तू म्हणजे,,

मुरलीधर परुळेकर's picture
मुरलीधर परुळेकर in जे न देखे रवी...
27 Nov 2012 - 6:58 am

तू म्हणजे अशी नशा
ग्लास इतका फ़ुल्ल भरलेला,
की ग्लास सुद्धा होई शराब !!!
तू म्हणजे अशी हट्टी की ;
आधीच घाट रस्ता
आणि त्यात पुन्हा गाडी खराब !!!

तू म्हणजे वैशाख वणव्यात
वळवाचा पाऊस !!
तू म्हणजे कुडकुडत्या थंडीत
आईस्क्रीम खायची हौस !!!

तू म्हणजे काळे ढग
आणि नाचणारा मोर
तू म्हणजे हळूच चिमटा
काढणारं खोडकर पोर

तू म्हणजे अस्सं प्रेम आईचं तान्ह्यावरती
तू म्हणजे असा राग बापाचा पोरावरती

तू म्हणजे वाफ़ाळलेली कॉफ़ी
आणि हवासुध्दा अशी धुंद
तू म्हणजे पावसची पहिली सर,
आणि सुटलेला मातीचा गंध….

तू म्हणजे कागदी नाव,
आणि इवलासा पाण्याचा ओहोळ,
तू म्हणजे माझ्या डॊळ्यातलं पाणी
आणि असंख्य आठवणींचा मोहोळ !!

कधी कधी तू इतकी शांत इतकी गप्प…
जसा माझ्या मनानं माझ्याशीच पुकारलेला बंद
आणि आपले सगळेच वाद / संवाद ठप्प !!

कधी तू अशी कि जशी शांत, निवांत वेळ
आणि माझा माझ्याच सावल्यांशी चाललेला खेळ !!!!!!!

प्रेमकाव्य

प्रतिक्रिया

ह भ प's picture

27 Nov 2012 - 1:39 pm | ह भ प

मस्तंच..
'तू तेव्हा तशी' आठवलं..

ज्ञानराम's picture

28 Nov 2012 - 4:58 pm | ज्ञानराम

छान. फुल्लटू ...आहे.

श्री गावसेना प्रमुख's picture

28 Nov 2012 - 5:05 pm | श्री गावसेना प्रमुख

1

अनिल तापकीर's picture

29 Nov 2012 - 8:06 am | अनिल तापकीर

मस्त

अन्या दातार's picture

29 Nov 2012 - 9:32 am | अन्या दातार

मुरली परुळेकरांनी एकेकाळी बह्या वाचायला देण्याचे वादे केले होते ते आठवले!