आज २१ फेब्रुवारी, हा ज्येष्ठ हिंदी अभिनेत्री नुतनचा स्मृतीदिन. आजच्याच दिवशी १९९१ रोजी नुतनने या जगाचा निरोप घेतला. या निरागस हास्याच्या, अप्रतिम तरीही साध्या सौंदर्याच्या, आपल्या नैसर्गिक अभिनयाने चित्रपटसृष्टी परिपूर्ण करणार्या नूतनला सलाम..
मिलन चित्रपटातलं सुनील दत्तच्या सोबतीने गायलेलं 'सावन का महिना' हे गाणं.
सरस्वती चंद्र चित्रपटातलं 'चंदन सा बदन' हे गाणं.
कर्मा चित्रपटातलं 'दिल दिया है जान भी देंगे' हे गाणं.
मेरी जंग चित्रपटातला तीचा दमदार अभिनय.
.
.
.
आणि मोहनिश बहल नावाचं तीचं दिवटं कार्ट.
गौतम राजाध्यक्षांसारखा एक मोठा फोटोग्राफर नूतनला जगातल्या सर्वात सुंदर स्त्रियांपैकी एक समजत असे. कमालीचा फोटोजेनिक चेहरा, सडसडीत अंगकाठी आणि उंच बांधा. सगळे असून नूतन सगळ्या चित्रपट सृष्टीसाठी नूतन ताईच राहिली. तिला घरात नवर्याकडून मारहाण होत असे असे काहीसे वाचल्याचे आठवते. घरात इतके प्रॉब्लेम्स असताना सीमा, पेइंग गेस्ट, बंदिनी, सुजाता, अनाडी ते सौदागर अशा अनेक सिनेमातील यादगार भूमिका आमच्यासाठी ठेवून गेली. नूतनला श्रद्धांजली.
नूतन म्हटली की मला हमखास आठवतात ती म्हणजे सुजाता मधलं "जलते है जिस के लिये", बंदिनी मधलं "मेरे साजन है उस पार" आणि दिल ही तो है मधलं "तुम अगर मुझको ना चाहो तो कोई बात नही" ही गाणी... कमाल गाणी, कमाल आवाज, आणि त्यातलं नूतनचं ते साधं तरीही सुंदर दिसण... ं
प्रतिक्रिया
21 Feb 2013 - 2:27 pm | तर्री
हे अमान्य आहे ! काहीतरी लेव्हा नूतन ताई विषयी -
पवन दिवानी , देव आनंद , कर्मा , अभिनय , वगैरे .
21 Feb 2013 - 2:29 pm | नानबा
बरं ब्वॉ... पण आत्ता हापिसात आहे ओ... एवढा वेळ नाही मिळणार लिवायला... वाचकांकडून प्रतिसादांमध्येच येऊदेत की या सगळ्या आठवणी...
21 Feb 2013 - 3:00 pm | अक्षया
नुतन चे एक आवडते गाणे
21 Feb 2013 - 8:15 pm | नानबा
मला युट्यूबची वरच्या सारखी लिंक द्यायला कोणीतरी शिकवा राव...
21 Feb 2013 - 3:02 pm | परिकथेतील राजकुमार
आजच्या दिवशी असे खरेतर बोलायला नको आहे, पण..
फिस्सकन हसायला झाले हो.
ही बाई कुठल्याही चित्रपटात आणि कुठल्याही फ्रेम मध्ये मोलकरीणच वाटते.
बाकी, अभिनय कशाला म्हणावे हा ज्याचा त्याचा प्रश्न असल्याने, त्याबद्दल नो कॉमेंटस.
21 Feb 2013 - 3:03 pm | परिकथेतील राजकुमार
कृपया कुठला फटू आंतरजालावरच्या कुठल्या ठिकाणाहून डकवला आहे त्याचा उल्लेख करा. अन्यथा विजुभौ रागावतील.
21 Feb 2013 - 3:12 pm | किसन शिंदे
नुतन म्हटलं कि आम्हाला आठवतं...
मिलन चित्रपटातलं सुनील दत्तच्या सोबतीने गायलेलं 'सावन का महिना' हे गाणं.
सरस्वती चंद्र चित्रपटातलं 'चंदन सा बदन' हे गाणं.
कर्मा चित्रपटातलं 'दिल दिया है जान भी देंगे' हे गाणं.
मेरी जंग चित्रपटातला तीचा दमदार अभिनय.
.
.
.
आणि मोहनिश बहल नावाचं तीचं दिवटं कार्ट.
21 Feb 2013 - 3:12 pm | पैसा
गौतम राजाध्यक्षांसारखा एक मोठा फोटोग्राफर नूतनला जगातल्या सर्वात सुंदर स्त्रियांपैकी एक समजत असे. कमालीचा फोटोजेनिक चेहरा, सडसडीत अंगकाठी आणि उंच बांधा. सगळे असून नूतन सगळ्या चित्रपट सृष्टीसाठी नूतन ताईच राहिली. तिला घरात नवर्याकडून मारहाण होत असे असे काहीसे वाचल्याचे आठवते. घरात इतके प्रॉब्लेम्स असताना सीमा, पेइंग गेस्ट, बंदिनी, सुजाता, अनाडी ते सौदागर अशा अनेक सिनेमातील यादगार भूमिका आमच्यासाठी ठेवून गेली. नूतनला श्रद्धांजली.
21 Feb 2013 - 3:47 pm | प्रसाद१९७१
नुतन हे नाव ऐकले की माझ्या डोळ्यासमोर एक साडेचार फुटी ( डोक्याचे ८ इन्च वगळुन साडेचा फूट रहातात ) पिंप येते.
कठीण आहे, काय काय बघावे लागले जुन्या पिढीतल्या लोकांना ( आणि आवडुन पण घ्यावे लागले ).
कारण नुतन टाळली तर नर्गीस नावाचे अजुन मोठ्या डायमिटरचे पीम्प.
21 Feb 2013 - 4:20 pm | अभ्या..
मोहनीश बहलच्या मम्मी आहेत का? छान छान.
चेहर्यावरुनच ओळखू आल्या.
21 Feb 2013 - 5:21 pm | अविनाशकुलकर्णी
नुतन सुनिल दत्त चे जम्माडी जमंत होते असे ऐकिवात आहे
21 Feb 2013 - 5:28 pm | किसन शिंदे
विकिवर २३ फेब्रुवारी दाखवतंय.
21 Feb 2013 - 7:56 pm | नानबा
नूतन म्हटली की मला हमखास आठवतात ती म्हणजे सुजाता मधलं "जलते है जिस के लिये", बंदिनी मधलं "मेरे साजन है उस पार" आणि दिल ही तो है मधलं "तुम अगर मुझको ना चाहो तो कोई बात नही" ही गाणी... कमाल गाणी, कमाल आवाज, आणि त्यातलं नूतनचं ते साधं तरीही सुंदर दिसण... ं
21 Feb 2013 - 8:00 pm | ५० फक्त
निगाहे मिलाने को जी चाहता है .
21 Feb 2013 - 8:36 pm | मराठी_माणूस
वरील काही प्रतिक्रिया वाचुन ".... गुळाची काय चव" , ही म्हण आठवली