थकल्या भुकेस पटकन केवळ कळले ते अंडे
नेमक्यावेळी पचका करूनी जळले ते अंडे
खरपूस वास, तोंडी पाणी, भट्टी जमली वाट्टं
परंतु केकच्या झाकणामागे हसले ते अंडे
गणिताच्या पेप्रात मी दिली उत्तरे सारी
तरी पेपरावरती शेवटी उरले ते अंडे
कठोर तपाच्या नंतर देवा मनभावे स्मरले.
विश्वाचे इंगीत म्हणूनी दिसले ते अंडे
रंगत चढल्या मैफिलीत मग मीही घेतली तान
पण स्टेजवर बसल्याबसल्या झेलले ते अंडे
**सध्याच्या अंडे महोत्सवाच्या निमित्ताने पटकन काही स्फुरले. वृत्त वगैरेवर अजिबात विचारही केलेला नाही
प्रतिक्रिया
3 Jul 2012 - 5:31 pm | मी_आहे_ना
हाहाहाहा..(मौजमजा) छान जमलीयं
3 Jul 2012 - 6:16 pm | पैसा
रोज खावे अंडे.
3 Jul 2012 - 6:27 pm | सुनील
अंडे का फंडा आवडला!
गेल्या काही दिवसांपासून मिपाकरांची "अंड"श्रद्धा अगदी ओसंडून वाहते आहे, हे खरे :)
3 Jul 2012 - 7:47 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
पहिली रेसिपी असल्यामुळे अंड्यावर माझा भारी जीव.
:D
3 Jul 2012 - 10:25 pm | नंदन
दोन 'एगा'लिटेरियन हुच्चभ्रूंच्या प्रतिक्रिया वाचून अं. ह. झालो :)
4 Jul 2012 - 12:12 pm | श्रावण मोडक
योग्य दुवा दिलास. एरवी पंचाईतच झाली असती.
3 Jul 2012 - 6:31 pm | शुचि
छान. :)
3 Jul 2012 - 9:07 pm | मुक्त विहारि
छान छान
3 Jul 2012 - 9:30 pm | अमितसांगली
छान....मस्त जमलीय..........
3 Jul 2012 - 9:36 pm | सुहास..
रूष !
आता ही कविता अंडे न घालता कशी करायची ;) (तु आधीच अंडे घालुन केली आहेस ;) )
3 Jul 2012 - 10:31 pm | जाई.
मस्तच
4 Jul 2012 - 12:23 am | वीणा३
:)
4 Jul 2012 - 11:35 am | श्रीरंग_जोशी
हे तर शीघ्र काव्य, मानले बुवा तुंम्हाला!!
4 Jul 2012 - 12:35 pm | कुंदन
करा आता विडंबन जोशी बुवा.
कळते ते अंडे , पाडली ती ...... ;-)