मग,काय केलस ग या वाढदिवसाला ?

सुहास..'s picture
सुहास.. in जे न देखे रवी...
28 Oct 2010 - 1:01 pm

मग,काय केलस ग या वाढदिवसाला ?
विसरलीस का त्या मंद, मृदुगंधाला
पाहताच हरवलेल्या आपल्या शब्दांना
बिलगलीस नकळत हरवून स्वतःला

मग,काय केलस ग या वाढदिवसाला ?
विसरलीच असशील त्या गावाला
भिजलेल्या त्या चिंब पावसाला
ओंठावर विसावलेल्या त्या थेंबाला

मग,काय केलस ग या वाढदिवसाला ?
डोळ्यातून मी व्यक्त होताना, तुला
आठवतो का पहिलाच स्पर्श केलेला
माझा हात तुझ्या केसांत विसावलेला

मग,काय केलस ग या वाढदिवसाला ?
माझी आठवण नको तुझ्या मनाला
आपल्या हळूवार जपलेल्या त्या क्षणांला
म्हणून विसरलीस ना आपल्या नात्याला

मग,काय केलस ग या वाढदिवसाला ?
हसताना हलकेच ओघळणार्‍या अश्रुला
निक्षुन बजावताना, झालेल्या यातनेला
माझी आठवण नको म्हणून मनाला

मग,काय केलस ग या वाढदिवसाला ?
नाते तोडणार्‍या भावनेच्या भराला
कसे गं, गेलीस परक्या देशाला
परत ये ,का अशी झुरवतेस स्वतःला

मग,काय केलस या वाढदिवसाला ?
जप ग, त्या जगण्याच्या द्वंद युध्दात स्वतःला,
विसरू नकोस स्वताच्या निरागस हास्याला,
सावरेन स्वत:ला, आठवणी असताना सोबतीला

आयटीत+ ऐटीत असल्यामुळे पदोपदी,आसपास ईतक काही घडत असत,काही नवी नाती जुळत असतात आणी काही तुटत असतात अथवा विरह-अग्नीत जळत असतात.त्यांच भाव-विश्व काय असेल? काय काहुर असेल त्यांच्या मनात? याचा विचार करताना सुचलेल्या चार ओळी,गोड मानुन घेणे.

समाजजीवनमान

प्रतिक्रिया

sneharani's picture

28 Oct 2010 - 1:06 pm | sneharani

मस्त झालीय कविता!
:)
आवडली.

Dhananjay Borgaonkar's picture

28 Oct 2010 - 2:50 pm | Dhananjay Borgaonkar

अप्रतिम झाली आहे कविता.

मग,काय केलस ग या वाढदिवसाला ?
नाते तोडणार्‍या भावनेच्या भराला
कसे गं, गेलीस परक्या देशाला
परत ये ,का अशी झुरवतेस स्वतःला

कड़क आहेत या ओळी.

Dhananjay Borgaonkar's picture

28 Oct 2010 - 2:51 pm | Dhananjay Borgaonkar

अप्रतिम झाली आहे कविता.

मग,काय केलस ग या वाढदिवसाला ?
नाते तोडणार्‍या भावनेच्या भराला
कसे गं, गेलीस परक्या देशाला
परत ये ,का अशी झुरवतेस स्वतःला

कड़क आहेत या ओळी.

रश्मि दाते's picture

28 Oct 2010 - 3:13 pm | रश्मि दाते

मस्त जमली आहे सुहास्,खुप आवडली मला......अगदी बरोबर मांडल्या आहेत भावना कि कुणी जवळ्च दुर नीघुन गेल्यावर....

प्रभो's picture

28 Oct 2010 - 6:39 pm | प्रभो

ह्म्म....

पैसा's picture

28 Oct 2010 - 6:42 pm | पैसा

मला कवितेतलं फारसं कळत नाही, पण भावना कळल्या. छान कविता!

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Oct 2010 - 7:36 pm | बिपिन कार्यकर्ते

+१...

परिकथेतील राजकुमार's picture

29 Oct 2010 - 12:39 pm | परिकथेतील राजकुमार

+२...

प्राजु's picture

28 Oct 2010 - 9:29 pm | प्राजु

छान आहे..

मग,काय केलस ग या वाढदिवसाला ?
विसरलीच असशील त्या गावाला
भिजलेल्या त्या चिंब पावसाला
ओंठावर विसावलेल्या त्या थेंबाला

अतिशय जबरदस्त कविता .. खुप खुप आवडली २-३ दा वाचली मनभरुन ...

लिहित रहा .. वाचत आहे ..

(काल ह्या कवितेचे पान ओपन होत नव्हते .. आज झाले छान वाटले)

विसोबा खेचर's picture

28 Oct 2010 - 10:15 pm | विसोबा खेचर

छान कविता रे..!

आठवतो का पहिलाच स्पर्श केलेला
माझा हात तुझ्या केसांत विसावलेला

हे कुठे केलंस? :)

माझ्या आयुष्यात मी हे प्रथम राजमाचीच्या वाटेवर एका झाडाआड केलं.. छान पावसाळा होता.. १९८६/८७ सालची गोष्ट आहे ही..! असो.. :)

(सालसप्रेमी) तात्या.

पाषाणभेद's picture

28 Oct 2010 - 10:36 pm | पाषाणभेद

सुहास वेलकम टू द क्लब. (दोन्ही अर्थांनी)!

फ्रॅक्चर बंड्या's picture

29 Oct 2010 - 11:32 am | फ्रॅक्चर बंड्या

छान आहे कविता..

मराठमोळा's picture

29 Oct 2010 - 12:04 pm | मराठमोळा

मस्तच रे..
आवडली कविता. :)

अवलिया's picture

29 Oct 2010 - 12:06 pm | अवलिया

मस्त रे !

स्पंदना's picture

29 Oct 2010 - 12:33 pm | स्पंदना

सु हा स ! _ _ /\ _ _ !!

सुन्दर लिहिलय !
इतिहास आठवावा इतक सुन्दर !

चिगो's picture

30 Oct 2010 - 12:52 am | चिगो

>>मग,काय केलस ग या वाढदिवसाला ?
विसरलीच असशील त्या गावाला
भिजलेल्या त्या चिंब पावसाला
ओंठावर विसावलेल्या त्या थेंबाला

मग,काय केलस ग या वाढदिवसाला ?
डोळ्यातून मी व्यक्त होताना, तुला
आठवतो का पहिलाच स्पर्श केलेला
माझा हात तुझ्या केसांत विसावलेला
<<
खुप सुंदर...

गुंड्या बावळा's picture

30 Oct 2010 - 8:25 am | गुंड्या बावळा

कडक!!!!

रमणरमा's picture

30 Oct 2010 - 10:06 am | रमणरमा

आवडली कविता

वा विरह कवितेत विरह उतरलाय अगदी.

अशीच विस्कटली आपलं ते हे काय ते उचकपाचक केली आज....!

अरे सुहाश्या तुला कुणाची आठवण झाली आणि तुला ही कविता स्फुरली.

मग,काय केलस ग या वाढदिवसाला ?
विसरलीस का त्या मंद, मृदुगंधाला
पाहताच हरवलेल्या आपल्या शब्दांना
बिलगलीस नकळत हरवून स्वतःला

हे वाचून तर कविमनाचा वाटतो आहेस तू....