दुष्काळ

शैलेन्द्र's picture
शैलेन्द्र in जे न देखे रवी...
6 Jun 2012 - 5:56 pm

कोरड्या विहरीतुन आटलेला दुष्काळ,
रस्त्यातल्या पाईपातुन फुटलेला दुष्काळ,
गळत्या टँकरमधुन गावकीला तुडवत,
सोन्याच्या मोलाने लुटलेला दुष्काळ.

पंचायतीत मंजुरीला आलेला दुष्काळ,
मंत्रालयातुन पास केलेला दुष्काळ,
टक्क्याच्या हिशोबाने चोख वाजवुन,
आपापल्या घरी नेलेला दुष्काळ.

टग्यांनी बघ्यांचा चोरलेला दुष्काळ,
रिकाम्या पोटातुन कोरलेला दुष्काळ,
हिरव्या वावरांतुन, पाटाच्या कडेने,
भरपाईच्या पाण्याने पेरलेला दुष्काळ.

खादीतुन बोलणारा प्रागतीक दुष्काळ,
एन्जीओतुन खर्चलेला जागतीक दुष्काळ,
भेगाळल्या जमीनीत जळुन मेलेला,
लाचार निर्वासीत अगतीक दुष्काळ

बिभत्सकविता

प्रतिक्रिया

शैलेन्द्र साहेब, जर

भेगाळल्या जमीनीत जळुन मेलेला,
लाचार निर्वासीत अगतीक दुष्काळ

दुष्काळ जर असा असेल तर मग दुष्काळ कसा तो सुकाळ नाही का? कारण सुकाळ मेला जळुन म्हणुन तर दुष्काळ आला ना

शैलेन्द्र's picture

6 Jun 2012 - 7:15 pm | शैलेन्द्र

निश,
दुष्काळ म्हणजे फक्त पावुस न पडणे, पाण्याची टंचाई नसते, दुष्काळाला अनेक आर्थीक सामजीक कंगोरे असतात. प्रत्येक दुष्काळ हा काही जणांसाठी सुकाळच असतो, माझी कविता त्यावर भाष्य करतेय... यात खरा दुष्काळपीडीत कसा होरपळतो ते शेवटच्या ओळीत सांगायचा प्रयत्न केलाय. ..

जेनी...'s picture

6 Jun 2012 - 7:02 pm | जेनी...

ह्म्म्म ....

सुकाळ मेला जळुन म्हणुन तर दुष्काळ आला

___________________

नै ओ निश सैब , जळुन गेलेलाहि दुष्काळच..
दुष्काळात दुष्काळ असा त्याचा अर्थ असावा
अस मला वाटतय .

भरत कुलकर्णी's picture

7 Jun 2012 - 1:25 am | भरत कुलकर्णी

शैलेन्द्र खरे आहे बाबा. दुष्काळ कुणासाठी सुकाळच असतो.
(काय योगायोग आहे बघ, मलादेखील असेच वाटले.)

शैलेन्द्र's picture

7 Jun 2012 - 2:37 pm | शैलेन्द्र

:)

भेगाळल्या जमीनीत जळुन मेलेला,
लाचार निर्वासीत अगतीक दुष्काळ

अफाट!

अप्रतिम कविता.. एकदम उत्कट..!

खूप आवडली!

शैलेन्द्र's picture

11 Jun 2012 - 2:38 pm | शैलेन्द्र

धन्यवाद