नॉन आयटीवाल्यांना आयटीवाल्यांबद्दल आणि एकंदरीत आयटी क्षेत्राबद्दल खुपच कुतुहल असते. आयटी म्हटलं की सगळ्यात आधी दोनच गोष्टी नजरेसमोर येतात, एक म्हणजे बक्कळ पैसा आणि दुसरं म्हणजे एसीत बसून काम करणं. दोन्ही गोष्टी आयटीमधील सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट या प्रमुख अंगाबद्दल शब्दशः खर्या असल्या तरी आयटी म्हणजे केवळ सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट नाही. आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्येही बक्कळ पैसा आणि एसीमधील काम यांच्या जोडीनेच इतरही असंख्य भानगडी असतात. काही चांगल्या तर काही वाईट.
आपण भारतीय स्वतःला आयटीतील बाप समजतो. पण ते खरं नाही. या क्षेत्रात काम करणारे (आणि वास्तवाचे भान असलेले) चांगलेच ओळखून आहेत की आपण या क्षेत्रातले पाटया टाकणारे हमाल आहोत. आपल्याला मिळणारा बक्कळ पैसा हा केवळ चलनातील फरकाचा प्रताप आहे. तसेच अमेरिका आणि युरोप खंडांमध्ये वाढलेले संगणकीकरण परंतू स्वस्त आणि कुशल संगणक कामगारांची अनुपलब्धता हीसुद्धा आपल्याला सो कॉल्ड आयटीमधले बाप बनवण्यास कारणीभूत आहे. पुढे हे सारं आपण विस्ताराने पाहूच.
बरेच दिवसांपासून मनात होतं की उगाचच प्रतिसादाच्या पिंका टाकण्यापेक्षा काहीतरी चांगलं लिहिण्याचा प्रयत्न करावा. पण टंकायचा कंटाळा येत होता. त्याचबरोबर विषय कुठला निवडावा हे ही कळत नव्हतं. माझा हातखंडा असलेला अध्यात्म हा विषय डार्विनच्या उत्क्रांतीवादाच्या प्रकाशात उलगडून दाखवावा की मानसशास्त्राचं बोट धरुन मनोविकारांबद्दल सहज सोप्या भाषेत लिहावं हे कळत नव्हतं. संगणक सुरक्षा या विषयावर काही खरडावं असंही कधी कधी वाटायचं. नुकतीच चालू झालेली प्रथम फडणीसांची मोबाईल उत्क्रांतीवरील सुंदर मालिका, त्याहीआधीची सोकाजीनानांची अत्याधुनिक तंत्रज्ञान सहज सोप्या भाषेत सांगणारी लेखमाला वाचून वाटलं की आपण आयटीवर का लिहू नये. आणि ठरवलं की आपण आयटीवरच लिहायचं.
कमी अधिक अशा साडे सात आठ वर्षांच्या माझ्या आयटी करीयरमध्ये खुप काही गोष्टी पाहील्या, अनुभवल्या. काही आनंद देणार्या, काही आपल्या क्षमतेचा कस पाहणार्या, काही मनस्वी चीड आणणार्या, तर काही नैराश्येच्या खोल गर्तेत फेकून देणार्या. या सार्याबद्दल लिहिण्याचा हा प्रयत्न असेल. मिपावर आयटीमधील रथी महारथी आहेत. ते माझ्या लेखनात काही चुका झाल्या तर दाखवून देतीलच. तसेच ते प्रतिसादांमधून आपले अनुभवही सांगतील, वाचकांच्या प्रश्नांना उत्तरेही देतील याची मला खात्री आहे.
नमनाला घडाभर तेल वाहून झालं आहे. मुद्दयाचं असं काही लिहिलंच नाही. ते सारं आपण पुढच्या भागापासून पाहू.
तोपर्यंत, स्टे टयुन्ड* !!!
*स्टे टयुन्ड - हा आयटी मॅनेजर्सचा आवडता शब्दप्रयोग. शब्दशः अर्थ "तुमचा रेडीओ अमुक अमुक फ्रीक्वेंसीला टयून करा" एव्हढाच असला तरी आयटीमध्ये त्याला खुप मोठा अर्थ आहे. तुम्हीच पाहा:
प्रसंग १ : अबक आयटी कंपनी आपली कर्मचारी संख्या वाढवण्याच्या विचारात आहे. दे हॅव एक्स्पान्शन प्लान. या संदर्भात एका नामांकीत सरकारी संगणक शिक्षणसंस्थेच्या नोटीस बोर्डवर नोटीस लावली जाते. पोरं पोरी भराभर आपापले रिझुमे, सीव्ही जे काही असेल ते मॅनेजरच्या ईमेल आयडीवर पाठवतात. (कंपनी सध्यातरी छोटी असल्यामुळे प्रोजेक्ट मॅनेजरच रीक्रुटमेंट, रीसोर्स मॅनेजमेंट पाहत असतात.) पोरांचा भरभरुन प्रतिसाद पाहून मॅनेजर हरखून जातो. रीप्लाय म्हणून केलेल्या ईमेलमध्ये पोरांना तो खुप मोठी मोठी स्वप्नं दाखवतो. शेवटी थोडंसं रीक्रुटमेंट प्रोसेसबद्दल, इंटरव्ह्यू शेडयुलबद्दल लिहितो लिहितो. अगदी शेवटची ओळ असते, स्टे टयुन्ड !!!
प्रसंग २ : कंपनीत अॅट्रीशन रेट वाढू लागला आहे. मॅनेजमेंटच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. याच गतीने पोरं पोरी जरी कंपनी सोडून जाऊ लागली तर एक दिवस कंपनीला टाळं ठोकावं लागेल याची त्यांना खात्री पटू लागली आहे. काहीतरी करणं भाग आहे. मग एचारमधील चार डोकी/मॅनेजमेंटमधील चार डोकी मिळून काहीतरी प्लान बनवतात. याच कंपनीत पोरांना कसं उज्ज्वल भवितव्य आहे याच्या लंब्याचौडया बाता केल्या जातात. हा प्लान एक खुपच वरचा मॅनेजर एक दिवस टाऊन हॉल नामक मीटींगमध्ये सार्या कर्मचार्यांना समजावून सांगतो. त्याचं ते गाजरदर्षक भाषण संपवता संपवता तो म्हणतो, स्टे टयुन्ड !!!
प्रसंग ३ : अबक नावाच्या भारतीय आयटी कंपनीचा कखग नामक अमेरिकन तेल आणि वायू कंपनीशी आयटी सेवा पुरवण्यासाठीचा करार आहे. कधीतरी या अमेरिकन कंपनीचा एक उच्चपदस्थ अधिकारी अबक च्या भारतातील डेव्हलपमेंट सेंटरला भेट दयायला येतो. त्याच्यासाठी पायघडया घातल्या जातात, त्याला टोपी घातली जाते (सॉरी, पगडी घातली जाते), त्याची आरती केली जाते. या सार्या पाहूणचाराने तो भारावून जातो. शेवटी तो टाऊन हॉल नामक मीटींगमध्ये भाषणाला उभा राहतो. आमच्या कंपनीला या वर्षी इतके इतकी मिलियन की बिलियन डॉलर नफा होणार आहे. पण हा नफा कमावण्यासाठी आम्हाला तुमच्याकडून उत्तम अशा आयटी सेवेची अपेक्षा आहे अशा टाईपचं ते भाषण असतं. भारतीय कंपनीच्या मॅनेजरच्या डोळ्यांसमोर ऑनसाईट अपॉर्च्युनिटीज दिसायला लागतात. तो "क्लायंट" आपलं भाषण एकदाचं संपवतो. त्याचं शेवटचं वाक्य असतं, स्टे टयुन्ड !!!
प्रतिक्रिया
16 Feb 2013 - 4:41 pm | आदूबाळ
धन्याजीराव, स्टेईंग ट्यून्ड!
कीप द लेखस फ्लोईंग हां मात्र...:)
16 Feb 2013 - 4:53 pm | अत्रुप्त आत्मा
1 टू आदूबाळ.
आणी आमच्या सारख्या या कुठल्याच क्षेत्राची काहिही माहिती नसलेल्यांसाठी या लेखमालेबद्दल धण्यवाद्स! :-)
@माझा हातखंडा असलेला अध्यात्म हा विषय डार्विनच्या उत्क्रांतीवादाच्या प्रकाशात उलगडूनदाखवावा की मानसशास्त्राचं बोट धरुन मनोविकारांबद्दल सहज सोप्या भाषेत लिहावं >>>आणी याच्याही प्रतिक्षेत :-)
16 Feb 2013 - 4:49 pm | मन१
सउरुवात तर चांगलिये.
पण जालावर बहुशः आयतीवाले अध्कांशाने वावरत असल्याने आधीच त्यांचं ओव्हर रिप्रेझेंटेशन झालय.
ह्यापेक्षा मानसशास्त्रातील उलगडलेल्या लिहिल्या असत्यात तर अधिक आवडलं असतं.
16 Feb 2013 - 4:56 pm | धन्या
डू यू हॅव डेटा? सेंड मी पीपीटी ईओडी टुडे.
16 Feb 2013 - 5:20 pm | मोदक
वेल...
मि. धनाजीराव, आय थिंक देअर इस बेंचमार्कींग इश्यू विथ मनोबा.
ओव्हररिप्रेझेंटेशन ऑन व्हॉट स्केल..?
16 Feb 2013 - 5:21 pm | सोत्रि
ज ह ब र्या!
- ('ईओडी टुडे'च्या जिवावर जगणारा) सोकाजी
16 Feb 2013 - 5:27 pm | अभ्या..
असं सुरुवातीलाच आयटीभाषेत नाय बाबा बोलायचं. ;)
एकतर आत्ता कुठे धनाजी रावांनी समजावून द्यायला सुरुवात केलीय.
16 Feb 2013 - 9:59 pm | जेनी...
=))
पिपिटी इझ नॉट रेड्डी येट .:P
dhanyaakaakaa paTTAapaTtAa liwa ..
mee waachatey he lakshaat THiwaa =))
16 Feb 2013 - 5:56 pm | आदूबाळ
ईओडी बरोबर सीओडब्ल्यू असा पण प्रकार असायचा कचेरीत. क्लोजर ऑफ वर्क. सीओडब्ल्यू म्हणजे संध्याकाळी सहापर्यंत पाठवा आणि ईओडी म्हणजे उशीरापर्यंत कचेरीत राबून रातोरात पाठवा.
16 Feb 2013 - 6:52 pm | किसन शिंदे
=))
आता आता ह्या ईओडीबरोबर ते एएस्एपी पण लै डोकं खातंय.
16 Feb 2013 - 7:15 pm | आदूबाळ
"एएस्एपी"चा कुणी "असॅप" असा उच्चार केला की माझ्या डोळ्यांत खून चढतो...
16 Feb 2013 - 6:56 pm | शुचि
आमच्याकडे सी ओबी = क्लोजर ऑफ बिझनेस म्हणायचे.
16 Feb 2013 - 4:55 pm | किसन शिंदे
मस्तच रे धन्या.
सकाळी ११ ला हापिसात पोहचल्यानंतर दुपारी १२ वाजता मिटिंग रुमच्या एका कोपर्यात दोन चेअर्सवर तंगड्या पसरून झोप कशी घ्यायची असते हे ही टाक या अनुभवांमध्ये, अर्थात असा अनुभव तुला असेल तर. ;)
16 Feb 2013 - 5:02 pm | ५० फक्त
चला आयटीत गेलो नाही तेच कसं बरं झालं, हे बायकोला समजावुन सांगायला काहीतरी मिळेल यातुन अशी अपेक्षा.
16 Feb 2013 - 5:07 pm | परिकथेतील राजकुमार
अपेक्षाभंग झाला.
दोन पेग झाल्यावरती अनेक मित्रांच्या तोंडून हे ऐकतच असतो. ;)
धनाजीराव काहीतरी 'आतल्या गोटातले' येऊ द्या बॉ.
16 Feb 2013 - 5:11 pm | धन्या
मालक जरा दमानं घ्या. ज्या गोष्टी बाहेर माहिती आहेत त्या लिहिण्याचा उद्देश नाहीच. ही फक्त "इंट्रो" आहे. :)
16 Feb 2013 - 5:13 pm | परिकथेतील राजकुमार
वाट बघींग...
16 Feb 2013 - 5:26 pm | ५० फक्त
धाग्याच्या लेखकांनी जर वाचकाला पहिल्या भागापासुन आयटीच्या आतल्या जगाची ओळख करुन दिली तर एकदम समोर आलेल्या त्या अनोख्या सत्याने तो असा भांबावला असता. वेगळ्या परिस्थीतीत वाढवल्याचा वेगळा परिणाम म्हणजे नॉन आयटि पब्लिक.
16 Feb 2013 - 5:29 pm | अभ्या..
_________/\_________
गाववाले दंडवत तुम्हाला
16 Feb 2013 - 5:17 pm | अभ्या..
५० दादा आणि पराशी सहमत. जरा काहीतरी डार्क साईड वगैरे पण सांगा धनाजीराव.
च्यायला ते आयटी वाल्याचे बघून इथली पोरं पण एसी आन नेट मागतेत पीसीवर. नेट घेऊन काय करणार तर दिवसभर लाईक्स वाटत बसणार. काम गेले बोंबलत.
16 Feb 2013 - 5:10 pm | बॅटमॅन
वा, मस्त लिहिलेय!!! आमचे करिअर छोटे असले तरी मित्रांकडून यातल्या गोष्टी ऐकल्या आहेत. पुढील भागांच्या आतुरतेने प्रतीक्षेत.
16 Feb 2013 - 5:15 pm | सस्नेह
आणखी हायटी किस्से येउद्या..
16 Feb 2013 - 5:22 pm | प्यारे१
बघिंग्ड द वाट!
- आयटीगावकुसाबाहेरचा प्यारे
16 Feb 2013 - 5:34 pm | दादा कोंडके
मलाही खुप दिवसांपासून (वर्षांपासून!) उत्सुकता आहे. च्यामारी आयटीमध्ये लोकं करतात काय? गळ्यात बॅज अडकवून, स्मार्टफोनवर खेळत बसची वाट बघत असलेले लोक चकचकीत निळ्या काचेच्या बिल्डींगात जाउन नेमकं करतात काय?
पण नक्की कशाबद्द्ल लेख असणार आहे ते अजून कळलं नाही. थोडा विस्कळीत वाटला. "बट आय विल स्टे ट्युन्ड!"
16 Feb 2013 - 5:36 pm | पैसा
आणखी येऊ द्या. डार्विनवादी आध्यात्म, सोपे मानसशास्त्र आणि सोपे आयटी अशा सर्व लेखामालांची वाट पहात आहे.
16 Feb 2013 - 6:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धनाजीराव लेखन काळजीपूर्वक वाचतोय.
>>> आयटी म्हटलं की सगळ्यात आधी दोनच गोष्टी नजरेसमोर येतात, एक म्हणजे बक्कळ पैसा आणि दुसरं म्हणजे एसीत बसून काम करणं.
पुढील लेखन वाचून माझं मत बदलेल असं वाटतं. :)
>>> बरेच दिवसांपासून मनात होतं की उगाचच प्रतिसादाच्या पिंका टाकण्यापेक्षा काहीतरी चांगलं लिहिण्याचा प्रयत्न करावा.
मस्त निर्णय. आवडत्या विषयावर भरपूर येऊ दे.
कंपनी, बॉस, कायम स्वरुपाची नोकरी, नोकरीतील धोके, बक्कळ बँक बॅलेन्स, टीम लिडर, बग्स, बॉस, सॅलरी, सॅलरी वाढत जाईल-थापा, इंक्रिमेंट, मनस्ताप, चहाड्या, थकवा. निराशा, कुटुंब, मानसिकता असे विषय पुढे येतीलच.
-दिलीप बिरुटे
17 Feb 2013 - 12:47 am | धन्या
अगदी याच वाटेने आपण जाणार आहोत. :)
18 Feb 2013 - 10:14 am | आनंद घारे
मध्यरात्र उलटून गेल्यानंतर ऑफिसातून घराकडे जाण्याचा विचार करणे.
हे भारतात राहून युरोप अमेरिकेतील क्लायंट्सना सेवा पुरवणार्या कंपन्यांमध्ये काम करणार्यांना लागू होते.
अलीकडे घरी बसून लॅपटॉपवर काम करण्याची सोय ज्यांना मिळाली आहे त्यांना कदाचित मध्यरात्रीपूर्वी परतणे शक्य होत असले तरी ते फक्त शरीराने घरी असतात.
16 Feb 2013 - 7:36 pm | राजेश घासकडवी
पहिला भाग नुसताच, 'लिहिणार आहे, स्टे ट्यून्ड' असं लिहून, आम्हा नॉन आयटी लोकांना आयटी जगाचं विश्वरूपदर्शन घडेल अशा अपेक्षा वाढवलेल्या आहेत. तेव्हा स्टेइंग ट्यून्ड
हे वाचायला निश्चितच आवडेल.
16 Feb 2013 - 7:51 pm | कपिलमुनी
चित्रपटामधील लिक्वीडचे डायलॉग ऐका ...आय टी चे भारी चित्रण आहे
17 Feb 2013 - 12:51 am | धन्या
ज्या कुणाला आयटीमधील पोरापोरींची ईंटर्नल म्हणजे हापिसातील प्रेमप्रकरणं कशी असतात हे माहिती करुन घ्यायचे असेल त्याने प्यार का पंचनामा सिनेमामधील लिक्वीडची प्रेमकहाणी समोर आणावी.
रीयलमध्येही तसंच्या तसंच घडत असतं. :)
17 Feb 2013 - 7:46 pm | टवाळ कार्टा
सहमत आहे :(
16 Feb 2013 - 8:07 pm | संजय क्षीरसागर
विषय मस्त निवडलाय. आता सविस्तर भाग टाका.
16 Feb 2013 - 8:21 pm | तिमा
आय या अक्षरापासून सुरु होणार्या अनेक शब्दांची मला भीति वाटते.
उदा.- आयटी, आयक्यू,आयआयटी,आयझेड आणि तत्सम. पण नवे काही कळणार असेल तर वाचायची उत्सुकता आहे.
16 Feb 2013 - 9:11 pm | माझीही शॅम्पेन
............... आरेरे आय टी मध्ये लोक काय करतात ही यक्ष प्रश्न सगळ्याना पडलेला असतो , त्यावर जास्तीत जास्त प्रकाश टाकून उघड सर्वाना पाडण्याचे पालथे धंदे ताबडोतोब बंद करा , कृ. प्र. ह. घ्या :)
(अपरैझल च्या कर्व वर घरणगाळणारी माझीही शॅम्पेन)
16 Feb 2013 - 9:49 pm | श्रीरंग_जोशी
याच व्यवसायातून माझ्या दोन वेळच्या भाकरीची सोय होत असल्याने जीवाभावाचा विषय. आगामी लेखांमध्ये प्रतिसादांद्वारे भर घालण्याचा प्रयत्न करीन...
अन या विषयासाठी मराठी आंतरजालावर घासून घासून गुळगुळीत झालेल्या अध्यात्माच्या विषयाला बाजूला ठेवल्याबद्दल तर विशेष धन्यवाद!!
16 Feb 2013 - 9:54 pm | मराठे
>> स्टे टयुन्ड
या शब्दांचा अर्थ नीट समजून घ्यायचा असेल तर अशीही बनवाबनवी मधला धनंजय मानेचा हा प्रसंग आठवा:
घरमालक: 'अहो पण ते औषधाचं लक्षात ठेवा हं'
धनंजय माने: 'नक्की आणतो तो औषध. "वाट बघा"'
17 Feb 2013 - 12:53 am | धन्या
आयटीमध्येही स्टे टयुन्डचा अर्थ हाच आहे. धनंजय मानेंना अभिप्रेत असलेला. :)
16 Feb 2013 - 9:57 pm | मराठे
बाकी नमनाला घडाभर तेल असं जरी वाटत असलं तरी ती सुद्धा आयटीची खासियतच.. 'आयडी-अँड-असेस' नावाचा एक महत्वाचा प्रकार सोफ्टवेअर डेवलपमेंट मधे असतोच.. म्हणजे जे आपण बनवायला घ्यायचं म्हणतोय त्याची खरच गरज आहे का आणि त्याने किती फायदा होईल किंवा बचत होईल वगैरेची चाचपणी करणे.
16 Feb 2013 - 10:29 pm | तुमचा अभिषेक
3 signs that the person is working in IT .....
1. Stressed
2. Depressed
3. Still Well Dressed .. ;
या लेखमालिकेनंतर हा नुसता विनोद होता की काळा विनोद हे उलगडेल अशी अपेक्षा.
16 Feb 2013 - 11:43 pm | अग्निकोल्हा
अध्यात्म समृध्द अडगळ तर आयटी फारच कॉमन टॉपिक आहे, की यावर विवीध ठिकाणी ऑलरेडी जंक/टाइअमपास्/खट्याळ मटेरिअल इतकं बदाबदा उपलब्ध आहे की यात खरच काही नाविन्य नाहीये. अर्थात तुम्हि साक्षात भाषानारायण असल्याने केवळ "तुमचे शब्द" हेच काय ते लेखनाला भव्य उंची मात्र नक्कि देणार यात तिळमात्र शंका नाही म्हणूनच आतुरतेने वाट बघतोय पुढच्या भागाची. लेखनाला शुभेच्छा.
17 Feb 2013 - 12:38 am | Mrunalini
छान झालाय लेख... पुढचा भाग हि लवकर टाका.
17 Feb 2013 - 1:13 am | प्रसाद गोडबोले
:)
17 Feb 2013 - 1:48 am | उपास
उत्सुक..
17 Feb 2013 - 3:58 am | चौकटराजा
म्या बी येकेकाळी आयटी वाला हमाल होतो. बारीक बारीक कोबॉल चे प्रोगाम यायचे मला. पण मला देखील हा प्रश्न पडला होता की एवढे पंचवीस पंचवीस हजार जण करतात काय तिथे? आज देखील मला भिती वाटते ही हा आय टी चा फुगा फटकन फुटला तर एवढी बॅंकानी वीस वीस वर्षाची लोन दिल्येत त्या बॅकेत आपले म्हातारपणाचा आधार असलेली ठेव हा फुटलेला फुगा बुडवील काय ?
धना साहेब, ष्टेइंग ट्युन्ड !
17 Feb 2013 - 4:24 am | शुचि
नाही फुटणार हो फुगा. सर्वत्र काँप्युटर अॅप्लीकेशन्स वापरली जातात. त्यांच्या मेंटेनन्स, एन्हॅन्स्मेंटकरता हमाल लागणारच.
17 Feb 2013 - 10:02 am | सुहास..
हे सगळे विन्टेल/ एस्सॅप वाले असाच डेटा चढवत बसतात आणि ताप आम्हा स्टोरेज वाल्यांना ;)
धन्या, लेका तेव्हढे येक्ष्चेंज च्या विन्डोज ची डिस्क आयडीई ची करून घे, स्साल परफॉरमन्स नाही म्हणून आमच्या नावाने बोंबलत बसता ;)
17 Feb 2013 - 5:43 pm | बाळकराम
नॉन आयटीवाल्यांना आयटीवाल्यांबद्दल आणि एकंदरीत आयटी क्षेत्राबद्दल खुपच कुतुहल असते.
ज्योक ऑफ द डे!
तो जमाना १५ वर्षापूर्वीच संपला, आता आयटीतली लोक काय हमाल आहेत, ते सगळ्याना कळून चुकलंय.
आपण भारतीय स्वतःला आयटीतील बाप समजतो.
तुम्ही पुढे याचं स्पष्टीकरण दिलं आहेच, आणि या प्रांजळपणाबद्दल तुमचे नक्कीच कौतुक आहे. पण वस्तुस्थिती तेव्ह्ढयापुरतीच मर्यादित नाही. मुळात भारतीय "आयटी" ही नुसती आयटी "सर्विसेस प्रोवायडर" आहे. खर्या व्यवस्थापनशास्त्रात ("स्टे ट्युन्ड"- वगैरे खुळचट प्रकार नव्हे) जी व्हॅल्यू चेन सांगतात त्यानुसार आयटी सर्विसेस ची व्हॅल्यू चेनच्या एका एन्ड ला ओरॅकल, एसएपी इ कंपन्या येतील दुसर्या एन्ड ला इन्फी, विप्रो इ भारतीय कंपन्या येतील- थोडक्यात ज्या फक्त लेबर काँट्रॅक्टर आहेत असं म्हणता येइल अशा. भारतातल्या आयटी क्षेत्राचा (भारतात) कितीही गवगवा झालेला असला तरी दुर्दैवाने ही वस्तुस्थिती आहे की २०-२५ वर्षापूर्वी भारतीय कंपन्या "बॉडी शॉपींग" करायच्या आणि आजही सामान्यपणे त्या तेच करत आहेत. या २०-२५ वर्षात रोजगाराच्या वाढलेल्या अमाप संधी, एक ब्रँड म्हणून भारतात वाढलेले महत्त्व या जमेच्या आणि उल्लेखनीय बाजू असल्या तरी एक इंडस्ट्री म्हणून त्यात गुणात्मक वृद्धी फारशी झाली नाही हे ही तितकंच खरं आहे. माझ्यापुरतं बोलायचं झालं तर- भारत आयटी तला "बाप" तेव्हाच होइल- जेव्हा:
- बाजारात एक तरी भारतीय ऑपरेटिंग सिस्टिम असेल- विंडोज वा ओएस एक्स सारखी.
- ओरॅकल, एसेपी इ सारखे एक तरी भारतीय प्रॉडक्ट बाजारात असेल ज्याच्यावर जगभरातले संगणकतज्ज्ञ काम करताहेत
- अँड्रॉईड, ओएस ५ सारखे एक तरी मोबाईल ओएस वा इंटरनेट ब्राऊसर भारतीय कंपन्यानी बनवलेला आहे
- सॅमसंग, अॅपल एवढा तर जाऊ द्याच, जागतिक मोबाईल फोन मार्केटमधे किमान ५% हिस्सा असणारी भारतीय कंपनी असेल - तेच भारतीय बनावटीच्या संगणकाबद्दल
चायनाने अमेरिकन/युरोपियन संगणकांचे सुटे भाग बनविण्यापासून सुरुवात करुन ते आज लेनोव्हो विकत घेऊन जागतिक संगणक मार्केटमधला एक महत्त्वपूर्ण हिस्सा बनण्यापर्यंत प्रगती केली. अशी अनेक उदाहरणे चायनाने अलाँग द व्हॅल्यू चेन केल्याची दिसतील. भारतातही, नॉन आय टी क्षेत्रात ही उदाहरणे दिसतील ( टाटा मोटर्स, भारत फोर्ज, सझलन, बजाज इ. अनेक). २५ वर्षापूर्वी जो भारत ओबड्धोबड अँबेसिडर्/पद्मिनी गाड्या बनवायचा तो आज जॅग्वार्/लँड रोव्हर सारख्या आलिशान गाड्यांपासून ते नॅनो पर्यंतच्या गाड्या बनवतो. अशी नेत्रदीपक प्रगती (गुणवत्तेच्या दृष्टीने) भारतीय आय टी ने केलीय असं मला तरी वाटत नाही. (किंबहुना, हे संकेतस्थळ ज्याच्यावर चालतेय ते ड्रुपल (? चूभूद्याघ्या) सुद्धा भारतीय नाहिये)
17 Feb 2013 - 6:44 pm | दादा कोंडके
एकंदर प्रतिसाद आवडला. आयटीबद्द्ल माहिती कळली. पण,
आयटी पेक्षा ऑटोमोबील कंपन्यांनी चांगली प्रगती केली याच्याशी सहमत पण जेव्हडं प्रोजेक्ट केलं जातं तेव्हडं खरं नाही हे म्हणू इच्छितो. आपल्याकडे गाड्या बनवतात त्यापेक्षा अॅसेंबल होतात असं म्हणावं लागेल.
उदा. टाटा नॅनो ची पार्ट लीस्ट आणि सप्लायर्स बघितले तर ९०% पेक्षा जास्त परकीय आहेत. त्यातही ईसीयु, इंस्ट्रूमेंट क्लस्टर्स, ब्रेक सिस्टीम, इंटेरीअर्स हे सगळे महत्वाचे घटक आयात केलेली आहेत. आणि बेअरींग, व्हील बॅक प्लेट वगैरे किरकोळ घटक स्वदेशी आहेत. हेच बाकीच्या हायएंड वहिकल्सबाबत पण खरं आहे. :(
18 Feb 2013 - 9:45 am | खटासि खट
हे जग आयटीयन्स आणि नॉनआयटीयन्स यांच्यात विभागले गेले आहे.
19 Feb 2013 - 3:37 am | बाळकराम
हा दुसरा ज्योक ऑफ द डे! चालू द्या!
19 Feb 2013 - 11:02 am | संजय क्षीरसागर
प्रतिसाद अत्यंत समर्पक आणि मौलिक!
17 Feb 2013 - 5:51 pm | अमोल खरे
यु गाईज नीड तो फोकस ऑन डिलिव्हरेबल्स इन्स्टेड ऑफ वेस्टिंग युअर एनर्जी ऑन मिपा. वि एक्स्पेक्ट अ लॉट फ्रॉम यु, इफ यु डु नॉट शो पॉझिटिव्ह रिझल्ट्स क्विक्ली, वी मे नीड टु पुट यु अन्डर अवर ऑब्सर्व्हेशन. इट मे ऑल्सो अफेक्ट युअर इयर एन्ड अॅप्रेझल. आय होप आय अॅम व्हेरी क्लिअर अबाऊट इट मिस्टर धन्या. =))
17 Feb 2013 - 11:33 pm | धन्या
आयटी स्पेशल सुचना वजा धमकी इथे शेअर करण्यासाठी धन्यवाद. :)
18 Feb 2013 - 2:33 am | पाषाणभेद
येस आय डू अग्री विथ मि.अमोल. इन्क्लूडींग धनाजी, ऑल अॅट मिपा आर नॉट गिव्हींग देअर १००%. आय अल्सो नो दॅट अदर प्रोजेक्ट्स आर डिलीव्हरींग मोर दॅन अस. देन व्हाय नॉट वी? यू पीपल शुड लर्न फ्रॉम देम.
17 Feb 2013 - 8:53 pm | मयुरपिंपळे
ज्याना कामाची आवड नसते ते पाट्या टाकण्याच काम करतात... ;) पंरन्तु आय टी मधे काम करण्याची मज्जा वेगळी आहे.
आमच्या सरामुळे आयटी मधे काम कस कराचय ह्याचे धडे घेतले आहेत.
17 Feb 2013 - 11:40 pm | धन्या
तुमच्या या तीनही वाक्यांचं अधिक विस्तृत स्पष्टीकरण लिहू शकाल का? काही अपवाद सोडले तर अल्मोस्ट प्रत्येक आयटीवाला तुमची ही वाक्ये खोडून काढील.
यावर जरा अधिक लिहा राव. कदाचित काहीतरी नविन हाती लागेल. :)
18 Feb 2013 - 12:59 pm | ५० फक्त
आमच्या सरामुळे आयटी मधे काम कस कराचय ह्याचे धडे घेतले आहेत. - खरंच सांगाच, कारण काय फार पुर्वीपासुन इथं सरांमुळं अडचण दुर होते असा एक प्रवाद आहे, खरं खोटं सर आणि देव किंवा देवसर जाणे.
18 Feb 2013 - 1:53 pm | स्पा
विनय सर काय?
18 Feb 2013 - 2:33 pm | ५० फक्त
विनयशील असावेत बहुदा. बाकी त्या सरांचे विद्यार्थी चेपुवर तुमचं स्टेटस शेर करताना आढळले म्हणे.
18 Feb 2013 - 2:48 pm | स्पा
काय सांगता काय?>
विनय सरांनी हे असले संस्कार केले?
18 Feb 2013 - 8:48 pm | धन्या
पण काम ऐटीत कसे करावे याचं प्रशिक्षण मात्र छान दयायचे सर.
19 Feb 2013 - 8:17 am | ५० फक्त
होय होय्,पार सिडनी मध्ये सुद्धा क्लास काहाड्ले होते सरांनी.
20 Feb 2013 - 3:25 am | विश्वनाथ मेहेंदळे
धन्या भाव, प्रत्येक क्षेत्रात दोन प्रकारची माणसे असतात. काम खरोखर एन्जॉय करणारी आणि आला दिवस ढकलणारी. शिवाय कुठलेही काम १००% enjoyment नसते. कधी interesting तर कधी mundane काम असणे हे साहजिकच आहे. आयटी क्षेत्रात पण अर्थात तसेच असणार.
पण आयटी वाल्यांना प्रत्येक गोष्टीत पराचा कावळा करायची सवय असते. तसेच इथेही झाले आहे.
पाहिजे तर अजून विस्तृत लिहितो.
18 Feb 2013 - 2:50 am | शुचि
आय टी मध्ये डाऊन टाइमला पाट्या सगळेच टाकतात : )
(कामाची अत्यंत आवड असलेली व पाट्या सुद्धा टाकणारी) शुचि
17 Feb 2013 - 9:26 pm | प्रचेतस
धन्या, सुरुवात झकास रे.
नमनालाच घडाभर तेल ओतलं नाहीस ते बरं केलंस.
आता तपशीलवार एकेके गोष्ट येऊ देत.
18 Feb 2013 - 5:11 am | रेवती
वाचतीये.
18 Feb 2013 - 9:00 am | नाखु
"ऐटीत" झालाय... तांत्रिक बाबी माहीत नाहीत पण कामाची पद्ध्त कशी असते हे समजून घ्यायला आवडेल्..पू.भा.प्र.
18 Feb 2013 - 11:40 am | चावटमेला
लेखाची सुरूवात आवडली. काही शब्दांचे/वाक्प्रचारांचे खरे अर्थ खाली देत आहे
FYI - माझ्या काही कामाचं दिसत नाहीये, तुझ्या असेल तर पाहा नाही तर जाऊदे खड्ड्यात
Let's discuss it later - चल फूट, डोकं नको खाऊस
Please let me know in case of any issues - असले तरी काय उखडणार आहात?
Action Points - अश्या गोष्टी ज्या कुणालाच करायच्या नसतात
Out of Office Auto reply - मी आज सुट्टीवर आहे आता बसा बोंबलत
appraisal - जे झाल्यावर ह्या पृथ्वीतलावरचं कुणीच खुश नसतं
HR - सर्वांत जास्त अकार्यक्षम डिपार्टमेंट (कुणी मिपाकर असतील तर ह.घ्या. ;)), जे कायम तुमची हेल्थकेअर पॉलिसी रिन्यु करायची मेल टाकते..
चला, आता येवढेच, बाकी सवडीने, आय हॅव अ कॉल टू अटेंड :)
18 Feb 2013 - 1:32 pm | चिरोटा
1)looping xyz(मला कळते कोणाला कुठली माहिती हवी आहे ते)
2)Are we on same page?(तू चुकतो आहेस किंवा मी तरी चुकतोय).
३)Its not a rocket science.(Software म्हणजे फक्त Input,output,database असा विचार करणारे काही MBA मॅनेजर्स)
18 Feb 2013 - 2:51 pm | कपिलमुनी
मला असे सतत ऐकायला लागयचे !! एका दिवशी वैतागून म्हणालो..
"रॉकेट सायन्स" सोपा असतय... *** ला आग लागली कि उडून जाता !!
आणि एवढा सोपा असेल तर करा कि स्वतः !!
बादवे ...मॅनेजर मराठी होता , त्या मुळे शुद्ध॑ मराठी मध्ये सांगितल
18 Feb 2013 - 8:40 pm | धन्या
त्यापुढचं अप्रेझल कसं झालं? ;)
19 Feb 2013 - 8:18 am | ५० फक्त
थांबताहेत कशाला अॅप्रेझल पर्यंत, हातात दुसरं ऑफर लेटर असेल म्हणुन तर एवडी डेरिंग केली ना बाप्पा..
19 Feb 2013 - 7:59 pm | धन्या
ईन फॅक्ट आयटीवाला जेव्हा सध्याची नोकरी सोडायची असं ठरवतो तेव्हा त्याच्या हातात दुसर्या कंपनीची ऑफर असते. सध्याच्या कंपनीत राजीनामा दिल्यानंतर आठवडाभरात त्याच्याकडे अजून एक ऑफर आलेली असते. ही दुसरी ऑफर पहिल्या ऑफरपेक्षा जास्त पगाराची असते. कारण या दुसर्या ऑफरवाल्या कंपनीत मुलाखत देताना त्याने स्पष्ट म्हटलेलं असतं की मी माझ्या सध्याच्या कंपनीत राजीनामा दिला आहे. माझ्याकडे अमुक अमुक कंपनीची ऑफर आहे, ते मला वर्षाला ईतके ईतके लाख देत आहेत. तुम्ही दोन लाख जास्त देत असाल तर्च तुमच्याकडे येईन.
बरं एव्हढयावर थांबेल तो आयटीवाला कसला. आता पठठयाकडे दोन ऑफर असतात. दुसर्या ऑफरमधील वार्षिक पगार पहिल्या ऑफरपेक्षा दोन लाखांनी जास्त असतो. खरी गंमत पुढे आहे. सध्याच्या कंपनीचा नोटीस पीरीयड तीन महिन्यांचा असतो. आपला हा आयटीवाला भिडू हे तीन महिने अजून ईतर कंपन्यांमध्ये मुलाखती देत राहतो. जर कुठल्या कंपनीत निवड झाली (ती होतेच) तर हा पठठया दुसरी ऑफर पुढे करतो आणि आपली कॅसेट रीवाईंड करतो, "माझ्याकडे अमुक अमुक कंपनीची ऑफर आहे, ते मला वर्षाला ईतके ईतके लाख देत आहेत. तुम्ही दोन लाख जास्त देत असाल तर्च तुमच्याकडे येईन." ती कंपनी तेव्हढा वार्षिक पगार देतेही. न देऊन सांगते कुणाला.
22 Feb 2013 - 4:53 pm | कपिलमुनी
दोन ऑफर असून निर्लज्ज पणे ३ री शोधतो आहे...
12 Mar 2014 - 8:09 pm | राजेंद्र मेहेंदळे
looping xyz--चल हट माझे डोके नको खाउ,त्याला विचार
Are we on same page?शिरतय का तुझ्या मट्ठ डोक्यात?
Its not a rocket science- काय फालतु लोक्स येतात आजकाल इथे साधे कामही जमेना
18 Feb 2013 - 12:24 pm | प्रसाद१९७१
फार वरवरचे होतय. जास्त आत जावुन लिहायला पाहिजे. आणि स्वताच्या काँमेन्ट्स पाहिजेत च
18 Feb 2013 - 1:00 pm | ५० फक्त
हो मिळतील त्यापण मिळतील, जेंव्हा श्री. धन्या हे आयटि सोडुन पुर्णवेळ सखुपुराण लिहायला घेतील तेंव्हा.
19 Feb 2013 - 8:04 pm | धन्या
मी आयटीमधला हमाल आहे. आयटीतल्या एखादयाच मुकादमाला आपला आयटीचा धंदा सोडून पुर्णवेळ लेखन करता येणं जमेल. तो तितक्या ताकदीचा असू शकतो. माझ्यासारख्या एका मामूली हमालाला ते शक्य होईल असं वाटत नाही.
18 Feb 2013 - 8:45 pm | धन्या
हा लेख खुपच वरवरचा झाला आहे हे मान्य आहे. हा लेख फक्त श्रीगणेशा होता त्यामुळे फार खोलात गेलो नाही. यापुढचे लेख जास्तीत जास्त माहितीपुर्ण लिहिण्याचा प्रयत्न करेन.
>> आणि स्वताच्या काँमेन्ट्स पाहिजेत च
दिवसभरात स्वतः प्रतिसाद देणं मला तांत्रिक कारणामुळे शक्य नाही. जमेल तसे प्रतिसाद नक्की देत जाईन. :)
18 Feb 2013 - 1:01 pm | चेतन माने
वाचतोय :) आतल्या (आय.टी. च्या) गोष्टी वाचायला आवडतील
(आय.टी. त प्रवेश करतानाच धडपडलेला )
18 Feb 2013 - 1:11 pm | श्रिया
सुरवात चांगली आहे, तपशिलवार लेख अजून रोचक वाटेल.
19 Feb 2013 - 11:12 am | विलासराव
लेख म्हनुन हजेरी लावली.
बाकी या विषयात आवड शुन्य.
19 Feb 2013 - 7:44 pm | दादा कोंडके
कंपुगिरी-कंपुगिरी म्हणतात ती हीच का?
19 Feb 2013 - 8:07 pm | धन्या
प्रत्यक्ष ओळखत असल्यामुळे त्यांनी कौतुकाचे चार शब्द लिहिले एव्हढंच. मिपावरचा देवमाणूस आहे तो.
19 Feb 2013 - 7:02 pm | मी-सौरभ
वाचून उपेग होईल्से वाटते...
We look forward to further update from you.
(आयटीत असूनही आयटीत नसलेला) सौरभ
11 Mar 2014 - 11:50 pm | दिव्यश्री
सुरवात आवडली आहे.
एक म्हणजे बक्कळ पैसा आणि दुसरं म्हणजे एसीत बसून काम करणं. >>> बाहेरच्या लोकांना हेच दिसतं... मलाही असचं वाटत होत . आता ते फक्त तसं नाही हे पुरेपूर समजल आहे . प्यांटवालं मान-पाठ एक होई पर्यंत काम करतात हे माहिती आहे. इथेही राजकारण चालत आणि बर्याच पलीकडच्या गोष्टी कळल्या आहेत.
तुम्ही लिहित रहा... :)
12 Mar 2014 - 12:03 am | आशु जोग
मुलींना आयटी वालाच हमाल का हवा असतो
असा एक परेशान पडला
12 Mar 2014 - 1:01 am | दिव्यश्री
हा प्रश्न नक्की कोणाला आहे ?
12 Mar 2014 - 1:52 pm | अत्रन्गि पाउस
आयटी मध्ये डोमेन एक्स्पर्ट हा एक अनाकलनीय/काल्पनिक प्रकार आहे ...
उदा काही वर्षे बँकिंग कस्टमर साठी प्रोग्रम्मिंग केल्यावर तो 'बँकिंग' आयटी एक्स्पर्ट समजला जावा अशी अपेक्षा असते...इतरांपेक्षा चार बँकिंग संकल्पना माहित असाव्यात हि अपेक्षा ठीक आहे पण एकदम एक्स्परर्त ?
हे म्हणजे कंपाऊंडर ला डॉक्टर सारखे ज्ञान असावे हे अपेक्षा करण्यासारखे आहे
असो..
'आयटी मधील मिथ्या समज ' हा एक अतिशय मोSSSSSSSठ्ठा विषय आहे