उपवासाला कुठले पदार्थ चालतात?

प्रकाश घाटपांडे's picture
प्रकाश घाटपांडे in काथ्याकूट
20 Oct 2012 - 11:14 am
गाभा: 

बटाटा, रताळे, केळे, वरई, साबुदाणा, शेंगदाणे हे माहित असलेले काही पदार्थ आहेत, मला एक प्रश्न पडतो कि उपवासाला अमुक एक पदार्थ चालतो किंवा चालत नाही हे ठरवण्याचे काय निकष आहेत. कुठल्या धर्मग्रंथात असे लिहिले आहे काय? तसेच कर्नाटकात चालणारा पदार्थ महाराष्ट्रात चालत नाही असे काही प्रांतिक भाग पण त्यात आहे म्हणे? मला शेंगदाण्याची गंमत वाटते कि शेंगदाणा चालतो पण शेंगदाण्याचे तेल चालत नाही. एखाद्याने ठरवले की मी उपवासाला हलका पदार्थ म्हणुन फक्त भातच खाईन पण ते चालत नाही.उपवास हा श्रद्धेचा भाग आहे हे मान्य. मला कधी कधी याविषयी देखील शंका येते कि उपवास करणारे खरेच श्रद्धेने करतात कि गतानुगतिकतेचा भाग म्हणुन करतात. म्हणजे असे कि घरात सगळे करतात म्हणुन मी करतो या पेक्षा वेगळा विचार नाही. घरात सगळे करत आलेले आहेत मग आपण ती परंपरा कशाला मोडा हा त्यामागे असलेला विचार. उपवास मोडल्याने पाप लागते असे ते मानीत नसावे पण मोडला तर मनाला बोचणी लागते. उपवासा विषयी इतरांची मते जाणुन घ्यायला आवडेल?

प्रतिक्रिया

मृत्युन्जय's picture

20 Oct 2012 - 11:30 am | मृत्युन्जय

काय हे घाटपांडे काका? तुम्ही पण शिळ्या कढीला उत आणायला लागलात?

असो. उपासाला अमुक एक पदार्थच चालतो यामागे काहितरी शास्त्र जरुर असावे. काय ते मला माहिती नाही.

मी उपास करतो ते फक्त स्वतःवरचे नियंत्रण तपासण्यासाठी. आणि मी उपासादरम्यान फक्त दुध आणि फळेच खातो त्यामुळे इतर पदार्थांबद्दल माझा पास. नवरात्रीच्या ९ दिवसात फक्त दूध आणि फळे खाउन राहिले आणि पुरेशी झोप घेतली तर फारच छान आणि हलके हलके वाटते हे मात्र खरे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Oct 2012 - 11:37 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>> मला एक प्रश्न पडतो कि उपवासाला अमुक एक पदार्थ चालतो किंवा चालत नाही हे ठरवण्याचे काय निकष आहेत.

निकष बिकष काही नसावेत.

>>> कुठल्या धर्मग्रंथात असे लिहिले आहे काय ?

जाणकारांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.

>>> एखाद्याने ठरवले की मी उपवासाला हलका पदार्थ म्हणुन फक्त भातच खाईन पण ते चालत नाही.
असं कै नै, वरण-भात कोणत्या तरी भागात उपवासाला चालतो असं कुठेतरी मागे कोणी तरी म्हटल्याचे आठवते.

>>> उपवास करणारे खरेच श्रद्धेने करतात कि गतानुगतिकतेचा भाग म्हणुन करतात.

आड्मुठी (अंध) श्रद्धा आणि गतानुगतिकता.

>>>>उपवास मोडल्याने पाप लागते असे ते मानीत नसावे पण मोडला तर मनाला बोचणी लागते.

पापाबिपाचं कै नै पण बोचणी लागते.च्यायला, चतुर्थी धरायचो तेव्हा अनेकदा चॉकलेट बिकलेट आणि तत्त्सम पदार्थ माझ्या उपवासाला आडवे आले आहेत. पण मी कोणाला त्याबद्दल बोलायचो नाही पण, बोचणी लागल्याचे आठवते. बियर फियर उपवासाला चालते असंही ऐकलं आहे. पण ही बोचणी लय अवघड असते.
उपवास बिपवास पोटाला विश्रांती म्हणुन बरं आहे. पण दिवसभर सटर-फटर खाणार असाल तर उपवासात कै मजा नै. उपास तापास बंद केले पाहिजे,उपवास म्हणजे 'जवळ राहणे'कोणाच्या जवळ राह्यचं आहे, तर देवाच्या. देवासारखी वृत्ती यायची असेल तर त्याला उपवासाची गरज नाही, ती बिनउपवासाचीही येऊ शकते असे वाटते.

अवांतर : ओ माय गॉडची सिडी है का रे कोणाकडं ? मला जरा मेल करा ना राव. :)

धन्यवाद.

-दिलीप बिरुटे

अवांतर : ओ माय गॉडची सिडी है का रे कोणाकडं ? मला जरा मेल करा ना राव.

आहे ना काका, पण जवळ जवळ ६९४ MB आहे. मेल वर कशी चढवु तेच कळत नाही. मद्त करा आता पाठवते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Oct 2012 - 12:40 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आहे ना काका, पण जवळ जवळ ६९४ MB आहे. मेल वर कशी चढवु तेच कळत नाही. मद्त करा आता पाठवते.

मेलने एवढा पसारा येऊ शकतो का हे मलाच माहिती नाही. पण तात्त्काळ प्रतिसाद दिल्याबद्दल आभारी.

-दिलीप बिरुटे

किसन शिंदे's picture

20 Oct 2012 - 12:06 pm | किसन शिंदे

बर्याच दिवसांपासून मलाही पडलेला प्रश्न आहे हा.

सरांचा आणि मृत्युंजयाचा प्रतिसाद तर वाचला पण आणखी काही प्रतिसादांच्या प्रतिक्षेत.

सुहास..'s picture

20 Oct 2012 - 12:09 pm | सुहास..

माफ करा, पण मी आजवर पदार्थांना चालताना पाहिले नाही ;)

जोशी 'ले''s picture

20 Oct 2012 - 10:11 pm | जोशी 'ले'

ज्याला पाय असतील ते तर उपवासाला चालतच नाहि ;-)

विसुनाना's picture

20 Oct 2012 - 12:33 pm | विसुनाना

कोणत्या 'उपवासा'बद्दल बोलताय?

म्हणजे गैरसमज नको म्हणून विचारतो आहे- नेहमीचे गुरु -शनिवार की संकष्टी की एकादशी की अंगारकी की शिवरात्र की आषाढी- कार्तिकी की रोजे ?

प्रत्येक उपवासाप्रमाणे पदार्थ बदलतात असा माझा समज आहे.

(हा प्रतिसाद केवळ निखळ दृष्टीने वाचावा.)

हिंदू मुसलमानांना आपलेसं मानलत, किरिस्तावांनीच काय घोडं मारल? ;)
त्यांना ही आपलं म्ह्णा तेही उपवास(लेंट) धरतात. ;)

अवांतर : जे तब्येतीला झेपेल ते उपवासाला 'चालेल'. :)

विसुनाना's picture

20 Oct 2012 - 3:47 pm | विसुनाना

सगळ्याच धर्मांचे उपवास घ्या : http://en.wikipedia.org/wiki/Fasting वोक्के?

संजय क्षीरसागर's picture

20 Oct 2012 - 12:37 pm | संजय क्षीरसागर

उपास तापास बंद केले पाहिजे,उपवास म्हणजे 'जवळ राहणे'कोणाच्या जवळ राह्यचं आहे, तर देवाच्या.

कुठे असतो हा देव?

भक्तीमार्गीयांचा असा गोंधळ होतो!

उपवास म्हणजे स्वतःशी एकरूप होणं, टू बी कनेक्टेड टू वनसेल्फ.

शरीराची सर्वात जास्त उर्जा अन्नपचनात व्यतित होते. जर उपाशी राहिलं तर (असेल ती उर्जा) स्वतःप्रत यायला मदत करते.

पचनसंस्थेला विश्रांती हा अनुषंगिक फायदा आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

20 Oct 2012 - 1:38 pm | प्रकाश घाटपांडे

शरीराची सर्वात जास्त उर्जा अन्नपचनात व्यतित होते. जर उपाशी राहिलं तर (असेल ती उर्जा) स्वतःप्रत यायला मदत करते.

याविषयी वैद्यकीय मत जाणून घ्यायला आवडेल. आपण शरीराच्या गरजेपेक्षा जास्त खात असतो. तेवढे जरी बंद केले तरी शरीराचे चयापचय संस्था चांगली काम करेल व चरबी पण कमी होईल असे काहींचे म्हणणे आहे. मला त्यात तथ्य वाटते.

तेवढे जरी बंद केले तरी शरीराचे चयापचय संस्था चांगली काम करेल व चरबी पण कमी होईल असे काहींचे म्हणणे आहे. मला त्यात तथ्य वाटते

ते सरळच आहे हो पण आपण भूकेप्रमाणे खात नाही, वेळेप्रमाणे खातो त्यामुळे गरज किती आहे त्याचा पत्ता लागणं शक्य नाही.

तुमचा प्रश्न

उपवासाला कुठले पदार्थ चालतात आणि ते कुठल्या धर्मग्रंथात लिहिले आहे काय?

असाय.

पुढे तर फारच भानगड आहे

उपवास हा श्रद्धेचा भाग आहे हे मान्य. मला कधी कधी याविषयी देखील शंका येते कि उपवास करणारे खरेच श्रद्धेने करतात कि गतानुगतिकतेचा भाग म्हणुन करतात. म्हणजे असे कि घरात सगळे करतात म्हणुन मी करतो या पेक्षा वेगळा विचार नाही. घरात सगळे करत आलेले आहेत मग आपण ती परंपरा कशाला मोडा हा त्यामागे असलेला विचार. उपवास मोडल्याने पाप लागते असे ते मानीत नसावे पण मोडला तर मनाला बोचणी लागते

यामुळे पुन्हा श्रद्धा, पाप-पुण्य मग त्या बरोबर देव असे अनेक प्रश्न निर्माण होतात. वास्तविकात असं काही नाही पण हे समजेल तर ना!

भक्तीमार्गीयांनी उपवास हा श्रद्धेचा आणि पाप पुण्याचा विषय केलाय.

भक्तीमार्गाचा पुरस्कार करणारे आणि बिंडबनाच्या मर्कटलीला करणारे, ज्यांची सगळी जालीय हयात केवळ बद्धतेवर विनोद करण्यात गेलीये (जे मनात तेच लेखनात!) असे लोक दिशाभूल करतात आणि एखादी साधी गोष्ट समजणं अवघड होतं. असो, उपवासाचा अर्थ आणि उपयोग पहिल्या प्रतिसादात दिला आहे.

पैसा's picture

20 Oct 2012 - 2:29 pm | पैसा

काही हिंदू लोक उपासाला शिरा किंवा चपाती किंवा डाळतांदुळाची खिचडी खाल्ली तर चालते असे म्हणणारे भेटले आहेत तर ख्रिश्चन लोक ईस्टरपूर्वी जो ४० दिवस उपास करतात तेव्हा "दारू आणि चिकन उपासाला चालत नाही. मासे पण शिवराक, तेव्हा ते चालतात" असे सांगणारे भेटले आहेत.

त्या अर्थी उपासाला काय खाल्ले तर चालते ही फार फ्लेक्झिबल गोष्ट असावी! :D

सस्नेह's picture

20 Oct 2012 - 3:14 pm | सस्नेह

माझ्या मते ज्यामध्ये कार्बोहायड्रेट्स नाहीत असे कोणतेही पदार्थ उपवासाला चालावेत. म्हणजे फळे, कूट न घालता केलेल्या कोशिंबिरी, सॅलड इ. भात पचायला हलका असला तरी कार्बोहायड्रेट्युक्त असल्यामुळे उपवासाला न खाल्ल्यास उत्तम.

प्रभाकर पेठकर's picture

21 Oct 2012 - 1:18 am | प्रभाकर पेठकर

दाण्याच्या कुटात कार्बोहायड्रेट्स आहेत?
साबुदाणा, रताळी, बटाटे इ.इ. मध्ये भरपूर कार्बोहायड्रेट्स आहेत, ती तर चालतात उपासाला.

दाण्याच्या कुटात फॅट्स आहेत.
साबुदाणा, रताळी, बटाटे इ.इ. मध्ये भरपूर कार्बोहायड्रेट्स आहेत,
म्हणून तर मी म्हटलं की हे न खाता फळे, सॅलड्स खावी.

विनायक प्रभू's picture

20 Oct 2012 - 3:19 pm | विनायक प्रभू

उपास?
कसला?

दुसरा उपास शरिराबरोबर इतरांना देखिल घातक आहे.
बाकि मी देखिल नवरात्रीचा उपवास केला आहे. त्यामुळे सर्व सुग्रण्या आनि सुग्रणकर ह्याना विनंती कि उपवासाचे पदार्थाच्या रेशिप्या लिहा.

शैलेन्द्र's picture

20 Oct 2012 - 11:25 pm | शैलेन्द्र

मास्तर, यांचा नव रात्रीचा उपवास आहे तेंव्हा उपवास निभावुन नेण्याची रेसीपी सांगा.. :)
वेताळराव, ह घ्या बरका..

पुण्याचे वटवाघूळ's picture

20 Oct 2012 - 3:40 pm | पुण्याचे वटवाघूळ

बाकी काही चालते की नाही हे माहित नाही पण साबुदाण्याची खिचडी मात्र मला प्रचंड आवडते.माझे सगळे उपास ही खिचडी खाण्यासाठी असतात :)

सुजित पवार's picture

23 Oct 2012 - 2:02 pm | सुजित पवार

माझे पन :)

लाल भोपळा व भेंडीही चालते उपासाला. काहे ठीकाणी मस्तपैकी कढीपत्त्याची फोडणी वगैरे देऊन त्यात तोंडली इ. भाज्या परतून उपासाला चालतात असे म्हटले होते. त्यांच्याकडे चालत असतील. आपल्याकडे जे उपासाला चालतं ते मला तरी फार आवडतं म्हणून खरे तर उपास, बाकी काही नाही. ;)

प्रेरणा पित्रे's picture

20 Oct 2012 - 5:36 pm | प्रेरणा पित्रे

मी पण बर्याच दिवसांपासुन हा विचार करत होते...
उपासाचे जवळजवळ सर्वच पदार्थ अतिशय पित्तकारक असतात.. उपासामुळे डोकेदुखी व तत्सम त्रास झाले तरी लोक भरमसाठ औषधे घेउन उपास सुरु ठेवतात.. तेव्हा त्यांना उपासाला औषधे सुद्धा चालतात..
बरेच लोक त्यात स्वताप्रमाणे फेरबदल करुन भाजकं अन्न चालतं म्हणत दशमी, पोहे, उपमा पण खातात....

माझी पित्तप्रक्रुती असल्याने मी कधीच उपास करण्याच्या भानगडीत पडत नाही.. जर उपासामुळे शरिराला त्रास
होणार असेल तर त्यातुन मानसिक समाधान कसे मिळणार.? त्यापेक्षा मला साधंवरण भात नेहमीच सात्विक वाटतो..

मी वटपोर्णिमा/ हरितालिकेला यथासांग पुजा होइस्तोवर अन्नाचा कण खात नाही.. नंतर मात्र रोजचे जेवण जेवते..

शेवटी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे... कारण प्रत्येक जण देवाला व श्रद्धेला वेगवेगळ्या प्रकारे इंटरप्रिट करतो..

कै नै हो. उपवासाच्या नावाखाली तडस लागेपर्यंत खाणारे पाहिले आहेत. हिपॉक्रसी आहे सगळी. अर्थात चतुर्वर्गचिंतामणीसारख्या ग्रंथांत काही लिहिले असेल तर माहिती नै. पण साधी गोष्ट बघा, वरणभातागत अस्सल देशी पदार्थ चालत नै आणि पोर्तुगीजांनी आणलेला साबुदाणा चालतो होय?? सगळे एक नंबर ढोंगी आहेत झालं.

प्रकाश घाटपांडे's picture

20 Oct 2012 - 7:07 pm | प्रकाश घाटपांडे

बटाटा देखील दक्षिण अमेरिकेतून आला असे म्हणतात. तो ही पोर्तुगिजांनीच आणला असे ही ऐकून आहे. ज्ञानेश्वरांच्या काळात बटाटा होता का? याविषयी साशंक आहे.
भारतात वेगवेगळ्या राज्यात उपवासाला कुठले पदार्थ चालतात हे जाणुन घेणे देखील रोचक ठरावे.

बॅटमॅन's picture

21 Oct 2012 - 12:37 am | बॅटमॅन

बरोबर आहे,पोर्तुगीजांनीच बटाटा आणला भारतात. ज्ञानेश्वरांच्या काळात आपल्याकडे बटाटा नव्हता. बटाट्याला संस्कृत शब्ददेखील नाही, त्यावरून भारतातील त्याचे अर्वाचीन अस्तित्व सिद्ध होते.

भारतात वेगवेगळ्या राज्यात उपवासाला कुठले पदार्थ चालतात हे जाणुन घेणे देखील रोचक ठरावे.

नक्कीच.

प्रभाकर पेठकर's picture

21 Oct 2012 - 1:58 am | प्रभाकर पेठकर

उपासतापास, व्रतंवैकल्य वगैरे गोष्टी मनाची ताकद वाढविण्यासाठी आहेत. संयम, मनावरील नियंत्रण ह्याची सातत्याने तपासणी आणि वाढते प्रयत्न ह्या साठी आहेत. ह्याचे दोन फायदे आहेत. एक शारीरिक. लंघनाने पचनशक्तीवरील अतिरिक्त ताण कमी होऊन ती नियंत्रणात राहते आणि दोन, मानसिक. वरती म्हंटल्याप्रमाणे संयम किंवा मनावरील नियंत्रण. 'मन हे ओढाळ गुरुं, परधन पर कामिनीकडे धावे' असे मनाचे वर्णन केले आहे. बहिणा बाईंनीही मनाला नाठाळ जनावराची उपमा दिली आहे. कितिही हाकललं तरी पिकात तोंड घालतं. अशा अनियंत्रीत मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याला संयमाची, नियंत्रणाची स्वतःला सवय लावून घ्यावी लागते. त्याच्या अनेक पद्धती आहेत. उपासतापास, व्रतवैकल्य हा त्यापैकीच एक भाग. पाप-पुण्याची संकल्पना, देवाचे अस्तित्व, देवाची भिती इ.इ.गोष्टींमुळे माणसाची वर्तणूक एका मार्गावर (सन्मार्गावर) राहण्यासाठी मदत होते ज्या योगे सर्व समाज नैतिकतेच्या नियंत्रणाखाली राहतो आणि गुन्हेगारी, अनाचार ह्याला आपसुक चाप बसतो.
परंतू, पूर्वीच्या काळी (आणि कांही अंशी आजही) ह्या संयमाला, नियंत्रणाला कार्यांन्वित करण्यासाठी मनुष्यप्राण्याला देवाची, पापपुण्याची, स्वर्ग-नरकाची भिती घालावी लागते. त्यातून देवांच्या दिवशी उपास करणे, व्रतवैकल्य करणे वगैरे प्रथा सुरू झाल्या. मनुष्य स्वभावानुसार त्या चांगल्या गोष्टींनाही फाटे फोडण्याचे काम अनेकांनी केले. आणि पापभिरू माणसांनी त्या फाटे फुटलेल्या अनिष्ट, अतार्कीक प्रथांनाही आपलेसे केले, पुढच्या पिढ्यांकडे सुपूर्त केले आणि इष्ट्-अनिष्ट, तार्किक्-अतार्किक पद्धती आजच्या जगात आपण पाहतो अनुभवतो.
ह्या शिवाय वेगवेगळे नवस बोलणे ह्यानेही प्रथा (त्या-त्या कुटुंबापुरत्या)बदलल्या. उदा. देवाला साकडे घातले जायचे 'देवा माझ्या मुलाचा/नवर्‍याचा आजार बरा होऊ दे. मी उपवासाला हिरवी मिरची खाणार नाही.' किंवा 'मी संकष्टी निर्जळा करेन.' इ.इ. त्यांची मनोकामना (योगायोगाने) पुरी झाली आणि त्यांनी नवस बोलल्या प्रमाणे प्रथा सुरू केली. पुढे काही पिढ्यांनंतर बाकीचे तपशिल विस्मृतीत जाऊन 'आपल्यात उपासाला हिरवी मिरची खात नाहीत' एवढाच संदेश उरला. असं का? हे कोणीच जाणत नाही. जाणून घेऊ इच्छित नाही, बदलू इच्छित नाही. नको उगीच, देवाचा कोप वगैरे झाला तर?

ही काही उदाहरणे झाली. अशा अनेक घटना, विचारधारांमधून उपासाला हे चालतं ते चालत नाही. अमुक एक व्रतासाठी तमूक एक साधना करावी लागते असे 'उपचार' जन्मास आले.

उपासा मागे लंघन आणि मनावरील नियंत्रण ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या. आहार पचावयास हलका असावा जेणेकरून पचनसंस्थेला आराम मिळेल आणि ती सतत कार्यक्षम राहील. इथे-तिथे धावणार्‍या मनाला वेसण घातली जाऊन रोजच्या जीवनात सद्वर्तनाची आस मनास कायम राहील, असे पाहिले पाहिजे.

देवळात जाणे हेही भिरभिरणार्‍या मनाला शांतता प्रदान करण्यसाठी उपयोगी ठरते. मंदिरातील वातावरण, घंटानाद, उदबत्यांचा वास, निरांजनाची ज्योत आणि कोणीतरी आपला आधार आहे अशी देवाची आश्वासक मूर्ती, मनावर, दु:खावर, वैफल्यावर मात करण्यासाठी मदतगार ठरू शकते.

प्रकाश घाटपांडे's picture

21 Oct 2012 - 8:22 am | प्रकाश घाटपांडे

उपवासा बाबत चा हा विचार इतर कर्मकांडांना देखील लावता येईल. मनाचे अगम्य स्वरुप हेच त्यामागे मोठे कारण आहे. काळाच्या ओघात कालबाह्य ठरणार्‍या गोष्टी हळू हळू मागे पडत जातात हे आपण पाहातोच आहोत. कालसुसंगत चिकित्सा होणे देखील गरजेचे आहेच. पुर्वी हॉटेल मधील साबुदाणा खिचडी ही उपासाला ग्राह्य धरली जात नसे. हळूहळू त्याला मान्यता मिळू लागली कारण त्याची व्यावहारिक गरज.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Oct 2012 - 10:15 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>> उपासतापास, व्रतंवैकल्य वगैरे गोष्टी मनाची ताकद वाढविण्यासाठी आहेत.

पेठकर साहेब, मनाची ताकद वाढते याला काही विदा आहे काय ? असा काही विदा उपलब्ध नसणारच आहे. मला असं वाटतं उपवासानं मनाची ताकद वाढते, यावर तर माझा काही विश्वास नाही. उपवास आणि व्रत व्रतवैकल्य करणा-यांमधे महिलांचा अधिक भरणा आहे. पुरुषांचे उपवास तसे कमीच आणि जे कोणी पुरुष उपवास करत असतील त्या मागे कोणीतरी सांगितलं आहे म्हणुन उपवास. विशेषत: महिलांच्या रेट्यामुळे पुरुष नाविलाजाने उपवास करतात असा माझा एक समज आहे. अर्थात अशा समजाला काही आधार नाही. आणि पुरुषांच्या मनाची ताकद उपवासाने वाढते किंवा महिलांच्या मनाची ताकद उपवासाने वाढते हाही एक भ्रम असावा. उलट उपवास करणा-या महिला उपवासाच्या काळात अधिक तणावात दिसतात. अर्थात अशा निष्कर्षालाही काही आधार नाही, पण इतर दिवशीच्या तुलनेत उपवासाच्या दिवशी महिला नॉर्मल वर्तनात दिसत नाही. अगदी कडक पथ्य पाळुन केलेल्या उपवासानं गळुन गेल्या असतील किंवा अन्य कारणं असतील पण त्या दिवशीच्या स्त्रियांच्या वर्तनाचा अभ्यास केला पाहिजे, नक्कीच काहीतरी नवी माहिती बाहेर येईल असे वाटते.

-दिलीप बिरुटे

प्रभाकर पेठकर's picture

21 Oct 2012 - 11:03 am | प्रभाकर पेठकर

मनाची ताकद वाढते म्हणजे माणूस मोह आवरायला शिकतो. जसे, एखाद्या दिवशी बिर्याणी खायचा मोह होतो आहे पण आज संकष्टी आहे त्यामुळे आज बिर्याणीचा मोह टाळून साबुदाणा खिचडी किंवा तत्सम पदार्थावर संतोष मानायला शिकायचं. हे एक उदाहरण आहे. ह्याची सवय झाली की इतर बाबतीतही, जसे पैसे कमी असताना चैनीच्या वस्तूंची खरेदी टाळणं, आवश्यक बाबींवर खर्च करता यावा म्हणून अनावश्यक बाबींवरील खर्च टाळणं इ.इ. मोहावर अंशतः विजय मिळविणे शक्य होते, निदान सुसह्य तरी होते.

उपवास आणि व्रत व्रतवैकल्य करणा-यांमधे महिलांचा अधिक भरणा आहे. पुरुषांचे उपवास तसे कमीच आणि जे कोणी पुरुष उपवास करत असतील त्या मागे कोणीतरी सांगितलं आहे म्हणुन उपवास. विशेषत: महिलांच्या रेट्यामुळे पुरुष नाविलाजाने उपवास करतात असा माझा एक समज आहे.

महिलांचा भरणा अधिक असतो ह्याचं कारण महिलांचा घाबरट स्वभाव. त्यामानाने पुरुष जास्त बिन्धास्त असतात. पण पुरुष अगदी महिलांच्या रेट्यामुळे, नाईलाजाने उपवास करतात असे नाही. (तसेही, बरेच असतात ह्याच्याशी सहमत आहेच) तर, स्वामी समर्थ, अनिरुद्ध बापू इ.इ. चे अनुयायी, ज्योतिषाने सांगितले म्हणून 'कडक' उपास करणारे अनेक पुरुष माझ्या व्यवसायाच्या निमित्ताने पाहिले आहेत.

अगदी कडक पथ्य पाळुन केलेल्या उपवासानं गळुन गेल्या असतील किंवा अन्य कारणं असतील पण त्या दिवशीच्या स्त्रियांच्या वर्तनाचा अभ्यास केला पाहिजे,

ह्यातुनच शारीरिक क्लेश सहन करायची मनाची ताकद वाढते. शिवाय आपले ध्येय साध्य करण्यासाठी (उपास यशस्वी करण्यासाठी) मनाचा निग्रह वाढीस लागतो. असो.

मनाची ताकद वाढविण्याच्या अनेक मार्गांपैकी हा एक मार्ग आहे हे मी माझ्या मुळ प्रतिसादात म्हंटले आहेच. त्यामुळे नुसते उपास केल्याने मनाची ताकद वाढते असा 'एकास एक' असा गणिती हिशोब इथे अभिप्रेत नाही. तसेच, हा भावनेचा प्रश्न असल्याने सर्व ठिकाणी एकच परिणाम साध्य होईल असेही नाही.

प्रकाश घाटपांडे's picture

21 Oct 2012 - 12:09 pm | प्रकाश घाटपांडे

मला असं वाटतं उपवासानं मनाची ताकद वाढते, यावर तर माझा काही विश्वास नाही.

उपवास ही श्रद्धा आहे. श्रद्धा ही आत्मिक बळ देते. श्रद्धेच्या जागी अंधश्रद्धा हा शब्द घातलात तरी युक्तिवादात फरक पडत नाही. अंधश्रद्धा हे शॉक अ‍ॅबसॉर्बर सारखे काम करतात. खरतर श्रद्धा ही अंधश्रद्धाच असते. सोयी साठी सकारात्मक श्रद्धा या उपयुक्त व नकारात्मक श्रद्धा या उपद्रवी वा अंधश्रद्धा अशी विभागणी करतात. असो. कुणाला आत्मिक बळ कशातून मिळेल हे सांगता येत नाही.इश्वर,व्यक्ती विचार या वरील श्रद्धा या समाजात दिसून येतात. अंनिसवाल्यांची अंधश्रद्धा निर्मूलनावर श्रद्धा आहे असा युक्तिवाद केला जातो.

प्रभाकर पेठकर's picture

21 Oct 2012 - 2:03 pm | प्रभाकर पेठकर

खरतर श्रद्धा ही अंधश्रद्धाच असते.

पटंत नाही.

श्रद्धा हा 'डोळस' विश्वास आहे तर अंधश्रद्धा हा 'आंधळा' विश्वास आहे.

जसे, माझ्याकडे चार्टर्ड अकाउंटंट्ची पदवी आहे त्यामुळे आज न उद्या मला योग्य ती नोकरी मिळेल. मला वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज करीत राहून मुलाखती दिल्या पाहिजेत. ही श्रद्धा झाली. एक 'डोळस', 'तार्किक' विश्वास.

पण, मी चार्टर्ड अकाऊंटंट आहे आणि दर मंगळवारी सिद्धी विनायकाच्या दर्शनाला गेल्याने मला योग्य ती नोकरी मिळेल ही अंधश्रद्दा झाली. अर्ज न करता, मुलाखती न देता 'विनायक' कितीही 'सिद्ध' असला तरी तुमच्या पदरात नोकरी टाकणार नाही.

कवितानागेश's picture

22 Oct 2012 - 1:32 pm | कवितानागेश

"उपवास ही श्रद्धा आहे." आणि
"श्रद्धा ही आत्मिक बळ देते."
ही २ वाक्य एकमेकांच्या विरुद्ध आहेत. ( असे मला आपले उगीचच वाटतंय! :) )
(तथाकथित)उपवास हा नियमांनी बांधलेला आहे.
श्रद्धेला नियम नसतात. श्रद्धा बिन्धास्त असते! :)
श्रद्धा असेल तर नियमांची गरज नाही, जे काय करायचे ते सगळेच एकतर 'श्रीक्रुष्णार्पणमस्तु' किंवा 'यद्यद कर्म करोमि तद्तद अखिलं, शंभो तवाराधनम्'... किंवा अजून असेच काहीबाही.....
उपवास करण्यासाठे नियम आले, तिथे नखरे आले, कुठल्या पदार्थांनी चालायचे, कुठल्यांनी लटकायचे वगरै बंधने आली.
तिथे श्रद्धा नसवी....
शिवाय आत्मिक बळ तर जगताना प्रत्येक ठिकाणी लागते, ते जगण्यावरच्या प्रेमातूनच मिळत असते, बाकी सगळ्या गोष्टी निमित्तमात्र.
...बाकी उपास करण्याची, मोडण्याची, जोडण्याची 'फॅशन' अजूनही चालू आहे का जगात? ;)

५० फक्त's picture

22 Oct 2012 - 2:53 pm | ५० फक्त

...बाकी उपास करण्याची, मोडण्याची, जोडण्याची 'फॅशन' अजूनही चालू आहे का जगात? -

मग मा. माउतै, तुमच्या जगात सध्या कशाची फॅशन आहे याबद्दल मार्गदर्शन कराल का म्या पाम राला. बिनधास्त श्रद्धेच्या फॅशनबद्दल सुद्धा लिहा काहीतरी.

कवितानागेश's picture

22 Oct 2012 - 5:36 pm | कवितानागेश

तुमच्या जगात सध्या कशाची फॅशन आहे याबद्दल मार्गदर्शन कराल का म्या पाम राला.>
दूधभात!!
बिनधास्त श्रद्धेच्या फॅशनबद्दल सुद्धा लिहा काहीतरी. ?
काहीतरीच!! :)

कपिलमुनी's picture

22 Oct 2012 - 4:37 pm | कपिलमुनी

खरतर श्रद्धा ही अंधश्रद्धाच असते.

गोंधळलेला प्रतिसाद !!

अजुन तपशिलात गेलात तर आवडेल ज्ञानकण वेचायला

लेखापेक्षा प्रतिसाद भारी...!
माफक व सात्विक आहार घेऊन केलेल्या उपासाने मनाची शुद्धी होऊन चित्त निवळते, हा अनुभव आहे.

चौकटराजा's picture

21 Oct 2012 - 9:53 am | चौकटराजा

एक आहेत त्याना साखर खायची नाही.दुसरे काय चालेल ?
एक आहेत त्याना गुटख्याचा उप्वास घडत आहे.
एक आहेत त्यांच्या बायको माहेरी गेल्यामुळे " उपवास " घडत आहेत.
या सर्व उपवासाच्या उप प्रकाराना काय काय चालेल बॉ ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Oct 2012 - 10:21 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

१) शुगरफ्री विविध खाण्याचे विविध पदार्थ आता बाजारात उपलब्द्ध आहेत.
२) गुटख्याने उपवास मोडतो. आणि गुटखा उपवासाच्या दिवशी खाल्ला तर माणुस थेट नर्कात जातो असं एका प्राचीन ग्रथांत लिहिलं आहे, असं त्याच्या मनावर बिंबवत राहा. आणि या प्राचीन ग्रंथाचा लेखक थेट परमेश्वर आहे हे सांगायला विसरु नका :)
३) या उपवासात काही तरी 'वेगळंच ' दडलं आहे. उपवास कडक राहु द्या. उपवासानंतर जेवणाचा आनंद वाढतो, असं सांगा. ;)

-दिलीप बिरुटे

अर्धवटराव's picture

21 Oct 2012 - 10:47 am | अर्धवटराव

हा सगळा हौसेचा मामला आहे साहेब. काळाच्या कसोटीवर मनाला, त्या अनुषंगाने शरीराला घासत राहणे हि माणसाची गरज आहे.. छंद म्हटलं तरी चालेल. बाकी भक्तीमार्ग वगैरेच्या समर्थनार्थ-विरोधात प्रवचन देणार्‍या आंजा विद्वानंचं फार काहि ऐकु नये... तो एक उपवास केला तरी पुरे.
राहिला प्रश्न उपवसाला काय चालते... तर एकच गोष्ट... तोंड.

अर्धवटराव

मूकवाचक's picture

21 Oct 2012 - 5:41 pm | मूकवाचक

शर्ट-ट्राउझर, जीन्स-टीशर्ट, सलवार-कमीज, चोली-घागरा, नेकटाय (कंठलंगोट), स्लीव्हलेस ब्लाउज हे माहित असेलेले काही कपडे आहेत, मला एक प्रश्न पडतो की हापिसात अमुक एक कपडा चालतो किंवा नाही हे ठरवण्याचे काय निकष आहेत. कुठल्या औद्योगिक कायद्यात असे लिहीले आहे काय? तसेच सॉफ्टवेअर प्रॉडक्ट कंपनीत चालणारे कपडे सॉफ्टवेअर सर्व्हिसेस कंपनीत आणि पारंपारिक उद्योगात चालत नाहीत असा काही डावाउजवा भाग पण त्यात आहे म्हणे? मला टीशर्टची गंमत वाटते, की फक्त शुक्रवारी स्मार्ट कॅज्युअलमधे 'इन' केलेला कॉलरवाला टीशर्ट चालतो पण सुटसुटीतपणे लोंबत सोडलेला गोल गळ्याचा टीशर्ट चालत नाही. एखाद्याने ठरवले की मी सोमवारी सोयीचे पडते म्हणून गोल गळ्याचा टीशर्ट आणि कॉड्राय पँट घालून येईन पण ते चालत नाही. ड्रेसकोड हा कॉर्पोरेट कल्चरचा भाग आहे हे मान्य. मला कधी कधी याविषयी देखील शंका येते की ड्रेसकोड लादणारे/ पाळणारे खरेच विचारपूर्वक/ निष्ठेने तो ठरवतात/ पाळतात की गतानुगतिकतेने तसे केले जाते. म्हणजे असे की युरोप, अमेरिकेतल्या सगळ्या कंपन्या तसे करतात म्हणुन आम्हीही करतो या पेक्षा वेगळा विचार नाही. आजवर सगळ्या कंपन्या असेच करत आलेल्या आहेत तेव्हा आपण ती परंपरा कशाला मोडा हा त्यामागे असलेला विचार. ड्रेसकोडचे उल्लंघन केल्याने व्यावसायिक चारित्र्यावर डाग लागतो असे कुणी मानत नसावे पण तो मोडला तर मनाला बोचणी लागते. ड्रेसकोड विषयी इतरांची मते जाणुन घ्यायला आवडेल?

श्रीरंग_जोशी's picture

21 Oct 2012 - 8:29 pm | श्रीरंग_जोशी

या विषयावर मी पूर्वी इथे काही अनुभव व विचार मांडले होते.

५ वर्षांपूर्वी आमच्या कंपनीला पुण्यातील कार्यालयात शुक्रवारी पण फॉर्मल कपड्यांची सक्ती करावी लागली होती. कारण काही कर्मचार्‍यांकडून शुक्रवारी मिळालेल्या अपवादाचा जबरदस्त गैरवापर होत होता.

माझ्या मते आजूबाजूला काम करणार्‍या सहकार्‍यांना संकोचल्यासारखे वाटत असेल तर त्या प्रकारचे कपडे घालून कार्यालयात जाणे संयुक्तिक नाही.

५ वर्षांपूर्वी पुण्यातील कार्यालयात जी उदाहरणे दिसली ती आजवर अमेरिकेत कामाच्या ठिकाणी कधीच दिसली नाहीत.

प्रकाशराव - काथ्याकूटाच्या मूळ विषयाखेरीज वेगळ्या विषयावरील प्रतिक्रियेवर प्रतिक्रिया देत असण्याबद्दल क्षमस्व.

कवितानागेश's picture

22 Oct 2012 - 1:18 pm | कवितानागेश

हापिसाला फारेनचेच कपडे चालतात! ;)

श्रीरंग_जोशी's picture

21 Oct 2012 - 8:16 pm | श्रीरंग_जोशी

रताळ्यांच्या चकत्या हा माझा आवडता पदार्थ आहे. शिवाय नेहमी नेहमी साबुदाण्याची खिचडी खाऊन कंटाळा आल्यास भगर पण छानच.

मी लहानपणीपासून दोन्ही एकादश्या व महाशिवरात्रीची भक्तिभावाने वाट पाहायचो कारण उपासाचे विविध चवदार पदार्थ खायला मिळायचे जसे साबुदाण्याचे वडे, उपासाची आमटी, जिरे व दही घालून केलेली बटाट्याची भाजी, अधून मधून भूक लागल्यास शेंगदाण्याची चिक्की :-).

त्यामुळे ज्यांनी कोणी जेव्हा केव्हा ही परंपरा सुरू केली असेल त्यांना अनेक धन्यवाद. अश्याच चवदार परंपरा अजून सुरू व्हाव्यात.

उपासाला (मराठी संस्कृतीत तरी) कोणत्या भाज्या चालतात याबद्दल एक गृहीतक कुणाकडून तरी ऐकले होते. ज्या भाज्या जमिनीच्या खाली वाढतात (जसे बटाटा) त्या उपवासाला चालतात. फळे मात्र अपवाद.

उपवासाला खालील पदार्थ चालतात:

गाय
कोंबडा
होला
बकरा
मेंढा
रेडा
हरीण
ससा
बदक
इ. प्रकारचे सर्व पशूपक्षी. (वाघसिंह वगैरे चालत नाहीत पण...)

मासे चालतात की नाही हे माहित नाही.

कदाचित एके काळी माणूसही चालत असावा असा माझा कयास आहे.

एस's picture

28 Oct 2012 - 11:54 pm | एस

वरील पशुपक्षी यज्ञात बळी द्यायला चालतात, म्हणूनच उपवासालाही चालतात. इन फॅक्ट, जे काही यज्ञात बळी म्हणून दिले जाता येतात, तेच फक्त उपवासाला खाण्याची मुभा आहे. वाघसिंहासारखे हिंस्र पशू मात्र चालत नाहीत हेही त्यामुळेच म्हटले आहे.

बटाटा चिवडा's picture

22 Oct 2012 - 9:02 am | बटाटा चिवडा

उपवासाच्या पदार्थांची चर्चा पाहून मी "चालत" नाही.. पळत आलो प्रतिसाद द्यायला.. :-)

नितिन थत्ते's picture

22 Oct 2012 - 11:30 am | नितिन थत्ते

उपासाला फारेनचेच पदार्थ चालतात.

सुहास..'s picture

22 Oct 2012 - 12:28 pm | सुहास..

उपासाला फारेनचेच पदार्थ चालतात. >>>

हे चुकुन ' उपासाला काँग्रेसचेच पदार्थ चालतात. ' असे वाचले ;)

नितिन थत्ते's picture

22 Oct 2012 - 7:50 pm | नितिन थत्ते

ती काय तरी संताजी धनाजींची गोस्ट आइकल्याली व्हती.

तुमचा प्रश्न : उपवासाला कुठले पदार्थ चालतात? असाये. ते म्हणजे `मला काहीही खायचं नाहीये तर मी काय खाऊ? असं विचारणं झालं.
अध्यात्मिक मार्गात उपवासाचा उपयोग शारीरिक उर्जा स्वतःप्रत आणायला केला जातो.
तुम्ही एक ठरवा : खायचं किंवा नाही खायचं.
एकदा नाही खायचं म्हटल्यावर विषय संपला.
खायचं असेल तर काय खावं याला अनंत उत्तरं आहेत आणि ती इथे दिसतायत पण त्यांचा उपवासाशी काहीएक संबंध नाही.

(तशी ड्रेसकोडवर पण चर्चा आहे पण त्याचा हेतू चर्चा भरकटवणं आहे की आकलनाचा आवाका (की दोन्ही) हे लक्षात येत नाही.)
तुम्ही नीट पाहिलत तर `खावं किंवा नाही' हा आपला निश्चय होत नाही म्हणून सगळे प्रश्न आहेत.

संदीप जगदाळे's picture

22 Oct 2012 - 4:29 pm | संदीप जगदाळे

उपवास म्हणजे पोटाला (पचनसंस्थेला) एक दिवस आराम !

मूकवाचक's picture

22 Oct 2012 - 7:10 pm | मूकवाचक

थोडी भर - उपवासाची व्याख्या काहीही असो, तो करण्याआधी काही डाचत असेल तर उलटी करून मोकळे होते आवश्यक!सगळी मळमळ बाहेर पडली की मग पचनसंस्थेला आराम देणे सोपे जाते :-)

प्रियाकूल's picture

22 Oct 2012 - 5:27 pm | प्रियाकूल

भाव तिथे देव. देव कै म्हणत नाही कि माझ्यासाठी तू उपवास कर तरच मी तुला प्रसन्न होईन.जे मिळेल , जे पचेल ते खावं. आमच्याकडे तर मीठ,जिरे आणि कोथिंबीर पण चालत नाही.(मी चालवते) मिठाऐवजी शेंदेलोण वापरते. मिठापेक्षा चांगलं असतं अस ऐकलय. बी पी, शुगर वाल्यांसाठी शेंदेलोण वापरावं म्हणतात. बाकी साबुदाणा कसा बनवतात ते गूगल वर सर्च करून पहिले तेव्हा हि लिंक मिळाली.
http://www.youtube.com/watch?v=hM0G6b0I7TI
पण कसा होता न कि उपवासादिवाशीच पाणी पुरी चा गाडा दिसतो आणि फार च कंट्रोल करावा लागतो. ;)

पाणीपुरीचा गाडा पाहून कंट्रोल करणे लै सोपे आहे जर "ती" बातमी पाहिली असेल तर ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Oct 2012 - 5:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ती बातमी येऊन काही दिवस थोडं असं तसं झालं असेल पण भय्यांचा पाणीपुरीचा धंदा बसला किंवा कमी झाला असे वाटत नाही. सालं बोटं बुडवुन कुछ तिखा कुछ मिठा पाणीपुरी खावी ती त्यांचीच. कितीही मळकट भय्या असु दे, सालं हे वेड अनेकांचं कमी झालं असेल असं वाटत नाही.

प्रियाकूल साबुदाना कसा बनवतात त्याचा व्हिडियो डकवल्याबद्दल धन्स.

-दिलीप बिरुटे

बॅटमॅन's picture

22 Oct 2012 - 6:01 pm | बॅटमॅन

कितीही मळकट भय्या असु दे, सालं हे वेड अनेकांचं कमी झालं असेल असं वाटत नाही.

पुलंच्या पानवाला मधले हे वाक्य आठवले ;)

"आता त्याचा तो पाने पुसायचा फडका-त्यात पान स्वच्छ होते की घाण होते हा वादाचा मुद्दा आहे, पण त्याच्या कळकटपणाच्या चढत्या श्रेणीला चौपाटीवरच्या भेळेची चव असते असे जाणकार सांगतात."

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Oct 2012 - 6:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

"आता त्याचा तो पाने पुसायचा फडका-त्यात पान स्वच्छ होते की घाण होते हा वादाचा मुद्दा आहे, पण त्याच्या कळकटपणाच्या चढत्या श्रेणीला चौपाटीवरच्या भेळेची चव असते असे जाणकार सांगतात."

स्सहीच निरिक्षण आहे.

सर्व कळकट-मळकट भय्यांचे (यात कुठेही द्वेष नाही, प्रेमच आहे) त्यांच्या प्लेटांचे, फडक्यांचे, तिखा-मिठा डब्याचे, पाणीपुरीचे, स्वतंत्र धाग्यात फोटो फोटो डकवावे, असा माझा मनात खयाल आहे.

-दिलीप बिरुटे

नक्की डकवा. शिवाय भारतव्यापी पोल घ्यायला हर्कत नसावी- कुठल्या गावची पाणीपुरी जगातभारी? माझे मत कोलकात्याला.

मोदक's picture

23 Oct 2012 - 1:43 am | मोदक

इंदूर.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Oct 2012 - 5:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

उपवासादिवाशीच पाणी पुरी चा गाडा दिसतो आणि फार च कंट्रोल करावा लागतो.

हाहाहा. स्सही हं. मलाही उपवासाच्या दिवशी पाणीपुरी खावी वाटेल, कुठेतरी चिकनची तंगडी तळलेली लटकावलेली दिसते. औरंगाबादेत 'सागर' हॉटेलच्या पुढे काही दुकाना आहेत, तेथुन समोरुन जातांना असं सगळं तळणं येता जाता दिसत असतं. सगळं असं मांसाहारी प्रकार पाहावा लागतो. मसाल्याचा वास तरी भारी येईल. कुठे इम्रती वाला मुद्दामहुन आपला उपवास असतो म्हणुन की काय असे भारी वेढे अशा ष्टाइलनं टाकतो की उपवास काय रुटीन आयुष्य थोडं थबकतं. खरं म्हणजे अशा सर्व विचारांनी आपल्या मनाचा ताबा घेतला की तिथेच उपवास मोडतो, नै का !

-दिलीप बिरुटे

रेवती's picture

22 Oct 2012 - 6:21 pm | रेवती

अहो तै, थांबा थांबा!
ती बातमी वाचली/ पाहिली नाहीत काय? ;)
त्यानंतर तो पदार्थ खाणे सोडून दिले होते.
उलट पापु दिसली तरी मळमळायला लागायचे.

किसन शिंदे's picture

23 Oct 2012 - 2:00 am | किसन शिंदे

ती बातमी वाचली/ पाहिली नाहीत काय?

आता तो भय्या हाराचा धंदा करतो म्हणे. :D

आनन्दा's picture

23 Oct 2012 - 1:56 pm | आनन्दा

मूलतः उपासाला कंदमुळे आणि फळे चालत्यात... तेव्हा त्या नियमात बसणारे काहीही चालते. मग ते देशी असो की विदेशी!
जसे की पंतप्रधान भारताचा नागरीक असावा.. मन :प

माम्लेदारचा पन्खा's picture

24 Oct 2012 - 3:24 pm | माम्लेदारचा पन्खा

बाकी काही चालो न चालो ,आपल्या देशाकडे पाहून एक गोष्ट नक्की कळली आहे....पैसे खायला कोणताही उपवास आडवा येत नाही !

अत्रुप्त आत्मा's picture

28 Oct 2012 - 11:21 pm | अत्रुप्त आत्मा

या निमित्तानी चे.पु.वर आलेली १ पोस्ट मुद्दाम इथे उचल-टाक करतो... आंम्ही ज्या साबुदाण्याला(आणी उपासाच्या इतर सार्‍याच पदार्थांना) ८ वर्षापूर्वीच बाय/बाय केले आहे...त्याच्या निर्मितिप्रक्रीये बद्दलची माहिती आहे ही... अवश्य वाचा...

http://sphotos-g.ak.fbcdn.net/hphotos-ak-snc6/224441_370485896365951_1035345809_n.jpg

क्या आप जानते हैं साबूदाने की असलियत को ??

आमतौर पर साबूदाना शाकाहार कहा जाता है और व्रत, उपवास में इसका काफी प्रयोग होता है। लेकिन शाकाहार होने के बावजूद भी साबूदाना पवित्र नहीं है। क्या आप इस सच्चाई को जानते ह
ैं ?

साबूदाना किसी पेड़ पर नहीं ऊगता । यह कासावा या टैपियोका नामक कन्द से बनाया जाता है । , कासावा वैसे तो दक्षिण अमेरिकी पौधा है लेकिन अब भारत में यह तमिलनाडु,केरल, आन्ध्रप्रदेश और कर्नाटक में भी उगाया जाता है । केरल में इस पौधे को “कप्पा” कहा जाता है । इसकी जड को काट कर इसे बनाया जाता है जो शकरकंदी की तरह होती है इस कन्द में भरपूर स्टार्च होता है । यह सच है कि साबूदाना (Tapioca) कसावा के गूदे से बनाया जाता है परंतु इसकी निर्माण विधि इतनी अपवित्र है कि इसे शाकाहार एवं स्वास्थ्यप्रद नहीं कहा जा सकता।

साबूदाना बनाने के लिए सबसे पहले कसावा को खुले मैदान में बनी बडी बडी कुण्डियों में डाला जाता है तथा पानी डाल कर रखा जाता है और रसायनों की सहायता से उन्हें लम्बे समय तक गलाया, सड़ाया जाता है। इस प्रकार सड़ने से तैयार हुआ गूदा महीनों तक खुले आसमान के नीचे पड़ा रहता है। रात में कुण्डियों को गर्मी देने के लिए उनके आस-पास बड़े-बड़े बल्ब जलाये जाते हैं। इससे बल्ब के आस-पास उड़ने वाले कई छोटे मोटे जहरीले जीव भी इन कुण्डियों में गिर कर मर जाते हैं।

दूसरी ओर इस गूदे में पानी डाला जाता है जिससे उसमें सफेद रंग के करोड़ों लम्बे कृमि पैदा हो जाते हैं। इसके बाद इस गूदे को मजदूरों के पैरों तले रौंदा जाता है या आज कल कई जगह मशीनों से भी मसला जाता है इस प्रक्रिया में गूदे में गिरे हुए कीट पतंग तथा सफेद कृमि भी उसी में समा जाते हैं। यह प्रक्रिया कई बार दोहरायी जाती है। और फिर उनमें से प्राप्त स्टार्च को धूप में सुखाया जाता है । जब यह पदार्थ लेईनुमा हो जाता है तो मशीनों की सहायता से इसे छन्नियों पर डालकर गोलियाँ बनाई जाती हैं ,ठीक उसी तरह जैसे की बून्दी छानी जाती है ।

इन गोलियों को फिर नारियल का तेल लगी कढ़ाही में भूना जाता है और अंत में गर्म हवा से सुखाया जाता है । और मोती जैसे चमकीले दाने बनाकर साबूदाने का नाम रूप दिया जाता है
बस साबूदाना तैयार । फिर इन्हे आकार ,चमक, सफेदी के आधार पर अलग अलग छाँट लिया जाता है और बाज़ार में पहुंचा दिया जाता है । परंतु इस चमक के पीछे कितनी अपवित्रता छिपी है वह सभी को दिखायी नहीं देती।

तो चलिये उपवास के दिनों में ( उपवास करें न करें यह अलग बात हैं ) साबूदाने की स्वादिष्ट खिचड़ी ,या खीर या बर्फी खाते हुए साबूदाने की निर्माण प्रक्रिया को याद कीजिये

०==========०============०==========०============०==========०============०======

श्रीरंग_जोशी's picture

28 Oct 2012 - 11:38 pm | श्रीरंग_जोशी

साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडे हे अत्यंत प्रिय असल्याने वरील माहिती वाचून क्लेश न केलेलाच बरा...

प्रकाश घाटपांडे's picture

29 Oct 2012 - 4:23 pm | प्रकाश घाटपांडे

गुर्जी समस्त उपवासकरांना हे समजले तर काय अनर्थ होईल.

ईन्टरफेल's picture

5 Nov 2012 - 8:53 pm | ईन्टरफेल

कै नै ओ !
सकाळि ११ वाजता मिळनारी पोळी भाजी !
रात्रि ९ वाजता मिळनारी चटनि भाकर !
उपवास गेला चुलीत !