणि सुरस अरेबियन नाईट्स वाचल्याचा आनंद मिळतोय!!
:)
पुढील भाग वाचण्यासाठी उत्सुक आहे...

नंदन's picture

21 Feb 2013 - 2:41 am | नंदन

असेच म्हणतो :)

(नॉन-आयटी विंजिनेर)

मितभाषी's picture

22 Feb 2013 - 11:54 pm | मितभाषी

हेच बोल्तो.

पुभाप्र

एकदाच २० दिवस बेंचवर होते. मला खूप टेन्शन यायचं तेव्हा.

अर्धवटराव's picture

21 Feb 2013 - 2:47 am | अर्धवटराव

साला सगळा फास्टफूडचा जमाना. तब्बेतिने लाईफ चघळत चघळत लुफ्त घ्यायचा सोडुन मरमर करायची कसली हौस म्हणायची ही. आयला... आम्हि तर बेंचवर नसुन देखील बेंचवाल्यांपेक्षा जास्त (रिकामटेकडे) उद्योग करतो, आणि वरुन चांगलं काम केलं म्हणुन मॅनेजरची शाबाशी देखील मिळवतो =))

अर्धवटराव

उपास's picture

21 Feb 2013 - 2:54 am | उपास

बेंच वर फार दिवस फुकट घालवले असतिल तर मुलाखतीच्यावेळी अशा व्यक्तिचा रीझ्युमे खोटा असेल तर पकडणे सरावाने शक्य होते असे अनुभवाने सांगता येईल.
लेख आणि त्याच्यावरची चर्चा मस्तच.
(नोकरी ब्दलण्याचा महिन्या-दोन महिन्यांचा काळ सोडता, गेल्या १३ वर्षात एकदाही बेंचवर आणि नॉनबिलेबलही नसलेला) - उपास

नुमविय's picture

21 Feb 2013 - 1:59 pm | नुमविय

जमालाय!

मालोजीराव's picture

21 Feb 2013 - 2:33 pm | मालोजीराव

मस्त रे !

दुसरी कल्पना जास्त आवडली...एकदा संपूर्ण सह्याद्री हिंडायची घालायची इच्छा आहे...अश्या प्रकारे जर बेंच वर गेलो तर नक्कीच पूर्ण होईल :)

बाकी धनाजीराव यंदाच्या सिझनला फुल फार्मात...

मालोजीराव's picture

21 Feb 2013 - 2:34 pm | मालोजीराव

मस्त रे !

दुसरी कल्पना जास्त आवडली...एकदा संपूर्ण सह्याद्री हिंडायची इच्छा आहे...अश्या प्रकारे जर बेंच वर गेलो तर नक्कीच पूर्ण होईल :)

बाकी धनाजीराव यंदाच्या सिझनला फुल फार्मात...

वेल्लाभट's picture

21 Feb 2013 - 2:35 pm | वेल्लाभट

बापरे. कठीणच. छान लिहिलंय बाकी.

भारततल्या सगळ्या फॉरेक्स ट्रेडर्सना रीजर्व बँकेने डीसेंबर २०११ पासुन बेंच वर बसवलेले आहे अजुन काम देण्या बद्द्ल काही बोलत नाही.

इरसाल's picture

21 Feb 2013 - 3:05 pm | इरसाल

एवढे सगळे बोंबलत आहेत तर शेवटचे सांगुन टाका की हा बेंच (बाकडा) ज्यावर बशित्यात त्यो कंपनी पुर्विते की घरुन्श्यान घिवुन जावा लागतो ?

इरसाल's picture

21 Feb 2013 - 3:21 pm | इरसाल

एवढे सगळे बोंबलत आहेत तर शेवटचे सांगुन टाका की हा बेंच (बाकडा) ज्यावर बशित्यात त्यो कंपनी पुर्विते की घरुन्श्यान घिवुन जावा लागतो ?

अमेय वत्सराज's picture

22 Feb 2013 - 10:43 pm | अमेय वत्सराज

छान लेख.

चौकटराजा's picture

23 Feb 2013 - 5:11 am | चौकटराजा

येवढे पर्तिसाद आसूनही येकाने पन त्या बाकड्याचा फटू टाकला नाय ! ह्ये काय मिपा सौंस्क्रुतीत लय वंगाळ दिसतया ! म्ह़ंजे जेच्या बध्धल जळायाचं तेजा येक बी फटू आसाया पायजेल का नाय ?

धन्या's picture

23 Feb 2013 - 5:48 am | धन्या

एव्हढं रामायण गाऊन झाल्यानंतरही तुम्ही विचारत आहात की रामाची सीता कोण.

बेंच ही संज्ञा आहे. हा आता एक गोष्ट आहे. जेव्हा आयटी ईंजिनीयर्सना काम असते तेव्हा त्यांना हापिसात कुठल्यातरी बिल्डींगमध्ये, कुठल्यातरी फ्लोअरवर प्रोजेक्ट एरीया ठरवून दिलेला असतो. की बाबा, या एव्हढया जागेत अमुक अमुक प्रोजेक्टची लोकं बसतील. मग या लोकांना त्यांचे असे एक चौकोनी खुराडे दिले जाते. आयटीवाले त्या खुराडयाला क्युबिकल म्हणतात. एका क्युबिकलमध्ये चार माणसं चार कोपर्‍यात तोंडं करुन बसतील अशी व्यवस्था असते. मॅनेजरला एकटयाला आख्खं क्युबिकल दिलं जातं बहूधा.

ज्या आयटी कंपनीत बेंचवर असतानाही ऑफीसला जावे लागते, अशा आयटी कंपन्यांमध्ये एक बेंच एरीया असतो. म्हणजे प्रत्यक्षात शाळेतल्या बाकांसारखे बाक नसतात. मोठया हॉलमध्ये शे दोनशे लोकांची बसायची सोय केलेली असते. आपण टीव्हीवर लोकसभेत जसं पाहतो तसेच लोकं रांगेत बसतात. फरक एव्हढाच की प्रत्येकाच्या पुढयात कॉम्प्युटर सिस्टीम असते.

मोठया कंपन्यांमध्ये बेंचवर असलेल्यांची संख्या प्रचंड मोठी असते. आणि बेंच एरीयात बसायची जागा खुपच कमी असते. अशा वेळी ज्यांना बेंच एरीयात जागा आणि कॉम्प्युटर मिळत नाही असं पब्लिक लायब्ररीत बसणं, जिमला जाणं, मैदानावर जाऊन काही खेळ खेळणं असे पर्याय शोधतात.

सर्वात उत्तम पर्याय असतो डॉर्मिटरीत जाऊन मस्त ताणून देणं.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

23 Feb 2013 - 2:52 pm | विश्वनाथ मेहेंदळे

माझी कंपनी बेंच एरिया सारख्या unproductive गोष्टींवर खर्च करत नाही. आधी तर बेंच वर असताना ऑफिसला जायची गरजच नसायची. हल्ली दिवसातून एकदा तोंड दाखवायला सांगतात म्हणे, मला तर ते ही सांगितले नव्हते. सांगितले असते तर थोडा दंगा घातला असता, लॉगिक सांगा म्हणून. त्यातून आमच्या इथे ना डॉर्म असते ना खेळाचे मैदान. जाऊन टाईमपास करणार तरी कुठे ?

माझी कंपनी बेंच एरिया सारख्या unproductive गोष्टींवर खर्च करत नाही.

आनंदाची गोष्ट आहे.

आधी तर बेंच वर असताना ऑफिसला जायची गरजच नसायची. हल्ली दिवसातून एकदा तोंड दाखवायला सांगतात म्हणे.

तुम्ही भाग्यवान आहात.

मला तर ते ही सांगितले नव्हते. सांगितले असते तर थोडा दंगा घातला असता, लॉगिक सांगा म्हणून.

कंपनी तुम्हाला चांगलीच ओळखून असणार. (आम्ही तर तुमच्या मुद्देसुद प्रतिसादांना घाबरुन मिपावर लिहणंही बंद केलं होतं.)

त्यातून आमच्या इथे ना डॉर्म असते ना खेळाचे मैदान. जाऊन टाईमपास करणार तरी कुठे?

एकदा ऑफीसमध्ये रिकाम** नऊ तास काढायचे नाहीत म्हटल्यावर या गोष्टींची गरजच नाही.

व्यनीतून तुमचा ईमेल आयडी कळवा. माझा रीझ्युमे पाठवून देतो. आणि हो, तेव्हढं ईंटरव्ह्यू पॅनलवर कृपा करुन दुसर्‍या कुणाला तरी बसवा. तुम्ही नको. इथं सॉर्टींग आणि सर्चिंग अल्गोरिदम कुणाच्या बाला येत आहेत. ;)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

23 Feb 2013 - 4:59 pm | विश्वनाथ मेहेंदळे

तुम्ही भाग्यवान आहात.

व्यनितून CTC आणि total exp सांगतो. मग परत हेच बोलून दाखव ;-)

आम्ही तर तुमच्या मुद्देसुद प्रतिसादांना घाबरुन मिपावर लिहणंही बंद केलं होतं

फाडा बिले गरिबावर...

व्यनीतून तुमचा ईमेल आयडी कळवा. माझा रीझ्युमे पाठवून देतो. आणि हो, तेव्हढं ईंटरव्ह्यू पॅनलवर कृपा करुन दुसर्‍या कुणाला तरी बसवा. तुम्ही नको

आनंदाने :-)

इथं सॉर्टींग आणि सर्चिंग अल्गोरिदम कुणाच्या बाला येत आहेत.

मग आजानुकर्णांची टीम जॉईन कर ;-)

मग आजानुकर्णांची टीम जॉईन कर.

यातला विनोदाचा भाग बाजूला ठेवूया. पण आयटीत काही जॉब प्रोफाईल असे आहेत की त्यासाठी विशेष शिक्षणाची मुळीच गरज नाही. कामचलाऊ ईंग्रजी लिहिता आणि बोलता आलं तरी पुरेसं असतं. सर्व्हीस बेस्ड आयटी कंपन्यांमधील सपोर्ट प्रोजेक्टसमध्ये नक्कीच काही जॉब प्रोफाईल असे असतात.

उदा. एका प्रसिद्ध जागतिक औषध निर्माण कंपनीला एक तितकीच प्रसिद्ध भारतीय सर्व्हीस बेस्ड आयटी कंपनी संगणकीकरण सेवा पुरवते. या औषध निर्माण कंपनीची कामे जगभरात २४x७ तास चालू असतात. या ऑपरेशन्ससाठी काही अतिमहत्वाच्या संगणक प्रणाली अचूक आणि अविरत चालू असणे गरजेचे असते. अर्थात संगणक प्रणालींच्या आजवरच्या अनुभवांतून एक गोष्ट लक्षात आलेली आहे की ती संगणक प्रणाली बनवत असताना कितीही काळजी घेतली असली, तिच्या कितीही चाचण्या केलेल्या असल्या, तरी प्रत्यक्ष वापराच्या वेळी त्या त्या वेळच्या हार्डवेअर, सॉफ्टवेअर, नेटवर्क कनेक्टीव्हीटी ईत्यादींच्या परिस्थितीनुसार संगणक प्रणाली तिच्या अपेक्षित वागण्यापेक्षा थोडी वेगळी वागू शकते. (अनएक्स्पेक्टेड रीस्पॉन्स). काही वेळा संगणक प्रणाली ठप्पही होऊ शकते. (अनअवेलिबिलीटी). अशा वेळी संगणक प्रणाली आणि कंपनीचे कामकाज जर एकमेकांशी खुपच जखडलेले असतील (टाईटली कपल्ड) तर मग अपेक्षित प्रतिसाद न देणार्‍या / बंद पडलेल्या संगणक प्रणालीमुळे कंपनीचे प्रत्यक्ष कामकाज (उदा. कच्चा माल एका विशिष्ट प्रमाणात एकमेकांत मिसळणे, तयार झालेल्या औषधी गोळ्या बाटल्यांमध्ये भरणे, ठराविक संख्येच्या बाटल्यांचे खोके भरणे ई.)

असा काही संगणक प्रणालीचा बिघाड झाला की फ्लोअरवरचे कामगार किंवा त्यांचा सुपरवायझर कुणीतरी त्यांना उपलब्ध करुन दिल्या गेलेल्या समस्या व्यवस्थापन प्रणाली (इन्सिडंट मॅनेजमेंट सिस्टीम) मध्ये तो त्या समस्येची (इन्सिडंटची) नोंद करतो.

जगाच्या पाठीवर कुठेतरी त्या औषध निर्माण कंपनीच्या आयटी सर्व्हीस प्रोव्हायडर कंपनीचे लोक या समस्या व्यवस्थापन प्रणालीवर २४x७ तास लक्ष ठेवून असतात (इन्सिडंट मॉनिटरींग). सर्व्हीस बेस्ड आयटी कंपन्यांच्या सपोर्ट प्रोजेक्टसमध्ये तीन शिफ्टसमध्ये काम चालते ते याचमुळे. तिकडे फ्लोअरवरच्या कामगाराने त्याच्या समस्येची नोंद केली की अगदी पुढच्या क्षणी त्या सम्स्येची माहिती इकडे आयटीवाल्यांना दिसू लागते. ही माहिती वर्गीकृत (क्लासिफाईड) असते. कुठल्या संगणक प्रणालीत बिघाड झाला आहे, हा बिघाड झाला तेव्हा कामगार प्रणालीच्या नेमक्या कोणत्या सुविधेचा वापर करत होते ईत्यादी माहिती त्या इन्सिडंटमध्ये नोंदवलेली असते. आता आयटी कंपनीत जी कुणी व्यक्ती मॉनिटरींग करत असते तिला स्वत:ला त्या समस्येवर काम करायचे नसते. त्या व्यक्तीने फक्त ती समस्या कोणत्या टीमकडे पाठवायची आहे हे तपासायचं, त्या टीममधला कोण ईंजिनीयर पाहायचं आणि तो इन्सिडंट त्या शिफ्टमधल्या ईंजिनीयरच्या नावे करुन टाकायचा. कधी कधी नेटवर्क डाऊन असेल तर सार्‍याच यंत्रणा ठप्प होतात अशा वेळी नेटवर्क कनेक्टीव्हीटी पुर्ववत करणं हाच एक क्रिटीकल इन्सिडंट असतो. कुठलीच संगणक प्रणाली उपलब्ध नसल्यामुळे फ्लोअरवरचे काम इंन्सिडंट मॉनिटरींग टीमला फोन करतात. इन्सिडंट टीमने मग तो इन्सिडंट नेटवर्क टीमला फोन कॉल करुन असाईन करायचा असतो.

ईथून पुढे आयटी ईंजिनीयर लोकांचे काम सुरु होते. त

या सार्‍या इन्सिडंट मॅनेजमेंट प्रकारात कुठलेच विशेष ज्ञान लागत नाही. जे लोक समस्या व्यवस्थापन प्रणालीवर लक्ष ठेवून असतात, त्यांना ईंग्रजी समजणं, लिहिता, वाचता आणि बोलता येणं एव्हढंच पुरेसं असतं. कुठली समस्या कुठल्या टीमकडे पाठवायची ही माहिती वर्ड किंवा एक्सेल फाईलमध्ये असते.

सर्व्हीस बेस्ड आयटी कंपन्या उपरोल्लिखित जॉब प्रोफाईलसाठी बीएस्सी आयटी/कॉम्प्युटर, बीसीए अशी शै़क्षणिक पात्रता असलेली मुले/मुली या जॉब प्रोफाईलसाठी घेतात. पगारही विशेष नसतो (दहा हजाराच्या आसपास). शिफ्टस कराव्या लागतात. कामाच्या गरजेनुसार दर आठवडयाला किंवा महिन्याला शिफट्स बदलातात. तरीही पोरं आपण आयटीतल्या एका बडया कंपनीत काम करतो म्हणून खुश असतात.

तुमच्या घरी, शेजारी पाजारी कुणी बीएस्सी आयटी/कॉम्प्युटर किंवा बीसीए झालेला तरुण/तरुणी एखाद्या बडया आयटी कंपनीत शिफ्टसमध्ये काम करत असेल तर तो/ती इन्सिडंट मॉनिटरींगचं काम करतो/करते असं बिनधास्त समजावे. कारण या प्रोफाईलवर दुसरी कुठली शैक्षणिक पात्रता असलेलं सहसा कुणी नसतं.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

23 Feb 2013 - 8:03 pm | विश्वनाथ मेहेंदळे

या प्रकाराला लेवल-१ सपोर्ट म्हणतात. एखाद्या नावाजलेल्या outsourcing वाल्या कंपनीत किती टक्के लोक L१ ला असतात रे ?

होते काय माहित आहे काय, बेसिक्स कच्चे असल्याने मी म्हणतो त्या लोकांना efficient solutions देत येत नाहीत. मग धेडगुजरी पद्धतीने काम होते. आणि त्यात काही चूक आहे असे कुणालाच वाटत नाही. मुळात आपल्या अज्ञानामुळे आपल्याला जास्त काम करावे लागत आहे हेच कळत नाही. एक प्रॉब्लेम दहा प्रकारे सोडवता येतो पण ज्याला त्यातले ज्ञान आहे त्याला, इतरांना ते दहा options दिसणारच नाहीत.

हे वाच. The Blub Paradox. थेट संबंध नाही तसा, पण तेच लॉगिक इथे लावता येईल.

बेसिक्स कच्चेपेक्षाही L1 ला सहसा कमी अनुभव असलेले लोक असतात, म्हणजे ज्यांनी अजून खूप किडे केले नसतील वा ज्यांना ते करायचा अनुभव नसतील असे. मग ते एकदम उच्च सोल्यूशन्स कसे देणार? दुसरे म्हणजे पुस्तकी वा केवळ सर्टीफिकेशनच्या परीक्षा पास होऊन मिळालेले ज्ञान आणि प्रत्यक्ष काम करुन मिळालेले ज्ञान ह्यात जमीन अस्मानाचा फरक असतो. भरमसाट सर्टीफिकेशनबिरुदावली मिरवणारी माठ मंडळी पाहिली आहेत.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

23 Feb 2013 - 8:37 pm | विश्वनाथ मेहेंदळे

माफ करा. माझी प्रतिसाद लिहिताना काहीतरी चूक झाली. माझ्या प्रतिसादातील पहिली ओळ धन्याच्या लेटेस्ट प्रतिसादाला उद्देशून होता आणि पुढील भाग हा आधीच्या चर्चेचे continuation होते. ते बेसिक कच्चे वाले वाक्य समस्त outsourcing industry ला लागू आहे. L१ ला ते अजिबात लागू होत नाही.

यशोधरा's picture

23 Feb 2013 - 8:57 pm | यशोधरा

ओके. चांगली चर्चा आहे, चालूद्यात. :)

पुन्हा एकदा डेव्हलपमेंट प्रोफाईलचे वेध लागल्यामुळे मी सपोर्टची टर्मिनॉलॉजी विसरु लागलो आहे. :)

असो.

एखाद्या नावाजलेल्या outsourcing वाल्या कंपनीत किती टक्के लोक L१ ला असतात रे ?

एकुण आयटीवाल्यांच्या संख्येच्या मानाने खुपच कमी.

बेसिक्स कच्चे असल्याने मी म्हणतो त्या लोकांना efficient solutions देत येत नाहीत. मग धेडगुजरी पद्धतीने काम होते. आणि त्यात काही चूक आहे असे कुणालाच वाटत नाही. मुळात आपल्या अज्ञानामुळे आपल्याला जास्त काम करावे लागत आहे हेच कळत नाही. एक प्रॉब्लेम दहा प्रकारे सोडवता येतो पण ज्याला त्यातले ज्ञान आहे त्याला, इतरांना ते दहा options दिसणारच नाहीत.

बेसिक कच्चं असण्यापेक्षा मुळात त्यांचं शिक्षण आणि प्रशिक्षण तितकं खोलवर झालेलं नसतं. मुळात कंपनीला पैसे वाचवायचे असल्यामुळे कंपनीही अशीच माणसं निवडते. मग कुणीतरी त्यांना नॉलेज ट्रान्स्फरच्या नावाखाली "हे असं करायचं, ते तसं करायचं" अशी जुजबी माहिती देतं. आणि ते पब्लिकही ते तसंच करत राहतं. आणि मग हे तुम्ही म्हटल्याप्रमाणे प्रॉब्लेम्स होतात.

विमे, The Blub Paradox हे अफलातून आर्टीकल शेअर करण्यासाठी धन्यवाद.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

24 Feb 2013 - 1:03 am | विश्वनाथ मेहेंदळे

विमे, The Blub Paradox हे अफलातून आर्टीकल शेअर करण्यासाठी धन्यवाद.

Blub Paradox च्या मागचा फंडा बऱ्याच ठिकाणी वापरता येतो. मागे एका अध्यात्मिक वादात माझा मुद्दा समजावून सांगण्यासाठी मी त्या सारखे एक उदाहरण वापरले होते.

पॉल ग्राहम चा पूर्ण ब्लॉग बघ. अत्यंत सुंदर आहे. त्या माणसाचा करीअर ग्राफ पण रोचक आहे. त्याने एकेकाळी वेब स्टार्टअप सुरु केली, ती कालांतराने याहू ला विकली आणि याहूत नोकरी करायला लागला. आता ती नोकरी सोडली आणि फंडींग देतो इतर स्टार्टअप्स ना. Dropbox आणि Airbnb या दोन्हींना त्याचे फंडिंग आहे. १० बिलियन चा पोर्टफ़ोलिओ आहे त्याच्या कंपनीचा. या सगळ्या अनुभवामुळे ब्लॉग ला वजन आहे :-)

चौकटराजा's picture

23 Feb 2013 - 6:59 pm | चौकटराजा

आमी ह्यी मिष्टेक काडायचा कारन आसा की त्या वीसावीसाच्या सामन्यात ते परत्यक्ष बाकड्याव बसल्याले लोक दावत्यात म्हूनशान म्हनालो .
आन तानायला डारमीटर्‍या बी बनावल्यात ? आयाया ! मंग तर लईच जळालो.

यशोधन वाळिंबे's picture

23 Feb 2013 - 6:35 pm | यशोधन वाळिंबे

कोणीतरी म्हणे..
एवरेस्ट लांबुनच छान दिसतो :-)

लौंगी मिरची's picture

23 Feb 2013 - 11:23 pm | लौंगी मिरची

धागा माझ्यासारख्याना अतिशय उपयुक्त माहिती देणारा आहे . दहावेळा नवर्‍याला आयटीत नक्कि तु काय काम करतोस हे विचारल्यावर काहिहि नीटसं उत्तर न देता " सांगुन तुला काय कळणार आहे का ?" असं प्रश्न वजा उत्तर मिळतं , त्यामुळे हा धागा वाचायला खुप आवडला .
मी तर म्हणेन बेंच्वर बसलेल्या नवर्‍याचा ग्रुहिनीला बराच फायदा होतो .माझा अनुभव म्हणजे :
१) बेंचवर असताना "दुपारी जेवायला घरी ये , आज डबा नाहि देत चालेल का ? " असं म्हटल्यावर लगेच तयार होतो , पण तेच काम असताना असं विचारायलाहि भिती वाटते . लगेच " दुपारी मीटिंग आहे , कॉल आहे .. येणार कधी .. जाणार कधी ? ह्यावरणं वाद घालतो .
२ ) मुलाला स्कूलबस पर्यंत तरी सोडायला जा , फक्त आजच्या दिवस ? असं म्हटल्यावर " अगं कसं शक्य आहे , पंधरा मिनिटात निघतोय मी " अशी उत्तरं मिळतात . तेच बेंचवर असला कि " एवढच ना ! आजचा दिवसच काय .. आता रोज जाईन म्हणुन जातो .
३ ) एरवी कुठल्याहि नातेवाईकाला ओरडुन मागे लागुन झालं तरी फोन करणार नाहि कि कुणाला भेटायला जाणार नाहि .. पण बेंच मुळे हा दिवसभर सगळ्याना फोन करेल , मित्रांना घरी जेवायला बोलवेल , आईशी गप्पा मारुन नको नको त्या न्युझ घरी आणेल ..
असे बरेच उद्योग करतो ,
तेव्हा मात्र मला माझा नवरा माणसात आलाय याचं समाधान मिळतं :)

तोटे तसे फारसे नाहित पण काम नसल्याने त्याची चिडचिड होते , थोडा अस्वस्थ वाटतो .
महत्वाचं म्हणजे नको तिथे आपली मतं मांडत बसतो :( .

सकु आणि संखंचं ' स्पायडरमॅन स्पायडरमेंन मि. स्पायडरमँन गाणं आठवलं'

लौंगी मिरची's picture

23 Feb 2013 - 11:47 pm | लौंगी मिरची

त्या गाण्याची लिंक मिळु शकते का ? कळेल तरी अर्थ तुमच्या प्रतिसादाचा , नाहितर
अज्ञानात सुख माणुन घेण्यात येइल .

५० फक्त's picture

26 Feb 2013 - 8:22 am | ५० फक्त

http://www.hulkshare.com/7jigno6wi471 , जुळवुन घेता आलं तर पहा नाहीतर खवत चर्चा करु.

दादा कोंडके's picture

24 Feb 2013 - 1:17 am | दादा कोंडके

आईशी गप्पा मारुन नको नको त्या न्युझ घरी आणेल ..

कुणाच्या आईशी? नको नको त्या न्युज म्हणजे काय?

नाना चेंगट's picture

23 Feb 2013 - 11:27 pm | नाना चेंगट

लै लोकं बसले बेंच मोडला तर नै ना?

धन्या's picture

24 Feb 2013 - 1:36 am | धन्या

एक लाखापेक्षा जास्त कर्मचारी संख्या असणार्‍या आयटी कंपन्यांची बेंच क्षमता पंचवीस हजाराच्या आसपास असते.

आयबीएम मध्ये तुम्ही बेन्चवर असाल तर हापिसातसुद्धा जायची गरज नसते. अशामुळे घरात तुम्ही नक्की नोकरीवर आहात की कसे याबाबत संभ्रम निर्माण होतो

सत्यवचन महाराजः)

आयबीएम मध्ये तुम्ही बेन्चवर असाल तर हापिसातसुद्धा जायची गरज नसते. अशामुळे घरात तुम्ही नक्की नोकरीवर आहात की कसे याबाबत संभ्रम निर्माण होतो

सत्यवचन महाराजः)

मैत्र's picture

26 Feb 2013 - 6:17 pm | मैत्र

हत्ती आणि चार आंधळे या गोष्टीप्रमाणे चर्चा चालू आहे असं वाटतंय.
महत्त्वाचा फरक हा की इथे अनेक डोळस आहेत आणि समोर येणारे सोंड / पाय/ शेपूट / कान असे अवयव पाहून हा महाकाय प्राणी असाच आहे असे दावे प्रतिदावे सुरू आहेत.
चर्चा आणि काही मुद्दे उत्तम आहेत आणि नॉन आयटी वाचकांना बरीच माहिती मिळेल यात शंका नाही पण खूप काही एकांगी लिखाणही दिसते आहे.

(अनेक वर्षे आयटी कंपन्यामध्ये काढलेला / कुठल्याही स्किल्सचा अभाव नसताना साडेचार महिने सलग बेंच पाहिलेला / इंप्लिमेंटेशन्स / सपोर्ट आणि सीआर सर्व प्रकार पाहिलेला पण आजवर एकही 'कोड' न लिहिलेला) मैत्र

(अनेक वर्षे आयटी कंपन्यामध्ये काढलेला / कुठल्याही स्किल्सचा अभाव नसताना साडेचार महिने सलग बेंच पाहिलेला / इंप्लिमेंटेशन्स / सपोर्ट आणि सीआर सर्व प्रकार पाहिलेला पण आजवर एकही 'कोड' न लिहिलेला) मैत्र

तुम्ही तर खुप मोठी हस्ती दिसता आयटीमधील. आपल्याबद्दल आदर आहे.

हत्ती आणि चार आंधळे या गोष्टीप्रमाणे चर्चा चालू आहे असं वाटतंय.
महत्त्वाचा फरक हा की इथे अनेक डोळस आहेत आणि समोर येणारे सोंड / पाय/ शेपूट / कान असे अवयव पाहून हा महाकाय प्राणी असाच आहे असे दावे प्रतिदावे सुरू आहेत.

चर्चा चालू आहे हे महत्वाचे नाही का?

चर्चा आणि काही मुद्दे उत्तम आहेत आणि नॉन आयटी वाचकांना बरीच माहिती मिळेल यात शंका नाही पण खूप काही एकांगी लिखाणही दिसते आहे.

याची शक्यता मी नाकारत नाही. किंबहूना, पहिल्या भागात मी तसा उल्लेख केलाच आहे:

कमी अधिक अशा साडे सात आठ वर्षांच्या माझ्या आयटी करीयरमध्ये खुप काही गोष्टी पाहील्या, अनुभवल्या. काही आनंद देणार्‍या, काही आपल्या क्षमतेचा कस पाहणार्‍या, काही मनस्वी चीड आणणार्‍या, तर काही नैराश्येच्या खोल गर्तेत फेकून देणार्‍या. या सार्‍याबद्दल लिहिण्याचा हा प्रयत्न असेल. मिपावर आयटीमधील रथी महारथी आहेत. ते माझ्या लेखनात काही चुका झाल्या तर दाखवून देतीलच. तसेच ते प्रतिसादांमधून आपले अनुभवही सांगतील, वाचकांच्या प्रश्नांना उत्तरेही देतील याची मला खात्री आहे.

नाऊ ईट्स युअर टर्न सर. माझं लेखन एकांगी कसं आहे हे पटवून देणार्‍या तुमच्या प्रतिसादाची मी वाट पाहतोय. तुमच्या प्रतिसादाने माझ्या आणि माझ्या या लेखमालेच्या वाचकांच्या ज्ञानात नक्की भर पडेल अशी मला आशा आहे.

मैत्र's picture

27 Feb 2013 - 10:06 am | मैत्र

# मी कोणी हस्ती वगैरे नाही. मिपावर बरेच अनुभवी / /ज्येष्ठ - तुम्ही म्हणालात तसे रथी महारथी आहेत (खर्‍या अर्थाने)
आठ वर्षे हासुद्धा आय टी साठी मोठा अनुभव आहे. त्यामुळे अर्थात तुम्हालाही उत्तम कल्पना असेल.
-- कमी अधिक अशा साडे सात आठ वर्षांच्या माझ्या आयटी करीयरमध्ये खुप काही गोष्टी पाहील्या, अनुभवल्या. काही आनंद देणार्‍या, काही आपल्या क्षमतेचा कस पाहणार्‍या, काही मनस्वी चीड आणणार्‍या, तर काही नैराश्येच्या खोल गर्तेत फेकून देणार्‍या. या सार्‍याबद्दल लिहिण्याचा हा प्रयत्न असेल. --
यु सेड इट. बरोब्बर हाच आहे आयटीचा अनुभव. तो तसा वाटला नाही आत्तापर्यंत. पुढील लेखांबद्दल उत्सुकता आहे.

# चर्चा चालू आहे हे नक्कीच महत्त्वाचे आहे
# धन्याजीराव - तुमचं लिखाण हे शक्य तितकं माहितीपर आणि बरंच अनबायस्ड आहे. मी चर्चा एकांगी होते काही वेळा असं म्हटलं आह. धन्या यांचं लेखन नाही.
चर्चा सध्या दुसरीकडे जाते आहे. मी त्यावर काही मतप्रदर्शन जास्त करू इच्छित नाही.
जिथे मला एकांगी मतं वाटली त्यावर मी वेळ काढून थेट प्रतिसाद देईन.

कुळाचा_दीप's picture

27 Feb 2013 - 7:55 am | कुळाचा_दीप

बर हे सगळ बहुतान्शि झाल सर्व्हिस बेस्ड कम्पनि बद्दल...प्रोडक्ट बेस्ड बद्दल पण काहि येऊद्या...

धन्या's picture

27 Feb 2013 - 8:31 am | धन्या

प्रोडक्ट बेस्ड आयटी कंपनीमध्ये सहसा बेंच नसतो. त्यांना आगाऊ नोकरभरती करण्याची मुळात गरज नसते.