गद्यातलं हे माझं पहिलं (आणि आवडलं नाही तर एकमेव ) लिखाण आहे.
साधारण वर्षभरापूर्वी नॅशनल वर मदर इंडिया चालू होता. कदाचित १५ ऑगस्ट असावा. बघायचा होता. पण सतत फोन, घरातली कामं यात तो सलग पाहता आलाच नाही. बाहेरून येईपर्यंत सिनेमा संपला होता. असंच सर्फिंग करतांना झी स्टुडिओ या चॅनेलवर एट बिलो हा सिनेमा चालू होता. मी पुढे जाणार इतक्यात बाबांनी मला थांबायची खूण करत हा सगळं काम सोडून हा सिनेमा पहा अशी आज्ञा केली...
सुरूवात चुकली होती. ती बाबांकडून कळाली. अंटार्क्टिकामधे मोहीमेसाठी एक अमेरिकन पथक गेलेलं असतं. स्टेशनपासून लांब बर्फात फिरतांना नायक बर्फाच्या घळईत अडकतो. वर बर्फ जमा होऊन त्याची तिथंच हिमसमाधी बांधली जाण्याचा धोका निर्माण होतो.
पथकातल्या एकाला एक कल्पना सुचते. मोहीमेसाठी कुत्र्यांची गाडी आणलेली असते. मोहीमेत वापरली जाणारी ही कुत्री हुषार असतात. कुत्र्यांना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येतं आणि त्यांच्या सहाय्याने नायकाला घळईतून बाहेर काढण्यात यश येतं. तो बराच जखमी असतो आणि पाय जायबंदी झालेला असतो. लवकर मेडिकल हेल्प मिळाली नाही तर गॅंगरीन होऊन पाय कापावा लागण्याचा धोका असतोच.
युद्धपातळीवर एका हेलिकॊप्टरचा बंदोबस्त करून पेशंटला न्यायचं ठरतं. कुत्र्यांचा नायकावर आणि मिहीमेतल्या सदस्यांवर खूप जीव असतो. ते ही मागे लागतात. मोजक्याच जागेमुळं ते कुत्र्यांना बांधून ठेवतात आणि आम्ही लगेच येतो असं त्या कुत्र्यांना सांगून अमेरिकेकडे उड्डाण करतात.
नायकाचा पाय बरा होतो. तीन दिवस झालेले असतात. त्याला तिकडं कुत्र्यांच काय झालं असेल या कल्पनेनं अस्वस्थ वाटायला लागतं. त्याच्या भावनेची तीव्रता कुणाकडेच नसल्याने खास कुत्र्यांसाठी पुन्हा जावं असं कुणालाच वाटत नसतं. एकतर मोहीम आटोपलेली असल्याने आता पुन्हा जाणं म्हणजे सगळी जमवाजमव करणे,पैशांचा बंदोबस्त करणे हे सगळं आलंच.. हे सोपं नसतं
इकडं हवामान खराब होत चाललेलं असतं. कुत्र्यांना बांधून ठेवलेलं. हिमवादळं सुरू झालेली असतात......
पुढं काय होतं हे सांगत नाही. हा सिनेमा प्रत्येकाने पहावा इतका सुंदर आहे...!
त्या कुत्र्यांच काय होतं हाच सिनेमाचा विषय आहे. माणूस आणि कुत्रा यांच्या नात्यावर केलेली एखादी सुंदर कविताच असावी असा हा सिनेमा आहे..
कुत्र्यांनी दाखवलेली माणुसकी आणि माणसाची बेपर्वाई, संकटात त्यांच एकमेकांवरचं प्रेम... !!! कसलेल्या अभिनेत्यांना मागं टाकतील असा त्या कुत्र्यांचा अभिनय... सगळंच अद्भुत !!
- संध्या
--------------------------------------------------------------------------
या सिनेमाच्या नेटवरील लिंक्स.
http://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=NXkoGlxVbLY
http://www.youtube.com/watch?v=OSwlozB-zyE&feature=player_embedded
http://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=NXkoGlxVbLY
पुढे काय हे टीव्हीवर पहा. माझाही अधून मधून काही भाग राहीला बघायचा..... झी स्टुडिओ वर नेहमी असतो.. किंवा मग सीडी !!
टीप :
http://www.youtube.com/watch?v=Z3eBOcWmZw4&feature=related
या वरच्या लिंकमधे पहिला भाग दिलेला आहे. या यूट्यूबच्या बाजूलाच एक ते बारा असे भाग दिलेले आहेत. संपूर्ण सिनेमा इथेच पाहता येईल..
प्रतिक्रिया
12 Aug 2012 - 12:18 pm | यशोधरा
मस्त आहे हा सिनेमा. पाहिला आहे मी.
12 Aug 2012 - 12:26 pm | मोदक
धन्यवाद्स...
12 Aug 2012 - 12:22 pm | प्रचेतस
एट बिलो पाहिलेला होताच. अत्यंत सुंदर चित्रपट आहेच.
अन्टार्क्टिकाच्या बर्फाळ वातावरणात ५ महिने जगण्याचा कुत्र्यांचा संघर्ष सुरेख चित्रित केला आहे.
12 Aug 2012 - 12:46 pm | बबलु
अप्रतिम सिनेमा. First day first show ला पाहिला होता २००६ मध्ये.
माझ्या अत्यंत आवडत्या सिनेमांपैकी.
12 Aug 2012 - 6:29 pm | चिम् चिम् मामा
हा सिनेमा जर धर्मेंद्र ने पाहिला तर तो.... त्याचा पेटंट डायलोग कधी बोलणार नाही... खी...खी..!!!!!
खुप सुरेख सिनेमा.... धन्यवाद सिनेमची ८वण करुन दिल्या बद्दल.
12 Aug 2012 - 6:32 pm | रेवती
धन्स.
12 Aug 2012 - 8:14 pm | मैत्र
अतिशय सुंदर चित्रपट आहे. काही विशेष कुत्र्यांचा / लीडर्सचा 'अभिनय' किंवा एकूण दिग्दर्शन मस्त आहे.
सुरुवात / प्लॉट जरा चुकला आहे:
एका अतिउत्साही शास्त्रज्ञाला काही विशिष्ट मोजमापे घेण्यासाठी जायचं असतं आणि इतर पर्याय नसल्याने नायक नाईलाजाने कुत्र्यांची स्लेज टीम घेऊन जातो. परतताना तो शास्त्रज्ञ घळईत (crevice) मध्ये अडकल्यावर कुत्रे त्याला वाचवतात. जेव्हा टीम परत येते (पोल सोडून) तेव्हा कुत्र्यांसाठी जागा राहत नाही.
काही काळाने नायकाला राहवत नाही आणि तो त्यांना आणण्याचा प्रयत्न करतो. पैशाची जेव्हा सोय होत नाही तेव्हा तो शास्त्रज्ञ मदत करतो..
12 Aug 2012 - 11:36 pm | प्रचेतस
परत सुरुवात चुकली आहे. ;)
तो शास्त्रज्ञ अन्टार्क्टिकाच्या बर्फमय भूमीत रूतलेला उल्कापाषाण शोधण्यासाठी आलेला असतो.
13 Aug 2012 - 11:42 am | मैत्र
दुरुस्तीबद्दल :)
12 Aug 2012 - 9:07 pm | अत्रुप्त आत्मा
बघितलेला आहे हा सिनेमा...अतिशय छान आहे.
12 Aug 2012 - 10:56 pm | जाई.
अप्रतिम आहे हा सिनेमा
13 Aug 2012 - 5:52 am | स्पंदना
अतिशय आवडलेला एक सिनेमा. शेवटी तर अतिशय भावनावश वायला होत.
आठवण करुन दिल्याबद्दल धन्स .
13 Aug 2012 - 6:00 am | रेवती
आवडला. फारच सुंदर.
13 Aug 2012 - 6:28 am | चौकटराजा
मी पाहिलेला नाही पण नक्कीच पाहीन.
@ सांजसंध्या, गद्यातील लिखाण ही आपली एक सुंदर सुरूवात आहे. पुलेशु.
यामुळे सहजच आठवला तो प्रोजेक्ट एक्स हा चित्रपट !
13 Aug 2012 - 10:37 am | ५० फक्त
लई भारी पिच्कर आहे हा, जबरा एकदम ते कुत्र्यांचं सिलबरोबर लढाई करणं मांसाच्या तुकड्यासाठी वगैरे, जबराच आहे सगळा भाग.
13 Aug 2012 - 12:05 pm | शिल्पा ब
नाही पाहीला अजुन. माहीतीबद्दल धन्यवाद. बघते.
13 Aug 2012 - 12:13 pm | मृत्युन्जय
आता बघेन म्हणतो. बघायलाच हवा.
आता लिखाणाबद्दल. हे चित्रपट समीक्षण दाल फ्राय सारखे होते. चुकण्याची फारशी संधीच नव्हती. त्यामुळे तुम्ही अजुन लिहा. आम्ही सांगुच कसे आहे ते. आम्हाला नाही आवडले तरी फरक पडणार नाही. तुम्ही जे लिहितो आहात त्यात तुम्हाला सृजनशीलतेचा अनुभव आला आणि इतरांना जिलब्या टाकल्याचा अनुभव नाही आला म्हणजे तुम्ही ऑन ट्रॅक आहात असे समजा. :)
13 Aug 2012 - 12:31 pm | बॅटमॅन
हा पिच्चर अस्तित्वात आहे असे माहितीच नव्हते. वर्णन ऐकून उत्सुकता प्रचंड जागृत झालेली आहे, पाहीनच आता. धन्यवाद :)
13 Aug 2012 - 12:36 pm | Maharani
धन्यवाद...नक्की बघेन........
13 Aug 2012 - 12:56 pm | गवि
सिनेमा बघायलाच हवा असं वाटतं आहे. बाकी प्रत्यक्ष आयुष्यात मात्र ध्रुवीय मोहिमांवर नेलेले बहुसंख्य कुत्रे प्रचंड उपयोग करुन घेऊन झाल्यावर इच्छित स्थळी पोचल्यावर / परत येताना, ध्येय साध्य झालं आणि आता त्यांना सोबत नेणं डोईजड आहे म्हणून मोहिमेच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर गोळी घालून मारुन टाकून "डिस्पोज ऑफ" केल्याचा इतिहास आहे.
13 Aug 2012 - 12:59 pm | बॅटमॅन
:( :(
13 Aug 2012 - 2:21 pm | शिल्पा ब
आताच पाहीला. कुत्र्यांच काम एकदम मस्त. खास करुन मेलेल्या माशाचं मांस खायच्या वेळेस केलेलं प्लानिंग ... पक्षी पकडायच्या वेळेचं प्लानिंग.
प्रत्यक्षातसुद्धा अशा काही घटना असतील का? म्हणजे इतकं मेलोड्रामॅटीयक नाही तरी कुत्र्यांची काळजी घेउन त्यांना बरोबर घेउन येणे वगैरे. गुगलुन बघते नंतर.
असो. या चित्रपटाचा ट्रेलर पाहीला होता पण संपुर्ण चित्रपट पहायचा योग आज आला. धन्यवाद हो सांजसंध्या बै !
13 Aug 2012 - 9:01 pm | सांजसंध्या
मैत्र
करेक्ट केल्याबद्दल धन्यवाद. सर्वांचे आभार :)
14 Aug 2012 - 9:25 am | मुक्त विहारि
सिनेमा डावुनलोड करत आहे...
असेच उत्तम सिनेमे सांगत रहा..(पण फक्त हॉलीवूडचेच)...