त्रागा धागा... वैताग.....

मन's picture
मन in जनातलं, मनातलं
19 Feb 2013 - 12:31 pm

हा धागा मी का लिहितोय ?
कटकट करुन फार थकलोय. चिडचिड करायचाही स्टॅमिना संपलाय. अगदि लहान लहान गोष्टींत चिडचिड करायची पूर्वीपासून सवय. एक बस सुटली ऑफिसची नि ५ मिनिटं वाट पहावी लागली, कर चिडचिड. बॉसनं येताना सगळ्यांना शेकहँड केलं गुड मॉर्निंग म्हणत, मला सोडलं, कर चिडचिड. तिचं नाव ठाउक नाही, पण रोज येउन ओळखीची स्माइल देते, आज एकदम अनोळखी चेहरा करुन चाल्ली गेली, कर चिडचिड.
पक्यानं आज पुन्हा फुकटात चहा पिला माझ्याकडून नि पुन्हा वर निर्ढावल्यासारखा फुक्टात सुट्टा मारुन गेला; बोंबल त्याच्या नावानं.(तरी त्याला स्वतःहून बोलावून चहा पाजायचं सोडू नकोस. किंवा त्यानी बोलावल्यावर लागलिच जायची सवय मोडू नकोस.)
धाग्याला प्रतिसाद नाही मिळाले, होउन बस खट्टू. बसम्ध्ये शेजारी जाड्या येउन बसला नि माझ्याही सीटचा ८०% भाग त्यानं व्यापला, करुन घे वैताग.
.
चीननं ग्वादार बंदर घेतलं, बांधलं ; घे टेन्शन. युरो कोसळणार, डॉलर कडाडणार असं ऐकलं, कर चिंता. डॉलराऐवजी रुपया कडाडला(नि डॉलर पडला!) अजूनच घाबर. कंपनीचा नफा कमी झाला हो. पैसा कमी मिळणार हो. अशी बोंब मारणं कर सुरु.
.
पाकड्यांची अण्वस्त्रं माथेफिरुंच्या हाती जाण्याचं ऐकलं कर त्रागा. जगातलं पेट्रोल एक न एक दिवस संपणार आहे हे पुन्हा जाणवलं, घे घाबरगुंडी उडवून स्वतःची. "अरे बाप रे , आभाळ कोसळणार, आता कसं होणार" हाच ह्या सगळ्यात आमचा टोन.
.
बस आता. हे जगाचं टेन्शन सोसवत नाही. "सारी दुनिया का बोझ मेरे ही कमजोर खंदो पे है" असं वाटून घेणं सोडीन म्हणतो. जsssरा मोकळ्या मनानं श्वास घ्यावा. मनापासून आवडलेल्या छोट्या छोट्या गोष्टींना दाद देउन पहावी. पण आधी एकदा सगळा त्रागा लिहूनच काढायची तीव्र इच्छा आहे. पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या धाग्यांवर तोच तो वैताग डोकावयास नको.
.
.
समाजवादी आत्मताडन नि मन मारुन जगणे
पूर्वी ऊठसूट स्वच्छ चारित्र्यवाल्या जुन्या नेत्यांबद्दल, नि त्यांच्या उच्च मूल्य, साधी राहणी, परोपकार , निष्ठा, वगैरेबद्दल वर्तमानपत्रात वाचायचो आणि आपल्याला किती वाईट काळात रहावं लागतय त्याबद्दल हळहळायचो. आजही मराठी वृत्तप्त्रांतातील स्तंभलेखनात जुन्या काळच्या समाजवाद्यांचा प्रभाव आहेच. विनोबा भावे,साने गुरुजी,तर कधी नानाजी देशमुख, कधी राममनोहर लोहिया, एसेम, मृणाल गोरे किंवा उच्च मूल्ये जपणारे , अभ्यस्त असणारे आणि प्रागतिक विचाराअंचे म्हणून यशवंतराव चव्हाण अशी नावं पब्लिक घेते.
मुळात ह्या सर्वांचा जेव्हा तथाकथित कर्तबागारीचा सुवर्णकाळ सुरु होता, तेव्हा भारत कुठे होता?
ह्यांनी त्यात काय भर घातली? आज जे भिकारचोट, अप्पलपोटे आणि ढेर्‍या तुडुंब भरल्या तरी ढेकरही न देणारे असे जे नेते म्हणवले जातात,हे त्यांचीच सेकंड जनरेशन फळी आहेत ना? ह्या आज गणंग वाटणार्‍यांना त्यांनीच वर आणले/येउ दिले का?
की ह्यांना ते थांबवायचे होते पण काळाच प्रवाह अडवण्यात हे माझ्याइतकेच दुर्बळ, हीन दीन दुबळे ठरले?
म्हणजे चांगली वर्तणूक असणरे सज्जन पण दुर्बळ अशीच ही माणसे का?
.
सगळ्या भल्या म्हणवल्या जाणारे लोक नेहमी कांदा भाकरीच का खातात? चांगलं खाण्यावर असे ते खार खाउन का असतात?(स्पेशली विनोबा भावे).चांगलं खाउनपिउन समाजसेवा करता येत नाही का?
विनोबा भावे आणि गांधी ह्यांच्या "भलेपणानी वागा", "चांगला माणूस बना" असल्या कै च्या कैच उपदेशाला सिरियसली घेतल्यानं आम्ही किती खड्ड्यात गेलोय हे ह्यांना माहितीये का?
माझ्या खड्ड्यात जाण्याची हे जिम्मेदारी घेतात का?
चांगलं खाउनपिउन समाजसेवा करता येत नाही का?
समाजासाठी आप्लं घर स्वाहा करतो म्हणजेच फार काही मोठ्ठं करतो असं काही आहे का?
सुखासुखी राहणं हा मोठ्ठा गुन्हा आहे का? "हे साले पांढरपेशे", "स्वतःपुरतं पाहणारे" असं म्हणत नेहमी आम्हाला आमच्या जगण्याची लाज वातून द्यायचा हा वृत्तपत्रवाल्यांचा का प्रयत्न असतो?
.
विनोबाजींचे बहुतांश लिखाण हे उपदेशात्मक असते त्यामुळेच कधी कधी थोडेसे वाचून झाले की कंटाळवाणे नि पकाउ वाटते. उदात्त, पारंपरिक भारतीय विचार वगैरे त्यातून डोकावत राहतात.त्यांच्या टाइपच्या पुढील वाक्यांमुळे मला व्यावसायिक व व्यावहारिक जीवनात जबरदस्त आपटी खावी लागली.

खरे बोलावे. साधे रहावे. उगाच भपका कशाला? दुसर्‍यांना माफ करावे. समजून घ्यावे.भलेपणाने वागावे.
उगाच कुणाला वाइट्-साइट बोलू नये.(म्हनजे थोडक्यात सगळी टिंगल टवाळी गायब. गजाल्या गायब. कट्टे गायब्.दोसत कंपनी गाय्ब.) मेहनत करावी. मेहनत केली असेल तर त्याचे श्रेय मिळेलच. श्रेय मुद्दम घेण्याचा प्रयत्न करू नये.आपली चूक कबूल करावी.दुसर्‍याच्या चुका उगाच प्रकाशझोतात आणू नये.
.
दवणे :-
चित्रपट रसिक म्हणवणार्‍यांनी "गुंडा" पाहिलं नसेल, वाचक म्हणवणार्‍यांनी "दवणे" वाचले नसतील तर त्यांनी आयुष्यात खूप मोठ्ठं काही मिस केलय.
.

(सर्व साने गुरुजी फ्यान ची क्षमा मागून) अधिकाधिक बाळबोध, सुगम, सुकर, तथाकथित "संस्कारक्षम" लिहिण्यात साने गुरुजींपेक्षाही दवणे कैकपट पुढे आहेत. ( त्याच्या लिखाणात साधेपण, सात्विकपणा, वागण्यातील शुचिर्भूतता वगैरे वगैरे टिप्पिकल मध्यमवर्गानं over hype करुन ठेवलेल्या संकल्पनांचा भडिमार आहे.)
.
कुणाला शिव्याशाप खरोखर लागत असतील असे वाटत असेल तर माझ्या आयुष्यातील सर्व तळतळाट ह्या बकवास समाजवादी विचारांना लागतील. "साधे रहा. चांगले रहा. भले रहा. (स्वतःची चूक नसताना) थोबाडित खाउन घ्या. स्वतः कष्ट करूनही सुखासमाधानानं जगायची लाज वाटून घ्या. आपल्या कामाचं क्रेडिट घ्यायला संकोच करा नि स्वतःच्या पायावर धोंडा घालून घ्या; स्वतःचा न्याय्य हक्क विसरुन मन मारुन जगा. गुणी बाळ व्हा."
असला बकवास सिरियसली घेतल्यानं माझं लै नुस्कान झालेलय. स्वतःवर विलक्षण अन्याय करायची नि न्यूनगंड बाळगायची , अनावश्यक समाजसेवा (स्वतःचे इतरांमार्फत शोषण होउ देण्यासाठी इतरांना उत्तेजित करण्याची!!) करण्याची मला असल्या कंपूच्या बालपणातील घेरावामुळे लागलेली सवय अजूनही धड गेलेली नाही.
.
थोडक्यात थिल्लरपणाचा विक्रम तो माणूस करतो. ह्या उथळपणात त्याला फक्त चेतन भगतच*टक्कर देउ शकतो.
.
.
*भगत सोशालिस्ट बकवास करतो असे मी म्हणत नाही. पण तो त्याच तोडीचे भंकस्/थिल्लर/सवंग लिखाण करु शकतो असे मला म्हणायचे आहे.
.
स्वामी विवेकानंद :-
"इच्छा असेल तर सद्गुरु मिळतोच" , तथाकथित "सन्मार्गस नि आध्यात्मिक उन्नतीस लागतोच" वगैरे वगैरे स्टाइल काही स्वामीअभ्यासक म्हणवणार्‍यांनी बिंबवले. आम्ही दिवसेंदिवस इच्छाच करीत बसलो.
नंतर मात्र त्यांचेच इतरही विचार/quotes समजले ते बरे झाले. कष्ट करा. (चक्क भौतिक)उन्नती करुन घ्या. पाश्चात्त्यांच्या चांगल्या गोष्टी( मोकळेपणा, सचोटी, आत्मविश्वास) शिकण्यास संकोचू नका . बंधूभाव जपा. बलशाली व्हा. "तरुणांनो गीता पठण करण्यापेक्षा आधी सशक्त व्हा. भरपूर फुटबॉल खेळा" ह्या धर्तीवरचं बरच काही "स्वामी विवेकानंद म्हणतात" ह्या इवल्याशा पॉकेट बुक मध्ये मिळालं. स्वामीजींच्या नावानं जो डोक्याला शॉट्ट करुन घेतला त्यावर स्वमीजींनीच उतारा दिला.
असो.
.
साने गुरुजी, विनोबांचे काही निबंध नि विचार आणि अशा महापुरुषांच्या गोष्टी ह्या नाही त्या वयात वाचल्या. निस्ते वाचून न थांबता वाचून सिरियसली घेतल्याने महाप्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता. वागणूक विचित्र झालेली नि साइडलाइन झाल्याने होणारा त्रास व इतर वैताग नेमक्या शब्दांत इतरांसमोर मांडता न आल्यानं स्वतःचाच प्रदीर्घ काळ छळ करुन घेतला होता. झेपेल ते झेपेल तसे करावे, नीट समजून घ्यावे; समजत नसेल तर सोडून द्यावे नि चार चौघांसारखे जगायला लाजू नये, गिल्ट तर अजिबात वाटून घेउ नये हे समजायला फार म्हणजे फारच उशीर झाला होता.
.
.
मिपावरच ह्या चिडचिडीवर एका प्रतिसादात भारीच उपाय सुचवलेला :-
सॉफ्ट्वेयरचे hotfix वा नविन version येते तसेच विचारांचेही करायचे असते.
विचारांच्या मागे "शक्य असेल तेव्हा", " नुकसान होणार नसेल तर ","काहीच फायदा होणार नसेल तर" हे टाकून पहा.
शक्य असेल तेव्हा खरे बोलावे. साधे रहावे.
काहीच फायदा होणार नसेल तर उगाच भपका कशाला?
नुकसान होणार नसेल तर दुसर्‍यांना माफ करावे. समजून घ्यावे.भलेपणाने वागावे.
.

माझ्या रडगाण्यातून थोडा पॉझ घेतोय.
अआथवतील तसे त्रागे ह्याच धाग्यावर करीत राहिन. तुम्हालाही ज्यांच्या नावानं बोंब ठोकायची असेल इथे ठोकून घ्या. कसं मोकळं मोकळं वाटेल.
वरील सर्वकाही खरं तर माझ्या जालावरच्या खरडी, प्रतिसाद ह्यांचं संकलनच आहे; इतर काही नाही.
तूर्तास कामास लागतो. बाय.
तोवर तुम्ही तुमच्या चिडचिडीची ह्यात भर घालू शकता.

--मनोबा

राहणीप्रकटन

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

19 Feb 2013 - 12:37 pm | प्रचेतस

हम्म्म.

हापिसात मिपावरचा ब्यान उठलेला दिसतोय.

पैसा's picture

19 Feb 2013 - 12:40 pm | पैसा

वैतागवाडी लै आवडली! त्यानिमित्ताने मनोबा लिहिते झाले हे फार झक्कास काम झालं. आज तरी मी वैतागले नाहीये. पण काही झालंच तर हा धागा वाचनखुणेत साठवून ठेवीन म्हणते!

बॅटमॅन's picture

19 Feb 2013 - 12:47 pm | बॅटमॅन

पण ही वैतागवाडीसुद्धा लैच सभ्य, अंतर्मुख वगैरे आहे. इथे कुणाची मारलेली नाहीये उगा. अजून एक वैतागलेल्या माणसाची डायरी आहे ती बहुतेक भडकमकर मास्तराण्णी लिवलीय ती लैच भारी हाय.

प्रसाद गोडबोले's picture

19 Feb 2013 - 12:52 pm | प्रसाद गोडबोले

मनोबा , बहुतेक हा त्रागा हा वैताग सर्वच सेन्सेटीव्ह संवेदनशील माणसांची व्यथा असते
.
जास्त त्रास करुन घेण्यात काही अर्थ नसतो अन आंतर जालावर चर्चा करुन तरी काही खास उत्तर सापडत नाही...सो तुम्ही जे उपाय शेवटच्या पॅरा मधे सांगितलेत त्याला एक अ‍ॅड करत आहे .... जमेल तितुके ... विनेदी चेष्टा मस्करीच्या मुड मध्ये राहण्याचा प्रयत्न करावा .

बहुतांश त्राग्याचा गोष्टींमधे "हसावे" अशी एकतरी गोष्ट नक्केच सापडते ... त्यावर मनसोक्त हसावं अन बाकी सगंळ सोडुन द्यावं ....बस्स

चेतन माने's picture

20 Feb 2013 - 11:58 am | चेतन माने

काही जणांना हे सहज जमत..... काहींना थोडा वेळ जातो पण उपाय मस्त आहे :)

यशोधरा's picture

19 Feb 2013 - 12:52 pm | यशोधरा

वैताग! वैताग! आज वैताग दिन आहे का? मग सुट्टी कशी काय नै मिळाली आम्हां आयटी हमालांना? एक दिअव्स तरी वैताग दिनाची सुट्टी नको का? असलेल्या सुट्टयाही प्रोजेक्ट्सपायी घेता येत नाहीत हा अजून एक वैताग.

गवि's picture

19 Feb 2013 - 12:54 pm | गवि

कोल्डारिन ली??

सहज's picture

19 Feb 2013 - 1:24 pm | सहज

स्नेहाताईचे सुंदर गाणे -

अपसेटवा न मूरा
जो भी राँगवा हे उसे
सेट राईटवा करो जी

फ्रस्टीआओ नही मूरा

तुमचा अभिषेक's picture

19 Feb 2013 - 1:47 pm | तुमचा अभिषेक

चिडणे, त्रागा करणे, वैताग येणे म्हणजे आपण आपल्या आयुष्यापेक्षा जगाला फार गंभीरपणे घेतोय असा अर्थ झाला.. आपण आपले मस्त जगत राहायचे, मनाला हवे तसे.. जर आपल्या वागण्याने इतर कोणाला त्रास होत असेल तर तो त्यांचा प्रॉब्लेम आहे, त्रागा चिडचिड वैताग हे जे काही आहे ते त्यांच्या मनात उत्पन्न होऊ द्या ना.. :)

अत्रुप्त आत्मा's picture

19 Feb 2013 - 1:56 pm | अत्रुप्त आत्मा

बास्स.....मनोबा,कसं का होइ ना, अस्सं मोकळं झालं पाहिजे एकदाच.! ;-)

प्यारे१'s picture

19 Feb 2013 - 2:10 pm | प्यारे१

अरे वा! मज्जा आहे की!

बरंचसं आदर्शवादी वाटणारं असं आम्ही पण मनात बिंबवतो.
त्यामुळं होतं काय की रेल्वे अश्श्शी समोरुन निघून जाते नि आम्ही नंतर स्वतःला श्या देत बसतो.
सालं अलिकडं पण नाय नि पलिकडं पण नाय!
मधल्या मध्येच लटकलेला!

ही फेज पण मजा करायची असते रे मनोबा! वेन्जॉय!

मी-सौरभ's picture

19 Feb 2013 - 2:17 pm | मी-सौरभ

बघ जरा तुझ्या मित्राला काय झालय??
बस त्याला घेऊन; वैताग कमी होईल कदाचित त्याचा.

(ढिसः या प्रक्रियेत तुझा वैताग वाढला तर त्याला मंड्ळ जबाबदार राहणार नाही)

राही's picture

19 Feb 2013 - 2:26 pm | राही

दुसर्‍याचे अज्ञान हे आपल्या स्वतःच्या दु:खाचे कारण होऊ देऊ नये असे वचन आहे.

"मुलींची शाळा", "मुलांची शा़ळा" ...ई ई ई ई ई....यक्क्क्क.........
अशा सेपरेट शाळा काढणं हा राष्ट्रिय गुन्हा म्हणून जाहिर करायला हवा. त्याच्यानं पर्सन्यालिटी प्रॉब्लेम होतो.
.
शाळा एकत्रित ठेवली तर पोरं मोठी झाल्यावर बावचळल्यासारखं करायची किंवा उचकल्यासरखं किंवा हपापल्यासारखं करायची शक्यता कमी होते. मला अजूनही कमी परिचित स्त्रियांशी बोलताना गोंधळल्यासारखं होतं. कळतं पण वळत नाही.म्हणजे समजा अगदि ग्रुप जमलाय कींवा कट्टा सुरु आहे; तेव्हाही अगदि शेजारी येउन , नाव घेउन कुणी स्पष्ट प्रश्न विचारला तरच मी उत्तर देतो. उत्तरही जेवढ्यस तेवढे असते. बोलायचे टाळतो. विनाकारण कॉन्शिअस होतो. नक्की काय होते सांगता येत नाही. जीभ ,मान आक्रसते. मी मनानेही आकुंचित पावतो. मनातल्या मनात कोपर्‍यात जाउन बसतो. अन्यथा ग्रुप मध्ये बसलो आहोत, सगळे बोल्ताहेत असे चित्र असेल तर त्या चित्रातील गप्प बसलेला तो प्राणी मीच असतो. बर्‍यापैकी आता ग्रुप असताना आजही कमी परिचित स्त्रियांबद्दल माझा reflex हा असाच आहे. मला मिक्सअप होण्यास भयंकर वेळ लागतो. कधी कधी अनंत वेळ घेतला तरी मी मिक्स अप होउच शकत नाही. हा मी असा आहे हे मला ठाउक असतानाही मुळात माझ्या मागे कुणी लागूच कसं शकतं हे आजवर मला समजलेलं नाही.
अर्थात भारतात मला माझ्यासारखेच शतमूर्ख सहस्रसंख्येने सापडले. आपण एकटे नाहित ह्या कल्पनेने सुखावलो.
.
म्हणूनच "शेपरेट शाळा हा राष्ट्रिय गुन्हा" आहे.
.
टू द टॉप ऑफ धिस आय सरप्राइझ अबाउट वन थिंग . आमची "भावी ही" आहे. तिला हे असं आहे हे सगळं सगळं ठाउक आहे. तिला हा चक्क प्लस पॉइंट वाटतो.मध्यमवर्गीय चष्म्यातून हा बावचळलेपणा म्हणे सभ्यतेचा पुरावा आहे!
.
इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला माझी प्रोजेक्ट मेट घरी वगैरे यायची.(प्रोजेक्ट टीम मी निवडली नव्हती. HOD ने सिलेक्ट करुन दिली होती. माझी मुलींना एकदम चक्क "माझ्या सोबत प्रोजेक्ट करणार का" इतका भयंकर चावट, लज्जास्पद, अश्लील वगैरे प्रश्न थेट विचारायची हिम्मत नव्हती.)
तर ती यायची तेव्हाही घरचे(त्यातही स्त्रीसदस्य) विनाकारणच उगीचच सलगीनं वागायचे. "आम्हाला चाल्तं हो. आम्हीही तसे फार मागासलेले वगैरे नाही. मोकळ्या विचारांचे आहोत." असं उगीच अधून मधून आडून आडून सात सांगत वैताग आणायचे. त्यांच्या ह्या सांगण्यामुळं ते खरोखर तसे नाहित; त्यांना फक्त तसे दाखवायचे आहे आणि तेसुद्धा तसेच अवघडल्यासारखे आहेत ह्यावर शिक्कामोर्तब व्हायचे.
.
ह्या परिस्थितीत वढल्यानं परवापरवापर्यंत पार वाट लागलेली होती. जसाजसा सोशल मिक्स अप झाला तसा निखळपणे दंगा करता आला. हा असाच आधीची वीस बावीस वर्षे नि:संकोचपणे करता आला असता हे समजलं.
.
बादवे, मी स्वभावाने "शांत"नाही. एखादा मुद्दा मिळाला तर त्याबद्दल मी बिनदिक्कत काहीहे पिंका टाकित सुटतो. किंवा अमुक विषयाची माहिग्ती व्हावी म्हणून शंका वगैरेही विचारतो. प्रॉब्लेम कधी होतो? प्रॉब्लेम माझा तेव्हा होतो जेव्हा इकडचं तिकडचं बोलायचं असतं. मुद्द्यांशिवाय सहज, गप्पाटाप्पा करायच्या असतात. हां तेव्हा मात्र आख्खा कोराच असतो. ब्लँक. ह्या सर्व गोष्टीचं १००% खापार शाळेवर जात नाही; पण त्याचाही काही प्रमाणात तरी महत्वाचा सहभाग आहेच.
.
मला आठवतय तसं वय वर्षे बावीसएक होइपर्यंत मी औरंगाबाद शहराच्या धड पुरेसं बाहेरच पडलेलो नाही काही कारणाने.वय वर्षे तेवीसपासून मी नॉर्मल लोकांना भेटलो. त्यामुळं बौद्धिक वय अजूनही पाचेक वर्षेच आहे. घर ते शाळा इतकच करायचो. शाळेनंतर फार तर इकडं तिकडं फिरणं आणी धडपडणं व्हायचं, त्यातही एकटाच असायचो. कधी कधी ग्रुप असायचा. पण मी अशा एखाद्या ग्रुपमध्येही एकटाच असायचो. i may not be unique. but i was alone.
.
मला प्रॉब्लेम ice breakingचा आहे. मला ते चटकन करता येत नाही. विशेषतः in person भेटित. त्यातही ग्रुपमध्ये भेटत असेन तर नक्कीच.एकदा एवढे ice breaking झाले की मग काहिच नाही.
.
.
जालवरती चक्क स्त्री आयडी "monogamy is a myth" ह्या धर्तीवर बोलूच कसं शकतात? (भारतीय) स्त्री त्यात पुन्हा विवाहित असून मद्यप्राशन करुच कसं शकतात? पुन्हा ते गपगुमान न करता वर तोंड करुन साम्गायला काहिच न वाटणे ह्या गोष्टींमुळे मला दचकायला होतं.(व्यक्तीस्वातंत्र्य वगैरे ठीक आहे; पण वातावरण्/संस्कार वगैरे नावाखाली एक प्रोग्रामिंग आहे; ते मानगुटीवरून उतरत नाही.)

पैसा's picture

19 Feb 2013 - 5:11 pm | पैसा

हा जास्त प्रॉब्लेम व्यक्तिमत्त्वाचा आहे असं वाटलं. म्हणजे एखादा अंतर्मुख स्वभावाचा असतो, एखादा बहिर्मुख. शाळा फक्त मुलांची असल्याने थोडा फरक जास्त पडला असं असेल. पण १००% तेच कारण असं नाही वाटत. पण आता हे सगळं लिहिलंस की तू. हीच बदलाची सुरुवात आहे!

प्रसाद१९७१'s picture

20 Feb 2013 - 5:06 pm | प्रसाद१९७१

मला प्रॉब्लेम ice breakingचा आहे. मला ते चटकन करता येत नाही.>>> तुम्ही आधी ह्या Internet चा नाद सोडा. एकदम outgoing होऊन जाल

स्पंदना's picture

19 Feb 2013 - 5:20 pm | स्पंदना

चला> मनोबा सुसाट सुटले.
छान वाटला हा वैताग. म्हणजे अस की कुठेतरी बोलावस वाटत पण कस बोलाव हा प्रश्न पडतो. निदान हा प्रश्नतरी सुटला नाही का मनोबा?

हे बघ दुसर्‍याने कसं वागावं हे आपण ठरवु शकत नाही तेंव्हा सोडुन द्यायचं, स्वतःपुरत एक वर्तुळ आखायचं अन त्यात मस्त गिरक्या घ्यायच्या. मग अधुन मधुन त्या बाहेर येउन जगाकडे पहायच अन आपल वर्तुळ सुरक्षित आहे ना याची खात्री करायची. पुन्हा वर्तुळ!

बॅटमॅन's picture

19 Feb 2013 - 6:01 pm | बॅटमॅन

+११११११११११११११.

"काही गल्बला काही निवळ | ऐसा कंठीत जावा काळ |"

-समर्थ रामदास.

मन१'s picture

19 Feb 2013 - 7:08 pm | मन१

दुसरा परिच्छेद(त्यातही शेवटचं वाक्य) अगदि साधा, आचरणीय आणि काही प्रमाणात श्वास घेण्यास मदत करणारा. मी आता मोठ्या आकारात घरामध्ये लावतोय.

मनोबा, तुम्ही चष्मा घालता ना ? मग तो काढुन ठेवा अन कुंडलिकाला रिव्हर राफ्टिंग करायला जा, दोन तास लई मज्जा. सगळे वैताग धुवुन जातात.

प्रसाद गोडबोले's picture

19 Feb 2013 - 6:55 pm | प्रसाद गोडबोले

कुंडलिकाला रिव्हर राफ्टिंग करा>>>>हा जबरदस्त उपाय आहे .

धाग्याचा एकूण सूर पटला नाही....

आमच्या आई-वडिलांनी सिनेमा पहायचे, दागिने घेण्याचे टाळल्यामुळे आम्हाला शिक्षणासाठी पैसे कमी पडले नाहीत* असे वाटते.

ते आदर्श पाळण्यासाठी साधे रहात होते असे वाटत नाही. तेव्हाच्या त्यांच्या वैयक्तिक आर्थिक परिस्थितीचा तो परिणाम होता. (ऑन द अदर हॅण्ड, आमचे अनेक नातेवाईक गडगंज श्रीमंत असूनसुद्धा साधेपणाने (दळिद्री पद्धतीने) रहात त्याचे कारण ते साधेपणाचा आदर्श मानीत होते हे नसून त्याकाळी तसेच राहण्याची पद्धत आमच्या समाजात (साने गुरुजी, टिळक, आगरकर यांच्या कैक आधीपासून) होती.

*त्यांच्या तशा राहणीमुळे आमच्या पिढीची व्हिजन तशी मर्यादित राहिली हे काहीसे खरे आहे. व्हिजन म्हणजे इंजिनिअर होऊन कंपनीत चिकटणे इतकीच मर्यादित होती. म्यानेजर/व्हाइस प्रेसिडेंट/सीईओ व्हायची व्हिजन आमच्यात त्यांनी रुजवली नाही हे खरे आहे. पण त्याबद्दल त्यांना दोष देणे मला पटत नाही.

अवांतर: कोएड शाळेत शिकूनही मुलींशी वागण्याचे बाबतीत आम्ही मनोबांसारखेच होतो.

धन्या's picture

19 Feb 2013 - 7:46 pm | धन्या

आज सकाळी चहा घेताना उगाच किल्ली दिली तुला.

असो. समोरासमोर बोलण्याचा पर्याय उपलब्ध असल्यामुळे उद्या सकाळी बोलूच. तोपर्यंत तुझ्या सीआरार रेटींगची काशी करणार्‍याच्या नावाने शिव्यांची लाखोली वाहा आणि रागाचा निचरा होऊ दे. :)

जातवेद's picture

21 Feb 2013 - 9:29 pm | जातवेद

सीआरार रेटींगची काशी

निदान ईकडेतरी याच्या गप्पा(?) नकोत :)

अग्निकोल्हा's picture

19 Feb 2013 - 11:01 pm | अग्निकोल्हा

साधारण अर्धदशकभरापुर्वी एक मजेशीर ब्लॉग-पोस्ट वाचला होता "वॉल्ट डिस्ने रुइन्ड माय लाइफ" त्याची आठवण झाली.

"बिग ब्रदर इज नॉट वॉचिंग यु" ज्याच नडलं तो सोडुन कोणाचं घंटा अडलेल नाही तुमच्या कामगिरीच मुल्यमापन करुन तुम्हाला त्याचे तसे रिटर्न्स (आज्/उद्या/ अथवा नेक्स्ट लाइफमधे) भोगावे लागतील.... बिंधास्त रहा यार. हॅव फन.

अस्वस्थामा's picture

20 Feb 2013 - 12:49 am | अस्वस्थामा

.. आणि बोळा निघाला एकदाचा ..

अगदी मनातलं लिहिलयस मन-भौ.

इथे त्रागा चीड चीड मुख्यतः ज्या गोष्टींना आदर्शवत मानून चाललोय त्यांच्यामुळे झालेला भ्रमनिरास (साध्या शब्दात 'चुतिया' बनल्याची भावना!) यामुळे आहे असं वाटतं. आणि आपल्यातले बरेच जण त्यांच्या त्यांच्या वेळेस यातून गेलेत असही वाटतंय.. फरक कुणी औरंगाबादेत तर कोणी साताऱ्यात किंवा सोलापुरात ..

यासंदर्भात आमच्या एका मित्राने एक वाक्य ऐकवलं होतं,
'आयुष्यात एक वेळ अशी येते की निष्पापपणा (innocence) हा cute न राहता मूर्खपणा ठरू लागतो, आपल्या आयुष्यातली ती वेळ आपण ओळखण्यात शहाणपणा आहे.. जे लोक त्यांच्या गोग्गोड प्रतिमेस जपायचा प्रयत्न करतात त्याचं बहुतेकदा हसंच होतं.'

(बराचसा समदुःखी)

परिकथेतील राजकुमार's picture

20 Feb 2013 - 12:04 pm | परिकथेतील राजकुमार

आधी दुसरीकडे वाचला होता, पण पुन्हा वाचताना तेवढीच मजा आली.

सालं संपादक झालो तरी संपादकपदाची कामं करायला छटाकभरही टैम काढणं ह्या जन्मात जमणार नाही. पण "संपादक हो म्हणून म्हणत होते. पण मीच नको म्हटलं " असं जाहिर कट्ट्यावर मानभावीपणे म्हणायची संधी मिळण्यासठी काय करावं लागतं? नक्की कोणती अ‍ॅप्टी क्लिअर केली की इथे संपादक्/निरिक्षक आणि अजून मोठ्ठ्या पदव्या मिळतात?
संतुलित पणाचा किती आव मी आणून दाखवला म्हणजे मला आमंत्रित करतील? सम्जा एखाद्या तावातावाच्या काथ्याकुटात "तुम्हाला शतमूर्ख त्याने जाहिर धाग्यावर म्हणावयास नको होते. आम्ही त्याच्याशी सहमत असलो तरी तुम्हाला तसे म्हणणार नाही"(!!??) असे किती गोल्-गोल , संतुलित प्रतिसाद देउन दाखवले तर मला हे ह्यांच्यासारखाच खरोखरिच सभ्य, मॅच्युअर्ड समजतील? हे गंडलेले आहेत की इतरांना गंडवताहेत ? ;)
.
हे संतुलित लोक मनातल्या मनातही संतुलित असतात का? कुणी राँग साइड येउन ह्यांना रस्त्यावर धडकला तरी हे "अहो असे करु नका. असे करणे इष्ट नाही." अशा समजुतीत बोलत असतील का? मनातल्या मनातसुद्धा "थोबाड फोडलं पाहिजे ***च्याचं " असं हे कधीच म्हणत नसतील का? तसं असेल तर नक्की कोणती तपःसाधना हे महात्मे आणि महात्मीणी करतात?
.
इथं अपेयपानाचं नाव कढलं की उकळ्या फुटणारे अनेकजण आहेत. नक्की साल्यांना परवडतेच कशी? की हे नेहमी फुकटातली पितात नि त्याच्या कॉकटेल्सच्या पाकृ टाकीत राहतात? ह्यांना डाउनपेमेंटचं आणि फ्लॅटच्या हप्त्यांचं टेन्शन नसतं का? सुखी माणसाचा सदरा ह्यांना भेटलं तर मिळू शकतो का?
"पिणार्‍यला पोरगी देत नाहित हं चांगल्या घरचे" असं ह्यांना पुनः पुनः सांगून घरच्यांनी कधीच टारकावलं नसेल का? ह्या स्थितीत मनावर ते कसा विजय मिळवू शकतात? हे लोक साने गुर्जींना शिरिअसली घेत नाहित का?

पिणार्‍यला पोरगी देत नाहित हं चांगल्या घरचे" असं ह्यांना पुनः पुनः सांगून घरच्यांनी कधीच टारकावलं नसेल का? ह्या स्थितीत मनावर ते कसा विजय मिळवू शकतात? हे लोक साने गुर्जींना शिरिअसली घेत नाहित का?

अधोरेखित प्रश्न वाचून डॉळे पाणावले एकदम. सीदंति मम गात्राणि, मुखं च परिशुष्यते, वगैरे वगैरे =))

पैसा's picture

20 Feb 2013 - 2:59 pm | पैसा

आता तुझ्या वैतागाचं खरं कारण कळलं!:D

ओह... असं आहे का..? आय सी. आलं लक्षात... हम्म.. :)

काल एका क्षुल्लक कारणावरुन माझ्या अपार्ट्मेंट्च्या मॅनेजरवर चिडले. त्रागा केला. आज जाऊन "सॉरी" म्हटलं ती अगदी सहजतेने म्हणाली "दॅट्स ऑलराइट. इट इझ लाइफ.
मला वाईट वाटले.

अर्धवटराव's picture

21 Feb 2013 - 1:46 am | अर्धवटराव

तुम्ही तिला तडकवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला ना? आता थोडं कमि पडला शाब्दीक दट्ट्या... त्याचं एव्हढं वाईट वाटुन घेऊ नका. पुढल्या खेपेला एक मस्त का.कु. टाका मिपावर... मॅनेजरला कसं झापावं या नावाने... आणि मग पूर्ण तयारीनिशी जा.

अर्धवटराव

या वेळेला इंटर्व्ह्यू ला प्रश्न होता - हाऊ डू यु हँडल कॉन्फ्लिक्ट?
अजिबात उत्तर देता आले नाही :( काहीतरी बावचळल्यासारखं उत्तर दिलं. खरं तर एक काकु टाकायचा आहे की मिपाकर कॉन्फ्लिक्टला कसे सामोरे जातात?

मन१'s picture

22 Feb 2013 - 4:08 pm | मन१

आता सिरियसली मेलोय. ठार झालोय.
होम लोनसाठी बेंक अधिकार्‍याने तोंडी सांगितलेला आकडा गृहित धरुन फ्लॅट बुक केला होता. डाउन पेमेंट नि अग्रीमेंटही झालं.
आता loan eligibility(कर्ज पात्रता?) मी समजलो त्याच्या वीस टक्के कमी निघालिये.
आता घ्या पर्सनल लोन आणि अडका कर्जाच्या सायकल मध्ये.
.
बहुतांश बँकांचा हाच दर असणार आहे. मला कुणी NBFC(non banking financial instituitions) सुचवू शकाल का? त्या अधिक लोन देतात म्हणे. काही nbfc म्हणजे महिंद्र फायनान्स्,चोलामंडलम, इंडिया बुल्स. असे अजून कुणाला ठाउक असतील तर सांगा. काम सोपं होइल.
नाहीतर तीर्थरुप नामक डिफॉल्ट बँकर निसर्गाने दिलेलाच आहे. पण आजवर तरी तिकडे जाण्याची पाळी आलेली नाही ग्रॅज्युएशनला लागल्यापासून.
आता गेलो तर इतकी वर्ष जपलेला आख्खा तोरा उतरेल एका झटक्यात.
.
घर विकण्याचा मला अनुभव नाही. घर विकणारे एखादे विश्वासाचे वकील वगैरे असतील तर त्यांचा नम्बर द्या.
फार ताण घेण्यापेक्षा घर काढून मोकळा होइन म्हणतो.
.
मनोबा, कधी होणार तुम्ही मॅच्युअर?

पैसा's picture

22 Feb 2013 - 4:20 pm | पैसा

घराच्या किमतीच्या ८५% आणि तुमच्या पगाराच्या ६०% पर्यंत हप्ता बसेल असे कर्ज मिळते. वडिलांकडून थेट पैसे घ्यायला नकोत. त्यांनी सह कर्जदार म्हणून सह्या केल्या तर पुरे. त्यांचे उत्पन्न्+तुझे उत्प्न्न एकत्र धरून त्याच्या ६०% ही एलिजिबिलिटी असते. काय रडताय राव!

अभ्या..'s picture

22 Feb 2013 - 4:29 pm | अभ्या..

पैसे मिळण्याचे काही नाही हो. वडीलांकडे असे मागायलाच जायला नको वाटते (सहीपण).
जास्त फाटे फुटतात हे आणि त्यावरची चर्चा हे माझ्या त्राग्याचे पण कारण आहे.

पैसा's picture

22 Feb 2013 - 4:34 pm | पैसा

मी घर घेतलं तेव्हा आधी लग्न केलेलं होतं त्यामुळे हमी देणार्‍याचा प्रश्न आला नाही. आता आधी लग्न करा. म्हणजे तो ही प्रश्न सुटून जाईल.

म्हणजे रोगापेक्षा उपाय भयंकर....

मन१'s picture

22 Feb 2013 - 4:34 pm | मन१

काही कारणामुळे वडील हा ऑप्शन बाद आहे. सहकर्जदार म्हणूनही.
रिलायन्स किंवा महिन्द्रा(जे अधिक लोन देतील, अधिक व्याजदर लावतील) असे फायनान्सर आता शोधतोय. बघूयात.

पैसा's picture

22 Feb 2013 - 4:36 pm | पैसा

पर्सनल लोन काढण्यापेक्षा बचतपत्रे, बँक फिक्स्ड डिपॉझिट, एल आय सी पॉलिसी अशा काही तरी तारणावर कर्ज घ्यावे. व्याजदर कमी लागतो. खाजगी वित्तसंस्थांपेक्षा एल आय सी कधीही बरी.

अभ्या..'s picture

22 Feb 2013 - 4:42 pm | अभ्या..

बँकेत असणारेच पालक, त्यांचे पर्याय आणि अर्थातच त्याला एलिजिबल नसल्याने दुसरेच मार्ग हुडकणारी आमची पिढी हा त्रागा इथेच व्यक्त करुन निरोप घेतो. :)

मन१'s picture

22 Feb 2013 - 4:45 pm | मन१

are you my alter ego?
am i suffering through multiple personality disorder?
how do you come to know everything???????????????!!!!!!!!!!!!

:(
जाऊ द्या ओ मनोबा. लागते कशी तरी नैय्या पार.
थोड्या वर्षाने तोच त्रागा रिपीट करायचाय. रोल रिव्हर्सल होइल इतकेच.

प्रसाद गोडबोले's picture

22 Feb 2013 - 4:45 pm | प्रसाद गोडबोले

सेम प्रॉब्लेम मला आला होता. :(

loan eligibility = कर्ज पात्रता हेच होय पण LTV = loan to value ratio ८०% आहे अर्थात जितकं काही लोन ठरवाल त्याच्या २०% तुम्हाला भराव्हेच लागतील ( एस्बीआय / एलायसी हौ.फायनास्न्स मधे हे फक्त १० % आहे म्हणे ...चौकशी करुन पहा )

गोल्डलोन हा परवडेबल पर्याय उपलब्ध्द आहे . पी एफ विड्रॉल जमतय का पहा . लॉन्ग टर्म एफ डी असेल तर त्यावर बर्‍याचश्या बॅन्का ९०% ओडी देतात आजकाल .
एकदा बुक केलेले घर विकु नका . ( सध्या रीयल थंड आहे पण एकदा गोल्ड इम्पोर्ट्वर निर्बंध आले ह्या बजेट नंतर की लोक परत रीयल इस्टेट मधे गुंतवणुक सुरु करणार... पर्यायाने रीयल इस्टेट परत बुम मधे येणार..रेट्स वाढणार.. आसा अंदाज आहे आमचा )
आणि सर्वात महत्वाचे... पर्सनल लोन् शक्यतो टाळा . (पर्सनल लोनचे व्याज आपल्या तोर्‍यापेक्षा खुप जास्त असते हो ...डिफॉल्ट ब्यॅन्कर कडे जाणे कधीही परवडते पर्सनल लोनपेक्षा)

(मीही नुकतेच घर घेतले आहे सेम प्रॉब्लेम्स मलाही आले होते ...कोणी तरी समदुख्खी दिसले म्हणुन बोललो. क्षमा केली पाहिजे . )

दादा कोंडके's picture

23 Feb 2013 - 5:02 pm | दादा कोंडके

वडिलांकडून पैसे घेउ नका. हा निर्णय तुम्हीच घ्यायचा आहे. पिएफवर वगैरे कर्ज मिळेलच किंवा काढून घ्या. कंपनीत चौकशी करून बघा. खूप कंपन्यांत नाममात्र व्याजावर पैसे देतात. पर्सनल लोन आजिबात काढू नका.

प्यारे१'s picture

22 Feb 2013 - 6:50 pm | प्यारे१

मनोबा,
मला वाटतंय की तू तुझ्या फारच वैयक्तिक गोष्टी एका मोठ्या पब्लिक फोरम समोर ठेवतो आहेस. जास्त टेन्शन नको घेऊ रे भावा! सगळ्यांचं बरंचसं असंच असतं. टेक अ चिल पिल का काय ते!

५० फक्त's picture

23 Feb 2013 - 10:04 am | ५० फक्त

आता तुम्ही आणताच आहात वैयक्तिक गोष्टी पब्लिक फोरमवर तर घ्या हे सल्ले / टिका.

आता गेलो तर इतकी वर्ष जपलेला आख्खा तोरा उतरेल एका झटक्यात. - कसला तोरा जपलाय तुम्ही ओ इतकी वर्षे, कधी झालं तुमचं ग्रज्युएशन, कधी लिगली किंवा इलिगली झाला आहात का एखाद्या लेकराचे बाप, किमान द्त्तक घेउन तरी, (हा असा तोरा एका झटक्यात अगदी याच कारणासाठी उतरलेला एक इथलाच आयडी माहित आहे मला, तुमचाही परिचय आहे त्याच्याशी, एकदा बोलुन बघा त्याच्याशी)

बाप ही गोष्टच अशी आहे की जेंव्हा आख्खी दुनिया तुमचा जीव घ्यायचा विचार करत असते तेव्हा हा बापच तुमच्या आणि दुनियेच्या मध्ये उभा असतो, या सध्याच्या पिढीचा हा सार्वत्रिक इश्यु आहे, ज्या व्यक्तिनं आपल्याला जन्म दिला, मोठं केलं, आपले लाड पुरवले, ज्या शिक्षणाच्या जोरावर आपण त्याच्या आख्ख्या हयातीच्या कमाईपेक्षा जास्त पैसे चार सहा वर्षात कमवतोय त्याच्या या सग़ळ्या उपकारांना विसरुन कृतघ्नता दाखवायची.

मा.संपाद्क मंडळ,

सदर प्रतिसाद धागाकर्त्याला अथवा आपणांस फार वैयक्तिक वगैरे वाटला तर उडवला जावा ही नम्र विनंती. तसेच हा प्रतिसाद न उडाल्यास त्यात विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देणे, धागाकर्त्यावर बंधनकारक नाही.

स्पा's picture

23 Feb 2013 - 10:13 am | स्पा

मनोबा
द आय टी हुचः

चालू द्या

सुबोध खरे's picture

23 Feb 2013 - 10:19 am | सुबोध खरे

बापासमोर कसला आलाय तोरा?पन्नाशी जवळ आली आणि दोन कॉलेज ला जाणारया पोरांचा बाप असून आजही मानसिक आधारासाठी मि माझ्या बापावर अवलंबून आहे

आयुष्याच्या अशा टप्प्यावर मी उभा होतो कि सर्व दुनियेने पाठ फिरवली असताना फक्त माझा बाप माझ्या पाठीशी उभा राहिला होता.निस्संकोचपणे बापाला आपले प्रश्न सांगा.उद्या माझी मुले अस प्रश्न घेऊन आली तर मी कोणताही संकोच न करता त्यांच्या पाठीशी उभा राहीन. (पितृ ॠण फेडणे हे असेच असते असे ऐकले आहे)

५० फक्त's picture

23 Feb 2013 - 3:50 pm | ५० फक्त

आयुष्याच्या अशा टप्प्यावर मी उभा होतो कि सर्व दुनियेने पाठ फिरवली असताना फक्त माझा बाप माझ्या पाठीशी उभा राहिला होता. - अक्षरशः सेम अनुभव, आणि ऋणाबद्दल म्हणाल तर आईबापाचं कर्ज फेडणं हे इथल्या एका आयुष्यात तरी शक्यच नाही.

राही's picture

23 Feb 2013 - 3:59 pm | राही

आधी स्वतःला ओळखा.स्वतःतले गुणदोष जाणून घ्या. दोषांचा बाऊ करू नका पण गुणांच्या कैफातही मश्गूल राहू नका. मुख्य म्हणजे कधीही स्वतःचा तिरस्कार करू नका. आत्मश्लाघा वाईटच पण आत्मपीडन त्याहूनही वाईट. ते मानसिक असंतुलनाकडे नेते. तुमचा देह,तुमचा जीव हे तुमचे क्रिएशन नाही.ती दुसर्‍या कुणाची तरी निर्मिती आहे आणि त्या निर्मात्यांचाही त्यावर हक्क आहे. हे असे दुसर्‍याने निर्मून तुमच्या हाती सोपवलेले तनमन तुम्ही जपायचे आहे, मशागत करून वाढवायचे आहे. उद्धरेत आत्मानं आत्मा,नात्मानं अवसादयेत. तुम्ही आजूबाजूला पहाल तर प्रत्येकासमोर समस्या आहेत, पर्सनॅलिटी इशूझ आहेत,संकटे तर आहेतच आहेत.तुमच्या एकट्याच्याच नशिबी हे सर्व आलेय असे म्हणून तुम्ही स्वत:ला इतरांपासून अलग करताहांत,खास,स्पेशल मानता आहांत.स्वतःला खास मानू नका. समाजामध्ये विरून जा. समाज हे एक मोठे संरक्षक कवच आहे,त्याचा लाभ घ्या.
हे सर्व फार उपदेशात्मक किंवा पेट्रनाय्झिंग वाटले तर क्षमा करा आणि सोडून द्या. दुर्लक्ष करा.

आदूबाळ's picture

23 Feb 2013 - 8:57 pm | आदूबाळ

पन्नास, सुबोधराव आणि राही यांच्या प्रतिसादाला +१

हे सर्व फार उपदेशात्मक किंवा पेट्रनाय्झिंग वाटले तर क्षमा करा आणि सोडून द्या. दुर्लक्ष करा..

हे सर्वात उत्तम !!!!!!!!!!!!!!

इशारा :- धार्मिक म्हणवून घेणार्‍यांपैकी काहिंच्या भावना दुखावू शकतात. खालील ओळींतील भावार्थ लक्षात घ्यावा. जमल्यास शांतपणे एकदा वाचून पाहिलेत तर आभारी राहिन.
.
हल्ली अध्यात्म, "योगा" ह्याला ग्लॅमर आलेलं आहे. काही आध्यात्मिक व अधार्मिक किंवा निधर्मी संघटनांबद्दल आमचे हे मत आहे. "आम्ही धार्मिक नाही पण आध्यत्मिक आहोत" असेही म्हणणारी बरीच मंडळी आहेत. अनेकानेक ब्रँडचे ते ग्राहक आहेत. ह्यातले सर्वात जोरात चालणारे माझ्या माहितीतले पुण्यात मला दिसलेले ब्रँड सांगतो:-
१.श्री श्री १००८ रविशंकर --Art of Living
२.इगतपुरीचे विपश्यनावाले गोयंकाजी
३.सद्गुरु परिवाराचे आपले सद्गुरु वामनराव पै.
४.स्व पांडुरंगशास्त्री आठवल्यांचा स्वाध्याय परिवार
५.एका नामांकित वर्तमानपत्रात आयुर्वेदाच्या नावाने धुमाकूळ घालणारे एक महाराज आता अध्यात्मावर अन् गीतेवर भाषणे,चेहर्‍यावर अष्टसात्विक भाव आणून व्याख्याने,कथने व वैचारिक नर्तने करताना दिसतात.
.
ह्यापैकी क्र.१ वाल्याकडे जाउन आलेली माणसे उगीच "हमारे गुरुदेव्,जय गुरुदेव" म्हणत झीट येइस्तोवर त्यांच्या पंथात सामील व्हायचा आग्रह करत आर्जवी स्वरात पैसे मागत सुटतात(शिबिरात ये म्हणून).बरे, एकदा काहीतरी रौप्यमहोत्सवी वर्ष का काहितरी म्हणून शिबीर फुकट होते म्हणून तिकडे गेलो तर डोक्याल इतका शॉट्ट बसला की फुकटातलेही पूर्ण करवले नाही. बुद्धीवाद्यांचे, स्वातंत्रयाव्दी तर्ककर्कश विचारवंतांपेक्षाही त्यांचे बकणे अधिक वैतागवाणे होते.
.
क्रमांक दोनवाले पैसे मागत नाहित. पण गेल्यावर मानगुटीला धरुन १० दिवस १००% टक्के मौन करायला लावतात.हे झेपणेबल न वाटल्याने गेलो नाही.(तिथल्या सूतकी कळा घेउन वावरणार्‍यांशी बोलायचं नाही हे ठिक आहे हो, पण एखादा फोनही कधीमधी कुणाला करायचा नाही, गरज पडल्यास पानटपरीवरही अजिब्बात जायचं नाही, हे आमच्यासरख्या उतवळ्या माणसाला भयंकर क्रूर,अमानवी वगैरे वाटले.) जायला बिचकलो. शिवाय सलग दहा दिवस सुट्टी जॉबला लागल्यापासून आजतागायत कधीच घेतली नाही.(बॉसला कुठल्या तोंडाने सुट्टी मागायची? मग आम्हास दाखवल्या जाणार्‍या ऑनसाइटच्या गाजराचे काय होइल??)
.
क्रमांक तीनवाल्यांचे भक्त त्यांच्यकडे हरिपाठ वगैरे ठेउन जेवायला बोलावतात म्हणून जाम आवडतात.बाकी कर्मकांड वगैरे ह्यांच्यात फार आहे असे वाटले नाही, पण सतत उपदेशा देण्याच्या पवित्र्यात उभ्या असलेल्या मंडळींकडे जाणे म्हणजे डोक्यावर आधीच विरळ झालेले केस स्वतःच्या हाताने संपवून घेणे, म्हणून त्यांच्या नादी लागलो नाही.
(प्रामाणिक् रहा, मेहनत् करा, स्त्रीचा आदर करा, क्रोध व व्यसनाच्या आहारी जाउ नका,लोकांशी चांगले वागा ह्या आणि अशा (खरंतर कॉमनसेन्सच्या) गोष्टी ह्यांचे सद्गुरु सांगतात. पण ह्या "जगावेगळ्या शहाणपणाच्या", अद्भुत, असामान्य व "जीवनाचे सार" ह्या गोष्टी मीही सांगायला तयार् आहे हो. पण मला ह्यांच्यासारखे कुणी पैसे का देत नाही ह्या विचाराने नेहमीच उदास् होतो :-( )
.
क्रमांक चार वाल्यांनी समाजोपयोगी बरीच कामे केल्याचे ऐकले आहे.(तळी खोदणे, श्रमदान वगैरे) पेप्रात त्यांच्या स्वाध्याय परिवाराच्या इस्टेटीवरुन काही वाद झाल्याचे वाचल्याचेही आठवते आहे. पण अजून त्यांचे कुणी (सुदैवाने?)बोलवायला आले नाही.
.
क्रमांक पाच हे पेप्रातूनच इतके भंडावून सोडतात की त्यांच्याकडच्या थंड हवेच्या ठिकाणी जायची हिम्मत होत नाही.(कधी हिम्मत झालीच तरी त्यांच्या पंचतारांकित सुविधा परवडणार नाहित हेही खरेच.)
तेच ते. गीतेचे सार्. गीता, आध्यात्म ह्यावर ते आयुर्वेदाकडून् अचानकच् आलेत. त्यांचा प्रचंड उदोउदो वर्तमानपत्रातून काळजीपूर्वक् होतोय्."जीवन ह्यांना कळले हो" नावाने त्यांचा कुठलासा मुलाखतीचा का कसलातरी कार्यक्रम् होता.
आता काही दिवसात ते योगाचीही (आतडी) फाडून ठेवणार असा डौट येतो. (म्हणजे, योगाचे अंतरंग् उघडे करणार, योगाच्या पोटात शिरून आपणास ज्ञान वगैरे देणार असे म्हणायचे आहे.)
.

तुम्ही सुशिक्षित म्हणवणारी माणसे प्रामुख्याने "मनाला उभारी यावी", "आत्मबळ मिळते" वगैरे कल्पना घेउन नवनवीन ठिकाणी जाता.(आर्ट् ऑफ लिव्हिंग गँगवाले).जरा साय-फाय्, तात्विक् व आध्यात्मिक पॉलिशचे आवरण असलेली ठिकाणे पसंत करता. सुशिक्षित व् त्यातही मध्यमवर्ग, उच्चमध्यमवर्ग ह्यात् अधिक. विशेषतः शहरी.
हे ज्यांच्याकडे जातात त्या गुरुंकडे ह्यांच्याकडे अफाट शाब्दिक ताकत असते. समोरच्याला अजिबात् कळणार् नाही असे बोलण्याची एक अद्भुत सिद्धी ह्यांच्याकडे असते. "चित्तमात्रेतून समष्टी निर्माण होते. नासिकाग्रे ध्यान् करत त्राटक केल्याने मनोर्जा जागृतीने अष्टचक्रे फिरु लागतात" असे काहिसे हे बोलू लागले, की मराठीच बोलताहेत् असा भास होतो, पण् तासंतास ऐकूनही अजिब्बात समजत् नाही.
.
मरणोत्तर काही मागत सुटणारे काही अल्पसंख्यही आहेत;ते वेगळे . ते "अलौकिक् दर्शन" वगैरे घेउन् कृतकृत्य होतात. कुणी बापूंच्या अन् त्यांच्या पत्नी व् भावाच्या दर्शनाने होतो, कुणी अम्मा भगवानच्या अनुग्रहाने फलित होतो. आमच्यकडे काही लोक् आधीच अशा प्रकारे सातही जन्माची पापे धुवून् बसली आहेत. पुन्हा करणयसही तयार् आहेत्,आध्यात्मिक धोबी ती त्यांना धुवून देतीलच.एकाने तर निव्वळ दर्शनाने स्वतःची कुंडली व पर्यायाने नियती आख्खीच बदलून् मिळू शकते व तसे बदलायची त्यांच्या केंद्रात एक्स्चेंज ऑफर अजूनही सुरु असल्याचे सांगितले आहे.
.
जबरदस्त पैसा असल्यावर्/मिळाल्यावर मनुष्य् असा धास्तावल्यासारखा का करतो व कशाच्याही कच्छपी का लागतो ते न कळे.
.
तुम्ही वेगवेगळ्या लोकांच्याकडे गेल्यावर आम्ही तुम्हाला फारसे समजावू शकत नाही. "आम्हाला अनुभव आलाय्." हेच एक स्टिरिओअटाइप् सतत ऐकावे लागते.प्रामाणीक पणे मी वेगवेगळ्या मंडळींना भेटूनही मलाच कसा कधी कुठला "अनुभव" आला नाही हे कळत नाही. अजूनही जाण्यास तयार आहे. पण कुणी असे खरोखरीचे पावरफुल सापडतच नाहित. ते नेहमीच "कोणे एके काळी होउन गेले" , "आमच्या ह्याच्या त्याला भेटले" असेच किस्से असतात. भाविकांच्या गराड्यात राहणे म्हणजे म्हटले तर गंमम्तीशीर म्हटले तर् गोंधळवणारा व् म्हटले तर वैतागवाडी/क्रूर अनुभव असतो. ढोंगी,बिनडोक,प्रामाणिक,लबाड,समजूतदार ह्या सर्वच प्रकारचे श्रद्धावंत भेटलेत. पण बुद्धीवाद्यांत इतकी व्हरायटी नाही. बुद्धीवंत म्हणवून घेणारे बव्हंशी एकसुरी असतात. ते बहुतांशी प्रामाणिक असतात; पण समजूतदार तर फारच क्वचित असतात.
.
असो. खूप काही मनातून स्क्रीनवर सांडते आहे. आवरते घेतो.

राष्ट्रिय पातळी, भारत महासत्ता वगैरे विषयाबद्दल आता बोंब ठोकणार आहे. ही बर्‍यापैकी गांभीर्याने ठोकत आहे.
भारत महासत्ता होणार म्हणे. म्हणजे नक्की काय होणार आहे? समृद्ध होणार आहे का? जीवनमान सुधारणार आहे का? की लष्करी धाक आसपासच्या भागात अधिक निर्माण होणार आहे? रस्त्यातले खड्डे संपणार आहेत का? सुरळित वीजपुरवठा सर्वत्र(निदान बहुतांश ठिकाणी, शेतीपासून घरदारापर्यंत) मिळणार का? कधीही बॉम्ब फुटू शकतो हे गृहित धरणं सामान्य भारतीय सोडणार का? समान नागरी कायदा आणायची हिम्मत येणार का?(तो कायदा येणं योग्यच आहे; ह्यावर खूपदा एकमत दिसतं; पण ते आणणं व्यवहार्य नाही; तो आणला तर आपली वाट लगेल अशी भीती आहे.तर ती भीती जाणार का?)
.
बेसिकली आपण बहुसंख्य लोक हिप्पोक्रेट्स आहोत; अप्पलपोटे आहोत. धडधडित राँग साइडने येउन धडक दिल्यावरही याला प्रत्युत्तर देताना " मी कसा बरोबर आहे" हे आर्ग्युमेंट कुणीच का करत नाही? "मी किती मोठ्ठा आहे. मेरि कितनी पैचान हय" असले सडेल आर्ग्युमेंट करताना आपल्याला काहिच कसं वाटत नाही. "जाउ दे; मोठी असामी आहे" असं म्हणून प्रभावशाली व्यक्तींचे गुन्हे इतक्या भयावह प्रमाणावर माफ होणार्‍या देशात जे चाललय त्याला आलबेल म्हणता येइल का?(बाहेर पंतप्रधान आणि प्रेसिडेंटांच्या सख्ख्या मुलींनाही तुरुम्गवास झालेला ऐकण्यात येतो( अमेरिका :- प्रेसिडेंट बुशच्या पोरिला तुरुंगवास झालेला; इंग्लंड :- पंतप्रधान टोनी ब्लेअरच्या पत्नीला विनातिकीट पकडल्यावर रेल्वेबाहेर काढलेलं.).किरकोळ मद्यपान वगैरेसाठी. खरेतर हे गुन्हे तर सहज दाबता येण्यासारखे आहेत; भारतात तरी.)
.
भारतत काय वाईट आहे असं म्हणणं म्हणजे डम्पिंग ग्राउंड मध्ये उभं राहून "दाखव बघू इथला कचरा" असं म्हणण्यासारखं आहे. इथं जे आहे ते बाय डिफॉल्ट चूकच आहे. चांगल्या गोष्टी अपवाद आहेत. मिडिया आणि त्याची भूमिका ह्यावर इथेच जालावर शेकडो पाने खर्ची पडलित. नेत्यांना निवडून द्यायचे स्वात्म्त्र्य तुम्हास आहे असे सांगण्यात येते. त्यातून काय अवस्था आहे हे दिसतेच. न्यायव्यवस्था बाय डिफॉल्ट होलि काउ आहे; त्याला चांगले म्हणणे कंपलसरी आहे. लष्कराकडे काय दारुगोळा आहे; किती शस्त्रसाठा आहे; ही झाकली मूठच बरी.(अगदि अधिकृत अहवालातही चीनकडे सातेकशे पाणबुड्या असतील तर आपल्या पन्नस्-साठ अशा धर्तीची आकडे वारी दिसते. जस्ट कम्पेअर चीन्-भारत्-पाक :-
७५०-१५०-९० असली ती आकडेवारी असते. पाकपेक्षा आपली ताकद थोदीशी जास्तच असते. २०-२५ टक्क्यांनी. पण चीनची सरळसरळ आपल्यापेक्षा ५०० टक्क्यांनी जास्तच असते.
संरक्षण सामुग्री किती आयात होते; त्याचे पुढे काय होते देवच जाणे. इतका मोठा देश आजही काहिच धड युद्धसामुग्री निर्मित करु शकत नसेल तर अवघड आहे.
.
८०%च्या वर कैदी कच्चे कैदी आहेत. ते जेलात गुरासरखे भरले जातात; मॅजिस्ट्रेटसमोर उभे न करताही वर्षानुवर्षे तसेच दाबले जातात.
.
मनोरुग्णांबद्दल समाजाचा दृष्टीकोन काय आहे ह्याची जाणत्यांना कल्पना आहेच. त्यांच्या हॉस्पिटल्सची अवस्था बघून नॉर्मल माणूसही मानसिक धक्क्याने रोगी होइल.
काहीही धड दर्जेदार निर्मिती कुठे होताना दिसत नाही. brand india असं काही उत्पादन क्षेत्रात किम्वा फॉर द्याट म्याटर सेवा क्षेत्रात आहे का?( भारतीय आय टी हा बकवास आहे हे इथे गृहितक आहे.) शेतीबद्दल बोलावयास नको. हेक्टरी उत्पादन पाश्चात्त्यांचे एकरी ४० च्या घरात असेल, तर चीनचे ३३-३५ पर्यंत आहे. भारताचे १५-१८च्या घरात रेंगाळते.
तुम्ही म्हणे शेतीप्रधान देश. चीनचे लागवडीखालील क्षेत्र भारतातील लागवडीखालच्या क्षेत्राच्या फक्त निम्मे आहे. तरीही त्यांचे उत्पादन भारताहून बरेच अधिक आहे.
.
भारत एकाच वेळी तीनेक शतकात वावरतो. सुखी आणि नशीबवान लोक,आभिजन वर्ग सध्याच्या युगात आहे. बाकेचे कित्येक मागच्या शतकात आहेत. त्याहून बुरसटलेले ल ओक बुरसटलेल्या टाळक्यानिशी नि सडलेले जीवनमान घेउन त्याही मागच्या शतकात रेंगाळताहेत.(स्लमडॉग पाहिल्यावर सगळे कसे चिडले होते. पण खरच तसं काही नाहिये का इथे?उगा "आमच्याकडे ताजमहाल आहे; चकचकित मॉल्सही आहेत" असे म्हणत वाळूत तोंड का खुपसतात देव जाणे.) आर्थिक राजधाने मुंबै म्हणे. ५५%हून अधिक पब्लिक झोप्डपट्टीत राहते. जवळपास मुंबैच्या आसपास जाणारीच लोकसंख्या असणारी शहरे म्हणजे शांघाय, तेहरान आणि तोकियो. ह्या प्रत्येकावर एकदा नजर टाका. तिथलं जीवनमान पहा. नुसता आकार पाहिलात तरी समजेल. ही सर्व शहरे मुंबैच्या सात्-आठ पट मोठी आहेत; पण तितकीच लोक्संख्या वागवून आहेत. तिथे मोकळ्यानी श्वास घेता येतो.
.
(मेळघाट वगैरे सारखे गंभीर)कुपोषण, उपोषण, बालमृत्यू हे शब्द नक्की कुठल्या महासत्तेच्या डिक्शन्रीत असतात ते एकदा तरी दाखवून द्या बुवा.
.
कित्येक लोकांचा व्यवसाय अजूनही स्मशानात जाउन मेलेली मढी उकरून त्याच्या अंगावरून जे काय मिळेल ते हिसकावून उदरनिर्वाह करणे हा आहे.
.
कितीही स्फोट झाले तरी कुणाला काहीच वाटत नाही. आता काल आणि आज काहिच झाले नाही. म्हणून सगळे एकदम थट्तामस्करी वगैरे करताहेत. जणू काही झालेलेच नाही. अचनाक ह्यांच्या बुडाखाली एखादा स्फोट होतो; हे बावचळल्यासारखे करतात; तेवढ्यापुरतं "कापून काढलं पाहिजे. एकदा धडा शिकवला पाहिजे" वगैरे रागाच्या ओकार्‍या बाहेर काढतात. आणि पुन्हा? पुन्हा काहिच नाही. सगळं कसं आलबेल! काही झालेलच नाही. नंदनवनात जणू सारे वावरताहेत्.थट्टा मस्करी सुरु.
अरे काय हे? मग एकदम स्फोटानंतर निर्वाणीची भाषा वगैरे व्यर्थ अभिनिवेशी बडबड तरी करु नका ना. स्फोट झाला उचक. बलात्कार झाला; एकाएकी "फार झालं. काहीतरी करा. त्याचं कापून काढलं पाहिजे " वगैरे वगैरे. आणि लागलिच पुढच्याच दिवशी पुन्हा? पुन्हा काहिच नाही. अरे बातम्या येत नाहित तेव्हा काहिच होत नसतं का? भारतात दर मिनिटाला दहाच्यावर तरी जोर-ज्बरदस्तीचे किस्से होत असतात. तुम्हाला सुधारायचे असेल तर मग नियमित दबाव का टाकत नही? नाहितर बोंब मारणे तरी सोडा ना मिडियानं कळ लावल्यावर; पिन मारल्यावर.
तोच प्रकार तो थिल्लर/वाह्यात अण्णा-केंद्रित भ्रष्टाचार विरोधी शंखाचा. "भ्रष्टाचारानं बरबटलेलो आहोत" हे एकदम तो म्हातारा काका ओरडायला लागल्यावर तुम्हाला कळलं का? म्हतारा काका गपचिप गावात जाउन पडल्यावर तुमची हवा कुठे गेली? तुम्ही नक्की बोंबा का मारत होतात? तुमचे उद्दिष्ट तुम्हाला तरी माहित होते का?
.
रेसिझम्-सेक्सिझम( लिंगाधारित भेदभाव) आणि कास्टिझम हे भारतातून आधी संपतील का भारतच आधी संपेल हे (असलाच तर)देवच जाणे. त्याची हिडिस रुपे मी सांगण्याची गरज नाही.
.
"माझ्यावर अन्य्यय होउ नये" ही कुणाचीच भूमिका का नाही? "मला इतरांना दाबता येइल इतपत सामर्थय्वशाली व्हायचय" अशीच सगळ्यांची सुप्त इच्छा का आहे? ("जानता है मै कौन हूं" मागचा गर्भितार्थ तोच आहे. "मी बडे बाप की औलाद आहे. मी वाटेल ते करीन.अनिर्बंध राहिन" हा तो आवेश आहे.)
.
दाद मागावयास गेल्यास तक्रारकर्त्यास कायम झोडपण्यात येणे कधी थाम्बणार?
पोलिसांना सामान्य पब्लिक विशेषतः फारसे गुन्हे न करणारे वचकून का असतात? पोलिसांची भीती सामान्य नागरिकाला वाटावी कि गुंडाला वाटावी? भारतात बाहुबली राजकारणी, इतर गुंड, स्थानिक प्रभावशाली व्यक्ती(अगदि इमाम बुखारी पासून कडवे हिंदुत्ववादी म्हणवून घेणारे हिंस्त्र गुंडही; हे सारेच) हे पोलिसांना खरच घाबरतात का? भारत हे पिसाळलेल्या कुत्र्यांचं अभयारण्य नाहिये का?
तुम्हाला कुणी लुबाडून गेला तर तुम्हाला न्याय मिळेल ह्याची किती खात्री वाटते?(काही लाख केसेस ह्या कित्येक दशके अपिलात पडून आहे. न्यायव्यव्स्था जबरदस्त अपयशी आहे.(उदात हेतू; कुचकामी अंमलबजावणी))
.
किती टक्के लोकसंख्येला पुरेसं चांगलं पाणी प्यायला मिळतं? महासत्ता झाल्यावर त्यांना मिळणार आहे का?sanitationची अवस्था काय आहे? पब्लिक युरिनल्सची काय अवस्था आहे?
.
स्त्रिया एकट्या फिरताना बिंदास फिरु शकतात का?(अपवाद सोडून)
.
भारताच्या लष्कराचा धाक किती आहे हे दशकभरापूर्वीच दिसले. बांग्लादेशी सैनिकांनी सहा भारतीय जवानांना मारले. त्यातील एक दोघांच्या प्रेतांची मिरवणूक काधली त्यांचय सीमेवरील गावाअतून(टाइम्स मध्ये फोटो होता. शिकारीत मारलेल्या डुकराला आडव्या काढीला बांधतात; नि त्याचे प्रेत मिरवतात तसे फिरवत होते.) वाजपेयींना शेख हसिना का खालेदा झिया कोण होती तेव्हा तिथे तिला फोन करुन निषेध केला. बस्स. इतकेच. हाच तुमचा धाक. धन्य धन्य.
.
भारत नावाचं डम्पिंग ग्राउंड इतके मोठे आहे की अजून पाच पन्नास हजार प्रतिसाद लागतिल सगळं सांगायला. तरी खूप काही शिल्लक राहिल."आम्ही आफ्रिकन देशांपेक्षा बरे आहोत" ह्यात खुश राहणे बरोबर आहे क ह्याचा जरूर विचार व्हावा.
.
थोडक्यात भारताची एक जबरदस्त गटार बनलेली आहे.
आर्थिक प्रगतीचे ढोल बड्वणार्‍यांस्साठी :-
http://articles.economictimes.indiatimes.com/2012-12-21/news/35953405_1_...
.
http://articles.economictimes.indiatimes.com/2013-01-02/news/36111402_1_...
.
तुमच्या नाकाखाली काय चाल्लय तेही पहा जरा:-
http://www.economist.com/blogs/banyan/2013/02/spending-bangladesh

दादा कोंडके's picture

26 Feb 2013 - 6:35 pm | दादा कोंडके

प्रतिसाद आवडला.

पैसा's picture

26 Feb 2013 - 4:18 pm | पैसा

यावेळचा त्रागा जरा डोक्याला त्रास देणारा आहे खरा.

धार्मिक गुरू वगैरे पटले तर घ्या नायतर सोडून द्या. बाकी लोक त्यांच्यामागे का जातात म्हणून स्वतःला अज्जिबात त्रास करून घ्यायचा नै.

आंतर्राष्ट्रीय राजकारणाबद्दल त्रागा करून विसरून जायचा असतो. बाकी कच्चे कैदी, गरिबी, सैन्याची दुर्दशा, पाण्याचे आणि इतर प्रॉब्लेम यावर त्रास करून काही फायदा नाही कारण एकट्या दुकट्याने हे बदलता येणार नाही. उलट जाब विचारणार्‍याला गप्प करायचे प्रयोग केले जातील.

http://www.dnaindia.com/india/report_case-filed-after-abusive-comments-a...

हे बघा.

सैन्याचे यावर्षीचे बजेट १४००० कोटी रुपयांनी कमी केले आहे म्हणे. आणि हे कमी केलेले पैसे कुठून कमी होणार? तर कारगिलसारख्या ठिकाणी जी खास साधनसामुग्री लागते त्यात, नव्या शस्त्रांमधे आणि सैनिकांच्या पगारातून कमी करणार. :( सैनिकांना निदान पैसे तरी पुरेसे द्या मेल्यांनो! सैनिकांच्या नावाचा फायदा घेऊन 'आदर्श' घोटाळे होणार. शी: :!

लहानपणापासूनच शाळेत काय नि घरात काय अतिरेकी लीन्-दीन होण्याचं गौरवीकरण केलेलं.
कल्पना करा आधीच लहान पोराला काही धड समजत नाही; खूप सरे प्रश्न ,शंका डोक्यात असतात त्याबद्दल ठाउक असेल तर उत्तर देउन मोकळे व्हावे किम्वा ठाउक नसेल "ठाउक नाही रे बाबा" असे म्हणून मोकळे व्हावे. ज्या त्या "गोष्टीवर त्या सर्वशक्तीमान प्राण्याला शरण जा, त्याच्या चरणी लीन हो. दीन हो. त्याच्यापुढे आपण सर्व यःक्श्चित आहोत. आपला हीन दीन दुबळेपणा मान्य करणे म्हणजे मोठेच पुण्य. " अशी गलिच्छ शिकवण रोज बोळ्याबोळ्याने दूध पाजावी तशी गळ्यात मारण्याची काय गरज?
.
लाइफ ऑफ पाय पाहिल्यावर त्यातला कथानाय्क सुरुवातीच्या भागात बर्‍यापैकी वेडझवा दाखवलाय. "thank you lord vishnu for introducing me to jesus" असे काहीतरी तो म्हणत जीझस च्या नादी लागतो. "असंही कधी असू शकतं का? इतकं कुणी बिन्डोक राहतं का भाउ" अशा प्रतिक्रिया त्या दृश्याबद्दल नंतर ऐकू आल्या.believe me, मी अगदि बराचसा असाच होतो. रादर, तसं असणं हेच कसं भला असल्याचं लक्षण आहे; सतत "ईश्वरी राज्यात जगण्यासठी" आपण "ईश्वरी दयेवर" कसे लाचार असतो; सज्जन माणूस म्हणजेच अधिकाधिक लाचार असे नकळतपणे ही माणसे ठसवित होती. आता पुन्हा "आम्ही कुठे काय शिक्वीत होतो रे बाबा" असे म्हणत हात वर करायला हे मोकळे आहेतच. म्हणजेच ह्यांना त्यावेळी सिरियसली घेणे ही आमची घोडचूक ठरली. आपल्या शाळा नि तथाकथित संस्कार हे असा दुबळेपणा संसर्गित करण्याचे कारखाने बनवून ठेवलेत. तुम्ही जर टगे असाल ; तर ह्यास सहज पुरून उराल. पण तुम्ही ह्यांच्यावर विश्वास ठेवलात तर मराल. उलट तुम्ही मेल्यावर "मी तर असे म्हटलोच नव्हतो रे बाबा", "धर्म तर असे सांगतच नाही", "तुला खरा अर्थच कळला नाही" असे हे वर तोंड करुन बोलणार.
.
तुम्हाला पोरात्यक्षिक हवं असलयस कुठल्याही नावाजलेल्या मुलांच्या "मराठी " शाळेत जा.तिथे प्रार्थना म्हणताना कसा "आर्त, व्याकूळ" भाव कसा थबथबून ओथंबून जात असतो ते बघा. लीन ,दीनवाणे शब्द आणि त्याहून केविलवाणा स्वर म्हणजे ह्या पादर्‍या प्रार्थना.
.
ही प्रार्थना पहा :-
"तुम ही हो माता पिता तुम्ही हो
तुम ही हो बंधू सखा तुम ही हो
तुम ही हो साथी तुम ही सहारे
कोइ न अपना सिवा तुम्हारे"
.
"तुम ही हो नैया तुम ही खिवय्या
तुम ही हो बंधू सखा तुम ही हो "
.
ही प्रार्थना म्हणताना आख्ख वर्ग/शाळा खाली उभा राही, समोर माइक घेउन तीन चर सुरेल पोरं उभी रहात नि आम्हास सुरात सूर मिळवून म्हणावं लागे.(नाहीतर कानफटात मिळे)हे म्हणताना चेहर्‍यावर आणी सुरात भक्तीभाव नावाच्या प्रकाराखाली जी किळसवाणी लाचारी टपटप्ती होइ; त्यास तोड नाही.
.
फार मागे टीव्हीवर एकदा जुनं हिंदी गाणं पाहिलं होतं "दे दी हमे आझादी बिना खड्ग बिना ढाल" त्याच्या शेवटी ते पोरगं अगदि भक्तीभावाच्या अतिरेकानं पार र्‍अडायला वगैरे लागतं. कसला हा बुळचटपणा. आणी हाच्च प्रकार अगदि असाच शाळांत ठाकून ठोकून शिकवला जातो.
पोरांचं भलं करायचच असेल तर आधी शाळेतील सर्व दीनवाणी गाणी बंद करा. प्रार्थना ह्या शब्दाला आग लावा. चांगुलपणाचे पाय चाटायला शिकवण्यापेक्षा वाईटपणावर थुंकायला शिकवा. पोरांना निर्भय बनवा. नाहीतर हीच पोट्टी पुढं जाउन नागरिक बनतात नि देवाला घाबरल्यागत विचित्र वागतात; ते नेहमीचच उपास तापास वगैरे. तो प्रकार आटोक्यात आणायचा तर ह्याही भागाकडं लक्ष द्या.
अजून काही प्रार्थना :-
"तू ही राम हय तू रहीम हय
तू करीम कृष्ण खुदा हुवा"
wtf? वरील दोन ओळींत जेवढ्या व्यक्तींची/प्रकारांची नावं आहेत त्यांना व्यावहारिक जीवनात खिजगणतीत तरी धरायची गरज आहे का? उठसूट आपलं तेच भंकस "सगळेच चांगले आहेत. सगळ्याच ग्रंथात सगळच चांगलं सांगितलय." (हे म्हणजे गांधींच्या "गीता हे मानसिक द्वंद्वाचं वर्णन आहे. त्यातही खरा उपदेश अहिंसेचाच आहे." ह्या छापाच्या तत्वज्ञानाच्या वर झालं राव. "हतो वा प्राप्यसि स्वर्गम् जित्वा वा भोक्ष्यसे महीम" काय गंमत म्हणून लिहिलं होतं का तिच्यायला?)
.
"हमको मन की शक्ती देना मन विजय करे
दूसरो की जय से पेहले खुद को जय करे"
(आधी स्वतःवर विजय मिळवा, मग दुसर्‍यांवर. स्वतःला थोबाडित मारुन घ्यायला शिका. टिपिकल बकवास.)
.
असो. घाईत आहे. सध्या इतकेच.

अप्पा जोगळेकर's picture

7 Mar 2013 - 12:31 am | अप्पा जोगळेकर

टोकाचा निराशावाद. सतत आंतरजालावर वावरल्याने किंवा बैठे काम केल्याने कदाचित असे होत असावे.
इथे धागे काढून कुंथत बसण्यापेक्षा इन्फीच्या फुटबॉल ग्राउंडवर जाऊन घाम गाळला असता तर जरा कूल वाटले असते आणि कदाचित काही प्रश्नांची उत्तरं सुद्धा मिळाली असती.
पंचतारांकित नोकरी आहे,पुरेसे पैसे आहेत,स्वतःचे घर आहे,पोरगीसुद्धा आहे तरीसुद्धा इतका निगेटिव्ह विचार करणे पटले नाही. गेट वेल सून.