यश राज फिल्म्स' - YRF, नाम तो याद होगा....(" *** नाम तो याद होगा ".. हा YRF चा अजरामर झालेला डायलॉग कोण विसरू शकेल..), असं जिव्हारी लागण्यासारखं नकळत, अबोलपणे कदाचित बोलून गेले असतील 'यश चोप्रा', असं वाटून जातं काहीसं, त्यांना हा माझा मानाचा मुजरा...
'जीवेत शरदम शतम' म्हणायचं राहून गेलं, असं काहीसं वाटून गेलं असेल तमाम सिनेमाप्रेमी लोकांना आणि त्यांना ही चुटपूट सदैव बेशक लागून राहील.
पाहूया त्यांची ही 'सतत तेवत राहणारी प्रेमाची मशाल' कोण पुढे घेऊन जाईल ? शेवटी जस आपण म्हणतो, "सचिन तो सचिनच, किंवा लता ती लताच, तसं यश चोप्रा ते यश चोप्राच". "प्रेम आणि निखळ प्रेम" , हा साधा धागा घेऊन त्याभोवती 'कित्येक' प्रेम-चित्रपट निर्माण करता येतात, गुंफता येतात हे यशजींकडून शिकावं, कुठल्याही निर्मात्या दिग्दर्शकाने. (लोकांना इथे भलतंच वाटेल की मी YRF चा प्रवक्ता आहे की काय.. ;-)..).... असो..
तर मूळ मुद्दा जो चित्रपटाचा आहे, "जो पर्यंत माझ्यात प्राण आहे तो पर्यंत तुझ्यावर प्रेम करीन मी"... -- "जब तक है जान", अशा काहीशा आपण अनेक प्रेमि युगुलांच्या आणा भाका ऐकल्यात, ऐकतो आणि ऐकत राहू, पण किती त्यांवर आजकाल खरे उतरतात हा एक 'सर्वेक्षणाचा विषय' होऊ शकतो.. असो..
"समर आनंद" (शाहरुख खान), नुसती चित्रपटात एन्ट्री घेतली पठ्ठ्याने आणि शिट्ट्याच शिट्ट्या. एवढ्या "मीरा" (कतरिना) आणि "अकीरा"ला (अनुष्का) सुद्धा नाही मिळाल्या हो.. :-(.. कससं झाला मलातरी.... [अपवाद फक्त समर आणि मीराच चुंबनदृश्य सोडलं तर.. :P..... सल्लू रागावेल हा.. चिडवू नका त्याला]. तर सांगायचा मुद्दा हा की, अजूनही शाहरुखचा फैन वर्ग लयं आहे, हे दिसून आलं. (अजूनही अशासाठी म्हटलं राव कारण कि साहेबांचं वय दिसून येतं कि या चित्रपटात, 'मीरा/अकिरा वर्सेस समर आनंद .. तुम्हीच पहा').. असो..
बॉम्ब डिस्पोसल स्क्वाड.. अम्म्म्मम.. 'बॉम्ब विरोधी पथकात' (बरोबर आहे का भाषांतर ते नंतर सांगा मला... ;-)... ), तेही भारतीय सेनेच्या पथकात काम, ह्या एन्ट्रीने समर सर्वांसमोर सादर केला जातो. बॉम्ब निकामी करण्यात एक्सपर्ट.. आकडा निकामी करण्याचा ९७ आणि ९८ व्याच्या तयारीत. लगेच हॉट गर्ल अकीराची एन्ट्री, डिस्कवरी वाहिनीची प्रतिनिधी. नेमकी तिच्या हातात समरची डायरी पडते, आणि टिपिकल प्रेमाचा फ्ल्याशब्याक [Flashback] सुरु होतो. 'डन डन लंडन' चा मागे नजारा, आणि आपली दुसरी हॉट गर्ल, मीराची एन्ट्री. पठ्ठ्या समर झाला की हो शिकार, काय म्हणतात ते पहिल्या नजरेतल्या प्रेमाचा.
भारतीय मुलाशी लग्न नं करण्याचा विडा उचलणारी मीरा शेवटी भारतीय समरच्याच प्रेमात पडते. पण इतर टिपिकल चित्रपटांप्रमाणे मी बाबांना कसं सांगू, त्यांनी आई नसताना ('नीतू कपूर'.. ही सुद्धा आहे हो...'ऋषी कपूर'च्या प्रेमाखातर सोडून देते मीराच्या बाबांना, 'अनुपम खेर'ला), मला वाढवलं, मी जे मागितलं ते दिलं आणि आता त्यांनी माझ्याकडे त्या अमुक मुलाशी लग्न कर, असं म्हटल्यावर नाही म्हणू शकत नाही, वगैरे वगैरे.. पण शेवटी एव्हर ग्रीन, समरच्या प्रेमात पडतेच ती. पण दैवाच्या तिच्या नियतीत भलतंच वाढून ठेवलेलं.
आधुनिक गर्ल, आजकालच्या पिढीच प्रतिनिधित्व करणारी मीरा देवाला खूप मानते, आणि आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपली सर्वात आवडती गोष्ट सदैव त्याग करण्याची तयारी दर्शविते (चांगली गोष्ट आहे, जी आजकाल फार दुर्मिळ झाली आहे या स्वार्थी जगात..), आणि इथेच ती नेमकी या चित्रपटात घोळ करून बसते. पुढे समरचा अपघात आणि ती देवाकडे त्याच्या प्राणाची आण भाकते आणि बदल्यात तिची आवडती गोष्ट, समरला, पुन्हा कधी भेटणार नाही, हे मागून बसते... पुढे समर वाचतो, मीरा त्याला तिची शपथ सांगते आणि समर देवाशी भांडून, 'स्वतःच्या प्राणाशी खेळत राहीन, बघूया मला तू कितपत जिवंत ठेवतोस', असं काहीसं म्हणून भारतात परततो वगैरे वगैरे..
झालं, ही एवढी डायरी वाचून अकिरा प्रेमात पडते हो समरच्या. चित्रपट पुन्हा आता सद्य स्थितीत येतो. पण हीच का ती अकिरा, जी प्रेमाच्या आधी सेक्स करण्याकडे कल आहे असं सांगणारी, बॉयफ्रेंडने सोडायचं दुःख नको म्हणून त्यालाच सोडणारी, आणि आता निखळ प्रेमाच्या गप्पा करणारी... खरंच प्रेम काय काय करू शकतं हो.
(मधल्या स्टोरीकरिता, इअर मसाल्याकरिता चित्रपट नक्कीच पहा तुम्ही हो... सर्व काही सांगितलं तर मजा तर उरणार नाहीच पण ही लोकं मला आत टाकतील ना हो) :-)... असो..
पुढे समरला पुन्हा अपघात होतो, पुन्हा डोक्याला मार लागतो आणि तो आपली सद्यस्मृती विसरतो आणि दहा वर्ष आधी जाऊन पोहोचतो स्मृतीच्या बाबतीत. पुन्हा मीरा येते त्याच्या आयुष्यात, डन डन लंडनमध्ये. अकीरा तिची समजूत काढते, आणि समर अजूनही तुझ्या निखळ प्रेमात आहे हे सांगते. मीही त्याच्या प्रेमात पडले, असंही निरागसपणे सांगते ती. पण तो सर्वस्वी तुझाच आहे वगैरे वगैरे आणा भाकते. समरची स्मृती येते, त्याला सद्य परिस्थितीची जाणीव होते, मीराची देवाला दिलेली शपथही आठवते, आणि पठ्ठ्या भारतात परततो. (मध्ये म्हटल्याप्रमाणे चित्रपट पहा, नाहीतर मला विचाराल, की वरच्याच परिच्छेदात हा पठ्ठ्या भारतात परततो म्हटलंय, तर पुन्हा भारतात कसा परततो हो... अहो हो.. काही खोडसाळ मला विचारतीलही तसं, म्हणून हा आधीच खुलासा करण्याचा अट्टाहास... ). अकिरा जाता जाता मीराला एक मौलिक सल्ला देऊन जाते, की 'देवाने तुझी परीक्षा घेऊन झालीय आता आणि त्याने फक्त तुझ्याचसाठी त्याला राखून ठेवलाय, जिवंत ठेवलाय', वगैरे.
झालं, मीराला संपूर्ण चित्रपटाच्या शेवटी साक्षात्कार होतो आणि ती पुन्हा भारतात समरकडे प्रेम व्यक्त करण्यासाठी येते....तेव्हा पठ्ठ्याचा बॉम्ब निकामी करण्याचा आकडा १०८ वर जाऊन पोहोचलेला असतो....असो..
साठा उत्तरी कहाणी सुफळ संपूर्ण...
कळावे लोभ असावा
-- के डी
+९१-९९२०-५७७-८०२
Times of India ने या चित्रपटाला २-१/२ आणि rediff ने ३ स्टार दिलेत... तेव्हा चित्रपट पाहणेबल आहे.. निदान शाहरुख, कतरिना आणि अनुश्कासाठी आणि निव्वळ यशराज फिल्म्स आहे म्हणून तरी नक्कीच पहा, मी म्हणेन. Hats off यश चोप्रा..
चित्रपटासाठी ३ स्टार *** माझ्यातर्फे. १/२ स्टार फक्त आमच्या मीरा आणि अकीरासाठी हो....काय समजलात.. बाकी ठरवणारे तुम्ही सुज्ञ आहातच....
www.hindimuvireview.blogspot.in, by KEDI
प्रतिक्रिया
14 Nov 2012 - 11:05 pm | कपिलमुनी
एखादा लेखन प्रकार हाताळताना त्याचे काही नियम पाळायचे असतात .. उचलला हात आणि टंकले असं नको !! एका चांगल्या लेखकाने एक चांगला वाचक असला पाहिजे असा म्हणतात. तुम्ही चित्रपट परीक्षण वाचली आहेत का ? मिपावर खुप छान चित्रपट परीक्षण आहेत .. चित्रपटाची उत्सुकता कायम राहील इतपत कहाणी सांगून काही ठराविक मुल्यांवर त्या चित्रपटांचे समीक्षण/ परीक्षण करायचे असते.बाकी प्रेक्षकांवर सोडून द्यावे..
15 Nov 2012 - 12:16 am | वीणा३
नाही मिळाल्या हो, सल्लू रागावेल हो, ही सुद्धा आहे हो, खरंच प्रेम काय काय करू शकतं हो,नक्कीच पहा तुम्ही हो, आत टाकतील ना हो, भारतात कसा परततो हो... अहो हो, आणि अकीरासाठी हो
15 Nov 2012 - 12:40 am | जेनी...
हो हो हो??
अगं किती हो?
=))
15 Nov 2012 - 12:43 am | जेनी...
परिक्षण ओघवतं पाहिजे ...जसं अगदी चिमटीत रांगोळी पकडलिय ,पण सोडताना मात्र
कुठे जास्त आणि कुठे नेमकीच ,ह्याचं गुढ त्या रांगोळीलाहि कळु नये .
हे असं कुठेच काहि दिसलं नाहि .
15 Nov 2012 - 10:02 am | चाणक्य
अगदी अगदी.
15 Nov 2012 - 12:59 am | निनाद मुक्काम प...
माझा वाचतांना गोंधळ उडाला होता.
परत एकदा वाचले तेव्हा धान्यात आले.
आमचा बुध्यांक अमळ जरा अधू आहे.
15 Nov 2012 - 1:04 am | किसन शिंदे
चित्रपट परीक्षण म्हटलं कि फक्त परा आणि समीरसूर हि दोन नावं डोळ्यासमोर येतात.
15 Nov 2012 - 2:28 am | सुहास झेले
:) :)
15 Nov 2012 - 9:24 am | जेनी...
किसन मान्य आहे
पण नव्या लेखकांनीहि प्रयत्न करायलाच हवेत . त्यांच काहि चुकत असेल ,
लेखनात काहि त्रुटी असतिल तर वाचक सांगतातच .
फक्त एकच लक्षात ठेऊन असावं ,
वाचकांनी लिखानाबाबतच टिका टिपनी करावी वैयक्तिक पातळीवर जाऊ नये .
आणि लेखकाने लेखाबद्दलच्या टिका टिपन्यांना चॅलेन्ज म्हणुन स्विकारावं , त्याचा राग
मानु नये .
मग प्रगती कुठेच थांबत नाहि .
16 Nov 2012 - 1:36 pm | नगरीनिरंजन
फारएंड साहेबांना विसरू नका रे!
17 Nov 2012 - 3:43 pm | विश्वनाथ मेहेंदळे
परीक्षण या शब्दाच्या व्याख्येचे पुनर्लेखन झाले की काय ?
15 Nov 2012 - 7:49 am | ५० फक्त
ब-याच गोष्टी कंसात का लिहिल्या आहेत समजलं नाही, त्याच कंसाबाहेरही चालल्या असत्या. असो, जमेल ह्ळुहळु. लिहित रहा, आपल्याकडं काय कमी सिनेमे निघत नाहीत.
15 Nov 2012 - 10:59 am | गवि
"कंस सोडवा" नावाचा भीतीदायक गणितप्रकार शाळेच्या पुस्तकात असायचा अशी आठवण जागी झाली. आणखी कोणाला आठवतंय का?
पण कंस सोडवल्यास लेखनप्रयत्न उत्तम आहे. असेच येऊ दे आणखी नव्या चित्रपटांबाबत. अधिक लोक परीक्षण लिहायला लागले की एकाच सिनेमाकडे पाहण्याचे अधिक अँगल्स / परस्पेक्टिव्ह मिळतात. त्यामुळे वाचकांना जास्त नीट प्रकारे मत बनवता येतं.
15 Nov 2012 - 3:03 pm | ५० फक्त
पण कंस सोडवल्यास लेखनप्रयत्न उत्तम आहे. असेच येऊ दे आणखी नव्या चित्रपटांबाबत. अधिक लोक परीक्षण लिहायला लागले की एकाच सिनेमाकडे पाहण्याचे अधिक अँगल्स / परस्पेक्टिव्ह मिळतात. त्यामुळे वाचकांना जास्त नीट प्रकारे मत बनवता येतं.
+१०० हो गवि.
15 Nov 2012 - 11:35 am | श्री गावसेना प्रमुख
जब तक है जान
जाने जहान.
तु नाचेगा.
15 Nov 2012 - 11:50 am | llपुण्याचे पेशवेll
चित्रपट परीक्षण वाचण्यापेक्षा असले उत्स्फूर्त लेख वाचायला आवडतात. नाहीतरी परिक्षकास तथाकथित संतुलिततेचे बंधन पाळावे लागते ना!
छान मला तरी आवडले बॉ.
15 Nov 2012 - 6:38 pm | रेवती
अरे वा! मग आता शिनेमा बघणार की काय? धाडसी आहेस हो पुपे. ;)
20 Nov 2012 - 12:31 pm | llपुण्याचे पेशवेll
नाय गो काकू. या साहेबांनी आधीच सावध केल्यामुळे आवडले.
16 Nov 2012 - 9:45 am | माम्लेदारचा पन्खा
दिवाळीच्या एका रात्री उत्सुकतेने हा पिच्चर टाकला.
यश चोप्रांची जादू ओसरलीये. अजिबात बघणेबल नाही वाटला सिनेमा .....
कितीही मेंदू बाजूला ठेवला तरी नाही पटत जे पडद्यावर चालते ते....
17 Nov 2012 - 11:57 am | केदारविदिवेकर
अंमळ साध्या माणसाला पचेल, रुचेल या भाषेत लिहिण्याचा अट्टाहास. हा अट्टाहास वाचताना त्यांच्यासमोर चित्रपट उभा राहावा हा कयास. बाकी इतर समीक्षक आहेत कि नियमांचा पालन करून काटेकोर पद्धतीने लिहून "बाकी प्रेक्षकांवर सोडणारे".. मग आमच्यात आणि त्यांच्यात काय फरक तो काय ?
युनिकनेस हवाय..... पुपे ने तो बरोबर ओळखला...
इतरांचे आभार. नक्की काही पटलेले मुद्दे नक्की आत्मसात करण्याचा प्रयत्न असेल. शेवटी म्हणतात न, माणसानेनेहमी नेहमी मधमाशीसारखा रहावे..
-- के डी
20 Nov 2012 - 11:07 pm | आशु जोग
हा धागा 'प्राण' या अभिनेत्यावर आहे का ?
त्यांची तब्येत गंभीर आहे असे कळते.
ते हिन्दी चित्रपटसॄष्टीचा प्राण आहेत.
नवा तेरे मेरे सपने(ABCL चा) असो, नाहीतर जंजीर असो
जाऊदे ना
पण खरा जोशातला प्राण पहायचा तर तो मधुमतीमधला.
त्यांचं हिन्दी म्हणजे अगदी दॄष्ट लागण्यासारखं.
तसाच 'मेरा साया' सुद्धा
21 Nov 2012 - 11:47 am | दिव्यश्री
.
और कब तक हे जान