असता तुझी कृपा ।
असता तुझी कृपा रे ये अर्थ जीवनाला ।
देवा तुझ्या दयेचा आधार पामराला ।।धृ।।
घरटे कसे रचावे हे ज्ञान पांखरांना ।
माते उरी दुधाचा तू निर्मिलास पान्हा ।।
शय्या कधी फुलांची काटे कधी उशाला ।।१।।
प्रपंची अडचणी येती, मती मूढ होई
दाटे अंधार जीवनी, मन निराश होई
होतोस दीप तू ,सापडे वाट आंधळ्याला
असता तुझी कृपा रे ये अर्थ जीवनाला ।
देवा तुझ्या दयेचा आधार पामराला ।।२।।
धिक्कारती सोयरे दाखवी पाठ सारे
हिणविति मज, फुकाचे सल्ले देत सारे
होऊन मित्र माझा, देतशी धीर मजला
असता तुझी कृपा रे ये अर्थ जीवनाला ।
देवा तुझ्या दयेचा आधार पामराला ।।३।।
कृपेचा सागर तू. अघाद तुझी माया
तुझ्याविना शून्य मी, लाभो तुझी छाया
भरवसा मज, लाविशी नाव किना~याला
असता तुझी कृपा रे ये अर्थ जीवनाला ।
देवा तुझ्या दयेचा आधार पामराला ।।४।।
अविनाश बेधुंद.स्वच्छंदी..मुक्त जीवन
प्रतिक्रिया
5 Feb 2013 - 3:48 pm | दादा कोंडके
ते 'स्वैर' राहिलं की हो.
बाकी असले काव्यात्मक गोग्गोड शब्द असुनही मला हे शब्द ओळीने वाचल्यावर 'सोडलेला वळु' डोळ्यासमोर येतो. :|
5 Feb 2013 - 4:24 pm | खटासि खट
अशी वेळ वै-यावरही येऊ नये. विषाद टपकतोय प्रत्येक ओळीतून..
5 Feb 2013 - 8:04 pm | विकास
कवितेतील भावना वाचताना, "सूरज की गरमी से" या भजनाची आठवण झाली.
भटका हुआ मेरा मन था कोई, मिल ना रहा था सहारा |
लहरों से लगी हुई नाव को, जैसे मिल ना रहा हो किनारा |
इस लडखडाती हुई नाव को जो किसी ने किनारा दिखाया,
ऐसा ही सुख मेरे मन को मिला है, मैं जब से शरण तेरी आया | मेरे राम ||
7 Feb 2013 - 9:15 am | संजय क्षीरसागर
असता तुझी कृपा रे फुलटॉस दे आम्हाला ।
अकु तुझ्या धाग्याचा आधार हरेकाला ।।धृ।।
काथ्या कसा काढावा ते सर्व ज्ञान देना ।
फाट्यावरी मारावा असला एकेक धागा ।।
पोळी कधी चपाती, `अंतर' किती? कशाल?।।१।।
असता तुझी कृपा रे फुलटॉस दे आम्हाला ।
7 Feb 2013 - 9:28 am | आनन्दिता
_/\_ _/\_ साष्टांग दंडवत स्विकारा संक्षी काका!!!
7 Feb 2013 - 9:36 am | संजय क्षीरसागर
विचारांचा सागर तू, आघाद चार ओळ्या
तुझ्याविना रूक्ष मीपा, लाभो तुझीच छाया
भरवसा मज, लाविशी टेंपो लायनिला
असता तुझी कृपा रे फुलटॉस दे आम्हाला ।
अकु तुझ्या धाग्याचा आधार हरेकाला ।।४।।
अविनाशबेधुंद, स्वच्छंद मुक्तजीवन (हे पुन्हा कशाला?)
7 Feb 2013 - 10:10 am | संजय क्षीरसागर
धिक्कारती उगीच दाखवी पाठ सारे
हिणविति मजफुकाचे, सल्ले देत साले
देऊन हिट तू ही, आस्मान बघायाला
का लाविशी मला रे, दे अर्थ लेखनाला ।
देवा तुझ्या दयेचा उपयोग नाही माला ।।३।।
7 Feb 2013 - 11:59 am | मोदक
उत्तम प्रयत्न..
कविता वगैरे प्रकारांशी फारसे जमत नसल्याने काव्याबद्दल "नो कमेंट्स", तरीही तुम्ही काथ्याकुटामधून बाहेर पडण्याची तयारी दाखवली याचा सुखद धक्का बसला ही प्रांजळ कबुली.
अवांतर - लेखकाच्या आधीच्या लेखनाशी नवीन लेखनाची तुलना करून "हात धुवून घेण्याचा" प्रकार बालीश वाटला.
"आधीच्या लेखनाशी नवीन लेखनाची तुलना" हाच प्रकार आपल्या बाबतीत कुणी केला तर 'मी' 'स्वतः' "एन्लाईटन्ड्" 'आहेच्च्च्च्च' चा फुकाचा आव आणून विषय भरकटवून चर्चा हायजॅक करणे.. दिसेल तिथे स्कोर सेटलींग करणे वगैरे प्रकार होतात हे ही इथेच बघितले आहे..
याच धर्तीवर एखाद्याची दुसर्या संस्थळावर उडालेली फे फे इकडे चर्चायची म्हणली तर.. हॅ हॅ हॅ :-D
अकुंना एक आगाऊ सल्ला - "कंस्ट्रक्टीव्ह क्रिटिसिझम नसेल तर दुर्लक्ष ही सर्वात मोठी शिवी आहे" (असे आमचे विमे काका म्हणतात.)
(लेखाकडे आणि लेखकाकडे पूर्वग्रहदुषीत नजरेने न बघणारा) मोदक.
7 Feb 2013 - 12:12 pm | गणामास्तर
बाब्ब्ब्बो....
7 Feb 2013 - 1:15 pm | मृत्युन्जय
मोदकाशी सहमत आहे.
7 Feb 2013 - 5:41 pm | संजय क्षीरसागर
अकुंचे सर्व धागे मी मजेत घेतो आणि त्यांच्याशी स्कोर सेटलींगचा प्रश्नच नाही
वरचा प्रतिसाद लेखकाचा दृष्टीकोन दर्शवतोय त्यामुळे वेगळं काही लिहीण्याची आवश्यकता नाही