जालावर खेळ चाले, हा गूढ.....

अधिराज's picture
अधिराज in जे न देखे रवी...
21 Feb 2013 - 12:54 pm

डिसक्लेमर: हि एक विडंबित कविता आहे. ह्या द्वारे कोणाच्याही (डूआयडी धारक,डूआयडी समर्थक आणि डूआयडी विरोधक) भावना दुखविण्याचा अथवा खतपाणी घालण्याचा हेतू नाही. तथापि कोणत्याही व्यक्तीशी अथवा प्रसंगांशी साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजाव, अशी नम्र विनंती.
=================================================================================
चाल : रात्रीस खेळ चाले, या गूढ चांदण्यांचा
-------------------------------------------------

जालावर खेळ चाले, हा गूढ आयडींचा
संपेल ना कधीही, घोळ डू आयडींचा ||ध्रु||

आभास ललना ती, असतो खरा पुरूष
जी तलवार भासते तो, असतो खरा धनुष्य
फसवी ओळख मिरवी, उद्देश द्वाड त्यांचा
संपेल ना कधीही, घोळ डू आयडींचा ||१|| (डूआयडी विरोधक उवाच)

कधी धागा नसे स्वयंभू, लागतो जीवास घोर
डू आयडी असता, सहज होई सेटल स्कोर
फसतात डू आयडीला, हा दोष भूलणार्‍यांचा
संपेल ना कधीही, घोळ डू आयडींचा ||२|| (डूआयडी समर्थक उवाच)

ह्या साजिर्‍या धाग्याला, का वितंडवाद हे दिठीत
गहजब हा कशाला, ना घेतले कुणा मिठीत
विसरा आता हे सारे, असे मी लाडका सार्‍यांचा
संपेल ना कधीही, घोळ डू आयडींचा ||३|| (डूआयडी धारक उवाच)

----------------------------------------------------

मुळ गाणे -

रात्रीस खेळ चाले, या गूढ चांदण्यांचा
संपेल ना कधीही, हा खेळ सावल्यांचा..||ध्रु||

हा चंद्र ना स्वयंभू, रवी तेज वाहतो हा
ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा
प्रीतीस होई साक्षी, हा दूत चांदण्यांचा... ||१||

आभास सावली हा, असतो खरा प्रकाश
जे सत्य भासती ते, असती नितांत भास
हसतात सावलीला, हा दोष आंधळ्यांचा.. ||२||

या साजीऱ्या क्षणाला, का आसवे दिठीत
मिटतील सर्व शंका, उबदार या मिठीत
गवसेल सूर आपुल्या, या धुंद जीवनाचा.. ||३||

गीत - सुधीर मोघे
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर - महेंद्र कपूर
चित्रपट - हा खेळ सावल्यांचा

अद्भुतरसविडंबनजीवनमान

प्रतिक्रिया

पैसा's picture

21 Feb 2013 - 1:03 pm | पैसा

ते खटासि खट तुम्हीच कै? :D

कविता विडंबन असेल तर कोडाइइकॅनॉल आणि भूछत्र हे वैभाग राहिलेत. तसाच नृत्य आणि रौद्ररस पण राहिलाय बघा!

अधिराज's picture

21 Feb 2013 - 3:54 pm | अधिराज

आदर्णीय ज्योती म्याडम,

खटासि खट आणि आम्ही एकच असल्याचा संशय ह्या आधीही खफवर एका पापभिरु माणसाने घेतल्याचे स्मरते. (त्यांचे आणि तुमचे विचार एवढे जुळलेले बघून मन भरून आले.) त्यावेळीच खट यांनी त्यांच्यासारख्या सज्जनाची तुलना माझ्यासारख्याशी करु नये असे बजावले होते. त्यामुळे माझ्याशी त्यांची तुलना हि त्यांच्या प्रतिमेला धक्का लागणारी आहे, हे नम्रपणे नमुद करतो.

सिन्सिअर्ली योर्स

पैसा's picture

21 Feb 2013 - 3:58 pm | पैसा

तुमचा डु आयडीचा अभ्यास आणि खटसाहेबांनी केलेली चर्चा पाहून उगीच आपलं विचारलं. हे पापभिरू महाशय कोण म्हणे? तो कदाचित तुमचा नैतर माझा डु आयडी असायचा एखादेवेळी! =))

म्याडम काळजी नसावी, ते १००% ओरीजिनल आहेत, त्यांना "पापभिरु" म्हटलं ह्यातच सर्व काही आलं.

अभ्या..'s picture

21 Feb 2013 - 4:13 pm | अभ्या..

तरीपण तुमच्याचर शंका घेतली म्हणजे पापभिरु कुठले? माथेफिरु च असतील ते.
कोणी घेतली होती हो शंका? कोण आहे तो

कोणी घेतली होती हो शंका? कोण आहे तो

हे ईश्वरा! कोणत्या धर्मसंकटात टाकलेस, अशी वेळ डू.आयडीवरही यायला नको.

परिकथेतील राजकुमार's picture

21 Feb 2013 - 4:37 pm | परिकथेतील राजकुमार

पैसातैने ह्या आयडीने असा प्रतिसाद दिलेला पाहून आश्चर्य वाटले.

पैसा's picture

21 Feb 2013 - 4:48 pm | पैसा

परिकथेतिल राजकुमार या आयडीने लॉगिन करायला विसरले वाटटं!

सुधीर's picture

21 Feb 2013 - 1:20 pm | सुधीर

भारी! तुमचा आयडी "डू-आयडी" तर नाही ना? :)

अनन्न्या's picture

21 Feb 2013 - 4:11 pm | अनन्न्या

मस्त जमलय विडंबन!!

पक पक पक's picture

21 Feb 2013 - 6:54 pm | पक पक पक

खुप भारि झालय.. :)

श्रीरंग_जोशी's picture

21 Feb 2013 - 7:00 pm | श्रीरंग_जोशी

अधिराजमाऊली दंडवत स्विकारा...!

डू आय डी कसले मी तर ऐकलय ३/४ सदस्य एकच आय डी वापरतात :) आणि इतरांना मल्टीपल पर्सनॅलिटी डिसॉर्डर चा भास होत रहातो. :D

बापरे! हे तर नविनच ऐकतोय. पण एकच आय डी ३-४ जणा.नी वापरायचा उद्देश काय असेल? चला अशा आयद्डी ना "द्रौपदी आय डी" म्हणायला हरकत नाही.

निवेदिता-ताई's picture

22 Feb 2013 - 10:36 am | निवेदिता-ताई

+१

बॅटमॅन's picture

21 Feb 2013 - 11:02 pm | बॅटमॅन

लयच कडक!!!!!

सुहास झेले's picture

22 Feb 2013 - 11:04 am | सुहास झेले

भारी.... :)

संजय क्षीरसागर's picture

22 Feb 2013 - 11:19 am | संजय क्षीरसागर

आभास बाईचा पण, असतो खरा पुरूष
डेटला बोलावणे, कावा खरा अदृष्य
बायकांशी सलगी, उद्देश साधे त्याचा
कोणास का कळेना, घोळ छूS आयडींचा

श्री गावसेना प्रमुख's picture

22 Feb 2013 - 2:04 pm | श्री गावसेना प्रमुख

तुमचाही छुपा आयडी आहे का?

संजय क्षीरसागर's picture

22 Feb 2013 - 2:20 pm | संजय क्षीरसागर

एकच आयडी आणि एकच बायडी हा आमचा फंडा आहे!

प्रसाद गोडबोले's picture

22 Feb 2013 - 2:16 pm | प्रसाद गोडबोले

आमचे डु आयडी घेणे हा प्रकार भलताच लागलेला दिसतोय ;)

काय राव अधिराज , तुम्ही जरा लवकरच भांडाफोड केलीत नाहीतर जरा मजा केली असती कोणाची तरी =))

श्री गावसेना प्रमुख's picture

22 Feb 2013 - 2:20 pm | श्री गावसेना प्रमुख

तुम्ही जरा लवकरच भांडाफोड केलीत नाहीतर जरा मजा केली असती कोणाची तरी

हे मुद्द्याच बोलले/लात तुम्ही ,तुम्हाला बाइ समजाव की माणुस की बाइमाणुस तेच कळत नाहीये.

संजय क्षीरसागर's picture

22 Feb 2013 - 2:24 pm | संजय क्षीरसागर

प्रमुखराव!

श्री गावसेना प्रमुख's picture

22 Feb 2013 - 2:33 pm | श्री गावसेना प्रमुख

आता बाइमाणुस जर पब्लिक प्लेस मध्ये,चावट आमंत्रण देतात तर आपण का म्हणुन लाजावे.

खटासि खट's picture

22 Feb 2013 - 1:31 pm | खटासि खट

मेरे पास खुदके धागे है, खफ है, खव है, व्यवि है, आयडी है, ड्युआयडी है, मिपा है, माबो है, ऐअ है, ऐपै है... क्या है तुम्हारे पास ?

- मेरे पास कामधंदा है

सूड's picture

22 Feb 2013 - 2:13 pm | सूड

या प्रतिसादाला टाळ्या पाह्यजेत राव !! \m/

तेरा मुझसे है पहले का नाता कोई
यूँ ही नहीं दिल लुभाता कोई...

जाने तू... या जाने ना...
माने तू... या माने ना...

प्रसाद गोडबोले's picture

22 Feb 2013 - 2:00 pm | प्रसाद गोडबोले

वाह अधिराज !
विसरा आता हे सारे, असे मी लाडका सार्‍यांचा
>>>ह्यावरुन आपण खरडवहीतली नोंद मोकळ्या मनाने स्विकारली असे वाटते.... आभारी आहे . :)

अधिराज's picture

22 Feb 2013 - 2:27 pm | अधिराज

गिरिजा म्याडम,

कविता वाचण्याच्या आधी डिसक्लेमर वाचावे. उगा स्वतःच्या अंगावर ओढवून घेऊ नये. (स्वतःच्या अंगावर ओढण्याची सवय भांडणउकरू खाष्ट काकूंना असते).
कवितेमध्ये डूआयडी विरोधक, समर्थक, व धारक या तिघांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. कविता कशी वाटली ते सांगा.

प्रसाद गोडबोले's picture

22 Feb 2013 - 3:45 pm | प्रसाद गोडबोले

छान आहे .
(पण प्रासंगिक आणि मिपा डिपेन्डंट आहे ... अर्थात ज्याला हा सगळा प्रकार माहीत नाही तो अ‍ॅप्रीशियेट करु शकणार नाही .. असो .आपले इतर लेखन वाचायला आवडेल :) )

प्रासंगिक आणि मिपा डिपेन्डंट आहे

हा निव्वळ योगायोग (डिसक्लेमर वाचा). हा प्रकार मिपा पुरताच मर्यादीत नसावा.

आपले इतर लेखन वाचायला आवडेल

आमच्या लेखनात इंटरेस्ट दाखवल्याबद्दल धन्यवाद!

तर्री's picture

22 Feb 2013 - 2:28 pm | तर्री

विडंबन आवडले. मूळ कविता देताना , कवीचे नाव दिलेत हे चांगले केलेत .

आभास बाईचा पण, असतो खरा पुरूष
माझ्या इ-करांत आयडी मुळे मी "स्त्री" असा आभास होत असे.
( मी खुलासा केला आता माझ्या धाग्यावारचे प्रतिसाद कमी झाले)

प्रसाद गोडबोले's picture

22 Feb 2013 - 3:43 pm | प्रसाद गोडबोले

=))