माझी बायको..

स्मिता चौगुले's picture
स्मिता चौगुले in जे न देखे रवी...
15 Feb 2013 - 3:53 pm

ग्रुपमध्ये एकदा अशीच चर्चा सुरु होती मुलींच्या मुलांकडून किती अपेक्षा असतात वैगेरे वैगेरे .. मग काय कुरघोडी सुरु, झाली मुलीपण मागे हटेनात...लग्न झालेल्या, लग्नाच्या तयारीत असणाऱ्या सगळ्या एकमताने आप-आपले अनुभव, ऐकीव माहिती शेअर करत होत्या की प्रत्येक मुलीच्या जशा आपल्या होणाऱ्या नवऱ्याकडून अपेक्षा असतात तशा मुलांच्याही आपल्या होणाऱ्या बायको बद्दल भरपूर अपेक्षा असतात, ती अशी हवी तशी हवी .. त्यावेळेस हि कविता सूचली, म्हटलं चला नेहमीच्या विषयापेक्षा हटके विषय मिळाला (एक मुलगी म्हणून मुलींच्या अपेक्षा कवितेतून मांडेल असं ग्राह्य धरतात लोक.. म्हणून म्हंटल हटके)

माझी बायको..

प्रत्येक मुलाच एक स्वप्न असत
माझी बायको हि वेगळी असावी
सर्व रंग - गुणांचं मिश्रण
अशी ती इंद्रधनूची छटा असावी

आकाशातील नक्षत्राची चांदणी वाटावी
सोज्वळ-सोबर तिची प्रतिमा असावी
सगळ्यात उठून दिसणारी स्वप्नं मुग्धा
अशी ती मोहिनी असावी

सगुणांच प्रतिक जशी
प्रेम– वास्तल्याची मूर्ती वाटावी
माझ्या ओंजळीत सुख सांडणारी  
अशी ती संपदा असावी

शांत, गंभीर ,पोक्त अशी
संस्कारांचा पुतळा असावी
कधी बालिश,पोरकट भासणारी  
अशी ती चंचला असावी

चतुर, अभिमानी,काटकसरी अशी
व्यवहार कुशल ती गृहिणी असावी
प्रसन्न, हसतमुख, गरीब गाय
अशी ती कल्याणी असावी  

सुखदु:खात साथ देणारी
संकटात आशेचा किरण  वाटणारी
निराशेच्या प्रत्येक वाटेवर सोबत करणारी
अशी ती प्रेरणा असावी

क्लेशाला दूर सारणारी
वेदनेवर फुंकर घालणारी
माझ्या चुका पदरात घेणारी
अशी ती हर्षदा असावी

या सगळ्या गुणांचं मिश्रण
अशी ती इंद्रधनूची छटा असावी
कारण ..... प्रत्येकालाच वाटत
माझी बायको हि सगळ्यात  वेगळी असावी  ... :)

....स्मिता चौगुले

मिपाकरांनी या विषयीचे आपले अनुभव जरूर मांडावेत..:)

कविता

प्रतिक्रिया

जेनी...'s picture

15 Feb 2013 - 3:57 pm | जेनी...

अय्या .... :)
म्हणजे अगदि माझ्यासारखीचकी गं :)

:P :D

स्मिता चौगुले's picture

15 Feb 2013 - 4:00 pm | स्मिता चौगुले

स्वयंघोषित ... अरे वा ...:)

जेनी...'s picture

15 Feb 2013 - 4:02 pm | जेनी...

अय्या ...
ते आणि काय असतं गं ?? :(

कवितानागेश's picture

15 Feb 2013 - 4:06 pm | कवितानागेश

शुद्ध मराठी शब्द असतो तो. जाउ दे. सोडून दे. :P
काळजी करु नकोस. तुझे कौतुकच करतायत त्या. ;)

बॅटमॅन's picture

15 Feb 2013 - 4:09 pm | बॅटमॅन

=)) =))

संजय क्षीरसागर's picture

15 Feb 2013 - 4:13 pm | संजय क्षीरसागर

स्व्यंगोशित

जेनी...'s picture

15 Feb 2013 - 4:14 pm | जेनी...

:-/

प्रसाद गोडबोले's picture

15 Feb 2013 - 4:19 pm | प्रसाद गोडबोले

मला पण एक जाऊ हवी आहे ...

जेनी...'s picture

15 Feb 2013 - 4:26 pm | जेनी...

जाऊ ??

अय्या :) ... पण माझं ठरलय गं :(

संजय क्षीरसागर's picture

15 Feb 2013 - 4:07 pm | संजय क्षीरसागर

कधी बालिश,पोरकट भासणारी
अशी ती चंचला असावी

स्मिता चौगुले's picture

15 Feb 2013 - 4:19 pm | स्मिता चौगुले

अग स्वयंघोषित --- स्वत:च ठरवणे... :)

संजय क्षीरसागर's picture

15 Feb 2013 - 4:26 pm | संजय क्षीरसागर

ती मिपाघोषित :

संस्कारांचा पुतळा असावी
कधी बालिश,पोरकट भासणारी
अशी ती चंचला असावी

आहे.... बाकीचं फोटोत पाहा .

शिद's picture

15 Feb 2013 - 4:13 pm | शिद

बायको चार जणांत ऊठुन दिसणारी असावी... चार जणांचा ***णारी नाही.

तर्री's picture

15 Feb 2013 - 4:21 pm | तर्री

विडंबन करायला खूप स्कोप आहे.

पैसा's picture

15 Feb 2013 - 4:22 pm | पैसा

मुक्ता बर्वेसारखी. :D :P

बॅटमॅन's picture

15 Feb 2013 - 4:33 pm | बॅटमॅन

पण एक्झॅक्ट तशी नाही. =))

सूड's picture

15 Feb 2013 - 5:09 pm | सूड

मुक्ता बर्वे, उर्मिला कानिटकर, केतकी माटेगांवकर यांचं मिश्रण करुन जे काय तयार होईल तशी असावी. ;)

अभ्या..'s picture

15 Feb 2013 - 5:17 pm | अभ्या..

मिश्र्णातून निर्मिती सावंत निघालीय. चालेल का? ;)

स्मिता चौगुले's picture

15 Feb 2013 - 5:19 pm | स्मिता चौगुले

गूड वन...:)

सूड's picture

15 Feb 2013 - 6:03 pm | सूड

जायचा रस्ता माहित आहे का बे?

अभ्या..'s picture

15 Feb 2013 - 6:08 pm | अभ्या..

नेतीय कडेवर घेऊन =)) =)) =))

दादा कोंडके's picture

15 Feb 2013 - 4:29 pm | दादा कोंडके

कणेकरीमधलं, "तुमची बायको सुंदर, कलासक्त वगैरे वाटायला हवी असेल तर सर्वप्रथम तिचं तुमच्या शेजार्‍याशी लग्न करून द्या" हे आठवलं. :)

संजय क्षीरसागर's picture

15 Feb 2013 - 4:31 pm | संजय क्षीरसागर

शेजार्‍याच्या बायकोवर प्रेम करा

सारे's picture

15 Feb 2013 - 4:29 pm | सारे

मस्तच सूचली आहे कविता..

प्यारे१'s picture

15 Feb 2013 - 4:43 pm | प्यारे१

नक्की किती बायका हव्यात? ;)

प्रसाद गोडबोले's picture

15 Feb 2013 - 6:05 pm | प्रसाद गोडबोले

"फक्त अजुन एक "

असं उत्तर देतील ...चावट मेले

संजय क्षीरसागर's picture

15 Feb 2013 - 6:08 pm | संजय क्षीरसागर

एकावर एक

bharti chandanshive१'s picture

15 Feb 2013 - 4:48 pm | bharti chandanshive१

मस्त

वेल्लाभट's picture

15 Feb 2013 - 5:16 pm | वेल्लाभट

वा! छान जमलीय कविता !
आजकाल (अपवाद असतील, क्षमस्व) मुलींच्या चेकलिस्ट फार स्पष्ट व्हायला लागल्यात. १,००,००० महिना पगार हवा (मग दिसायला कसाही का असेना मुलगा).. अमूक अमूक शहरात घर असायला हवं... क्वालिफिकेशनहई सिलेक्टिव्हच चालतात... असो.
मुलं आपली अजूनही त्यांची चेकलिस्ट स्वप्नातल्या परिशी टॅली करायचा प्रयत्न करत असतात. (अपवाद असतील अर्थातच, पुन्हा क्षमस्व)

असो.

गुड बन!

येनकेनप्रकारेण भरपूर पैसा आहे की नाही इतकेच हो, बाकी नुसत्या बातां.

श्री गावसेना प्रमुख's picture

15 Feb 2013 - 5:47 pm | श्री गावसेना प्रमुख

अशी ती मोहिनी असावी

अशी ती संपदा असावी

अशी ती चंचला असावी

अशी ती कल्याणी असावी

अशी ती प्रेरणा असावी

अशी ती हर्षदा असावी
एव्हढ्या महागाइत्,इतक्या सार्या
1

सकाळी भल्या पाहटे उठणारी
देव दर्शनाला साडि चोळी वरुन देवळात जाउन
पुजा मारुन मुलांना शास्त्रिय संगित व नृत्य शिकवणारी
आचार विचार वागणुकिने भारतिय परंपरा जोपासणारी...

नम्र विनयशील प्रसन्न प्रेमळ सात्विक
ड्रिम सिक्वेस्न्स सॉगमधे तोटक्या कपड्यात
मॅडोना लाजेल अशी कंबर झटकणारी
रस्त्यावरच्या लहान मुलांना फुलं फळं वाटुन मग
सिन्सीअरली मेडिकल कॉलेज अटेंड करणारी.

परिकथेतील राजकुमार's picture

15 Feb 2013 - 6:43 pm | परिकथेतील राजकुमार

देव दर्शनाला साडि चोळी वरुन देवळात जाउन
पुजा मारुन मुलांना शास्त्रिय संगित व नृत्य शिकवणारी

'पेग मारुन' असे म्हणायचे आहे का?

अग्निकोल्हा's picture

16 Feb 2013 - 12:09 am | अग्निकोल्हा

पुजा मारुनच, पेग तर व्यवस्थित तयार केला जातो.

अग्निकोल्हा's picture

16 Feb 2013 - 12:15 am | अग्निकोल्हा

जर पेग मारणार्‍यांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास "मारुन" च्या जागी "करुन" असे बिंधास्त समजावे.

बॅटमॅन's picture

15 Feb 2013 - 7:22 pm | बॅटमॅन

बाकी नेमके, पण

पुजा मारुन

पार फुटलो राव. =))

अत्रुप्त आत्मा's picture

15 Feb 2013 - 8:14 pm | अत्रुप्त आत्मा

एssssss,आमच्या "पूजा" मारायच्या नाहित हं ! :-/

अभ्या..'s picture

15 Feb 2013 - 9:26 pm | अभ्या..

कुणाला कशाचं तर कुणाला कशाचं :(
गुर्जी सोडा आता पूजा. ;)
लौकर लाडू द्या. :)

अग्निकोल्हा's picture

16 Feb 2013 - 12:21 am | अग्निकोल्हा

पार फुटलो राव

त्याच साठी तो शब्द योजला होता...

एखादी गोश्ट किती एग्झॅगरेटेड असावी याचं साउथ सुपरस्टार्सच्या चित्रपटातिल होरिइन्स या एक उत्तम उदाहरण ठराव्यात. असलि अतिशयोक्ति दाखवण्यामागे ते पारंपारीक, आधुनिक, ग्रामिण व शहरी भागातिल प्रेक्षकवर्ग मात्र एकाच दमात सांभाळणे हा महत्वाचा हेतु मात्र ते साध्य करतात म्हणूनच त्यांच कौतुक.. नाय तर आपली मराठी मरतुकडी व्यावसायीक चित्रपट सृष्टी... :(

बॅटमॅन's picture

16 Feb 2013 - 12:27 am | बॅटमॅन

हे बाकी खरंय. सौथचे पिच्चर निव्वळ गल्लाभरू असतात.

llपुण्याचे पेशवेll's picture

19 Feb 2013 - 10:32 am | llपुण्याचे पेशवेll

सौथच्या हिरोईनी पण गल्लाभरू असतात. :)

बॅटमॅन's picture

19 Feb 2013 - 12:10 pm | बॅटमॅन

अश्लील प्रतिसाद =))

मराठे's picture

15 Feb 2013 - 10:57 pm | मराठे

>> पुजा मारुन मुलांना शास्त्रिय संगित व नृत्य शिकवणारी

नुसतं "मारून मुलांना शास्त्रिय संगित व नृत्य शिकवणारी" असं असेल!

रेवती's picture

15 Feb 2013 - 7:20 pm | रेवती

पुजा मारून
ओ साहेब, असं जर पूजेला मारायला लागलात तर ती बरी सोडेल?

जेनी...'s picture

16 Feb 2013 - 12:17 am | जेनी...

बघ की :-/

अग्निकोल्हा's picture

16 Feb 2013 - 12:24 am | अग्निकोल्हा

मग तिथं पुजा उरकुन असं समजा...

असं नै गिल्फुकाका :-/ तुमी आधीच असं नै बाबा लिवाय पाय्जेल हुतं :-/
आता मला कुणी मारुन गेलं म्ह्न्जे ?? :( :-/

अग्निकोल्हा's picture

16 Feb 2013 - 12:37 am | अग्निकोल्हा

अगं तु सौदी होरोइन्स थोडीच हैस ?

अय्या ... म्ह्न्जे मी सौदीत गेली तरच मला मारतिल काय ??
इकडे नै मारणार का मग ??
मन्ग ठिके गिल्फुकाका ....
मारा सौदिच्या पूजाला :P

:D

अग्निकोल्हा's picture

16 Feb 2013 - 12:56 am | अग्निकोल्हा

नाय तर इकडं पन मारतिल!

जेनी...'s picture

16 Feb 2013 - 1:00 am | जेनी...

:-/

श्रिया's picture

15 Feb 2013 - 9:52 pm | श्रिया

छान. कविता मजेदार वाटली.

अधिराज's picture

15 Feb 2013 - 10:59 pm | अधिराज

आणि एक महत्वाचे, झुरळास घाबरणारी नसावी, कसें?

स्मिताताई कविता छान जमली आहे.

बॅटमॅन's picture

16 Feb 2013 - 12:05 am | बॅटमॅन

असहमत. बैको झुरळाला घाबरल्याने एरवी चान्स नसला तरी त्यासंदर्भात तरी तिच्यासमोर वीरश्रीचे प्रदर्शन करायला मिळते हे विसरलात होय =)) =))

शुचि's picture

16 Feb 2013 - 12:22 am | शुचि

कविता आवडली. इतकी सर्वगुणसंपन्न मुलगी - कठीण आहे.

उपास's picture

16 Feb 2013 - 3:23 am | उपास

कन्या राशीची सहाव्या घरातील शुक्रवाली पण नाही चालणार? ;)

संजय क्षीरसागर's picture

16 Feb 2013 - 9:05 am | संजय क्षीरसागर

अवलंबून आहे

मनीषा's picture

16 Feb 2013 - 12:08 pm | मनीषा

कठीण आहे !
सिलेक्षन (म्हणजे निवड ..) साठी इतके फिल्टर्स लावले तर रिझल्ट काय मिळणार?
खरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःचे मत नसलेली आणि आज्ञाधारक, अशी पाहिजे... बाकी सगळ्या निव्वळ कविकल्पना.
सॉरी स्मिता ताई अवांतरच पहिल्यांदा लिहिले ..
कविता छान आहे बरं का .

विश्वनाथ मेहेंदळे's picture

16 Feb 2013 - 12:47 pm | विश्वनाथ मेहेंदळे

बरी आहे कविता. आता उलट्या बाजूने लिहा.

सुहास..'s picture

16 Feb 2013 - 1:03 pm | सुहास..

येव्ह्ढ लांबलचक काव्य लोहिण्यापेक्षा सरळ 'मुकी* बायको ' पाहिजे असे लिहायचे ना ;)

मुकी म्हणजे मुकीच ;)

दादा कोंडके's picture

17 Feb 2013 - 5:31 pm | दादा कोंडके

आणि आंधळी सुद्धा. ;)

स्मिता चौगुले's picture

18 Feb 2013 - 8:52 am | स्मिता चौगुले

धन्यवाद प्रतिसादाबद्द्ल

मृणालिनी's picture

18 Feb 2013 - 8:17 pm | मृणालिनी

आंधळी आणि मुकी बायको? कशाला? त्यापेक्षा लग्नच नका . फ्री बर्ड फॉर एव्हर !! :)
बाकी कविता छानच झाली आहे.

स्मिता चौगुले's picture

19 Feb 2013 - 9:34 am | स्मिता चौगुले

:)