शार्दूलविक्रीडित

राजघराणं's picture
राजघराणं in जे न देखे रवी...
4 Jun 2012 - 5:40 pm

(शार्दूल म्हणजे सिंह. शार्दूलविक्रीडित म्हणजे सिंहाचा खेळ. हे मराठीतील एक सुंदर अक्षरगणवृत्त आहे. प्रत्येक ओळीत १९ अक्षरे आणी म स ज त त ग हे गण येतात. अक्षरगणव्रुत्तात एका ओळीत किती अक्षरे येतात आणी त्यांचा र्‍हस्व दीर्घ अक्षरांचा क्रम लघु गुरू ठरलेला असतो. उदा म म्हणजे तिन्ही गुरू अक्षरे.
त्यामुळे व्रुत्ताची चाल ठरलेली असते. शार्दूलविक्रीडित वृत्ताचे प्रसिद्ध उदाहरण म्हणजे -आम्ही कोण म्हणून काय पुसता ? ही कविता होय. ही चाल लग्नातल्या मंगलाष्टकालाही चालते.)

कवितेचे नाव : शार्दूलविक्रीडित
वृत्त : शार्दूलविक्रीडित
कवितेचा विषय :शार्दूलविक्रीडित. ..सिंहाचा खेळ.

धाडसाचे वारे वाहत होते. वृद्ध झाडे जोर जोरात हलत होती. ठिणग्या उडत होत्या ... वणवा पेटणार होता.. अशाच एका ठिणगीकडे सिंहाच्या एका छाव्याची नजर गेली. आणी मग ......

वारे वाहत धाडसी धडधडे ; कल्लोळ ज्वालाग्रही
झाडे घासत ही परस्पर उडे ; तो जाळ भूमीवरी
सिंहाचा सुकुमार पुत्र अवघा ; झेपावला त्यावरी
खेळाया गवसे पहाच भलते ; शार्दूल क्रीडा करी. ॥

छावा त्या विस्तवास खेळ समजी ; जाळात घेई उडी
दाहाची न मला क्षिती उब हवी ; गर्जोन ऐसे कथी
छातीशी कवटाळुनी हृदय ते ; उन्माद ज्वाला पिते
आगीचे अवघे शरीर बनते ; खेळे नसातून ती ॥

अंगारा सम नेत्र जाळच नखे ; हा पोत पंजा बने
जीभेची जणू हो मशाल जळती ; भाषाच ज्वालामुखे
वाटे तो नर स्वाभिमान जळता ; आगीस वाटे जनी
ज्वाला चित्त बने शरीर जळते ; आत्माच यज्ञाहुती ॥

पेटोनी हर चंदनी वृक्ष उठे ; त्यांचा सुवासी हवी
त्या रानात घुमे पवित्र बनले ; युद्धात गेले बळी
ऐसा हा वणवा जळे धडधडा ; ज्वालाहुती पेटल्या
ज्वाला सिंह पळे धडाड वनी हो ; शार्दूल क्रीडा पहा ॥

ही शार्दूल मशाल जाळ जळती ; धावे वनी वाटण्या
आत्म्यातील जहाल तेज दिधण्या ; रानातल्या बांधवा
साक्षात्कार ज्वलंततेच मधला ; सर्वांस दर्शावण्या
आत्मा ना बनतो ज्वलंत कधिही ; दाहास घेण्याविना ॥

चीं चित्कार उठे नभात - गगनी ; ती माकडे भ्याडशी
सैरावैर पळा पळाच जनहो ; शार्दूल ज्वाला वनी
भ्यालेली हरणी पळेच घुबडे ; डोळे मिटोनी खरी
धावोनी वटवाघुळांसह वनी ; ती शोधती बोळकी ॥

सिंहाचे हृदयी स्वगर्व वसतो ; शार्दूल ज्वाला जशी
शार्दूलासम पाहिजे हृदयही स्वीकारण्या आग ती
ज्वालासिंह विचार आग जळती; भ्यांडास भीती तिची
जाळोनि स्वशरीर काय घुबडे ; घालीत अत्माहुती ?

शार्दूला सम धैर्य ना वसतसे : प्राण्यांतही जाणत्या
दोषी का म्हणता गरीब घुबडा ? मूर्खास बुद्धी किती ?
ज्वालासिंह परंतु व्यर्थ जळला ; शार्दूल क्रीडा वृथा
राखेच्या सम ते शरीर बनले ; शार्दूल राखे जसा ॥

येता एक झुळुक चंदनमयी; मंत्रावली राख ही
राखेतून पुनः उठेल उडण्या ; शार्दूल पेटोनिया
निद्रेचा लखलाभ होत घुबडा ; शार्दूल जागा खडा
रजेही घुबडे असोत वनिची शार्दूल नेता खरा

.
.
.
.
.
.
.
.

झेपावेल सदा अवध्य नर तो ; शार्दूल क्रीडा पहा ॥

अभिराम दीक्षित. श्रीलंका २००५

वीररसअद्भुतरसरौद्ररसइतिहास

प्रतिक्रिया

राजघराण साहेब, अप्रतिम व निव्वळ लाजवाब.

शार्दूलविक्रीडितचा तुम्ही इतक्या चांगल्या प्रकारे माहीत करुन दिल्या बद्दल तुमचे मनापासुन आभार.

व चित्र एकदम जिवंत वाटता हेत. सुंदर.

अत्रुप्त आत्मा's picture

4 Jun 2012 - 5:58 pm | अत्रुप्त आत्मा

कविता वगैरे नंतर... पहिला सलाम या चित्रांनाच....

कवी अभिराम दीक्षित . श्रीलंका २००५??
प्रभाकरनवर लिहिल आहे का? की श्रीलंकेच ध्वजचिन्ह सिंह, यावर आहे ही कविता?
बाकि इतक सुंदर काव्य अन इतक वृत्त धरुन लिहिण ...मति गुंग झाली.
इतक च्छान काव्य इथ पोहोचवल्या बद्दल धन्यवाद राजघराण साहेब. अन त्याबरोबरची चित्र तर लाजवाब!

पैसा's picture

4 Jun 2012 - 6:09 pm | पैसा

काव्य आणि सोबतची चित्रे सगळंच फार सुंदर!

अपर्णा, अभिराम दीक्षित म्हणजेच राजघराणं!!

राजघराणं's picture

4 Jun 2012 - 6:17 pm | राजघराणं

कवितेवरचा हक्क सोडवत नै हो तै :-)

स्पंदना's picture

4 Jun 2012 - 6:44 pm | स्पंदना

आधी ठाउक असत तर एव्हढी तारीफ नसती केली. उगा छान प्रयत्न वग्गैरे म्हंटल असत.
पण काही म्हणा अतिशय सुरेख .
आता सांगा कविता कुणावर आहे, की खरच शार्दुलावर आहे?

प्रचेतस's picture

4 Jun 2012 - 6:17 pm | प्रचेतस

भन्नाट.

वा! अभिराम सुरेख!! कविता आवडली.

मानावा समरा जनास समरा ताराप ताराप गा

छाव्याचे हृदि काय ते उमजणे, हे ना असे खेळणे
शार्दूलासम वन्हिला डिवचणे, हे ना मुळातच उणे
भासावा वणवा खराच भडके, तैसे दिसे दृश्य हे
जाणे तो अभिराम दीक्षित करू सारे असे नेटके

चौकटराजा's picture

4 Jun 2012 - 6:32 pm | चौकटराजा

शार्दूल विक्रिडित मधे काव्य करणे यासाठी चार अक्षरी व तीन अक्षरी शब्दांचा मोठा साठा डोक्यात असावा लागतो. सबब यात लिहिणे तसे सोपे नाही. तेंव्हा प्रथम कवि राजास मानवंदना !
आणि कल्पकतेपलीकडील चित्रे जोडीला. कशाला जास्त चांगले आहे असे म्हणावे हे कळत नाही ! स्तब्ध !

श्रीरंग's picture

4 Jun 2012 - 6:35 pm | श्रीरंग

आप्रतिम! फारच छान जमून आले आहे! :)

नाना चेंगट's picture

4 Jun 2012 - 6:41 pm | नाना चेंगट

सुरेख !!!!!!!!

आहे वृत्त विशाल त्यास म्हणती शार्दूलविक्रीडित |
पैं हे वृत्त कवींस सर्वसमयी साचे करे पीडित|
त्याच्या आवळुनी समस्त मुसक्या जे हिंडवीले तया|
खासा डौलचि केसरीगतिचिया रे दीक्षितांच्या अभ्या** ||

**वृत्तरचनेच्या बंधनामुळे असे संबोधन वापरले आहे, तदुपरि लेखकाचिया कवण्याही हेतुचेया उपसर्गू जाहला नसे हे आत्ताचि नमूद करोन ठेवितो.

बाकी सेतुमाधवराव पगडींच्या आत्मचरित्रात एक मजेशीर कविता त्यांनी उद्धृत केलीये(मूळ कवीचे नाव विसरलो, कविता जशी/जेवढी आठवली तेवढी दिली आहे).

वृत्तांचे तप आचरी निशिदिनी --------
------------------------------------

(कुणी एक कवी कायम वृत्तबद्ध कविता करायचा हा इत्यर्थ)

(एकदा काय झाले)

आप्ते पत्र लिहूनि एक घरुनी, त्याच्याकडे धाडिले|
काही वृत्त अलीकडे न कळले,-------------|
चिंता घोरचि लागली बहु अम्हां, झालो पुरे पीडित|
त्याचे उत्तर हा लगेच कळवी, शार्दूलविक्रीडित!!!!

दुष्टारी पुरता भारी | अवतरला गॉथम शहरी|
वाल्गुदेय हा निर्धारी| विदूषका जाण पां||

विदुषक उवाच :

रात्रीच्या वटवाघळा हलकटा ; द्वाडा धरू का तुला ?
ओढूका शेपटीस खेचुनी दिवा दाव्वीन तुला अता ॥

(हसण्यावारी घ्यावे - केवळ जुगलबंदी आहे. :-) )

दुसर्‍या ओळीत एक सुधारणा:

ओढू का तव चर्म** खेचुनि तुला नेतो दिव्याशी चला|

**वटवाघळाला शेपटी नसते आणि त्याचे पंख हे पिसांचे नसून कातड्याचे बनलेले असतात.

आता यावर प्रत्युत्तरः

हा हा! गॉथमराज मी, मज कसे आव्हान देशी असे |
मी आहे जरि येकुटा तरि तुला मी धाकुटा पैं नसे |
जल्दीने तव ही विदूषकगिरी त्वां थांबवी ते बरे |
नस्तां वल्गुदक्रोधवन्हि तुजला जाळील हेची खरे ||

येता वीस जुलै, थिएटरिं पहा संघर्षगाथा खरी :)

दोघांचीही जुगलबंदी लै भारी. :)

२० जुलैच्या संघर्षगाथेत विदुषक नसून बेन आहे. ;)

जेनी...'s picture

5 Jun 2012 - 7:16 pm | जेनी...

अहो बॅटमॅन यालाच तर ' शार्दुलविक्रिडित म्हणतात ..:(
अलंकारिक भाषेत आहे त्यापेक्षा चढवुन ,नसलेल्या गोष्टिंचा आव आणुन बोलण .
मला तर एवढच कळतय .
बाकि आपण जास्त ज्ञानी आहात :)....( पाजळवा ) :P

राजघराणं's picture

5 Jun 2012 - 8:11 pm | राजघराणं

दुष्टारी पुरता भारी | अवतरला गॉथम शहरी|
वाल्गुदेय हा निर्धारी| विदूषका जाण पां||

विदुषक उवाच :

रात्रीच्या वटवाघळा हलकटा ; द्वाडा धरू का तुला ?
ओढू का तव चर्म खेचुनि तुला नेतो दिव्याशी चला|

वाग्लुदेय उवाच :

हा हा! गॉथमराज मी, मज कसे आव्हान देशी असे |
मी आहे जरि येकुटा तरि तुला मी धाकुटा पैं नसे |
जल्दीने तव ही विदूषकगिरी त्वां थांबवी ते बरे |
नस्तां वल्गुदक्रोधवन्हि तुजला जाळील हेची खरे ||

विदूषक उवाच

ही ही! गॉथम पुत्र मानवच चांडाळासवे गाठ रे।
ही जाती असते तुझी स्खलनशाली मात्र ध्यानी रहे ।
ऐ वाल्ग्या भय भूक मैथुन धर्मी कीडे कुत्रे जाण रे ।
मानव्यास हवा विदूषक गुन्हेगारी हवी मानवे ॥

बॅटमॅन's picture

5 Jun 2012 - 11:06 pm | बॅटमॅन

@ वल्ली: मुद्दा नोंदविला युरॉनर मनीं, टंकोनि थँकीतसे ;)

@पूजा पवारः हल्के घ्या, बघताय ना कितिकसा घेतो कुणी ताण ते :)

वाल्गुदेय उवाच

भेटू लौकरि गॉथमात इथल्या मत् होम ग्रौंडावरी |
चिंता तू न करी तुला झडकरी धाडीन फासावरी |
किंवा आर्खम नाम त्या भयपरी कारागृहीं सत्वरी |
थांबे तैंचि पुरी विदूषकगिरी या गॉथमीं शाहरी ||

पेंग्विन् बेन विदूषकू रिडलरू, टू फेस हे सर्वही |
आय्व्ही ती विष घेवुनी बघ सवे आहे सदा सज्जही |
सर्वांसी पुरुनी उरे, परि झुरे, बॅट्मॅन तो येकटा |
वेन ब्रूस असोनिही जणु नसे , हे जाणितो येकटा ||

रमताराम's picture

4 Jun 2012 - 7:02 pm | रमताराम

तुमचे पाय कुठे आहेत हो, करा इकडे जरा. _/\_. प्रचंड आवडली. भाषेवरचे प्रभुत्व अचाट आहे हो. आणि

छातीशी कवटाळुनी हृदय ते ; उन्माद ज्वाला पिते
आगीचे अवघे शरीर बनते ; खेळे नसातून ती ॥


शार्दूला सम धैर्य ना वसतसे : प्राण्यांतही जाणत्या
दोषी का म्हणता गरीब घुबडा ? मूर्खास बुद्धी किती ?
ज्वालासिंह परंतु व्यर्थ जळला ; शार्दूल क्रीडा वृथा
राखेच्या सम ते शरीर बनले ; शार्दूल राखे जसा ॥

टोपी काढली आहे.

एकदोन लहानशा गोष्टी:
शार्दुल या शब्दात पहिला उकार आहे. तुमच्या कवितेत मात्रांचे तंत्र (आम्हाला त्यात शष्प कळत नाही) बिघडत नसेल तर बदल करायला हरकत नसावी.

पेटोनी हर चंदनी वृक्ष उठे ; त्यांचा सुवासी हवी
त्या रानात घुमे पवित्र बनले ; युद्धात गेले बळी

हवी ऐवजी हवि हा शब्द हवा. दीर्घ ईकारान्त शब्दाचा अर्थ वेगळा असल्याने इथे कविचे स्वातंत्र्य जरा गोंधळात पाडणारे होते आहे.

जीभेची जणू हो मशाल जळती ; भाषाच ज्वालामुखे
जिव्हेची जणू.... असा बदल समर्पक वाटतोय का नि वृत्तात बसतोय का पहा.

दादानुं, कं लिवलंय कं लिवलंय तुमी. एरवी कवितेकडे ढुंकून न पाहणार्‍या माझ्यासारख्याला गद्य माणसाला इतकी बारकाईने वाचायला लावलीत हेच मोठे श्रेय कवितेचे.

रच्याकने इतकी समर्पक चित्रे कुठून मिळवलीत हो? (की तुम्हीच काढली आहेत? मग ही कलाही येऊ द्या की समोर.)

मनमेघ's picture

25 Dec 2015 - 6:21 am | मनमेघ

ररा, शार्दूल हाच बरोबर शब्द आहे.
बाकी प्रतिसादाशी सहमत आहे.

जबरद्स्तच, लहानपणापासुन या वृत्ताचे आकर्षण आहेच, आज त्यात अजुन भर पडली.

परिकथेतील राजकुमार's picture

4 Jun 2012 - 7:26 pm | परिकथेतील राजकुमार

अप्रतिम.

सुपर्ब डॉक्टर .....
डोळ्यांच पारण वैग्रे .....मस्तच

मराठे's picture

4 Jun 2012 - 9:54 pm | मराठे

मस्तच!

jaypal's picture

4 Jun 2012 - 10:49 pm | jaypal

पिवळा डांबिस's picture

4 Jun 2012 - 11:55 pm | पिवळा डांबिस

चित्रे सुरेख, काव्य तर त्याहून सुरेख!
आणखी शब्द वापरून वाचनानुभव डागाळत नाही.
जियो!!!!!

नंदन's picture

5 Jun 2012 - 12:03 am | नंदन

अप्रतिम!

संजय क्षीरसागर's picture

5 Jun 2012 - 1:16 am | संजय क्षीरसागर

दादानु, असाच लिहित राहा! तो हरणाचा फोटो अफलातून आहे

काव्य आणि छायाचित्रे दोन्ही मस्त..

अमृत

स्वानन्द's picture

5 Jun 2012 - 9:31 am | स्वानन्द

मस्त लिहीले आहे.
एक शंका: शार्दुल म्हणजे वाघ ना?

राजघराणं's picture

5 Jun 2012 - 12:28 pm | राजघराणं

शार्दुल म्हणजे सिंह अथवा वाघ थोड सैलपणे वापरलं जातं

http://spokensanskrit.de/index.php?tinput=lion&direction=ES&script=&link...

अक्षया's picture

5 Jun 2012 - 9:43 am | अक्षया

सुंदर माहिती, कविता आणि चित्रे..
शाळेत अक्षरगणवृत्त शिकली त्याची आठवण झाली..:)

प्यारे१'s picture

5 Jun 2012 - 10:44 am | प्यारे१

खूप मस्त फटु नी कविता देखील ...!

एकदम 'सिंघम' आठवला. ;)

sneharani's picture

5 Jun 2012 - 11:28 am | sneharani

सुंदर कविता.
:)

पियुशा's picture

5 Jun 2012 - 11:28 am | पियुशा

कविता छान , मला २ न. चित्र फारफार आवडल :)

मृत्युन्जय's picture

5 Jun 2012 - 1:21 pm | मृत्युन्जय

चित्र आणि शब्दांचा अद्भुत मिलाप. लाजवाब.

ऋषिकेश's picture

5 Jun 2012 - 1:37 pm | ऋषिकेश

पायाचाही फोटो टाका! __/\__
अप्रतिम रचना!

मेघवेडा's picture

6 Jun 2012 - 2:20 pm | मेघवेडा

सुरेख जमली आहे!

सिंहाचे हृदयी स्वगर्व वसतो ; शार्दूल ज्वाला जशी
शार्दूलासम पाहिजे हृदयही स्वीकारण्या आग ती
ज्वालासिंह विचार आग जळती; भ्यांडास भीती तिची
जाळोनि स्वशरीर काय घुबडे ; घालीत अत्माहुती ?

या ओळी विशेष आवडल्या. वृत्तावरची पकड वाखाणण्याजोगी आहे मालक. आणखी येऊ द्या. :)

आगाऊ म्हादया......'s picture

24 Dec 2015 - 10:07 am | आगाऊ म्हादया......

सहमत!!

प्रीत-मोहर's picture

5 Jun 2012 - 1:43 pm | प्रीत-मोहर

अप्रतिम__/\__

प्रकाश घाटपांडे's picture

5 Jun 2012 - 1:51 pm | प्रकाश घाटपांडे

शब्द व चित्र याचा सुरेख संगम.

पेटोनी हर चंदनी वृक्ष उठे ; त्यांचा सुवासी हवी
त्या रानात घुमे पवित्र बनले ; युद्धात गेले बळी
ऐसा हा वणवा जळे धडधडा ; ज्वालाहुती पेटल्या
ज्वाला सिंह पळे धडाड वनी हो ; शार्दूल क्रीडा पहा ॥

अप्रतिम ..!

वृत्तबद्ध , चित्रमय काव्य .

चीं चित्कार उठे नभात - गगनी ; ती माकडे भ्याडशी
सैरावैर पळा पळाच जनहो ; शार्दूल ज्वाला वनी
भ्यालेली हरणी पळेच घुबडे ; डोळे मिटोनी खरी
धावोनी वटवाघुळांसह वनी ; ती शोधती बोळकी ॥

ज ब र द स्त !!!!!!!..... अप्रतिम!!!!!!!!

आज हाही पैलू पाहायला मिळाला!!!! :)

चिगो's picture

5 Jun 2012 - 7:44 pm | चिगो

भन्नाट कविता आणि चित्रे.. एक सुंदर काव्यानुभव देण्यासाठी धन्यवाद..

सुमीत भातखंडे's picture

5 Jun 2012 - 8:44 pm | सुमीत भातखंडे

काव्य आणि चित्रे दोन्ही छान!

शैलेन्द्र's picture

5 Jun 2012 - 10:12 pm | शैलेन्द्र

मस्त जमुन आलय... छान.. :)

आगाऊ म्हादया......'s picture

6 Jun 2012 - 9:48 am | आगाऊ म्हादया......

ते राहू द्या हो सगळा.....

खूप मस्त आहे कविता!!!!!
_________________________________________________________________
_________________________________________________________________

आगाऊ म्हादया......'s picture

6 Jun 2012 - 10:10 am | आगाऊ म्हादया......

कसं काय जमतं राव......!!!!

आयुष्यात एक छान कविता जमली तर घर डोक्यावर घेऊन नाचेन मी!!!!!!!!!!

_____________________________________________________--
_______________________________________________________-

चित्र-काव्य आवडले.
अप्रतिम !
फक्त एवढीच ओळ खटकली..
पेटोनी हर चंदनी वृक्ष उठे ; त्यांचा सुवासी हवी
"वृक्ष"च्या ऐवजी " तरु " असते तर ?

रैट्ट यू आर सार! वृत्ताच्या चालीप्रमाणे हेच्च बरोबर है :)

ह्याला माणसाला परत आणा राव.

प्रचेतस's picture

24 Dec 2015 - 12:56 pm | प्रचेतस

सहमत.

एस's picture

24 Dec 2015 - 10:56 am | एस

कैसी ही कविता न दृष्टि पडली
लाभा मुकलो हत!

सुमीत भातखंडे's picture

24 Dec 2015 - 1:04 pm | सुमीत भातखंडे

वाचलं.....पुन्हा आवडलं.
अप्रतिम