वळवून मान तिने .मधाळ का हसावे?
वेडे मन हे ,त्यात त्याने का फसावे ?
कधी हो कधी नाही नेमके काय समजावे?
कधी हसणे कधी रडणे तिचे तिलाच ठावे
गुलाबी जिवणी.,का करावे विभ्रमी चाळे ??
होतो जीव चोळा मोळा, हे तिला का न कळे??
वेळी अवेळी भेटणे,वाट निसरडी,वय कोवळे
कसे समजवू तिला ,मन मुळापासून उन्मळे
खवळला तो सागर, सुटले पिसाट वारे
तरी लोटतेस होडी वादळात ,हे आहे का बरे ??
अविनाश
प्रतिक्रिया
2 Feb 2013 - 11:34 pm | पैसा
अकु, कविता पण लिहिता? छान आहे.
3 Feb 2013 - 12:21 am | अधिराज
छान लिहिलया,कलिजा खल्लास झाला.
3 Feb 2013 - 11:26 am | श्री गावसेना प्रमुख
वाजवा रे धताड तताड धताड तताड धताड तताड
3 Feb 2013 - 12:20 pm | अधिराज
काय सरकार, कोणासाठी वाजवताय?
3 Feb 2013 - 3:34 pm | श्री गावसेना प्रमुख
हे काय कुलकर्ण्यांसाठी वाजवतोय्,ते सवडीन आलेत्
3 Feb 2013 - 4:54 pm | अत्रुप्त आत्मा
पिळून पात्तळ तिने दांडिवर का टाकावे?टोवेलास माझ्या का हिंस्त्र पणे ओढावे? ;-)
3 Feb 2013 - 5:23 pm | बॅटमॅन
ऐयो अक्कुजी तुम कविता बी लिकता क्या जी, एकदम खतरनाकच जी!
अवांतरुडु: कच्चा माल अच्छा है ;)
7 Feb 2013 - 1:02 am | प्रसाद गोडबोले
वळवून मान तिने .मधाळ का हसावे?
हार्डली २०-२५ प्रतिसाद येणार इथे !
हेच काथ्याकुट मधे टाका वळवून मान तिने .मधाळ का हसावे? ?? किमान १०० प्रतिसाद यायची बेट लावतो आपुन =))