सफर जास्परची .. भाग २

बन्या बापु's picture
बन्या बापु in भटकंती
15 Jun 2012 - 5:44 am

भाग एक : http://misalpav.com/node/21955

.................................................

जास्परला रात्री मुक्कामास पोहोचलो. दिवसभर उनाडक्या केल्यामुळे म्हणा कि निसर्ग पाहून म्हणा भूक अशी लागली नव्हती. तरी दोन घास पोटात टाकून आरामात निसर्गाच्या कुशीत निद्राधीन झालो.

सकाळी उठून आन्हिके उरकून लवकर पळ काढला तो Jasper Tramway कडे. इथे Canadian Rockies वर नेणारा एक गंडोला आहे. गन्डोल्यात बसण्यासाठी लोक सकाळ पासून रांग लाऊन गर्दी करतात असे ऐकले होते. इतक्या लांब येऊन अवलक्षण कशाला करा म्हणून ९ वाजताच रांगेत उभा ठाकलो.

गंडोला..

गन्डोल्याचा एकंदर मार्ग बघता डोळे पांढरे झाले. एक तर सुसाट वारा, त्यात उंच उंच नेणारा तो पेटारा आणि कमी कमी होत चाललेला प्राणवायू.. एकदम दडपण आला. पण वर उतरल्यावर काय सांगावा महाराजा.. वर्णन करण्या पलीकडे असणारा तो देखावा.

इतक्यात कुठूनशी एक खार दिसली. एवढ्या दुर्दम ठिकाणी ती काय करत होती कुणास ठाऊक, पण तिने हळूच लाजून अशी एक पोज दिली आणि एकदम जमिनीत गुडूप झाली..

वरतीच एक खानावळ वजा कॅन्टीन आहे. तिथे Mexican खाद्यपदार्थांना न्याय देऊन आम्ही खाली उतरलो. आता कूच करायची होती ते Athabasca Falls कडे.

Columbia Icefields च्या उत्तरेस असणारा हा धबधबा. साधारण ७० किमी पाण्याचा प्रवाह वाहत वाहत इथे येतो आणि अचानक जोर पकडून सुसाट वाहत अक्षरश खडक फोडून विवर तयार करतो. मुळात मला पाण्याचे अवास्तव वेड आहे. Niagara पासून ते Ireland च्या glendalough पर्यंत बरेच धबधबे बघितलेले. पण हा वेडावून गेला.

कोसळणाऱ्या पाण्याने बनवलेले विवर..

माहितीपत्रक

फुटलेली नवीन पालवी.. झाडांची जगण्याची अशी जिद्द कुठली ?

ह्याचाच एक सावत्र घराण्यात भासावा असा एक छोटा भाऊ म्हणजे Sunwapta Falls . तोही बघून घ्यावा म्हणून गाडी तिकडे वळवली. हाही धबधबा छोटेखानी असला तरी मजेदार आहे.

आता परतीचे वाट ६०० किमी ची. त्यात पहिले ३०० किमी मानव वस्ती नाही. म्हणून आपला दिवेलागणीच्या आता घरी परत जाऊ ह्या हिशोबाने परत निघालो. पाय निघत नव्हते, पण पुन्हा पुढील मोठ्या विकांताला राहिलेली ठिकाणे बघू असा ठोस वायदा मनाशी करून परतीच्या वाटेवर गाडी पळवू लागलो..

निसर्ग जणू मला खुणावून सांगत होता.. " पिकचर तो अभी बाकी ही मेरे दोस्त...."

समाप्त...

प्रतिक्रिया

कौशी's picture

15 Jun 2012 - 7:16 am | कौशी

आवडले.

संजय क्षीरसागर's picture

15 Jun 2012 - 8:58 am | संजय क्षीरसागर

सकाळी सकाळी एकदम दिलखुष, क्या बात है मेरे दोस्त!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Jun 2012 - 9:49 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

च्यायला, बापू नशीबवान आहात राव, हेवा बिवा वाटतो. सबकुछ जब्रा. :)

-दिलीप बिरुटे

बॅटमॅन's picture

15 Jun 2012 - 12:44 pm | बॅटमॅन

+१००

असेच म्हणतो. फोटो बघून झालेली जळजळ निताम्तसुम्दर निसर्गानेच शमवून टाकली आहे :)

अमृत's picture

15 Jun 2012 - 1:45 pm | अमृत

जळजळ झालीच :-( :-)

अमृत

प्यारे१'s picture

15 Jun 2012 - 10:02 am | प्यारे१

मस्तच...!
ती खारुतै बघून 'आईस एज' आठवला.

पुन्हा पुढील मोठ्या विकांताला राहिलेली ठिकाणे बघू असा ठोस वायदा केलाच आहे ,तर तो लवकरात लवकर पुर्ण करा.
फोटो इतके आवडलेत की सांगायला शब्दच नाहियेत :)

जातीवंत भटका's picture

15 Jun 2012 - 12:38 pm | जातीवंत भटका

निसर्गसुंदर भटकंती !
अजून येऊद्यात....
पु.ले.शु.

गणेशा's picture

15 Jun 2012 - 1:04 pm | गणेशा

खुपच छान सफर केलीत राव ..

फोटो पाहुन खुप प्रसन्न वाटले.

असेच फिरत रहा ...

Maharani's picture

15 Jun 2012 - 1:49 pm | Maharani

काय सुंदर फोटो आहेत........बघताना मजा आली...

नाना चेंगट's picture

15 Jun 2012 - 1:59 pm | नाना चेंगट

मस्त !!!

जास्परबद्दल कधीकाळी फक्त ऐकले होते.
फोटू पाहून छानच वाटले.
तुमचे फोटू पाहून न्यू हॅम्पशायरातला डोंगररांगामध्ये ट्रामवेने जाऊन कधीकाळी काढलेला हा फोटू आठवला.

316

बापू मामा's picture

5 Jul 2012 - 12:12 pm | बापू मामा

फोटो पाहून प्रतिक्रिया देण्याचा मोह आवरला नाही.
लगेच मिसळपाव चे सदस्यत्व घेतले.
फारच छान.

अत्रुप्त आत्मा's picture

4 Jul 2012 - 6:13 pm | अत्रुप्त आत्मा

साद देती हिमंशिखरे शुभ्र पर्वतांची.... :-)

सगळे फोटो आणी वर्णन....--^--^--^--