कॅल्गेरीला आल्यापासून जास्परला जाण्याचे मनात होते. जास्पर हे कॅनडामधील Alberta राज्यातील एक अतिशय निसर्गरम्य असे ठिकाण. वर्षातील ६ -७ महिने बर्फ, अतिशय थंड असे वातावरण, त्यात आजूबाजूला उंचउंच पर्वतरांगा, आणि त्यात वसलेले हे निसर्गचे छोटेसे जग..
मागचा वीकांत मोकळा होता, त्यात शुक्रवारीच पुत्ररत्नाने "बाबा आपण अस्वल बघायला कधी जायचे ? " हा "सवाल माझा ऐका" estyle विचारलेला. गाडीची टाकी फुल्ल केली, घरून sandwiches , बटाटाच्या काचर्या , पोळ्या असा शिधा तयार झालाच होता. रथात स्वार होऊन आमचा कबिला जास्परच्या मार्गाला कधी लागला ते कळे कळे पर्यंत आमचा पहिला थांबा एका छोट्या तळ्याकाठी झाला देखील...
तळ्यातील थंड पाण्यात थकवा थोडा दूर करून आणलेल्या sandwiches चा फडशा पडून आम्ही Banff मार्गे Lake Louise कूच केली..
लांबच्या लांब रस्ता..
Lake Louise चे तळे वर्षातील ८ महिने बर्फाच्चादित असते. जून महिन्यात देखील त्यावर चांगलाच बर्फ साचलेला होता. जणू संपूर्ण तळे गोठलेले होते. विशेष म्हणजे तापमान १० - १२ च्या आसपास होते.
संपूर्ण गोठलेले तळे....
झाडाखालून निसर्ग टिपण्याचा अजून एक प्रयत्न...
आजूबाजूला गिर्यारोहण करण्यासाठी केलेल्या वाटा, आलेले उत्साही गिर्यारोहक आणि पर्यटक डोळेभरून बघून झाल्यावर आणि थोडी भटकंती केल्यावर पुढील वाटचाल सुरु केली. ह्या ठिकाण नंतर पुढे Columbia Icefields वर जाण्याचे वेध लागले होते.
Columbia Icefields मध्ये आगमन..
स्वागतकक्षात ठेवलेले पेंढा भरलेले अस्वल..
glacier वर जाण्यासाठी तयार केलेला विशेष रथ..
ह्या glacier ची जाडी ( thickness ) Eiffel Tower च्या उंचीहून जास्त आहे असे सांगितले जाते. ह्या भागातील पाण्याचा एकमेव श्रोत
Glacier वर आल्यावर पहिले पाउल...
स्वागतकक्षा कडे परत आल्यावर थोडा पोटोबा भरून आता पुढे काय काय आहे ह्याची चौकशी केली.सूर्यास्ताच्या आत जास्पर गाठायचे होते. एकदा तुम्ही Icefields पुढे निघालात कि मानवी वस्ती थेट जास्परमध्येच. संपूर्ण वाटेत एकही गाव, खेड तर सोडाच, साधा पेट्रोल भरायला पंपही मिळणार नाही. २०० किमी साठी फक्त आपण आणि निसर्ग. ह्या वाटेवर एके ठिकाणी पाटी वाचली.. " जंगलातील प्राण्यांना खायला घालू नये.. तुम्ही स्वत त्यांचा खाद्य होण्याची शक्यता आहे." कुतूहल जागे झाले की असे कुठले प्राणी असावेत आणि एक एक करत त्यांनी दर्शन दिले. मध्येच कॅमेराने दगा दिला त्यामुले श्री व सौ अस्वल ह्यांचे नृत्य, कॅनडा मूस नामक प्राण्याचे धावणे ह्या सारखी चित्रे काढून सुद्धा नीट आली नाहीत. जी आली ती खाली देत आहे..
चिरंजीव अस्वल ( थोडे लाजले फोटो पोज देताना ) ...
"बाबा म्हणतात लेकरू, आई म्हणते पाडस..." ह्यातील हे हरणाचे पाडस ( ३-४ तरी आहेत :-) )
आणि हा कॅनडा मूस.. मोठा अजब प्राणी.. अजिबात घाबरत नाही.. मी इतक्या जवळून फोटो काढला तरी जागचा हलला नाही बिलकुल...
क्रमश:
प्रतिक्रिया
14 Jun 2012 - 10:07 am | अत्रुप्त आत्मा
फोटू भारीच आहेत,पण धागा पटकन आवरला... :-(
14 Jun 2012 - 10:22 am | उदय के'सागर
व्वा.... काय निसर्ग आहे.... तो प्रत्यक्ष पहातांना काय आनंद वाटत असेल? हेवा वाटला तुमचा :)
ते रस्ते आणि आजु-बाजुचा निसर्ग... खुपच अप्रतिम !!!
14 Jun 2012 - 10:59 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व्वा बापू व्वा. काय निसर्ग नटलाय पाहा.
-दिलीप बिरुटे
14 Jun 2012 - 11:21 am | ५० फक्त
काल सर्वसाक्षी अन आज तुम्ही, कशाला त्या मोकळ्या रस्त्यांची फोटो टाकताय ओ, इथं ऑफिसात बसुन जीव खालीवर होतोय, का उगा जळवताय.
निसर्गापेक्षा असे रस्तेच जास्त भावतात मनाला, गेला बाजार १२०-१४० ने गाडी चालवायला काय धमाल येईल.
14 Jun 2012 - 11:51 am | पियुशा
मस्त फोटो , अजुन असतील तर डकवा की :)
14 Jun 2012 - 1:25 pm | संपत
अहो मुस तुम्हाला कशाला घाबरेल? उलट तुम्हीच त्याला घाबरायला हवे होते. एकदम डेन्जर प्राणी. एकदा आमच्या अंगावर चालुन आला होता. पळता भुई थोडी झाली.
14 Jun 2012 - 1:29 pm | sneharani
मस्त आहेत निसर्गाचे फोटो!
:)
14 Jun 2012 - 2:29 pm | कपिलमुनी
भारतीय रस्ते आणि तिथले रस्ते , इकडची हरणे तिकडची हरणे अशी गुणात्मक तुलना न केल्याने आणि परदेशी धागा असून देखील इंग्रजी शब्दांची कमी संख्या असल्याने णिशेढ !!
14 Jun 2012 - 5:17 pm | प्यारे१
क्लास नि खल्लास...!
अशा जागी जाऊन नि:शब्द होणंच अधिक भावेल .
नको ती बडबड नी वटवट. काय बोला नि काय ऐका!
14 Jun 2012 - 6:04 pm | बिपिन कार्यकर्ते
भन्नाट निसर्ग!!!
14 Jun 2012 - 6:31 pm | बॅटमॅन
ऐला काय खतरनाक हो ते तुमचं कॅनडा!!!
14 Jun 2012 - 6:35 pm | नाना चेंगट
ज ब रा !!!!
14 Jun 2012 - 6:54 pm | रेवती
सगळे फोटू आवडले.
पाण्यावरच्या बर्फाचे जास्त आवडले.
14 Jun 2012 - 11:57 pm | सर्वसाक्षी
ठिकाण आणि फोटो - दोन्ही मस्त
15 Jun 2012 - 12:42 am | कवितानागेश
अतिशय सुंदर फोटो.
मी अश्या जागी गेले तर परत येणारच नाही! :)
15 Jun 2012 - 8:48 am | संजय क्षीरसागर
अप्रतिम सफर!