जंगलातले चालणे

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
7 Oct 2012 - 7:17 pm

(c) pashanbhedजंगलातले चालणे

दुर रानात रानात
शीळ घुमली कानात
पाखरांची किलबील
पानात पानात

उभा बाजूला डोंगर
झरा वाहतो समोर
पाणी पिण्यासाठी त्यात
सोडले कुणी जनावर

शिवालय शांत भग्न
गुंतले त्यात मन
थेंब थेंब पाण्याचा
होई अभिषेक अर्पण

होती बरोबर शिदोरी
झाली तीची न्याहरी
दुपारी होईल काहीबाही
त्यालाच काळजी सारी

एकटेच चालायाचे
स्वत:शीच बोलायाचे
जंगल मोठे निबिड
निघून एकटेच जायचे

आला सुर्य माथ्यावर
थेंब घामाचे अंगावर
पायवाट संपता संपेना
चालायाचे खूप अजून

- पाषाणभेद
(पुर्वप्रकाशित)

शांतरसकविता

प्रतिक्रिया

पैसा's picture

7 Oct 2012 - 10:32 pm | पैसा

लै आवडली.

अत्रुप्त आत्मा's picture

7 Oct 2012 - 10:59 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emo/happy/thumbs-up.gif

भेदक पाषाण आले,,, कविता घेऊन :-)
अता जाऊ नका पुन्हा,,,अशी सुट्टी टाकुन ;-)

स्पंदना's picture

8 Oct 2012 - 6:30 am | स्पंदना

आला सुर्य माथ्यावर
थेंब घामाचे अंगावर
पायवाट संपता संपेना
चालायाचे खूप अजून

miles to go before I sleep.

प्रचेतस's picture

8 Oct 2012 - 8:11 am | प्रचेतस

खूप छान.

सस्नेह's picture

8 Oct 2012 - 2:22 pm | सस्नेह

फोटूकडे पाहून तरी 'जंगल मोठे निबिड' काही वाटत नाही...

पाषाणभेद's picture

8 Oct 2012 - 4:24 pm | पाषाणभेद

तो फटू म्या काढेल हाय म्हून टाकला. समोरचा डोंगर सोडून द्या पण बरोब्बर त्या मोठ्या झुडपाखाली एक ओहोळ या टेकडीखाली उतरत होता. मी एकटा गेलो होतो तेथे अर्थात अंगाला घाम वैगेरे काही आला नव्हता. एक छोटी टेकडीच आहे ती. बाकी सिच्चूवेशन म्या वर सांगेल तश्शीच व्हती.

सहज's picture

9 Oct 2012 - 2:19 pm | सहज

तुम्हाला जंगलाची सफर करायला मिळाली हे खासच!

बाकी फोटो पाहून "द होल वावर इज अवर. गोऽ ना गो "" आठवले.

दाट झाडीची रेघ दिसतेय तोच ओहोळ असावा.
त्याच्या काठावर मस्त ताणून द्यावंसं वाटतंय..

पाषाणभेद's picture

10 Oct 2012 - 8:28 am | पाषाणभेद

थोडे अवांतर सांगतो.
येथे दोन शेजारी टेकड्या आहेत. त्या दोहोंच्या वरती दोन छोटी मंदीरे आहेत. वर उल्लेखलेला फोटो अन ओहोळ त्या मोठ्या झुडूपामागे जावून खाली उतरतो. ही निर्मीतीही येथलीच आहे.

सुधीर's picture

8 Oct 2012 - 3:06 pm | सुधीर

शेवटच्या दोन कडवी खास आवडल्या.
एकटेच चालायाचे
स्वत:शीच बोलायाचे
जंगल मोठे निबिड
निघून एकटेच जायचे

आला सुर्य माथ्यावर
थेंब घामाचे अंगावर
पायवाट संपता संपेना
चालायाचे खूप अजून

क्लास!

एकटेच चालायचे.सुन्दर! एकला निरन्जन हेच खरे.

ज्ञानराम's picture

10 Oct 2012 - 9:23 am | ज्ञानराम

खूपच आवडले... मस्त

सुहास..'s picture

10 Oct 2012 - 6:27 pm | सुहास..

खास च !

मदनबाण's picture

10 Oct 2012 - 10:38 pm | मदनबाण

दफोराव कविता आवडली ~ :)