माघचा आठवडा भारताकरिता काळा आठवडाच होता. स्त्रीयावरील अत्याचार शिगेला गेला. वर्तमानपत्र वाचले की मन विषण्ण होऊन जाते. त्याच विषण्णतेला व्यक्त करणारी ही कविता.
शिवरायांच्या महाराष्ट्रात जे घडत आहे, ते पाहुन महाराजचे मनदेखील किती दु़खी: होत असेल?
गनीम
शिवप्रभु पाहतो खालती,
काय झाले माझ्या धरती,
कोणाला भीत ह्या पळती,
माझ्याच ह्या तर नाती ।
अन्याया आली ही भरती,
मुसमुसनी कोण ते रडती,
मावळे का हे सारे बघती,
जरी तलवार त्यांच्या हाती ।,
कोण जन्मले हे आमच्या जाती,
जणु काळ भासे तो राती,
का चिरडले ह्या कोवळ्या कांती,
स्वराज्याची ही केली माती ।,
दे वरदान शिरावरती,
सळसळून रक्त हे म्हणती,
रक्षिण्या तो सुंदर मोती,
होऊ स्वार पुन्हा घोड्यावरती,
भवानी तलवारीच्या ह्या पाती,
घेऊ गनीमाची गर्दन हाती ॥,
-केके
प्रतिक्रिया
17 Jul 2012 - 12:10 am | सुनील
भा.पो.