माझा (http://www.misalpav.com/node/22092) लेख वाचून बरेच संदेश आले. खरे तर, माझ्या मूलांनी, अद्याप खूप मोठी प्रगती, केलेली नाही आहे.... पण एक मात्र नकी, की आता ते अपयश घेणार नाहीत.हा लेख बराचसा
"कॅलिडोस्कोपिक" आहे.ह्या लेखाला, स्थळ आणि काळाचे बंधन नसेल.कट्यावरच्या गप्पा असेच ह्याचे स्वरूप असेल.
ह्या लेखमालेला, मी "मूलांची शेती" हे नांव का दिले ते सांगतो.
तसे बघितले, तर आपण प्रत्येक जण शेतीच करत असतो.कोण आपले , अर्थज्ञान मिळवतो, तर कोणी आपले, वैद्यकीय ज्ञान मिळवत असतो.
त्यासाठी, योग्य ती पूस्तके वाचणे (बी रोवणे), त्यावर मनन आणि चिंतन करणे (पाणी आणि हवा), अडलो तर , तज्ञ लोकांना विचारणे (शेतातील तण काढणे) आणि मग परिक्षा देवून (पिकाची कापणी) नौकरी करणे व पैसे मिळवणे. (पिकाचा दर)..
आपण मूलांच्या बाबतीत तरी वेगळे असे काय करतो हो...
१. संस्कार ( वेळेवर ऊठणे, व्यायाम करणे इ.).... बी रोवणे
२. मूलांच्या बरोबर भरपूर गप्पा मारणे.(मूलांना पण आपले आई-वडील गप्पा मारायला हवे असतात)..पाणी आणि हवा
३. बर्याच वेळा , मूले त्यांच्या शाळेतील अडचणी आपल्याला सांगत नाहीत... इथे आपल्याला मदत करतात ते, मानसोपचार तज्ञ.(मला फार मदत झाली)...शेतातील तण काढणे..
४. मूले, जेंव्हा स्वतः हून सांगतील, की त्यांना काय व्हायचे आहे , तीच त्याची ... पिकाची कापणी
५. निवडलेल्या अभ्यासक्रमातील आवड आणि प्रगती....पिकाचा दर
पुढच्या भागापासून , आपण
संस्कार ह्या मह्त्वाच्या भागाकडे वळूया...
(बाय द वे, मूले , हा माझा वीक पॉइंट असल्याने, छगनराव आणि कं. ला जरा बाजूला ठेवू या.)
========================================================
मी जगातील सर्वोत्तम बाप आहे, हे "सर्टिफिकेट" मला माझ्या आई-वडीलांनी , मूलांनी आणि बायकोने दिले आहे.(बायकोकडून असे काही , सर्टिफिकेट, मिळवायला किती त्रास होत होतो, ह्याची कल्पना असेलच)
मध्यंतरी, "तारे जमिन पर" नावाचा सिनेमा आला होता.बायको-मूले, तो सिनेमा बघायला गेली.मूलांना विचारले, काय रे गड्या, कसा काय होता सिनेमा?मी जावू का बघायला?तिघांनीही सांगीतले, अजिबात जावू नका.... त्या "अमिर खानने", तुम्ही जे काही सांगता तेच सांगीतले आहे... खरे तर तूम्हीच अजून जास्त सांगू शकता.... (मूले , "कहानी" बघतात, "रावडी राठौड" वगैरे बघत नाहीत , ह्यावरून मूलांची सिनेमा बाबतीत आकलनशक्ती प्रचंड आहे, एव्हढेच सांगू शकतो)
एका नवर्याचा , एका बापाकडे, झालेला हा प्रवास कठीण होता पण अशक्य न्हवता.
असे म्हणतात, की "आई होणे सोपे आहे , पण आईपण निभावणे कठीण आहे". बापाच्या बाबतीत पण हीच म्हण लागू पडते.सूरूवाती-सुरुवातीला, मी पण थोडा, कठोर बाबा होतो.माझ्याकडून पण काही चूका झाल्या.पण वाचन प्रचंड असल्याने आणि बायकोनी दिलेल्या साथीमूळे रागावर खूप कंट्रोल आला.आपल्या बापाला राग येत नाही, हे जेंव्हा मूलांच्या लक्षात आले, तेंव्हा पासूनच, मूले मोकळी झाली.माझा राग कमी झाल्या मूळे, मूलांचा नक्की प्रॉब्लेम काय आहे, हे समजून घ्यायला सोपे गेले.त्यामूळे उपाय-योजना करायला पण सोपे गेले.
जिथे जिथे मी अडलो किंवा, पुस्तकीय मदत मिळाली नाही, तिथे तिथे, मानसोपचार तज्ञाची मदत घेतली.मुलगा वेडे-वाकडे वागू लागायच्या आत गेल्यामूळे,बराच फायदा झाला.
मानसोपचार तज्ञाकडे का गेलो?त्याने काय सांगीतले? आणि त्याचा काय फायदा झाला ते सांगतो.
१. मोठ्या मूलाला, मराठी माध्यम द्यावे की नको? असा प्रश्न पडला होता.मी आणि आमचे सगळे कूटूंब त्यांच्याकडे गेलो.त्यावेळी धाकटा मूलगा २ वर्षांचा होता.शक्यतो बर्याच ठिकाणी आम्ही सगळेच जण जातो. डोंबिवलीचे डॉ.पाध्ये आणि मी एकत्रच खेळायचो आणि ते माझ्या सगळ्या कूटूंबाला ओळखत होते.आमची , मानसोपचार तज्ञाकडे जायची पहिलीच खेप.
घरी हलकल्लोळ झाला.कशाला जायला पाहिजे?इंग्रजी माध्यमच द्या.वगैरे,वगैरे....कूठेतरी , ठाम उत्तर द्यायला पाहिजे... म्हणून मी स्पष्टपणे सांगीतले, माझ्या मूलांनी , कूठले शिक्षण , कूठल्या माध्यमातून घ्यावे, हाचा निर्णय , माझा मीच घेईन.त्याचे बरे-वाईट, जे काही परीणाम होतील, ते माझे मी सोडवीन...
डॉ.रांनी ३/४ च प्रश्न विचारले..आमची उत्तरे कंसात देत आहे..
अ) तू, मूलांसाठी किती वेळ देतो? (१ तास)
ब) त्यापैकी , इंग्रजीचा अभ्यास करायला , एक बाप म्हणून, तू किती वेळ देणार? (३० मिनिटे)
क ) मूलाच्या आईचे शिक्षण, कूठल्या माध्यमातून झाले आहे? (मराठी)
ड) त्या इंग्रजी शिकायला तयार आहेत का? (नाही)
मग आम्हाला बाहेर बसवून, मूलाशी गप्पा मारल्या. हे डॉ. आणि आपला बाप मित्र आहेत, हे मूलाला समजल्यामूळे त्याने, विना दडपण उत्तरे दिली. डॉ.नी त्याला ४/५ प्रश्न विचारले..
अ) आई मराठीतून बोलते, ते तूला आवडते का? (हो)
ब) आई-वडील इंग्रजीतून काही बोलले, तर तूला काही समजते का? (नाही)
क) बडबड गीते कूठली येतात ?
इथे मूलाने शाळेतील (त्यावेळी तो इंग्रजी माध्यमात होता) सगळी, म्हणून दाखवली..मग डॉ,च्या विनंतीने, मराठी बडबड गीते पण म्हणून दाखवली.
आता ह्यातील कूठली आवडतात? (मराठी)
डॉ.नी सल्ला दिला... मूलाला मराठी माध्यमात टाकले तर उत्तम... कारण, त्याचा कल पण तिकडे आहे आणि तूम्ही दोघेही , इंग्रजी माध्यमातले नाही.प्रत्येक धडा, आधी तूम्हाला वाचावा लागेल आणि मग त्याला समजावून द्यायला लागेल.
आम्ही, मराठी माध्यम ठरवले.
२.पहिलीच्या किंवा दूसरीच्या सहामाही नंतर, मूलगा शाळेत जायला तयार न्हवता.मला जाणवले, की प्रकरण , काही वेगळे आहे.पण तो माझ्याशी काही बोलायला तयार न्हवता.मग काय, चलो डॉ,पाध्ये...त्यांनी विचारल्यावर, त्याने सांगीतले, वर्गातील ४/५ मूले त्रास देतात.
डॉ. : वर्गात मूले किती?
मू, : ६०
डॉ. : ६० मोठे की ५
मू. : ६०
डॉ. : ६० तून ५ गेले, किती उरले
मू. : ५५
डॉ. : हे ५५ , ह्या ५ पेक्षा , खूप मोठे आहेत का?
मू. : होय...
डॉ. : मग आपण असे करू या... ह्या ५५ मूलांशी मस्त मैत्री करू या..
मग हळू हळू , त्याला, त्या ५ मूलांची नावे विचारली.ती नावे मला दिली. आणि सांगीतले की, बाईंना, ही नावे दे... आणि एव्हढेच सांग... की, ही मूले माझ्या मूलाला थोडा त्रास देतात. तर जरा माझ्या मूलाकडे, थोडे लक्ष द्या...
मी , थेट, मुख्याध्यापक बाईंनाच , भेटलो... त्यापण, मी गेलो की, छान गप्पा मारायच्या, नविन काय वाचले?शाळेत काय सुधारणा करायला हवी. वगैरे विचारायच्या.. मग हळूच सांगीतले, की बघा ताई, हा असा, असा थोडा त्रास आहे. त्या मूलांना न जाणवता, हा त्रास कसा दूर करता येईल?
बाईंनी. नावे घेतली आणि एका-एका मूलाला, वेगळे-वेगळे बोलावुन , डोस दिला.कधी कधी, वर्गात मूद्दाम जावून, मूलाची पाठ थोपटली...एका महिन्यात प्रॉब्लेम सॉल्व्ह....
आहे काय अन नाही काय
(इंग्रजी माध्यमाच्या शाळेत, असे काही होईल, असे मला वाटत नाही)
प्रतिक्रिया
29 Jun 2012 - 12:37 am | रेवती
ग्रेट!
बुलीजना तोंड देण्याचा किस्सा आवडला.
29 Jun 2012 - 1:04 am | मुक्त विहारि
आपण , घाबरतो ते, मानसोपचारतज्ञा कडे जायला.
आपल्याला, असे वाटत असते, की , ते फक्त, वेड्या माणसांनाच ट्रीटमेंट देतात...
पण
तसे नसते, ह्या अडचणींना कसे तोंड द्यायचे, ह्याची शिकवण , त्यांना मिळालेली असते.
वय आणि पोस्ट, ह्या प्रमाणात प्रॉब्लेम्स वाढत असतात.लहान मूलांचे भांडण. लहानच असणार.त्यांच्या नजरेतून ते खूप मोठा असतो.तिथे त्यांना आपली गरज असते.ती गरज पूर्ण करा.त्याला मार्गदर्शन करा.
इथे मी जर एक टिपि़कल बाप म्हणून वावरलो असतो तर...
१. मूलाला ओरडलो असतो
२. त्याला जबरदस्ती , शाळेत पाठवले असते.
३. मूलाने नावे, सांगीतल्या नंतर, शाळेत जावून भांडण केले असते.
४. त्या मूलांच्या नावाने पालक सभेत गोंधळ घातला असता.
५. त्या पालकांबरोबर भांडण केले असते.
वरील ५ ही प्रकाराने मलाच पूढे त्रास झाला असता.. त्या सल्याने, माझा फायदा झाला.पुढे मला अशा गोष्टींसाठी, डॉ.ची मदत भासली नाही.मूलाने, स्वतःच त्याचे प्रॉब्लेम्स निस्तरले.
29 Jun 2012 - 12:52 am | गणपा
लेखमाला चांगली चालली आहे.
अनेकांना उपयोगी पडु शकते.
कीप इट अप.
29 Jun 2012 - 1:23 am | मुक्त विहारि
ही सगळी तूझीच क्रुपा आहे...
तूझी , तूझ्या मूली संदर्भात एक पोस्ट वाचली होती... तेंव्हा पासूनच डोक्यात, किडे वळवळत होते.. ते आता इथे शब्दरूपी येत आहेत..
29 Jun 2012 - 2:36 am | अर्धवटराव
मु.वी. दादा... मिपावर आजवर वाचलेल्या धाग्यांपैकी हा सर्वात महत्वाचा धागा असावा माझ्या करता. अनेक धन्यवाद.
समस्त माय - बाप लोकांना नम्र विनंती... हातचं काहिही राखुन न ठेवता, अगदी किरकोळ वाटल्या तरी, ज्या काहि अपत्य संगोपनाच्या गोष्टी, अनुभव, सल्ले, किस्से सांगु शकाल तेव्हढे सग्ग्ग्ग्गळे टंका.
(पुणेरी पगडी घालुन) - आमच्या वेळी असं नव्हतं.
अर्धवटराव
29 Jun 2012 - 3:30 am | रेवती
आमच्या वेळी असं नव्हतं
असं नव्हतं बरं. अगदी पुण्यात नाही पण एका लहान वाटणार्या गावातल्या शाळेत तसेच होस्टेलमध्ये असताना रॅगींगचा बराच प्रकार माझ्याबाबतीत घडला होता. होस्टेलवर तर मी ८ दिवस सणकून तापाने आजारी पडले होते त्यावेळी. आईबाबांनी माझे मलाच निस्तरायला सांगितले होते. त्यासाठी रोज एक पत्र बाबांचे व काकांचे मला येत असे. महिनाभरात गाडी रुळावर आली पण माझ्याबरोबरच्या दोघी आधी हॉस्पिटलात दोन दिवस राहून आल्यावर पालक कायमचे त्यांना घरी घेऊन गेले होते. त्यानंतर रेक्टरबाईंचा पहारा फारच कडक झाला होता.
29 Jun 2012 - 7:44 pm | अर्धवटराव
नशिबवान आहेस तायडे.
अर्धवटराव
29 Jun 2012 - 6:20 am | शिल्पा ब
उपयोगी लेखमाला चालु केल्याबद्दल अभिनंदन.
माझं बाळ आत्ता कुठे पहीलीत जाईल.
मी माझ्या बाळाला सांगते : काही त्रास झाला तर शाळेत टीचरला सांगायचं अन मी आल्यावर मला. Mommy is here to protect you.
जमेल तसे अनुभव टंकेनच.
29 Jun 2012 - 7:08 am | शुचि
खूप छान वाटला हा भाग विशेषतः रेवती म्हणते तसं - टग्यांना तोंड देण्याचा उपाय मस्तच.
29 Jun 2012 - 7:38 am | मराठमोळा
उत्तम लेखमाला.. :) अभिनंदन
झैरात म्हणून नाही पण मी हे प्रश्न एकदा इथे उपस्थित केले होते
तुमचे अनुभव सर्वांनाच कुठे ना कुठे कामी येतील हे नक्की.
आणि हो, लेखाचे शिर्षक तुम्ही स्पष्टीकरण दिलेत तरी मनापासून नाही पटले. टेक्नीकली शब्द बरोबर असला तरी शेती ऐवजी "संगोपन" हाच शब्द जास्त समर्पक वाततो मराठीत असे माझे वैयक्तीक मत आहे. राग मानु नये. :)
29 Jun 2012 - 10:02 am | गवि
मराठी माध्यमाची निवड अशा प्रकारच्या सध्या सोप्या प्रश्नांनी करणं हा तसा सरळसोट उपाय आहे. अहो तुम्ही दिलेल्या अशा पार्श्वभूमीवर कोण मुलगा अशा मुलाखतीत "इंग्रजी आवडते" असं सांगेल? दोन वर्षे इंग्रजी शाळेत जाऊन आणि घरी मराठी वातावरण असताना शाळेतला एक "विषय" असलेला इंग्रजी आणि 'घरी असलेली आईबाबाची भाषा" यात चॉईस विचारण्यात काय अर्थ आहे?
मराठीत शिकण्यात बर्याच चांगल्या गोष्टी असणार म्हणूनच मोठे मानसशास्त्रज्ञही मातृभाषेत शिकणं चांगलं असं सांगतात. ( ते स्वतः मातृभाषेत शिकले असतील नसतील हा वेगळा मुद्दा..)
मी स्वत: संपूर्ण मराठी माध्यमात शिकलो. शाळेत उत्तम प्रगती केली. नेहमी पहिला-दुसरा.. तेव्हा सगळं छानच वाटतं. पण अकरावीला सायन्स घ्यायचं असलं की तिथे कोणी मराठीत शिकवत नाहीत, आणि ते शिक्षण प्रायमरी लेव्हल इंग्लिशमधे (मराठी दहावीच्या इंग्लिशची लेव्हल) नसून सर्वांना एकाच उच्च पातळीचं असतं. तिथे येऊन मराठी मिडियमच्या मुलाला शॉक बसतो. लहानपणापासून टाळलेली दरी एकदम समोर येते आणि त्यात हा अकरावीतला पाल्य एकदम कोसळतो.
डोकं असूनही पहिली एकदोन वर्षं केवळ भाषेमुळे (डिड्यूस, थिअरम, इन्टर्प्रीट द प्रिन्सिपल ऑफ अँगल ऑफ बँकिंग वगैरे शब्दांनीच) नापास होताहोता वाचण्याची वेळ येते किंवा मग खूप ताण घेऊन प्रेशरखाली इंग्रजीत अॅडॉप्ट होत होत शिकून काहीसे मार्क येतात, पण एकदम सेटबॅक येतोच. (आठवी नववीत मेंदूचे अनुप्रस्थ महासंयोजी पिंड वगैरे भाग शिकवतात.. अकरावीनंतर एकदम वेगळीच परिभाषा येते.. आठवीनंतर शास्त्र विषय इंग्रजीत शिकवण्याची स्कीम असते ..अशा सीट्स मर्यादित असून श्री मुक्तविहारी यांच्या अन्य लेखात त्यांच्या पाल्यांनी त्या लिमिटेड जागामधे आपली जागा पटकावली असं म्हटलं आहे.. जर मराठी शिक्षण उत्तम आहे तर मग पार्शल इंग्रजी शिक्षणाच्या जागा म्हणजे काहीतरी मर्यादित आणि यश म्हणून अचिव्हेबल अशी गोष्ट का असावी?)
प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतील कदाचित पण मी वर म्हटलेलं प्रातिनिधिक चित्र असावं असं मला वाटतं. पहिलीपासून चांगल्या शाळेत इंग्रजी शिकलेली मुलं लहान वयातच ती भाषा अॅडॉप्ट करतात. शास्त्रीयदृष्ट्याही हे मत अनेक ठिकाणी पाहिलं आहे की लहानपणी अनेक भाषा शिकण्याची कपॅसिटी मोठ्या वयापेक्षा जास्त तीक्ष्ण असते. आंतरराज्यीय लग्न केल्यामुळे माझ्याच घरात माझा मुलगा दोन्ही बाजूची एक एक अशा दोन भाषा पूर्णपणे समजायला लागला आहे आणि घरी कोणीही इंग्रजी बोलत नसूनही शाळेमुळे इंग्रजीही पिक अप करतोय.
मराठीतच शिकायचं अशा कौतुकास्पद विचाराला (जो माझ्या पालकांनीही एक तत्व म्हणून केला होता) मी कदाचित चॅलेंज करतोय.. पण उद्या पोराला पुढे काहीतरी बनायचं असेल* तर कधी ना कधी त्याला पूर्ण हाय लेव्हल इंग्रजी शिकावी लागेल. आणि अशा बाबतीत लवकर तर उत्तम असं माझं मत झालेलं आहे.
हे मत मांडण्याचा नैतिक अधिकार मला आहे कारण मी मराठी म्युनिसिपल शाळेत प्राथमिक आणि उत्तम खाजगी (मेरिटवाले) मराठी हायस्कूलमधे दहावीपर्यंत शिकलो आहे.
* पुढे काहीतरी बनायचं असेल तर या शब्दांवर वाद होऊ शकतो. प्राथमिक शाळेच्या लेव्हलला पोर पुढे काय बनणार हे नक्कीच निश्चित नसतं. त्याला शेती किंवा प्राथमिक मराठी शिक्षक किंवा मराठी साहित्यात एम ए करण्याचं त्याच वयात ठरुन गेलं असेल तर मग इंग्रजी माध्यमाची गरज नाही.. पण पुढचे अनेक रस्ते खुले ठेवायचे असतील तर मग सुरुवातीपासूनच त्याला इंग्रजीचं कंडिशनिंग आणि गोडी लावली पाहिजे. मराठी घरी बोलता येतंच.
29 Jun 2012 - 3:39 pm | सुकामेवा
आता माझ्या मुलीला मी मराठी माध्यमातच घातले आहे आणि तिला शिशु वर्गा पासूनच इंग्रजी पण आहे, त्यामुळे हे सगळे ती थोडेफार शिकेलच.
पण घरात सगळे मराठी बोलणार आणि केवळ हट्टापायी त्यांना इंग्रजी माध्यमात घातले आणि त्यांचे पुढे जाऊन जर नुकसान झाले तर कोण जवाबदार, अशी अनेक उदाहरण मी स्वतः बघितली आहेत
असो हे सगळे वादाचे मुद्दे आहेत त्यामुळे इथेच थांबतो..
29 Jun 2012 - 5:17 pm | शैलेन्द्र
प्रतिक्रीया आवडली..
अगदी हेच अनुभवल होतं अकरावीत मी.. तसा अभ्यासात बरा होतो पण अकरावीत इंग्लीशमुळे मला मराठी सोडुन इतर एकही विषय समजला नाही. "जठर"ला स्ट्मक म्हणतात हे माहीत नसल्यामुळे सरळ जठर हेच लिहुन आलो, परिणाम व्हायचा तोच झाला..
आता माझा मुलगा इंग्लीश मिडीयमला आहे, आणी मराठी मिडियमचे समकक्ष पुस्तक(भाषा/ईतीहास इत्यादी) तो गोष्टींची पुस्तक म्हणुन वाचतो.
30 Jun 2012 - 4:49 am | मुक्त विहारि
लहानपणा पासून एकत्र होतो, त्यामूळे, त्यांनी बर्याच स्टेप्स गाळल्या असतील आणि
दूसरी मह्त्वाची गोष्ट त्यांनी, विचारली " मूलासाठी इंग्रजी शिकायला वेळ देवू शकाल का?" आम्ही दोघेही तयार न्हवतो.म्हणून त्यांनी सल्ला दिला.
29 Jun 2012 - 10:09 am | महेश काळे
लेखमाला चांगली आहे.
मला उपयोगी पडु शकते...
धन्यु..
--नुकताच जन्मलेला बाप (महेश )..
29 Jun 2012 - 10:22 am | अमित
मुलांना मराठी माध्यमातून शिक्षण दिले आणि जर त्या शाळेत आठवी पासून सेमी इंग्रजी माध्यमाची सोय नसेल किंवा मर्यादीत जागांमुळे प्रवेश मिळाला नाही तर पुढे मुलाला अडचणी येऊशकतात का?
मुलाला कोणत्या भाषेतून शिक्षण झेपेल हे ठरवण्यासाठी काही 'टेस्ट' किंवा मार्ग आहेत का?
29 Jun 2012 - 4:21 pm | मुक्त विहारि
केला आहे..
29 Jun 2012 - 10:40 am | ५० फक्त
अतिशय उत्तम लेखमाला, मागे श्री. गणपा यांचेबरोबर चर्चा झाल्याचे आठवते आहे.
संपादक मंडळाला नम्र विनंती, - असा एक वेगळा विभाग सुरु करणे शक्य आहे.
29 Jun 2012 - 11:00 am | प्रेरणा पित्रे
आजच्या स्पर्धात्मक युगात इंग्रजी शिवाय पर्याय नाही.... जर बरोबरीची सर्व मुले इंग्रजी माध्यमातुन शिकत असतील तर आपल्या पाल्याला केवळ आपण मराठित शिकल्यामुळे मराठी शाळेत घालणे योग्य नाही..
शिवाय आई वडील म्हणुन आपण मुलांना घरी मातृभाषेतही उत्तम भाषा संस्कार करु शकतो.... मुलं खरच दोन्ही भाषा पिक अप करतात.. ( माझ्या ३ वर्षांच्या मुलाच्या अनुभवावरुन सांगते)
एकंदरीत एक पालक म्हणुन आपला लेख आवडला.. उत्तम लेखमाला..
29 Jun 2012 - 11:22 am | मिसळलेला काव्यप्रेमी
हा लेखही आवडला.
गविंशी सहमत.
वास्तविक "मराठी कि इंग्रजी " हा निर्णय मुलांची क्षमता ओळखुन घ्यावा.
पुढील लेखाच्या प्रतिक्षेत..
29 Jun 2012 - 12:01 pm | उदय के'सागर
खुप छान संदेश आणि माहिती. तुमचे अनुभव इथे मांडल्याबद्दल आणि हि मालिका सुरु केल्या बद्दल तुमचा खुप खुप अभारी. धन्यवाद!
29 Jun 2012 - 12:11 pm | शिल्पा नाईक
लेख उत्तम. गाविंची प्रतिक्रिया पण उत्तम.
मी आणी माझा नवरा दोघे पण मराठी माध्यमातून शिकलो, पण ११ला गाविंनी म्हणट्ल्या प्रमाणे बावरलो होतो. interview देताना पण english च दडपण यायच सुरवातीला. हे अस माझ्या मुलांच्या वाटेला येउ नये म्हणून आम्ही त्यांना english medium मध्ये टाकलं. (जे हल्ली बहुतेक पालक करतात)
29 Jun 2012 - 1:43 pm | सुधीर
चांगल्या लेखमालेची सुरुवात केल्याबद्दल धन्यवाद.
मराठी-इंग्रजी चा योग्य निर्णय व्यक्ती-स्थल-काल नुसार बदलू शकतो. कुठली बाजू अधिक बरोबर हे दुय्यम होऊन, उत्तम "शेती" कशी करावी याचं ज्ञान मिळेल ही अपेक्षा.
अवांतरः माझंही शिक्षण मराठीतून झालं. (पूर्ण इंग्रजी माध्यमातून शिकलेली कितीजण मराठी संकेस्थळांवर येत असावीत?) पुढे आयुष्यात सफाईदार बोलण्याचा सराव नसल्याने न्यूनगंड जाणवला, पण नंतर सफाईदार बोलण्याच्याही वरचढ पायर्या आहेत हे जाणून चुकल्यामुळे त्याचं भय हळूहळू कमी झालं. हळूहळू एक-एक पायरी चढताना, "काही" इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या मुलांनाही तेवढाच दम लागतोय हेही समजलं. गोरा जर इतर युरोपिअन असेल, किंवा एखादा चिंकी असेल तर तोही दरवेळेला सफाईदार बोलतोच असं नाही; पण काम होऊन जातं हा प्रत्यक्ष अनुभवही घेतला. माध्यमात कुठल्याही घाला, उत्तम संगोपन करण्याबरोबर मराठीची गोडी कशी लागेल असंही पाहिलं पाहिजे असं वाटतं.
6 Jul 2012 - 4:00 pm | सन्जयखान्डेकर
पुर्णपणे सहमत,
थोडे अजुन, ज्या काळात (१०/१५ वर्षापुर्वी) आपण मराठी माध्यमातुन शिकत होतो, त्या काळी द्रुकश्राव्य माध्यमांचा सुळसुळाट झाला नव्हता, आज ४-५ वर्ष वयाची मुले बोलताना ५०-६०% इंग्रजी शब्द वापरतात तसेच त्यान्चा आत्मविश्वास अफाट असतो, त्यामुळे मराठी माध्यमच योग्य.
29 Jun 2012 - 2:48 pm | संजय क्षीरसागर
या बाबतीत गविंशी सहमत आहे
आकलन, स्मरण आणि अभिव्यक्ती किंवा उपायोजन (Understanding or Grasping, Retaintaion & Application) या कोणतीही गोष्ट शिकण्याच्या तीन पायर्या आहेत.
आपल्याला मराठी येते कारण याच तीन कारणांमुळे न कळत आपल्याला ते साधलय.
जगाची भाषा इंग्रजी आहे आणि महाराष्ट्राची भाषा मराठी आहे. मराठी घरात जन्मलेल्या मुलांना मराठीचा व्यासंग केला (साहित्य, नाटकं, सिनेमे, सिरिअल्स आणि लेखन) की झालं पण इंग्रजीच तसं होत नाही तुम्हाला जाणीवपूर्वक तिचा अभ्यास करावा लागतो आणि मुख्य म्हणजे सफाईदारपणे लिहिता आणि बोलता यायला लागतं तरच तुम्ही तरु शकता अन्यथा बेक्कार काँप्लेक्स येतो.
29 Jun 2012 - 5:35 pm | चतुरंग
तुमचा लेख आवडला. मुद्दे समजले.
मराठी की इंग्लिश माध्यम हा निर्णय वैयक्तिक परिस्थितीनुसार पालकांनी घेणे महत्त्वाचे. इंग्लिश चांगले यायला हवे यात शंका नाही. परंतु मुळात शाळा एकूण कशी आहे याची चाचपणी करुन मग प्रवेश घेता आला तर उत्तम.
या लेखातून सगळ्यात महत्त्वाची जाणवलेली गोष्ट म्हणजे मुलांना आपण पालक म्हणून नक्की काय देऊ शकतो?
मुलांना त्यांच्या मनातलं न बावरता/न भिता बोलता येण्यासाठी एक आई-वडील म्हणून आपण किती सक्षम आहोत?
पालक म्हणून मुलांबरोबर आपणही घडत असतोच हे न विसरता, आपल्याला सगळे कळते असे न समजता जरुर तेथे बाहेरची मदत (उदा. मानसोपचार तज्ज्ञ) आपण घेतो का?
पुढील लेख वाचायला आवडेल.
-रंगा
29 Jun 2012 - 8:26 pm | शिल्पा ब
मुद्दा परत परत मराठी वि. इंग्रजी माध्यम यावरच घोटाळतोय. बाकीचे महत्वाचे मुद्दे कोणीच विचारात घेत नाही. मुलांचं संगोपन कसं करायचं याचा हाच एक क्रायटेरीया (?) आहे की काय?
29 Jun 2012 - 8:45 pm | अमितसांगली
आजच्या स्पर्धेत टिकण्यासाठी इंग्रजीवर प्रभुत्व हवेच....माझ स्वताच या भाषेवर प्रभुत्व नसल्याने नुकसान झाले आहे...मराठीवरचे प्रेम समजु शकतो पण भावना व व्यवहार यामध्ये फरक आहे...
29 Jun 2012 - 10:23 pm | जाई.
लेख आणि गविंचा प्रतिसाद दोन्ही आवडले
29 Jun 2012 - 10:23 pm | सूर्यपुत्र
यावरुन हा लेख आठवला...
-सूर्यपुत्र.
25 Jan 2013 - 2:10 pm | पिलीयन रायडर
मी ४-३-२-१ ह्या क्रमानी सगळे लेख वाचले. माझं बाळ ८ महिन्याचं आहे. आणि मी विचारच करत होते की इथे विचारावं का कुणाला की मुलांशी कसं वागावं, त्यांच्या भविष्याच्या द्रुष्टीने काय करावं ह्यावर कुणी माहिती देउ शकेल काय.. आणि आज हे तुमचे लेख वाचले.. खरचं धन्यवाद..!!!
फक्त आता मला "मुलांना कसे सांभाळावे" च्या ऐवजी "लहान बाळांना कसे सांभाळावे" ह्या वर माहिती हवी आहे!! म्हणजे इतक्या लहान वयातच आपण काय काळजी घ्यायला हवी?
26 Jan 2013 - 12:53 pm | मुक्त विहारि
व्य, नी. केला आहे..
26 Jan 2013 - 2:16 pm | सुखी
लेख उत्तम आहेत. व्य, नी. केलेली माहिती मला सुद्धा देउ शकता का?
25 Jan 2013 - 2:12 pm | पिलीयन रायडर
आणि ह्या लेखांवरचे प्रतिसाद दिसु शकतील काय?
26 Jan 2013 - 7:34 pm | अनन्न्या
अर्थात सायन्स, गणित शिकवणारे शिक्षक मराठीतून शिकवणारे नसतील तरच! याचा दहावी नंतर बराच फायदा होतो. महत्त्वाचे विषय इंग्रजी माध्यमातून होतात आणि इतिहास, भूगोल सारखे विषय आपल्या भाषेत लिहीणे सोपे जाते.
बाकी लेखमाला चांगली आहे.
28 Jan 2013 - 12:15 pm | बॅटमॅन
माझ्या एका मित्राचे मत लै झकास वाटले. "माझा मुलगा/मुलगी जर हुशार असेल तर मराठी माध्यम, नैतर इंग्रजी माध्यम." =))
28 Jan 2013 - 12:34 pm | नक्शत्त्रा
हा लेखही आवडला.
गविंशी मीही सहमत.
वास्तविक "मराठी कि इंग्रजी " हा निर्णय मुलांची क्षमता ओळखुन घ्यावां.
माझ्या अनुभवावरुन सांगते ....
माझा मुलगा वय :दोन वर्षे दहा महीने!
चयनिज (chinese ) ेइंग्रजी े हिंदी े मराठी छान बोलतो. आणी भाषांतर पण छान करतो.मुलांची क्षमता कधीही कमी नसते, पालकच वेळ देवू शकत नाहीत. भाषा कुठलीही असो आपण गोडी लावली पाहिजे. भाषेचा आदर केला पाहिजे.आणी भाषेचा आदर करायला शिकवले पाहिजे.
28 Jan 2013 - 6:52 pm | दादा कोंडके
मला वाटतं आपापल्या बाळगोपाळाचं कौतुक करून घेण्यासाठी एक मिपा कट्टा भरवावाच.
28 Jan 2013 - 6:32 pm | अमित
ह्या लेखांवरचे प्रतिसाद दिसु शकतील काय?
29 Jan 2013 - 2:39 pm | नक्शत्त्रा
दादा कोंडके
का नाही !!!!!
आईडीया छान आहे......संधी मिळाली कि सर्व पालक आपापल्या बाळगोपाळाचं कौतुक करतात.
तुम्ही नाही का करत कुणाचे कौतुक. लहान मुले नाहीत वाटत तुमच्या कडे.असुदेत
मिपा कट्टावर तुमचे तरीही स्वागत आहे.
29 Jan 2013 - 5:42 pm | विलासिनि
सध्याच्या धकाधकीच्या जिवनात पालक खूप कमी वेळ मुलांना देवू शकतात. माझ्या मुलीलाही मी संध्याकाळचा १ ते १/२ तासच देवू शकते. त्या वेळेत तिचा आजच्या दिवसात शिकवलेला अभ्यास विचारणे व तिचा गृहपाठ करुन घेणे एवढेच होत असे. पण सध्याच्या काळात येणार्या बातम्यांमुळे मी तिचा दिनक्रम विचारण्यास सुरवात केली. शाळेला निघाल्यापासून परत येईपर्यंत बसमध्ये, वर्गात काय काय होते?, कोण काय काय बोलते? अश्या बर्याचश्या प्रश्नांनंतर मला तिचे प्रोब्लेम्स कळायला लागले. उदा. ७.३० ते २.३० या कालावधीत ती शूला जायचेच टाळायची का तर तिथे वास येतो. मग मी तिला शूला न गेल्याने होणारे तोटे सांगितले त्यानंतर ती तयार झाली. मध्ये मध्ये ती जाते कि नाही याची मी खात्री करुन घेवू लागले.