कधीही न भेटणार्या, पण जिवलग मित्रांची ही स्टोरी. न भेटता (किंवा भेटण्याची शक्यता नसताना) ते जिवलग कसे झाले? ...असले प्रश्न विचारायचे नाही. तो भेटणारच नाही म्हटल्यावर ‘मी येड्यासारखा चालतोय कशाला’? नाही, नाही ते पण विचारायच नाही.... फक्त वाचायच.
_________________________________
मुक्कामाचं ठिकाण ठाऊक नाही पण चालयच,... वेड्यासारखं चालायच.
आजूबाजूच्या गर्दीला जुमानतय कोण?
उन्हातान्हातून वणवण त्यात सावली कुठली बोंबलायला ?
आपलीच पावलं म्हटल्यावर झक मारत चालणारच आणि पावलं चालतायत म्हटल्यावर रस्ता न सरून सांगतोय कुणाला?
अरे एक सांगायच राहिलं, वाळवंटातनं चालायच....फार मजा येते.
अचानक वाळूत अक्षरं उमटलेली दिसतात. कोण लिहून गेला कसं कळणार?
चालायची ताकद संपली पण बघायची आहे ना? (बघा!) ...पण दिसलं काहीच नाही.
तरी कुणीतरी आहे असं भासलं...(मला भास होतायत वगैरे निष्कर्ष काढू नका वाळूवरची अक्षर दिसली म्हटलयना?)
चला आता वाळूवरच्या अक्षरांशी खेळू . डोळ्यांची वाट लागली तरी हरकत नाही... ‘आत’ शांत वाटायला हवं.
त्या लिहित्या हाताला उत्तर देतो. ‘कसं देणार’ काय विचारताय? मगाशी सांगीतलं ना ‘कुणी रेखाटलीयेत माहिती नाही’ तरी आपल्याकडे आयडीया आहे ना!.... त्याच वाळूत अक्षरं लिहून उत्तरं द्यायची!
आह..! झाला संवाद चालू! (स्वत:चा स्वत:शी का होईना)...‘काही तरी चालू झालं’ हे महत्त्वाच.
सुरुवातीला वेड्यासारखा वाटणारा हा अनोखा संवाद हळूहळू.. पावलागणिक वाढत गेला (तुम्हाला काय वाटलं थांबलो? छे, .....चालता चालता लिहीतोय ).
अक्षरं उमटत राहिली. कधी वरून खाली कधी खालून वर. (मायला वाचणारेय कोण? मीच ना?) मग कशी लिहीली काय विचारताय?
तू. मी. मी. तू. ..... मी काय वाळूतली हुतूतू खेळत नाय, नीट वाचा... तू. मी. मी. तू. ..आय एम रायटींग संवाद फ्रॉम बोथ साइडस. आता पुन्हा ‘कश्याला लिहीतोय’ विचारू नका... न भेटणार्या `जिवलग मित्रांची' स्टोरी आहे ही (एकदा सांगीतलय ना)
आता वाळूतली अक्षरं डोक्यात गेली. सगळीकडे अक्षरं... पानापानांवर, फुलाफुलावर. कधी वार्याच्या झुळकीवरदेखील. कधी तर थेट मोठ्यांदा वाचायलाच लागलो.
अक्षरांच्या सोबतीनं आता जगणं आलं. इतकं इतकं बोलतोय तुझ्याशी. तुझ्याच शब्दात सांगायचं तर स्वतःशी बोलावं इतकं. (पब्लिक माझ्याकडे विचित्र नजरेनं बघतय,... बघू दे)
येड्यावाणी उर्दू-मराठीची भेसळ चाललीये पण अजूनही अक्षरंच. लिहिणारा हात नाही. त्या अक्षरांना तुझा चेहरा नाही.. कधी येशील समोर? या प्रश्नाला उत्तरही अक्षरीच. समोर येऊन नाही.... (अजून सॅंडवरच चाललय सगळं, आलं ना लक्षात?)
माझ्याकडे तुझा फोन नाही, पत्ता नाही, इ-मेल नाही, फेसबुक कश्याला म्हणतात मला माहिती नाही. अगम्य अश्या `संपर्कमाध्यमांतून आपण एकमेकांचे मित्र आहोत. पण आपण एकमेकांना कॉंटॅक्ट करायचा नाही. आपण फक्त बोलायच. वन वे...वाळूत अक्षरं लिहून.
काही क्षणांत.. किंवा कुठेसं म्हटलंय तसं दोन क्षणांच्या गॅपमधे का होईना पण तुझ्याशी जोडलं राहण्याचं अक्षराशिवाय साधन नाही, हे जाणून फार येड्यासारखं होतं. (तरी मी लिहीणार!)
नुसतेच शब्द, त्यांचे कधी तू, कधी मी, आणि कधी आपण मिळून लावलेले अर्थ. कळतयं ना तुला? मीच लावतोय अर्थ पण तुला मधे ओढतोय.... (नायतर पब्लिक ट्यांपोत बसवेल)
आनंद देणार्या इतर कोणत्याच गोष्टी तुझ्यासोबत करता येत नाहीत. (....ते केलं तर पारच कामातून गेला म्हणतील सगळे)
स्वतःला दिवसातून केव्हाही आरशात बघतो तेंव्हा तूच दिसायला लागलायस..नाही नाही... असाही दिवस येईल कधी तरी . ( अजून तरी आरश्यात बघीतल्यावर मीच दिसतोय)
तुझंमाझं नातं ते काय मग? निव्वळ शब्द?... नाही नाही... निदान तू तरी असं म्हणू नकोस.
‘आरशाच्या पलिकडे’ बघतो कसलाच शोध लागत नाही. मग तुला बघण्याचा हा विलक्षण सोस तरी का लावून घ्यायचा जिवाला? तू दिसलास कदाचित, तर काय होईल त्याने? स्वप्नपूर्ती? अपेक्षाभंग?.... छे, छे, तू दिसावास अशी अपेक्षा तरी कशाला? (वाळूतली हुतूतू काय कमी मजा आणतेय?) याच विचारात मग्न असताना कुणीतरी एफेम लावला.....
मेरे फोटोको, मेरे फोटोको सीनेसे यार,
चिपकाले सैंय्या फेविकॉल से!
....अचानक उत्तर मिळूनही गेलं. . तू आहेस अशी पाटीच गळ्यात अडकवून घेतली!
आता एकदम झ्याक झालं.. एकरूप असणे, समरस होणे अनुभवतोच आहे प्रत्येक क्षणी. हे ‘नसलेल्याच असलेल्याशी नातं’.... अशी फेविकॉल सोबत मिळणे हे माझं परमभाग्यच!
तेव्हा तुझंमाझं नातं. निरंतर टिकणारं.... फेविकॉल कशाला हवा? कल्पनेची पकड काही कमी नाही.
निरक्षर म्हणजे अक्षर ओळख नसलेला असा नाही. त्याला लिहीता वाचता येतं, पण अर्थ समजत नाही. आता आपलं नातं निव्वळ शब्दात बांधलेलं नव्हे, तर कधी न मिटणारं.... फेविकॉलपेक्षा मजबूत....निरक्षर भ्रमाच्या लेपाचं.
आता तू असलास काय आणि नसलास काय, दिसलास काय आणि नाही काय, काही फरक पडत नाही... माझ्या बाजूनं नातं पक्कं आहे! त्याला स्थळाकाळाचं बंधन नाही....कल्पना हेच त्याचं लिमिट आणि तीच त्याची पॉवर.
प्रतिक्रिया
17 Jan 2013 - 6:31 pm | पैसा
हे पण बरंय की. विडंबन म्हटलं तरी काहीतरी महत्त्वाचं लिहून गेलातच!
17 Jan 2013 - 6:41 pm | संजय क्षीरसागर
आभार! आतापर्यंतच्या सर्व लेखनाचा आशय हाच आहे
17 Jan 2013 - 6:37 pm | स्पंदना
फार अवघड असत तोल सांभाळन. कुणा जमतो बहुतेकांना नाही जमत्.गैरसमज तर कुणा गैरालाही उपड पाडायचा आवेश देउन जातो. त्यात अहंकार भरीवर भर घालत जातो. तरीही चालायच तिरस्काराच्या गर्तेत खोल खोल रुतण्यासाठी.
17 Jan 2013 - 7:48 pm | संजय क्षीरसागर
आपण कधी कुणाची खोडी काढत नाही पण त्यांनी आगळीक केली आणि आपण गप बसलो तर कसं वाटतं? तिथे निरहंकारितेची भाषा केली तर चालेल का?
एकदम उदाहरणाच्या टोकाकडे पाहू नका. आशय लक्षात घ्या. सामंजस्य सर्वांनी राखायची गोष्ट आहे. ती एकावर लादून उपयोग नाही.
17 Jan 2013 - 9:17 pm | अन्या दातार
हे सर्वात महत्त्वाचं आहे बघा!
18 Jan 2013 - 3:15 am | स्पंदना
तुम्ही "गैरसमज" या शब्दाकडे लक्ष दिलेले दिसत नाही आहे.
असो.
18 Jan 2013 - 10:25 am | संजय क्षीरसागर
जिच्याबद्दल तो झालाय ती व्यक्ती करते.
केवळ नांवात थोडाफार बदल करून केलेलं लेखन आणि त्यावर `हाण तेज्या आयला' असे प्रतिसाद हेतू उघडपणे दर्शवतात. त्याला गैरसमज कसं म्हणता येईल?
तरीही हे लेखन पूर्णपणे विचारांवर केलेलं वक्तव्य आहे. (ग्लिफ या सदस्याचा प्रतिसाद पाहा. त्यानं पोस्ट पूर्वग्रहरहित वाचलीये कारण त्याला मागे घडलेलं काहीही माहिती नाही).
तुम्ही दृष्टीकोन बदलला तर तुम्हालाही मुद्दा कळू शकेल.
19 Jan 2013 - 4:09 am | जेनी...
एकदम सहमत !
लगे रहो कक्काजान हम आप्के साथमेच .
17 Jan 2013 - 11:02 pm | अग्निकोल्हा
कल्पना हीच एक अतीशय गुंतागुंत असताना त्याला पॉवर म्हणन्याने (नंतर) गोंधळ उडणार नाही काय ?
17 Jan 2013 - 11:31 pm | शिल्पा ब
दुतोंडी प्रतिसादकर्ते पाहुन गंमत वाटते. नैतर हातात चुकुन कुर्हाड मिळाली की तोडातोडी करताना डोळे उघडे ठेवलेलं बरं असतं.
बरं, नेमकं कशाचं विडंबन म्हणायचं हे?
17 Jan 2013 - 11:46 pm | अर्धवटराव
असलेल्याला पास नसलेला करुन कल्पनेच्या विडीकाडीला पुरणपोळी म्हणत पोटभर जेवायला लावणारी मूळ प्रेरणाअ कुठुन आलि असावी?? सध्यातरी मिपावर पाकिस्तान, बलात्कार समस्या, वेगवेगळ्या व्यक्ती-संघटनांचे असलेले-नसलेले द्वेष.. असले विषय गाजताहेत.
अर्धवटराव
17 Jan 2013 - 11:45 pm | किसन शिंदे
विडंबन ओढून ताणून म्हणजे, करायचं म्हणजे करायचंच याच भावनेतून केलेलं वाटलं.
असो.
18 Jan 2013 - 12:13 am | बॅटमॅन
तंतोतंत!!!
18 Jan 2013 - 10:04 am | संजय क्षीरसागर
`तो' असा कुणी नाही.
मूळ पोस्टमधे `तो' आहे आणि त्याचा ध्यास घेऊन अनंत चालायचय असा सूर आहे.
माणूस विचार करतो असं म्हणतात पण `तो' म्हटल्यावर वातावरण इतकं भावूक होतं की `तो' आहेच असं समजून आपण काहीही विचार न करता पुढे जातो. (तिथले प्रतिसाद पाहा).
जो नाही तो कितीही चाललं तरी कसा भेटेल ? इतका साधा विचारसुद्धा मनात येत नाही.
वाळूत अक्षरं काय, पानापानात `तो' काय, वार्याच्या झुळकेत आणि पावलापावलागणिक `तो' काय, काय वाट्टेल ते चालू होतं. पुढे तर आरसा काय, आरश्याच्या पलिकडे काय.....
मूळ पोस्टवर प्रतिसाद देऊन त्यातली व्यर्थता दाखवण्याचा प्रयत्न केला होता, तो अप्रकाशित झाला. पण त्यापूर्वी बहुदा तो वाचला गेला असावा. कारण मग प्रतिसादातून बाजू सावरायचा प्रयत्न करत `तो' `कधीही न भेटणारा जीवलग मित्र' झाला!
आता परिस्थिती आणखीच फनी झाली. `तो कधीही भेटणार नाही' हे मान्य केल्यावर त्याला भेटण्याचा सगळा प्रयत्नच वेडेपणा झाला.
पुढे आणखी मजा झाली, जीवलग मित्र संपर्काशिवाय कसा होऊ शकतो? त्यामुळे ती निव्वळ एकतर्फी कल्पना आहे हे पुन्हा उघड झालं.
ही पोस्ट म्हणजे विडंबन किंवा अहंकाराच्या भावनेतून केलेलं तिरकस लेखन नाही.
शांतपणे वाचलं तर लक्षात येईल की एका भ्रामक कल्पनेतून कायकाय होऊ शकतं,... भ्रम ही काय चीज आहे. कारण शेवटी विचार ही कृतीची दिशा आहे.
18 Jan 2013 - 10:57 am | पैसा
:( मूळ लेखिकेच्या मनात काय होतं हे फक्त तीच सांगू शकते. इतर कोणी अंदाज करून दुसर्याला चूक ठरवणं बरोबर नाही.
18 Jan 2013 - 11:28 am | धन्या
"आण्णा, आज दुपारुन मला दत्त दिसलेत उंबरामदी. दत्त म्हणजे दत्तच. डायरेग."
"चांगलंय. साक्षात्कार होत असतात. निसर्गात देव आहेच. तू चांगला माणूस आहेस. भगवंताने तुला दर्शन दिलं. पण बरं का केशव, ही फार वैयक्तिक बाब आहे. त्यामुळे ती स्वतःपुरती ठेवावी. इतरांचा त्यावर विश्वास बसेलच असं नाही. पण म्हणून त्यांना खोटं ठरवायचं कारण नाही. ज्यांना देव हवा आहे, त्यांनी तो आपापला शोधावा. ज्यांना नकोय त्यांनी तो शोधू नये. हे स्वातंत्र्य सगळ्यांना आहे."
हा संवाद आहे गिरिष आणि उमेश कुलकर्णींच्या देऊळ चित्रपटातील कुलकर्णी आण्णा आणि केशव या पात्रांमधील. आण्णांचं भाष्य खुपच बोलकं आहे.
मी असं गृहीत धरलं आहे की हा लेख म्हणजे संक्षींनी इनिगोयच्या "अक्षर" या लेखाला दिलेलं प्रतिउत्तर आहे, ज्याला मिपाच्या भाषेत आपण विडंबन म्हणतो. मुळात इनिगोयनी त्यांच्या लेखावरील प्रतिसादात असा खुलासा केला होता की "एकमेकांना कधी न भेटणार्या पण एकमेकांचे निव्वळ 'व्हर्च्युअल स्नेही' असणार्यांचं मनोगत आहे हे.". लेखिका म्हणून त्यांनी केलेला हा खुलासा थोडा वेळ बाजूला ठेवला तर त्या लेखातला "तो" म्हणजे देव हे अध्याहृत (इम्प्लिसीट) आहे. हे निदान हिंदूंच्या बाबतीत तरी लहानपणापासून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या ठसवलं गेलेलं असतं. आणि म्हणूनच "देव" न मानणार्या संक्षींनीसुद्धा "तो" म्हणजे "देव" असाच अर्थ घेतला. बिकॉज, वुई हॅव बीन प्रोग्राम्ड दॅट वे.
एक सामान्य वाचक म्हणून मला इनिगोयनी लिहिलेलं मुक्तक आवडलं. असेलही शब्दांचा भुलभुलैया, पण हा शब्दांचा भुलभुलैया हळव्या मनाचा ठाव घेतो हे मात्र नक्की. मग ते देवाबद्दल लिहिलेलं असो वा व्हर्च्युअल मित्राबद्दल. त्याचवेळी संक्षींनी लिहिलेलं "निरक्षर" मात्र मला पोरकटपणा वाटला. प्रतिउत्तर दयायचं म्हणून त्यांनी केलेली शब्दांची कसरत केविलवाणी आहे. "मरुन रोब" सारखी नितांत सुंदर कथा लिहिणार्या व्यक्तीने केवळ पलटवार करण्यासाठी इतकं टोकाला जावं हे माझ्यासारख्या चांगल्या साहित्याचा आस्वाद घेणार्या सामान्य वाचकासाठी त्रासदायक आहे.
तरीही, इनिगोय आणि संक्षी या दोघांनाही आपापली मतं व्यक्तं करण्याचा हक्क आहेच. कोण चूक, कोण बरोबर हे व्यक्तीसापेक्ष असेल. माझं मत मी वरच्या परिच्छेदात मांडलं आहे.
आता मुळ मुद्दयाकडे वळतो. "अक्षर" वर संक्षींनी जो प्रतिसाद टाकला होता, त्याला उपप्रतिसाद म्हणून मी एक चित्र डकवलं होतं. हे दोन प्रतिसाद आणि त्यानंतरचे आमचे दोघांचे सारे प्रतिसाद संमंने उडवले. शनिवार होता, कुणाच्या फारसं लक्षात आलं नाही.
देव आणि धर्म हे विषय पुर्णपणे वैयक्तिक असून सार्वजनिक ठिकाणी चर्चा करण्याचे विषय नक्कीच नाहीत असं माझं स्वतःचं मत आहे. पण आता मात्र मला त्यावर चर्चा कराविशी वाटत आहे. अर्थात चर्चा निकोप व्हावी, इतर मंडळींनी केवळ पॉपकॉर्न खात चर्चेचा आस्वाद न घेता चर्चेत भाग घ्यावा अशी ईच्छा आहे. ते चित्र मी पुन्हा एकदा इथे डकवतो.
त्यानंतर संक्षींनी मला "मी कोण आहे? आस्तिक, नास्तिक की बावळट?" असा प्रश्न विचारला होता. तेव्हा शब्दाला शब्द वाढवण्याची ईच्छा नसल्याने मी माघार घेतली होती.
मी पुर्णपणे धार्मिक वातावरणात लहानाचा मोठा झालो. देव आहे, जे काही घडतं ते त्याच्या ईच्छेनेच असा घरातल्या सार्यांचा दृढ विश्वास आहे. लहानपणीच भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, योगवासिष्ठ हे "आत्मा - परमात्मा - पुनर्जन्म" थिअरी मांडणारे ग्रंथ चाळायला मिळाले. मी ही कटटर देववादी होतो. मी ही लहान असताना आमच्या घराच्या बाजूलाच असणार्या मारुतीशी आणि थोडा मोठा झाल्यावर नदिकाठी स्मशानाच्या बाजूला असणार्या शंकराशी तासनतास गप्पा मारायचो, त्याच्याशी भांडायचो, सु:ख - दु:खं सांगायचो.
पुढे वाचनाच्या कक्षा रुंदावल्या. चौकसबुद्धी वाढली. आणि माझी मतं बदलायला लागली. ग्रंथांमधल्या कॉन्ट्रव्हर्सीज दिसायला लागल्या. काही प्रश्नांची कुठुनच समाधानकारक उत्तरे मिळेनाशी झाली. आणि मग एकेकाळचा माझा जीवाचा जिवलग असणारा देव माझ्यासाठी केवळ एक संकल्पना बनला. त्यानंतर मी वाचनाचा ट्रॅक बदलला. डार्विनचा उत्क्रांतीवाद, रिचर्ड डॉकिन्सचं "द गॉड डील्युजन", सिग्मंड फॉईडचं "द फ्युचर ऑफ अॅन इल्युजन" अशी पुस्तकं वाचल्यानंतर मला आधी पडलेल्या प्रश्नांची बुद्धीला पटतील अशी उत्तरं मिळू लागली.
अर्थात ही जी दुसरी बाजू आहे, तीसुद्धा केवळ एक थिअरी आहे. फक्त ती थिअरी माझ्या बुद्धीला पटत आहे म्हणून मी ती स्विकारली आहे. देव आहे की नाही हे यावर मी ठामपणाने काहीच बोलू शकत नाही. विश्वाच्या अफाट पसार्यातील मी नगण्य ठीपका आहे. माझ्या बुद्धीची झेप एव्हढी नक्कीच नाही की मला विश्वाचं ज्ञान व्हावं.
पुन्हा एकदा वरचाच संवाद लिहितो.
माझ्या मते देव नाही असं मानणार्यांनी देव आहे असं मानणार्यांवर तुटून न पडता त्यांना त्यांची मतं, श्रद्धा जोपासू दयावात. जोपर्यंत या श्रद्धा मानवी जीवनावर विपरीत परीणाम करत नाही तोवर बुद्धीवादयांनी त्याला आक्षेप घेण्याचं काहीच कारण नाही.
18 Jan 2013 - 11:49 am | सस्नेह
सुस्पष्ट अन समर्पक प्रतिसादासाठी अभिनंदन !
18 Jan 2013 - 11:55 am | स्पा
चायला हेच मुद्दे जर शाकाहार - मांसाहार , स्त्री - पुरुष , निवासी - अनिवासी , कांग्रेस- बीजेपी , मुंबई - पुणे ई. ई लागू केले , तर चायला मिपा बंद पडायचं
असो चान चान अपेक्षा धन्याजी
18 Jan 2013 - 12:01 pm | धन्या
आपला हा प्रतिसाद वाचून खुप मोठया तरंगलांबीचे विचारतरंग मनात तरळून गेले.
18 Jan 2013 - 12:39 pm | बाळ सप्रे
मूळ धाग्याचा संदर्भ दिल्याबद्दल धन्यवाद..
अशा वादविवादात "वैचारीक पातळीवर" तुटून पडायलाही हरकत नाही.. मुद्द्यापुरत वेगळेपण सांगितल्याशिवाय वेगवेगळे काय विचार असु शकतात ते कसे समजणार.. तुटून पडणे म्हणजे आपला मुद्दा/ विचार हिरिरीने मांडणे.. त्यामुळे तुमचा मुद्दा प्रभावीपणे मांडता येतो.. फक्त आपला मुद्दा एखाद्याला पटला नाही तर वैयक्तिक रोष नसावा इतकच.. विचाराच्या कक्षा रुंदावणे म्हणजे तरी काय.. तुम्ही जी पुस्तक वाचलीत त्यातले विचार प्रभावीपणे मांडलेले असल्यामुळे कुठेतरी जुन्या विचारांना धक्का दिला गेला ना?? त्यामुळे नुसते श्रद्धा जोपासू देणे (आस्तिक/नास्तिक दोन्हींच्या) हे पटत नाही..
फक्त हे सर्व "वैचारीक पातळीवर" ठेवणे महत्वाचे ..
18 Jan 2013 - 12:50 pm | धन्या
चर्चा खेळीमेळीत आणि पुर्णपणे वैचारिक पातळीवर व्हायला हवी. परंतू वरचे काही प्रतिसाद वाचल्यावर तसं होत नाहीये हेच दिसतंय. :)
18 Jan 2013 - 2:05 pm | डॉ सुहास म्हात्रे
इतर काही लिहीण्याची गरज नाही !
18 Jan 2013 - 3:10 pm | सुधीर
प्रतिसाद आवडला. खास करून देऊळ या चित्रपटातल्या संवादाचा दाखला आवडला. मूळ लेखातलं संक्षीचं फक्त शेवटच वाक्य काहीसं कळलं आणि पटलं.
18 Jan 2013 - 3:24 pm | पियुशा
मरुन गाउन नाही हो "मरुन रोब" :)
18 Jan 2013 - 3:28 pm | गवि
अवांतर ठरु नये म्हणून वांतरः हो. मरुन रोब असं मूळ लेखाचं नाव आहे..
अवांतरः मरुन गाऊन ही रचना क्रॉनॉलॉजिकली चुकीची वाटते. मरणाने सर्वच संपते. गाऊन मरुन हे जास्त योग्य.
गाऊन मग मरणे हा हा घटनाक्रम जास्त नैसर्गिक वाटतो.
18 Jan 2013 - 3:31 pm | धन्या
गविकाका, तेव्हढा शब्द दुरुस्त करता का?
आमचं खेडयातलं बालपण कधी कधी असं दगा देतं. :)
18 Jan 2013 - 3:28 pm | धन्या
चुक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.
स्व-संपादन सुविधा नसल्यामुळे मी तरी तो बदल करु शकणार नाही :)
18 Jan 2013 - 4:26 pm | स्पंदना
अयोयो! एव्हढ चांगल लिखाण प्रतिसादात वाया गेल की. एक सुरेख लेख झाला असता.
19 Jan 2013 - 4:24 am | जेनी...
वा .
आवडला प्रतिसाद
22 Jan 2013 - 9:25 pm | यशोधरा
परफेक्ट.
18 Jan 2013 - 12:20 am | कवितानागेश
पैसाताई, अपर्णाताई आणि शिल्पाताई, तिघींशीही सहमत. :)
18 Jan 2013 - 3:26 am | स्पंदना
ताईदीन!!
18 Jan 2013 - 9:55 am | धन्या
आमच्या वेळी नव्हते हो असले काही मदर्स डे, फादर्स डे, एल्डर सिस्टर्स डे. आपल्या जीवाभावाच्या व्यक्तीवरील प्रेम व्यक्त करायला एक विशिष्ट दिवस कशाला हवा? तसं केलं तर मग बैल पोळा आणि हे डे यांमध्ये फरक तो काय राहीला.
आजची पीढी पाश्चात्यांचं अंधानुकरण करत आहे, आणि पाश्चात्यांना आपली उत्पादनं असे नवनवे डे निर्माण करुन पौर्वात्यांच्या गळी मारायचे आहेत.
असो. शेवटी काळाबरोबर बदलायला हवं म्हणून आमच्याही ताईदीनाच्या मिपावरील समस्त तायांना हार्दिक शुभेच्छा !!!
18 Jan 2013 - 4:30 pm | स्पंदना
आमच्या वेळी नव्हते हो असले काही
हे वाक्य पुण्यातल्या आठ वर्षाच्या पोरापासुन ऐंशी वर्षाच्या म्हातार्यापर्यंत कोणीही म्हणु शकतं. इति. पु.ल.18 Jan 2013 - 10:47 am | पैसा
हे हीन-दीन मधलं की दीन-दीन मधलं? =))
18 Jan 2013 - 12:02 pm | सूड
माझ्यातर्फेही ताईदिनाच्या सर्व मिपाकर तायांना शुभेछा ....अगदी मीनाक्षीताईसकट !! ;)
18 Jan 2013 - 1:46 pm | अत्रुप्त आत्मा
@अगदी मीनाक्षीताईसकट>>>
18 Jan 2013 - 4:27 pm | स्पंदना
दोन्हीतल गो बाय. पन 'दिन'मधल नाही.
18 Jan 2013 - 1:19 pm | संजय क्षीरसागर
याविषयी `देवाला रिटायर का करा?' या क्लिंटनच्या पोस्टवर सविस्तर चर्चा झाली आहे. कुणावरही तुटून पडण्यात मला काहीही इंटरेस्ट नाही.
मूळ लेखनात दुहेरीपणा जाणवला. एकतर देव आहे म्हणा आणि तुमच्या मस्तीत (किंवा भ्रमात राहा). सावरासावरी करायला 'व्हर्च्युअल स्नेही' वगैरे कशाला हवं? इफ यू बिलीव देन देअर इज नो वर्च्युअॅलिटी, इट इज रिअॅलिटी फॉर यू.
पराच्या तिथल्या प्रतिसादातला हा भाग मस्त आहे:
मूळ लेखनात तफावत आहे (आणि प्रत्येक भक्तीच्या मनात ती असतेच) तेवढी दाखवून दिलीये.
18 Jan 2013 - 1:49 pm | गवि
मला तर "व्हर्च्युअल स्नेही" हीच थीम स्पष्टपणे समोर आली असं वाटलं. देव ईश्वर हे निरुपणात्मक किंवा विचाराअंती काढलेलं अन्य इंटरप्रिटेशन वाटलं. प्रथम वाचनात माझ्या मनात विचार आला होता की "हे आंतरजालीय मैत्रीवर आहे असं दिसतंय, त्यामुळे कोण बुवा हा आंतरजालीय मित्र असे सूचक चवकशीवजा प्रतिसाद येतात की काय?!"
पण देवाचं मुळातच काही आहे वाटलं नाही. केवळ अक्षरांमधे घडणारा संवाद देवाशी रिलेटेड वाटत नाही. निदान प्रथम अर्थ तरी तसा नसावा. त्यामुळे सारवासारव म्हणून व्हर्च्युअल मैत्री हा मुद्दा नंतर पुढे आला हे पटत नाही.
18 Jan 2013 - 2:53 pm | संजय क्षीरसागर
या ओळींचा अर्थ तुला काय वाटतो?
चिन्मय कुणाला म्हणतात?
18 Jan 2013 - 3:41 pm | चाणक्य
मला तर मृण्मय कोणाला म्हणतात ते पण नाही माहिती?
(ईनिगोय ताई, ह्.घे.)
18 Jan 2013 - 3:52 pm | स्पा
18 Jan 2013 - 4:24 pm | संजय क्षीरसागर
पण त्यांच नातं `रिअल' असेल, वर्च्युअल किंवा अक्षर वगैरे नाही!
18 Jan 2013 - 1:24 pm | संजय क्षीरसागर
हे अत्यंत खास आहे
18 Jan 2013 - 4:24 pm | स्पंदना
संक्षी धन्यान बरच काही लिहिलं आहे. मलाही थोडफार तसच वाटतं. तरीही काही सांगायचा प्रयत्न. धन्याने उल्लेखलेला "मरून रोब", मलासुद्धा उल्लेखायचा होता. ज्या एका लेखाने तुमची ओळख झाली. काहीतरी वेगळा विचार मांडणे, त्यावर हिरीरीने चर्चा करणे. बहुतेकदा त्याचा अतिरेकही जाणवला.पण तो मुद्दा इथे नाही. तुमचा विश्वास, तुमची मते तुम्ही मांडणे इथवर सगळ ठिक. पण मग अचानक तुम्ही तुटुन पडलात कश्यावर तरी. ते ही राहुदे. होतय काय तर जे "तुम्ही" होतात ते बदललात. नुसतेच कुठेतरी एक "वाईट" भावना घेउन "धुइइल्ल्या" सुरु झाला. लक्षात येतय का मी काय म्हणतेय ते? "तुम्ही" राहिला नाहीत. डु नॉट लुज युऑर सेल्फ. मला विचाराल तर दुसर्यान आपल्याला कस पाहिलं या पेक्षा मी मला कसा पाहतो हे जास्त महत्वाच. अन तुम्ही आज स्वतःला पाहाल तर ओळखु नाही शकणार.
18 Jan 2013 - 5:17 pm | संजय क्षीरसागर
तुझी ओळख झाली ती `मरून रोब' वरच्या प्रतिसादानं! कथेनं निर्माण केलेल्या माहौलवर तू प्रतिसाद दिला होतास (आणि अन्फॉरच्युनेटली..त्याच प्रतिसादात तिथल्या माहौल बदलवणार्या प्रतिसादाला श्रीफल आणि शाल अर्पण केली होतीस)
अध्यात्मात एक बेसिक फंडा आहे. स्वतःची व्याख्या करण्याच्या फंदात पडू नका! त्यामुळे मी स्वतःची व्याख्या करत नाही (आणि कुणी केली तर तो त्याचा प्रश्न आहे म्हणून सोडून देतो). सो आय वोंट चेंज!
`मरून रोब' ते `बुद्ध' हा एकच माहौल आहे त्यात काहीही बदल नाही!
18 Jan 2013 - 5:29 pm | धन्या
"स्वतःची व्याख्या करण्याच्या फंदात पडू नका" हेच जर "मी कोण आहे याची व्याख्या करण्याच्या फंदात पडू नका" असं वाचलं तर "मी कोण?" याचं उत्तर हिंदु किंवा वैदिक अध्यात्म "अहं ब्रम्हास्मि" किंवा "चिदानंदरुपो शिवोहम" असं देतं.
18 Jan 2013 - 4:29 pm | इनिगोय
'अक्षर' हे नेमकं काय आहे, याबद्दल इथे चर्चा चाललीय म्हणून हा खुलासा.
अक्षर हे संपूर्णपणे एकमेकांचे व्हर्च्युअल स्नेही असणार्या दोन लोकांचं मनोगत आहे. निव्वळ शब्दांच्या माध्यमातून, व्हर्च्युअली कनेक्टेड राहणाऱ्या प्रत्येकाच्याच मनात ते असावं.
माझ्या शैलीप्रमाणे ते काहीसे काव्यात्म झाले आहे, तेच अपर्णा अक्षय यांनी नेमक्या शब्दांची निवड करून गद्यात मांडले आहे. रणजित चितळे यांच्यापासून दादा पेंगट यांच्यापर्यंत सगळ्यांनाही त्यात हाच अर्थ दिसला. दादांच्या प्रतिक्रियेत तर 'कधीही भेट न झालेल्या पण जीवाभावाच्या' मित्राचा उल्लेख आहे. इथे ही दोन नावं मुद्दाम घेते आहे, कारण या दोन मंडळींचा माझ्याशी मिपाकर या पलीकडे परिचय नाही, सो मी सोयिस्कर प्रतिक्रिया उचलल्या, हे कोणी म्हणू नये.
त्यामुळे इथे चर्चेत असलेला मुद्दा, तो लेख देवाबद्दल आहे, आणि म्हणून मी 'देवभोळी' आहे याचा. कुठेसं कुणीसं (!) म्हटल्याप्रमाणे "लेखनाचा अर्थ हे तुमचं इंटरप्रिटेशन आहे. एकाच वेळी काही लोक प्रशंसा करतात, त्यांना ते उपयोगी वाटतं आणि काही लोक लेखन निरर्थक आहे म्हणतात यावरनं ते सिद्ध होतं."
माझ्या लेखनात उठसूट देव पाहणार्यांनी तो दृष्टीकोन बहुधा आपणच आपल्या डोक्यात घट्ट बसवून घेतला आहे, या शक्यतेचा विचार करावा.
देव कोणी मानावा, आणि कोणी नाही "ही फार वैयक्तिक बाब आहे. त्यामुळे ती स्वतःपुरती ठेवावी. इतरांचा त्यावर विश्वास बसेलच असं नाही. पण म्हणून त्यांना खोटं ठरवायचं कारण नाही. ज्यांना देव हवा आहे, त्यांनी तो आपापला शोधावा. ज्यांना नकोय त्यांनी तो शोधू नये. हे स्वातंत्र्य सगळ्यांना आहे." हेच माझंही मत आहे. देव, धर्म, अध्यात्म याबद्दल आपली मतं दुसर्यावर लादत राहणं मला सयुक्तिक/शहाणपणाचं वाटत नाही.
आणि माझं लेखन ज्यांनी वाचलंय त्यांना हे नक्कीच माहीत आहे, की मी अशा कोणत्याही भूमिकेचा प्रचार/पाठपुरावा करण्यासाठी लिहित नाही. त्याचप्रमाणे कोणत्याही अन्य भूमिकेचा विरोध करण्यासाठीही नाही.
दुसरा मुद्दा, लिहिलेल्या 'जीवलग मित्र संपर्काशिवाय कसा होऊ शकतो?' या विधानाबद्दल.
'संपर्काशिवाय मैत्री' असं कुठेही अक्षर मध्ये म्हटलेलं नाहीय. 'प्रत्यक्ष भेटीशिवाय मैत्री' असं ते सूत्र आहे. तो लेख 'पूर्वग्रहदुषित' मनाने वाचायचे टाळले असते, तर कोणत्याही साक्षर माणसाला या आणि अशा इतर मौलिक प्रश्नांची उत्तरं सापडली असती.
शिवाय अशी मैत्री करता येते, असा अनुभव मिपाकरांच्यातच अनेकांनी घेतलाय. अगदी गविंनीही त्यांच्या एका लेखात अशा घट्ट मैत्रीचा उल्लेख केलाय. त्यामुळे केवळ क्षीरसागरांना तसा अनुभव आला नाही, म्हणजे तो अनुभवच खोटा आहे, असं होत नाही. स्वतःच्या मर्यादित अनुभवांवरून तिथे त्या धाग्यातल्या सगळ्याच्या सगळ्या प्रतिसादकांना मोडीत काढण्यासारखं आहे हे!
सहसा पोस्ट टाकून झाल्यावर प्रतिक्रिया वाचणे आणि त्यात नवे काही दिसेल ते समजून घेणे असा माझा त्या पोस्टशी संबंध उरतो. त्यामुळे इतरजण जी चर्चा/वादावादी/आणि आपल्या कुवतीनुसार चिखलफेकही करतात, त्यात माझी भूमिका केवळ वाचकाची. आणि त्याचं मी काही वाटून घेत नाही.
लेख/पुस्तक/अन्य कोणतीही कलाकृती प्रत्येकच आस्वादकाला समजावून सांगत राहणे, हे मला त्या आस्वादकाच्या समजून घेण्याच्या कुवतीवरच बोट रोखण्यासारखे वाटते. त्यामुळे आजपर्यंत कधीच माझे लेख आपणहून स्पष्ट करत राहावे, हा प्रकार मी केला नाही. मात्र हे जे होतं आहे, त्यातून मिपावरचं वातावरण दुषित होणं हे मला माझ्या घरचं वातावरण गढूळ होण्याइतकं अप्रिय आहे. त्यामुळे हे सगळं लिहिणं आवश्यक वाटलं.
वर बाळ सप्रे यांनी 'आपला मुद्दा एखाद्याला पटला नाही तर वैयक्तिक रोष नसावा' असा अतिशय वाजवी मुद्दा मांडला आहे. पण दुर्दैवाने आकस, किंवा दुसर्याला तुच्छ लेखणे, हीच जर कोणाच्या लेखनाची प्रेरणा असेल आणि त्यासाठी कोणताही मार्ग स्वीकारायची तयारी असेल (जिज्ञासूंनी अवश्य तपशील जाणून घ्यावेत) तर त्याला काय करता येईल? आपल्या मतांशी असहमती दर्शवणार्यांना मत्सरी, मूर्ख, भ्रमिष्ट अशी विशेषणं वापरणं ही सवय असेल, तर त्याचं काय करावं? सत्य गवसलेल्या व्यक्तींना ही परिपूर्णता कशी, आणि हे कोणतं अध्यात्म, हे सांगता येईल का?
माझ्या या प्रतिक्रियेवर उत्तर काय असणार आहे, याची पूर्ण कल्पना आहे. तरीही शेवटी फक्त एकच सांगावंसं वाटतं, केवळ मी गुडघ्यावर डोकं टेकून बसल्याने सिद्ध किंवा बुद्ध झालो, असा भ्रम किती काळ बाळगणार?
18 Jan 2013 - 4:42 pm | संजय क्षीरसागर
आणि मला ही उत्तर द्यायला आनंद झाला असता ....पण शेवटी घोळ झाला !
तेच विचारावस वाटतं, ही स्वाक्षरी देवभोळेपणाशिवाय काय दर्शवते?
18 Jan 2013 - 5:05 pm | अक्षया
लेखाचा मुळ विषय जर जीने लिहीला आहे तीने समजावुन सांगुन पण नाकारला जातोय तीथे कोण काय बोलणार? आणि स्वतःला हवा तसा अर्थ काढुन उगीच काथ्याकुट केला जात आहे असे वाटते आहे.
त्या अक्षर लेखाचा आणि स्वाक्षरीचा संबंध का लावला जातो आहे? लेखावर प्रतिक्रीया लिहिणे ठीक पण कोणाची स्वाक्षरी आणि लेख याची सांगड घालण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे असे मला वाटते.
18 Jan 2013 - 5:15 pm | धन्या
असेच मलाही वाटते. :)
18 Jan 2013 - 5:21 pm | अनाम
मुद्दे संपले की गुद्दे सुरु होतात अस मोठमोठाली माणसं सांगुन गेलीत . :)
18 Jan 2013 - 5:31 pm | संजय क्षीरसागर
हे त्यांनी लेखनाचा आशय लक्षात न घेता केलेलं विधान आहे.
म्हणून विचारलय की `देव आहे अशी स्वाक्षरी ठोकणं' म्हणजे देव आहे हे सिद्ध करणं आहे का?
18 Jan 2013 - 5:34 pm | गवि
उत्तम लिहीणार्या दोन चांगल्या सदस्यांमधे वाद आणि चकमकी चालत राहू नयेत, शब्दच्छल होत राहू नये म्हणून आपल्याला काहीच करता येत नसल्याने मी गुडघ्यावर डोकं टेकून हत"बुद्ध" झालो आहे इतकंच कळतंय.. :(
18 Jan 2013 - 5:40 pm | धन्या
बुद्ध हे कुणा व्यक्तीचं नाव नसून ती एक अवस्था आहे. तुमच्या या प्रतिसादावरुन तुमची अवस्था खुपच अवघडल्यासारखी झाली आहे असं वाटतंय.
18 Jan 2013 - 5:51 pm | किसन शिंदे
गवि,
एक बाजू शांत असली तरी दुसर्या बाजुने हा वाद मुद्दामच उकरून काढला जातोय असंच दिसतंय आणि एकदा का डोळ्यावर तिरस्काराची पट्टी बांधली कि सगळं जगंच तिरस्कारमय वाटू लागतं आणि मग अशा वेळी आपल्याकडून कितीही समझोता करण्याचा प्रयत्न केला तरी तो निष्फळच ठरतो.
18 Jan 2013 - 6:10 pm | बॅटमॅन
किसनदेवा, येनकेनप्रकारेण ट्यार्पी वाढवायचा असला की असंच होतं. "बदनाम होगा तो क्या नाम न होगा?" असे श्री श्री श्री १००८ जॅक चिमणाजी(स्पॅरो, रा. ब्ल्याक पर्ल, मु. टोर्टूगा बुद्रुक) म्हणून गेलेत.
19 Jan 2013 - 7:23 am | मोदक
सहमत..
खरे तर लेखिकेने 'लेख समजावून देण्याची' आवश्यकता नव्हती. अक्षर सारखा नितांतसुंदर लेख 'समजावून देणे' हा प्रकारच मुळी ' साक्षर आणि सुजाण' वाचकांच्या बुध्दीचा उपमर्द ठरतो.
"कंस्ट्रक्टीव्ह क्रिटिसिझम नसेल तर दुर्लक्ष ही सर्वात मोठी शिवी आहे" असे विमे इथेच कुठेतरी म्हणाला आहे ते आठवले.
हे व अशाप्रकारची सूडभावनेतून केलेली सो कॉल्ड विडंबने मात्र मानवी स्वभावाचा मजेशीर पैलू दाखवून जातात. 'अहंकार माणसाकडून काय काय करवून घेतो' याची प्रचिती आली.
19 Jan 2013 - 10:54 am | संजय क्षीरसागर
लेखनाकडे त्या भावनेतून बघितलं जातय.
लेखिकेनं देखील स्पष्टीकरण देता येईनासं झाल्यावर
असा उघडपणे व्यक्तिगत प्रतिसाद दिलाय.... कोणत्या प्रतिसादात तिरस्कार आहे आणि तिरस्कार कशाला म्हणतात हे तुमचे प्रतिसाद दर्शवतात असं विचाराअंती लक्षात येईल.
19 Jan 2013 - 11:57 am | मोदक
ब्वॉर संक्षी. तुम्ही जिंकलात आम्ही हरलो.
खुश?
19 Jan 2013 - 12:15 pm | धन्या
हे पटलं.
बाकी चालू दया. :)
18 Jan 2013 - 4:34 pm | ५० फक्त
हा लेख आणि त्यामागची प्रेरणा असलेला लेख माझ्यासारख्या ब-याच अज्ञानी मिपाकरांना ओएसओएस पडला आहे, कुणीतरी समजावुन सांगायला एक नविन लेख लिहिलं का आम्हासाठी ?
18 Jan 2013 - 5:03 pm | संजय क्षीरसागर
यात तुम्ही सगळ्यांना गोवायचा प्रयत्न करून इंटरनेट मैत्रीशी संबंध जोडलाय!
लेखावरच्या प्रतिसादात मात्र तुम्ही म्हटलय
आता भेटणार नाहीच म्हटल्यावर चालायच कशाला?
आणि हो,
इंटरनेट मैत्री रियलशी असते चिन्मयशी नाही!
18 Jan 2013 - 5:49 pm | विलासिनि
नितस अजून काही कळ्त नाही पण हात हे काय लिहीताहेत वेडयासारखे....
रोको मत!! टोको मत!!
रोको मत!! टोको मत!!
किताबोंके बाहर किताबे बहोत....
18 Jan 2013 - 6:21 pm | Dhananjay Borgaonkar
निरबुद्ध
लोका सांगे ब्रम्हज्ञान, आपण कोरडे पाषाण.
मी मी मी मी मी मी मी आणि फक्त मीच...
18 Jan 2013 - 6:24 pm | अक्षया
कुंकु का लावतात? थुक्का का लावतात? बार का लावतात? लोक जास्त डोकं का लावतात? :)
18 Jan 2013 - 6:58 pm | किसन शिंदे
अक्षया ताई, ह्याच्याऎवजी लोक जास्त डोकं का खातात असा बदल केला तर?
19 Jan 2013 - 9:52 am | अक्षया
+ १
18 Jan 2013 - 7:36 pm | संजय क्षीरसागर
इतकंच सांगण्याचा प्रयत्न होता. चर्चा व्यक्तिगत होऊन वातावरण बिघडू नये म्हणून इथे थांबतो.
18 Jan 2013 - 8:04 pm | अग्निकोल्हा
मग "निरक्षर" असं नाव का दिलयं कथेला ? ते अजिबात समर्पक नाही असंच वाटलं, हा प्रतीसाद वाचुन.
18 Jan 2013 - 8:27 pm | अग्निकोल्हा
कथा स्वानुभव म्हणत चितारली गेली आहे, म्हणुनच
या शेवटच्या वाक्याचे ती अतिशय समर्थनच करत आहे असा भास या लेखातुन निर्माण होतो.
आणि जर तुम्हाला
फक्त इतकच या कथेतुन सांगायच होतं तर आपण लेखाची अनुभवरचना/वाक्यरचना पराकोटीची चुकीची केली आहे. अथवा सामान्याची दिशाभुल करणारी केलि आहे इतपतच निश्कर्ष इथं उभा होतो.
18 Jan 2013 - 10:49 pm | संजय क्षीरसागर
तुम्ही काहीही केलं तरी त्याची भेट होत नाही. आणि झाली याचा अर्थ तुम्ही (स्वतःपुरता तयार केलेला) भ्रम सार्थ झालाय.
वॉटेवर वन कम्युनिकेटस विथ गॉड इज जस्ट वन वे.
म्हणून शेवट असा केलाय : कल्पना हेच त्याचं लिमिट आणि तीच त्याची पॉवर
पोस्ट लिहीताना इथल्या पूर्वप्रकाशित लेखाचा संदर्भ घेतला होता. दुर्दैवानं तो स्कोरसेटलींग समजला गेला आणि त्यामुळे लेखनातला मुद्दा हरवला.
18 Jan 2013 - 10:51 pm | अर्धवटराव
एक असं उदाहरण द्या जी मानवी कल्पना नाहि.
अर्धवटराव
18 Jan 2013 - 10:54 pm | संजय क्षीरसागर
यू कांट डिनाय योरसेल्फ.
18 Jan 2013 - 11:31 pm | अर्धवटराव
जर "तुम्ही" कल्पना नाहि तर "स्वतः" कल्पना आहे
जर "स्वतः" कल्पना नाहि तर "तुम्ही" कल्पना आहे
जर "तुम्ही" आणि "स्वतः" कल्पना नाहि "आहोत" हि कल्पना आहे
इजण्ट इट ??
अर्धवटराव
18 Jan 2013 - 11:31 pm | सोत्रि
अहाहा, मस्त! _/\_
बाकी चर्चा चालू राहूदे!
- (निरक्षर) सोकाजी
19 Jan 2013 - 3:47 am | अग्निकोल्हा
अहो मग तर एक गम्मतच आहे. त्याचा मतितार्थ असा की गॉडच न्हवे तर तुमचं माझाशी अथवा माझं तुमच्याशी अथवा कोणाचही कोणाशी असलेलं सगळंच कम्युनीकेशन फक्त वन वेच आहे.
कारण जर आपण स्वतःच अस्तित्वात नाही तर अनुभवाला येणारं हे जगही अस्तित्वात नाही. म्हणजेच फक्त आणि फक्त स्वतःच्या अस्तित्वाच्या आधारावरच जगाचं/देवाचं/मित्रांच/आइ-वडिलांच अथवा यच्चावत अस्तित्व असलेल्या/नसलेल्या गोश्टींच अस्तित्व आहे हे घडतं.
ह्य नियमानुसार/प्रत्यक्ष अनुभवानुसार सगळं जिवन अथवा जगच काय मुळात आपलंही अस्तित्व आहे असं मानणं हेही एक प्रकारे वन वे कम्युनिकेशनच झालं की... आणि वन वे कम्युनिकेशन भ्रामक असतं असंच आपण या लेखात सुचवत आहात, मग आपलं आस्तित्व "यू कांट डिनाय" कसं म्हणता येइल ?
19 Jan 2013 - 4:24 am | अग्निकोल्हा
- थोडक्यात व्यापक विचारांती (Big Picture) आपल्या लेखनातुन (हा लेख व त्यावरचे आपण दिलेल्या प्रतिसादांचे सार यावरुन) तयार होणारा निष्कर्श असा बनतोय की, केवळ वन वे कम्युनिकेशन आहे ह्या मुद्यावर ज्या कशा सोबत/बाबत हे कम्युनिकेशन वन वे आहे त्या गोष्टिचं अस्तित्व ठामपणे नाकारता येइलच अथवा भ्रामक आहे असं म्हणता येइलच असं नाही.
उदा. आपली भेट अजुन झाली नाहीये, मग आत्ता जर तुम्ही तुमच्या मनात म्हणालात (वन वे कम्युनिकेशन केलं) कि ग्लिफ ही व्यक्ती रंगाने काळी, बूटकी व अक्कडबाज मिशी राखणारी अथवा कुंकु लावणारी आहे(समोरीला). तर ती व्यक्ती तशी(च) असेलही अथवा नसेलही... बस इतकच. म्हणजे ग्लिफ ही व्यक्ती रंगाने काळी, बूटकी व अक्कडबाज मिशी राखणारी हे ठामपणे सिध्द व्हायला तुम्ही केवळ वन वे कम्युनिकेशन केलतं ही एकमेव प्रक्रिया पुरेशि नाही व अवैज्ञानिकही ठरु शकते.
म्हणुनच जर का मी आपले लिखाण वाचण्यात्/समजण्यात चुक करत नसेन तर या लेखाचा आपण व्यक्त करत असलेला उद्देश व लिखाणातुन निघणारा निष्कर्श यात कमालिची तफावत आश्चर्यकारकपणे सामोर येत आहे...
19 Jan 2013 - 10:06 am | संजय क्षीरसागर
पहिल्या प्रतिसादात तुम्ही केलेली जोडणी बरोबर आहे पण काढलेला अर्थ तर्कपूर्ण नाही
याचा अर्थ असा नाही :
तुम्ही आणि मी एकच रिअॅलिटी आहे कारण आपल्या सर्वांचा `मी' एकच आहे. ती निर्वैयक्तिक जाणिव आहे. तुमच्या आणि माझ्यातला संवाद (जरी इंटनेटवर आणि दोन अनोळखी व्यक्तीत असला) तरी तो अॅक्च्युअल आहे. मी माझ्या कल्पनेशी (देव) संवाद साधत नाहीये, अस्तित्वात असलेल्याशी संवाद साधतोय.
संवाद निरर्थक होण्यासाठी एक गोष्ट अस्तित्वात नसावी लागते. इथे आपण दोघही अस्तित्वात आहोत (आणि मनात आणलं तर एकमेकांना प्रत्यक्ष भेटू शकतो)
देव हा भक्तानी स्वतःपुरता निर्माण केलेला भ्रम आहे. जर एखाद्याचा देव त्याला पानापानात, फुलाफुलात, वार्याच्या झुळूकेत वगैरे दिसायला लागला तर ती व्यक्ती वास्तवापासून अलग झाली आहे. तिचा भ्रम सघन झाला आहे. शी (ऑर ही) इज कंप्लीटली टेकन ओवर बाय हर ओन इल्यूजन. आणि ती अवस्था दारूण आहे, म्हणून हा लेख.
19 Jan 2013 - 3:39 pm | अग्निकोल्हा
धार्मिक साहित्यातुन अधोरेखित झालेला देव अस्तित्वात नाही एव्हड्यासाठिच हा लेखन प्रपंच असेल तर मुद्देसुद मांडणी वाटत आहे.
:) क्लासच _/\_ ! म्हणजे आता तुम्ही पाकिस्तान मधे राहता असं कोणी म्हटलं तर तुमची तक्रार नसावी, उगाच कशाला आपण रहात असलेल्या आजुबाजुच्या प्रत्येक कस्पटामधे हा भारताचा अविभाज्य घटक आहे म्हणुन ठासुन बरळायचं ते ? असले मानसिक विभ्रम हवेतच कशाला ?
पुन्हा गोधंळ उडवलात. आपण दोघही अस्तित्वात आहोत म्हणजे काय ? तुम्हाला कशावरुन खात्री आहे की "ग्लिफ" सुध्दा अस्तित्वात आहे ? आणि तो फक्त मनाचा खेळ नाही (मी अतिशय गांभिर्यानेच हा प्रश्न अतिशय Frank उत्तराच्या अपेक्षेनेच केला आहे)
19 Jan 2013 - 8:41 pm | संजय क्षीरसागर
तुमच्या प्रतिसादावरून!
19 Jan 2013 - 10:01 pm | अग्निकोल्हा
मग
हा निष्कर्श बरोबर आहे का समजण्यात अजुनही वाचकांची चुक होतेय ?
अरे बापरे हा तर निरक्षर भ्रमाच्या किती मोठा लेप झाला ? कारण आपण म्हणताय की केवळ "तुमच्या प्रतिसादावरून!" तुम्हि माझं अस्तित्व मान्य केलतं. हे मूळातच "एक वन वे कम्युनिकेशन" आहे. कारण याक्षणी "ग्लिफ" या व्यक्तिने या धाग्यावर लिहलेले प्रतीसाद हे केवळ एकाच व्यक्तिने लिहले आहेत असे आपण "वन वे" ठरवुन मो़कळे झालात. थोडक्यात "ग्लिफ" ही एकच व्यक्ती आहे अस्तित्वात आहे जी प्रतिसाद लिहते आहे याबद्द आपण वन वे शुअर आहात, "ग्लिफ" बद्दल आपण तशी दाट अंधश्रध्दा बाळगली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग "ग्लिफ" चे अस्तित्व तुम्ही खरे कसे मानता ?
19 Jan 2013 - 11:11 pm | संजय क्षीरसागर
दोन गोष्टी आहेत :
एक, यू कांट डिनाय योरसेल्फ.
आणि दोन, देव ही मानवी कल्पना आहे
माझं या पलिकडे एकही स्टेटमंट नाही. आता तुमचे मुद्दे :
देश किंवा सरहद्द या देखील कल्पनाच आहेत. याचा अर्थ भारताला पाकिस्तान म्हणा असा नाही.
तुम्ही ग्लिफ असा की संजय मुद्दा तो नाही. `तुम्ही आहात' यू एक्सिस्ट... दॅटस द पॉइंट.
आणि देव नाही कारण ती कल्पना आहे.
20 Jan 2013 - 12:38 am | अग्निकोल्हा
अहो पण मुळात मी सुध्दा तेच म्हणतोय की वन्स यु एक्सेप्ट ओन्ली यु एक्सिट, देन ऑल द रेस्ट इज जस्ट अ वन वे कम्युनीकेशन... इनक्लुडींग बट नॉट लिमीटेड टु अ गॉड बट एव्हरिथींग. दॅट इज द रिअल मॅग्निट्युड ऑफ युअर स्टेटमेंट कमिंग अप. अँड इट इज यु हु सेड हिअर कि वन वे कम्युनीकेशन हा भास असतो. म्हणजे केवळ देवच न्हवे तर सगळाच भास असतो असं आपण म्हणत आहात. जे मला फार विचीत्र वाटतयं.
विधान चर्चेच्या माध्यमातुन भरकटले आहे. ज्या प्रमाणे भारताचा कण अन कण भारताचा अविभाज्य भाग आहे मग माती असो नाही तर आंबे (रिगार्डलेस ऑफ नेमिंग कन्वेंशन) व देश किंवा सरहद्द या देखील कल्पनाच. तसच जर काल्पनिक परमेश्वराची सर्वव्यापकता सर्वत्र शोधणार्या(पानापानात, फुलाफुलात, वार्याच्या झुळूकेत वगैरे ) वैज्ञानिकास आपण जे म्हटले आहे तेच प्रंमाण भारत पाकिस्तान जपान अशी सरहद मानणार्यालाही म्हटले पाहिजे/लागु होते कारण आपण म्हणता तसं देश किंवा सरहद्द या देखील कल्पनाच/भ्रमच आहेत. नाही का ? या लोकांना भ्रमीश्टच म्हटलं पाहीजे. बरोबर ना ?
19 Jan 2013 - 11:58 pm | कवितानागेश
थोडक्यात "ग्लिफ" ही एकच व्यक्ती आहे अस्तित्वात आहे जी प्रतिसाद लिहते आहे याबद्द आपण वन वे शुअर आहात, "ग्लिफ" बद्दल आपण तशी दाट अंधश्रध्दा बाळगली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग "ग्लिफ" चे अस्तित्व तुम्ही खरे कसे मानता ?>
म्हणजे ग्लिफ या अनेक व्यक्ती आहेत का?
की glyph feels that he doesn't exist! असे काही होतय?
20 Jan 2013 - 12:49 am | अग्निकोल्हा
ग्लिफ काय आहे अथवा तो काय फिल करतो या पेक्षा आपण ग्लिफ बाबत जे काय फिल करतो तो एक भास आहे असे या धाग्याच्या लेखकाचे जे विधानीक विचार आहेत जे मला पटायला अवघड जातात...
लेखकाने दिलेल्या विधानांचा सखोल निरीक्षण केल्यास ते केवळ देवच न्हवे तर इतर सगळ्यालाच (अगदी देशा पासुन सरह्द्दी पर्यंत ते अनुभवाला येणार्या प्रत्येक गोश्टीला) फक्त एक "कल्पना" हे रुप (बहुदा अजाणतेपणे पण अतिशय सुस्पष्टतेने) लागु करत आहेत. असं कसं काय ते या सगळ्याला भ्रम म्हणु शकतात ?
20 Jan 2013 - 12:53 am | अग्निकोल्हा
आणि वन्स वि एक्सेप्ट ओन्ली यु एक्सिट, देन ऑल द रेस्ट इज जस्ट अ वन वे कम्युनीकेशन... इनक्लुडींग बट नॉट लिमीटेड टु अ गॉड बट एव्हरिथींग. दे शुड बी रिस्पॉन्सीबल फॉर व्हाट आर दे क्लेमिंग हिर.
20 Jan 2013 - 12:58 am | कवितानागेश
आपुलाचि वाद आपणासि|
20 Jan 2013 - 1:12 am | अग्निकोल्हा
एखादी गोश्ट कल्पना आहे असं म्हणताना कल्पना या प्रक्रियेची व्याप्ती केवळ परमेश्वर मानणे इतपतच नाहिये तर त्या पलिकडे ही पोचली आहे. नसलेल्या गोश्टींची कल्पना करुनच असलेल्या गोश्टींची सोय केली जाते. जसं कि...
१) कालगणना. प्रत्यक्षात याला अस्तित्व नाही पण ही काल्पनीक गोश्टही किती सुसुत्रता आणते रोजच्या दिनक्रमात ?
२) आपण बघत असलेला चित्रपट, याला अस्तित्व नाही तरी किती समरस होतो आपण कल्पनेकडे ?
३) आवाज कॅसेट वर टेप करुन मोटार जोरात फिरवली की मांजराचा आवाज निघतो, त्याला मांजराचं चित्र जोडल कि सुरेख काम झालं, याच संकल्पनेवर अँड्रॉइड अॅप आज किती पॉप्युलर झालय. आपण असं वाटत तिथल मांजर जणु आपण जे बोलु ते त्याच्या आवाजात रिपीट करतयं.... काल्पनिकच पण किती सुरेख ?
कल्पना ही एक भलेही गुंतागुंत असताना त्याच वापर हा एक भ्रमच असताना आज त्याने आपल आयुष्य किती व्यापलय/ सुसह्य करत आहे... आणी हे सगळ घडायला या धाग्याच्या लेखकाने म्हटल्याप्रमाणे कल्पना हेच यामागचं लिमिट आणि तीच यामागची पॉवर आहे. असं असताना धागा कर्ता सामान्यांना गोधंळा पाडणारी विधाने का सपोर्ट करत आहे हे अनाकलनिय होतयं... :(