मूलांची शेती....भाग १ ...तोंडओळख..
माझा (http://www.misalpav.com/node/22092) लेख वाचून बरेच संदेश आले. खरे तर, माझ्या मूलांनी, अद्याप खूप मोठी प्रगती, केलेली नाही आहे.... पण एक मात्र नकी, की आता ते अपयश घेणार नाहीत.हा लेख बराचसा
"कॅलिडोस्कोपिक" आहे.ह्या लेखाला, स्थळ आणि काळाचे बंधन नसेल.कट्यावरच्या गप्पा असेच ह्याचे स्वरूप असेल.
ह्या लेखमालेला, मी "मूलांची शेती" हे नांव का दिले ते सांगतो.
तसे बघितले, तर आपण प्रत्येक जण शेतीच करत असतो.कोण आपले , अर्थज्ञान मिळवतो, तर कोणी आपले, वैद्यकीय ज्ञान मिळवत असतो.
त्यासाठी, योग्य ती पूस्तके वाचणे (बी रोवणे), त्यावर मनन आणि चिंतन करणे (पाणी आणि हवा), अडलो तर , तज्ञ लोकांना विचारणे (शेतातील तण काढणे) आणि मग परिक्षा देवून (पिकाची कापणी) नौकरी करणे व पैसे मिळवणे. (पिकाचा दर)..
आपण मूलांच्या बाबतीत तरी वेगळे असे काय करतो हो...
१. संस्कार ( वेळेवर ऊठणे, व्यायाम करणे इ.).... बी रोवणे
२. मूलांच्या बरोबर भरपूर गप्पा मारणे.(मूलांना पण आपले आई-वडील गप्पा मारायला हवे असतात)..पाणी आणि हवा
३. बर्याच वेळा , मूले त्यांच्या शाळेतील अडचणी आपल्याला सांगत नाहीत... इथे आपल्याला मदत करतात ते, मानसोपचार तज्ञ.(मला फार मदत झाली)...शेतातील तण काढणे..
४. मूले, जेंव्हा स्वतः हून सांगतील, की त्यांना काय व्हायचे आहे , तीच त्याची ... पिकाची कापणी
५. निवडलेल्या अभ्यासक्रमातील आवड आणि प्रगती....पिकाचा दर
पुढच्या भागापासून , आपण
संस्कार ह्या मह्त्वाच्या भागाकडे वळूया...
(बाय द वे, मूले , हा माझा वीक पॉइंट असल्याने, छगनराव आणि कं. ला जरा बाजूला ठेवू या.)
========================================================
मी जगातील सर्वोत्तम बाप आहे, हे "सर्टिफिकेट" मला माझ्या आई-वडीलांनी , मूलांनी आणि बायकोने दिले आहे.(बायकोकडून असे काही , सर्टिफिकेट, मिळवायला किती त्रास होत होतो, ह्याची कल्पना असेलच)
मध्यंतरी, "तारे जमिन पर" नावाचा सिनेमा आला होता.बायको-मूले, तो सिनेमा बघायला गेली.मूलांना विचारले, काय रे गड्या, कसा काय होता सिनेमा?मी जावू का बघायला?तिघांनीही सांगीतले, अजिबात जावू नका.... त्या "अमिर खानने", तुम्ही जे काही सांगता तेच सांगीतले आहे... खरे तर तूम्हीच अजून जास्त सांगू शकता.... (मूले , "कहानी" बघतात, "रावडी राठौड" वगैरे बघत नाहीत , ह्यावरून मूलांची सिनेमा बाबतीत आकलनशक्ती प्रचंड आहे, एव्हढेच सांगू शकतो)
एका नवर्याचा , एका बापाकडे, झालेला हा प्रवास कठीण होता पण अशक्य न्हवता.
असे म्हणतात, की "आई होणे सोपे आहे , पण आईपण निभावणे कठीण आहे". बापाच्या बाबतीत पण हीच म्हण लागू पडते.सूरूवाती-सुरुवातीला, मी पण थोडा, कठोर बाबा होतो.माझ्याकडून पण काही चूका झाल्या.पण वाचन प्रचंड असल्याने आणि बायकोनी दिलेल्या साथीमूळे रागावर खूप कंट्रोल आला.आपल्या बापाला राग येत नाही, हे जेंव्हा मूलांच्या लक्षात आले, तेंव्हा पासूनच, मूले मोकळी झाली.माझा राग कमी झाल्या मूळे, मूलांचा नक्की प्रॉब्लेम काय आहे, हे समजून घ्यायला सोपे गेले.त्यामूळे उपाय-योजना करायला पण सोपे गेले.
जिथे जिथे मी अडलो किंवा, पुस्तकीय मदत मिळाली नाही, तिथे तिथे, मानसोपचार तज्ञाची मदत घेतली.मुलगा वेडे-वाकडे वागू लागायच्या आत गेल्यामूळे,बराच फायदा झाला.
मानसोपचार तज्ञाकडे का गेलो?त्याने काय सांगीतले? आणि त्याचा काय फायदा झाला ते सांगतो.
१. मोठ्या मूलाला, मराठी माध्यम द्यावे की नको? असा प्रश्न पडला होता.मी आणि आमचे सगळे कूटूंब त्यांच्याकडे गेलो.त्यावेळी धाकटा मूलगा २ वर्षांचा होता.शक्यतो बर्याच ठिकाणी आम्ही सगळेच जण जातो. डोंबिवलीचे डॉ.पाध्ये आणि मी एकत्रच खेळायचो आणि ते माझ्या सगळ्या कूटूंबाला ओळखत होते.आमची , मानसोपचार तज्ञाकडे जायची पहिलीच खेप.
घरी हलकल्लोळ झाला.कशाला जायला पाहिजे?इंग्रजी माध्यमच द्या.वगैरे,वगैरे....कूठेतरी , ठाम उत्तर द्यायला पाहिजे... म्हणून मी स्पष्टपणे सांगीतले, माझ्या मूलांनी , कूठले शिक्षण , कूठल्या माध्यमातून घ्यावे, हाचा निर्णय , माझा मीच घेईन.त्याचे बरे-वाईट, जे काही परीणाम होतील, ते माझे मी सोडवीन...
डॉ.रांनी ३/४ च प्रश्न विचारले..आमची उत्तरे कंसात देत आहे..
अ) तू, मूलांसाठी किती वेळ देतो? (१ तास)
ब) त्यापैकी , इंग्रजीचा अभ्यास करायला , एक बाप म्हणून, तू किती वेळ देणार? (३० मिनिटे)
क ) मूलाच्या आईचे शिक्षण, कूठल्या माध्यमातून झाले आहे? (मराठी)
ड) त्या इंग्रजी शिकायला तयार आहेत का? (नाही)
मग आम्हाला बाहेर बसवून, मूलाशी गप्पा मारल्या. हे डॉ. आणि आपला बाप मित्र आहेत, हे मूलाला समजल्यामूळे त्याने, विना दडपण उत्तरे दिली. डॉ.नी त्याला ४/५ प्रश्न विचारले..
अ) आई मराठीतून बोलते, ते तूला आवडते का? (हो)
ब) आई-वडील इंग्रजीतून काही बोलले, तर तूला काही समजते का? (नाही)
क) बडबड गीते कूठली येतात ?
इथे मूलाने शाळेतील (त्यावेळी तो इंग्रजी माध्यमात होता) सगळी, म्हणून दाखवली..मग डॉ,च्या विनंतीने, मराठी बडबड गीते पण म्हणून दाखवली.
आता ह्यातील कूठली आवडतात? (मराठी)
डॉ.नी सल्ला दिला... मूलाला मराठी माध्यमात टाकले तर उत्तम... कारण, त्याचा कल पण तिकडे आहे आणि तूम्ही दोघेही , इंग्रजी माध्यमातले नाही.प्रत्येक धडा, आधी तूम्हाला वाचावा लागेल आणि मग त्याला समजावून द्यायला लागेल.
आम्ही, मराठी माध्यम ठरवले.
२.पहिलीच्या किंवा दूसरीच्या सहामाही नंतर, मूलगा शाळेत जायला तयार न्हवता.मला जाणवले, की प्रकरण , काही वेगळे आहे.पण तो माझ्याशी काही बोलायला तयार न्हवता.मग काय, चलो डॉ,पाध्ये...त्यांनी विचारल्यावर, त्याने सांगीतले, वर्गातील ४/५ मूले त्रास देतात.
डॉ. : वर्गात मूले किती?
मू, : ६०
डॉ. : ६० मोठे की ५
मू. : ६०
डॉ. : ६० तून ५ गेले, किती उरले
मू. : ५५
डॉ. : हे ५५ , ह्या ५ पेक्षा , खूप मोठे आहेत का?
मू. : होय...
डॉ. : मग आपण असे करू या... ह्या ५५ मूलांशी मस्त मैत्री करू या..
मग हळू हळू , त्याला, त्या ५ मूलांची नावे विचारली.ती नावे मला दिली. आणि सांगीतले की, बाईंना, ही नावे दे... आणि एव्हढेच सांग... की, ही मूले माझ्या मूलाला थोडा त्रास देतात. तर जरा माझ्या मूलाकडे, थोडे लक्ष द्या...
मी , थेट, मुख्याध्यापक बाईंनाच , भेटलो... त्यापण, मी गेलो की, छान गप्पा मारायच्या, नविन काय वाचले?शाळेत काय सुधारणा करायला हवी. वगैरे विचारायच्या.. मग हळूच सांगीतले, की बघा ताई, हा असा, असा थोडा त्रास आहे. त्या मूलांना न जाणवता, हा त्रास कसा दूर करता येईल?
बाईंनी. नावे घेतली आणि एका-एका मूलाला, वेगळे-वेगळे बोलावुन , डोस दिला.कधी कधी, वर्गात मूद्दाम जावून, मूलाची पाठ थोपटली...एका महिन्यात प्रॉब्लेम सॉल्व्ह....
आहे काय अन नाही काय
(इंग्रजी माध्यमाच्या शाळेत, असे काही होईल, असे मला वाटत नाही)
- मूलांची शेती....भाग २...स्वओळख आणि नियम...
- मूलांची शेती....भाग ३...मुलांची ओळख...
- मूलांची शेती....भाग ४...संस्कार
Book traversal links for मूलांची शेती....भाग १ ...तोंडओळख..
वर्गीकरण
प्रतिक्रिया
ग्रेट!बुलीजना तोंड देण्याचा
उपाय खूप साधे आणि सोपे असतात..
लेखमाला चांगली चालली
लेका...
बाप हो...
आमच्या वेळी असं नव्हतंअसं
पालकांचा महिनाभर पत्रव्यवहार...
उपयोगी लेखमाला चालु
खूप छान वाटला हा भाग विशेषतः
उत्तम लेखमाला..
मराठी माध्यमाची निवड अशा
गवी तुमची प्रतिक्रिया आवडली पण ....
प्रतिक्रीया आवडली.. अगदी हेच
डॉ. आणि मी
उत्तम लेखमाला..
गविंशी सहमत
व्य. नि.
अतिशय उत्तम लेखमाला, मागे
गविंशी सहमत...
लेख
खुप छान संदेश आणि माहिती.
लेख उत्तम. गाविंची
पुढील भागाची प्रतिक्षा
पुढील भागाची प्रतिक्षा
मुवि, माध्यम अत्यंत महत्त्वाचय आणि ते इंग्रजीच हवं
मुवि,
मुद्दा परत परत मराठी वि.
इंग्रजी अत्यावश्यक
लेख आणि गविंचा प्रतिसाद
मुलांची शेती...
मी ४-३-२-१ ह्या क्रमानी सगळे
व्य, नी. केला आहे..
लेख उत्तम आहेत. व्य, नी.
आणि ह्या लेखांवरचे प्रतिसाद
आताचे सेमी इंग्रजी माध्यमही योग्य वाट्ते.
माझ्या एका मित्राचे मत लै
हा लेखही आवडला.
आवरा!
ह्या लेखांवरचे प्रतिसाद दिसु शकतील काय?
आपापल्या बाळगोपाळाचं कौतुक करून घेण्यासाठी एक मिपा कट्टा!!!
खूप महत्वाचा लेख.