होय ( शर्मिला इरोमसाठी ) : सत्चिदानन्दन यांच्या मलयाळम कवितेचा अनुवाद

Kavita Mahajan's picture
Kavita Mahajan in जे न देखे रवी...
21 Sep 2012 - 6:36 pm

माझं शरीर आहे
माझा ध्वज अर्ध्यावरचा.
मला पाणी मिळतं
उद्याच्या नदीतून,
भाकरी
वार्‍याच्या स्वयंपाकघरातून.
माझ्या मेंदूत आहे एक
बंदुकीची गोळी
हिरवीगार
अंतर्ज्ञानी माणसाच्या पोपटासारखी.
माझं नाव आहे
शेवटचं अक्षर माझ्या पुरातन भाषेतलं
शेवटचं उत्तर प्रत्येक कोड्याचं
तात्पर्य प्रत्येक म्हणीचं
ईश्वर प्रत्येक जादुई सुरावटीचा
दुश्चिन्ह...

( सत्चिदानंदन यांनी जयपूर फेस्टिवलमध्ये वाचलेल्या कवितेचा मराठी अनुवाद )

वाङ्मय

प्रतिक्रिया

नाना चेंगट's picture

22 Sep 2012 - 10:48 am | नाना चेंगट

आमचे परम मित्र प्रा डॉ दिलीप बिरूटे (तेच ते पाली अर्धमागधीचे आभ्यासक, मराठवाड्याची ज्वलंत अस्मिता आणि बरेच काही ) यांनी आम्हाला केलेल्या दोन खरडीतील अंश :

१) विलियम रॉबर्ट ने आधुनिकतावादी चिंतन की विशेषताओ की व्याख्या करते हुये लिखा ' आजकल ऐतिहासिक चेतना से पलायन की आकांक्षा बहुत प्रबल और लोकप्रिय है और इसे पूरा करने के साधन अनंत है | मादक पदार्थो का सेवन; पढने से बचना, ऐसा कुछ भी न पढना जो बेचैने करने वाला हो या बौद्धिक श्रम की मांग करता हो और तीव्र अनुभूतिमय जीवन जीना इन सबकी मदद से विचार के बहिष्कार और द्वद्वांत्मक को नकारने की प्रवृत्ती आजकल खू प्रचलित है | यह कहा जा सकता है कि अगर उन्नीसवी शताब्दी मे ईश्वर मर गया तो वीसवी सदी के उत्तरार्ध मे आलोचना बुद्धि बीमार और मरणोन्मुख है '' उत्तर आधुनिकतावाद जगदीश चतुर्वेदी यांच्या सौजन्याने.

२)मॅनेजर पांडेय आधुनिकतावाद के बारे मे लिखते है............. आरं है का ?

कविता आणि प्रतिसाद एकमेकांशी सुसंगत असतील, नसतील किंवा कसेही...

llपुण्याचे पेशवेll's picture

22 Sep 2012 - 1:03 pm | llपुण्याचे पेशवेll

नाना परिपक्व होऊ लागल्याची निशाणी म्हणायची का?

जाई.'s picture

22 Sep 2012 - 11:44 am | जाई.

साँरी
पण मला यात शर्मिला इरोमचा सबंध कुठेही समजला नाही
मूळ कविता वाचायला मिळेल का

Kavita Mahajan's picture

24 Sep 2012 - 11:50 am | Kavita Mahajan

शर्मिलाची कहाणी माहीत असल्यशिवाय तो सन्दर्भ लागणार नाही. गुगल केल्यास तिची माहिती मिळेल. मूळ कविता मल्याळम मध्ये आहे. तुम्हांला ती भाषा येत असल्यास सत्चिदांचा कॉन्तॅक्ट देईन. मागवून घेऊ शकाल.

जाई.'s picture

24 Sep 2012 - 4:54 pm | जाई.

धन्यवाद
शर्मिला इरोम मला चांगली माहित आहे
तिच्यासाठी गुगल करायची गरज नाही
अनुवादाचा आणि तिच्या कामाचा सबंध मला समजला नाही म्हणून विचारणा केली
मला मल्याळम येत नाही
तुम्ही ही कविता इंग्रजीतून अनुवाद केली आहे का
मला इंग्रजी अनुवाद हवा आहे

Kavita Mahajan's picture

24 Sep 2012 - 6:58 pm | Kavita Mahajan

नाही जाई.
कवीसोबत बसून मूळ मल्याळमवरूनच हिंदी-इंग्लीशमध्ये बोलत हा अनुवाद केला होता. तिचे चरित्रच या कवितेत प्रतिकात्मक रूपात त्यांनी लिहिले आहे, त्यामुळे ती माहिती पहा, असे मी सुचवले होते.

जाई.'s picture

24 Sep 2012 - 9:21 pm | जाई.

हम्म ओके

बाकी जाऊदे, तुम्हाला मलयाळम भाषा येते??? येत असल्यास लै भारी.

Kavita Mahajan's picture

24 Sep 2012 - 11:54 am | Kavita Mahajan

मला मल्याळम भाषा येत नाही. हा अनुवाद सत्चिदांसोबत बसून केला आहे. काही भाषांमधून आपल्याला थेट अनुवादक मिळत नाहीत. त्यामुळे हिंदी / इंग्लीशचा आधार घ्यावा लागतो. मी 'भारतीय लेखिका' नावाची एक पुस्तक मालिका संपादित करते आहे. त्यामुळे सध्या विविध भारतीय लेखक-लेखिकांच्या संपर्कात आहे.

बॅटमॅन's picture

24 Sep 2012 - 12:17 pm | बॅटमॅन

धन्यवाद.

यकु's picture

22 Sep 2012 - 3:32 pm | यकु

कोण शर्मिला इरोम?
ती हॉस्पिटलमध्ये आहे बर्‍याच दिवसांपासून तीच ना? ती लवकर बरी होवो.
हे सच्चिदानंद कोण?
हे जयपूर फेस्टीव्हल म्हणजे काय? ही चार आठ ओळींची कविता ( ती पण मल्ल्याळममध्ये असलेली ) वाचायला ते जयपूरला गेले? वा.. वा.. गुड.
आणि तिचा मराठी अनुवादही आम्हाला वाचायला मिळाला - गुडाड गुड!

संपादित.

नानू सरंजाम्या ( यक्कु)

Kavita Mahajan's picture

24 Sep 2012 - 12:01 pm | Kavita Mahajan

शर्मिला इरोमचा सन्घर्ष फार मोठा आहे. आपण तसे चार दिवसही जगू शकणार नाही. २००० सालपासून ती उपोषण करते आहे. ती बरी होण्याची शक्यता कमीच. कारण ती पूर्णतः सलाईनवर आहे. तोन्डाने तिने इतक्या वर्षांत थेंबभर पाणीही प्यायलेले नाही. तिने स्वतः लिहिलेल्या काही कवितांचे पुस्तक जुबान या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केले आहे.
सत्चिदानंदन हे तमीळमधले मोठे कवी आहेत. मला व्यक्तिशः आवडणार्‍या भारतीय कवींमध्ये सगळ्यात वर, पहिले नाव त्यांचे आहे. भारतीय भाषांखेरीज जगातील अनेक भाषांमधून त्यांच्या कविता अनुवादित झालेल्या आहेत. केंद्रीय साहित्य अकादेमीचे ते एकेकाळी अध्यक्षही होते. नव्या तरुण कवीमंडळींना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी अनेक उत्तम उपक्रम आखले व स्वतः त्यांच्या मळ्याळम कविता इंग्रजीत अनुवादित केल्या.

शैलेन्द्र's picture

23 Sep 2012 - 11:05 am | शैलेन्द्र

चांगल्याय... (कविता की प्रतिक्रिया ते विचारु नका. :) )

काही दृष्टांत, अन्वय कठिण वाटले, त्यामुळे अजून कविता नीट समजलेली नाही.

सांजसंध्या's picture

24 Sep 2012 - 10:26 am | सांजसंध्या

बंदुकीची हिरवीगार गोळी, शरीर म्हणजे अर्ध्यावर उतरलेला ध्वज या कल्पना आवडल्या.