✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सामना जगज्जेतेपदाचा - आनंद वि. बोरिस - भाग ३

च
चतुरंग यांनी
Wed, 05/23/2012 - 09:07  ·  लेख
लेख
विश्वविजेतेपदासंबंधी लिहिलेल्या आधीच्या दोन्ही भागाचे दुवे http://www.misalpav.com/node/21605 http://www.misalpav.com/node/21686 http://www.chessdom.com/news-2011/world-chess-championship-2012 या संकेतस्थळावर पट आणि चालींचे विश्लेषण दिसते. http://moscow2012.fide.com/en/ या ठिकाणी डावाचेच थेट प्रक्षेपण होत असल्याने डाव आणि खेळाडू बघता येतात. परंतु मध्येच प्रायोजकांचे काही कार्यक्रम सुरु होऊन रसभंग होतो. पण खेळाडू बघता येणे ही मौज काही वेगळीच असल्याने हे संस्थळही जरुर बघावे. तिसर्‍या भागात नवव्या डावापासून सुरुवात करायची आहे. आनंद आणी बोरिस दोघांची गुणसंख्या समसमान आहे. उरलेल्या चार डावात दोघांकडे दोन दोन वेळा पांढरी मोहोरी असणार आहेत. कालच्या डावात आनंदने बाजी मारुन आक्रमक झाल्याचे दाखवून दिले आहेच, बोरिस तर पहिल्यापासून शड्डू ठोकूनच खेळतोय त्यामुळे उरलेले चारही डाव रंगतदार होतील अशी आशा आहे. -चतुरंग

Book traversal links for सामना जगज्जेतेपदाचा - आनंद वि. बोरिस - भाग ३

  • ‹ सामना विश्वविजेतेपदाचा - आनंद वि. बोरिस -भाग २
  • Up
  • सामना जगज्जेतेपदाचा - आनंद वि. बोरिस - भाग ४ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
क्रीडा
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद
लेख
प्रतिभा

प्रतिक्रिया द्या
22723 वाचन

💬 प्रतिसाद (105)

प्रतिक्रिया

हेच म्हणत होतो

संजय क्षीरसागर
Wed, 05/23/2012 - 10:58 नवीन
फक्त शीर्षक डाव-९ असं हवं होतं, पटलं असेल तर संपादकांना रिक्वेस्ट करून पाहा (की तुम्हीच संपादक आहात?)
  • Log in or register to post comments

बेष्ट

रमताराम
Wed, 05/23/2012 - 11:34 नवीन
भेटू चार-पाच तासांनी.
  • Log in or register to post comments

दोघेही

चतुरंग
Wed, 05/23/2012 - 16:31 नवीन
बोर्डापाशी बसले आहेत. आर्बायटरनी घड्याळ सुरु केले आणि डाव सुरु!
  • Log in or register to post comments

पुन्हा एकदा

चतुरंग
Wed, 05/23/2012 - 16:36 नवीन
डी ४ सुरुवात परंतु आज आनंदने स्लाव कडे डाव न नेता निम्झो इंडियन कडे नेलाय! वेगवेगळी ओपनिंग वापरली जाताहेत. मजा आयेगा.
  • Log in or register to post comments

आनंद

रमताराम
Wed, 05/23/2012 - 16:40 नवीन
चांगलाच अग्रेसिव मूडमधे दिसतोय.
  • Log in or register to post comments

पहिली मारामारी झाली. डावाची

चतुरंग
Wed, 05/23/2012 - 16:44 नवीन
पहिली मारामारी झाली. डावाची सुरुवात संपून डाव मध्याकडे सरकलाय. आता स्ट्रॅटेजिक खेळ्या सुरु झाल्यात. बी ६ खेळून आनंदने पांढरा उंट मुख्य कर्णात बसवण्याची तयारी सुरु केली. बओरिसने जी५ मधे उंट बसवून घोडा पिन केला.
  • Log in or register to post comments

आज

रमताराम
Wed, 05/23/2012 - 16:47 नवीन
उंटाचा रोल महत्त्वाचा ठरणार असे दिसते. आनंदने मुख्य लाईन सोडून बी पट्टीतला उंट इतक्यात गमावण्याची घाई केली नाही, त्याऐवजी मध्यपटावरची प्यादी एक्स्चेंज केली. यावरून त्याने त्या उंटासाठी काही रोल निश्चित करून ठेवलेला दिसतो.
  • Log in or register to post comments

हो अजून

चतुरंग
Wed, 05/23/2012 - 16:56 नवीन
सी३ मधला घोडा तसाच धरुन ठेवलाय त्यावरुन काही वेगळाच डाव दिसतोय. बोरिसने हत्ती अपेक्षेप्रमाणेच सी१ मधे आणलाय. अशा वेळी खेळाडूंचे सेकंड्स (टीममधले मदतनीस) असतात त्यांनी खेळलेले डाव सुद्धा महत्त्वाचे ठरतात. कारण त्यानुसार त्यांनी मदत केलेली असू शकते. प्रतिस्पर्ध्याची खेळी ताडणे हे कमालीचे अवघड होत जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

अजूनही

चतुरंग
Wed, 05/23/2012 - 16:48 नवीन
कॉपीबुक स्टाईलने खेळ सुरु आहे. आता कोण आधी नवी खेळी करते बघायचे. आता आनंद बहुदा घोडा डी७ मधे आणेल आणि हत्ती सी८ मधे बसवायचा प्रयत्न. बोरिसची तयारी ई स्तंभात ताबा मिळवण्याची आहे. ई५ ह्या कमकुवत घरावर त्याचा डोळा आहे!
  • Log in or register to post comments

आनंद विचारात पडलाय.

चतुरंग
Wed, 05/23/2012 - 17:04 नवीन
त्याने या खेळीला बर्‍यापैकी वेळ घेतलाय (जवळपास १० मिनिटे). बोरिसने त्याल बहुदा किंचित धक्का दिलाय. आनंद कॉम्प्लिकेशन्स वाढवतो की टाळतो हे बघायचे आता!
  • Log in or register to post comments

बोरिसचा

रमताराम
Wed, 05/23/2012 - 17:15 नवीन
उंट डी-३ मधे गेला. या अपेक्षित खेळीनंतर एखादी 'अनपेक्षित' खेळी 'अपेक्षित' आहे आनंदकडून. :)
  • Log in or register to post comments

झाली ,उंट आणि सी ३ मधल्या

चतुरंग
Wed, 05/23/2012 - 17:21 नवीन
घोड्याची मारामारी झाली. आता आनंद वजीर सी ७ मधे हलवणार.
  • Log in or register to post comments

अखेर

रमताराम
Wed, 05/23/2012 - 17:22 नवीन
घोडा खाल्ला. आता बोरिसचे डी प्यादे बलवान झाले पण त्याच्या हत्तीचा सी पट्टीवर कब्जा मिळ्वण्याचा प्रयत्न फसला.
  • Log in or register to post comments

सी४

चतुरंग
Wed, 05/23/2012 - 17:25 नवीन
प्यादे पुढे काढून बोरिसने डी५ ची धमकी दिली. कारण तिथे प्याद्यांची मारामारी झाली की हत्तीचा काळ्यावजिरावर थेट हल्ला होतो. आणि त्याला सी पट्टी सोडूण जायला लागते.
  • Log in or register to post comments

अवघड वाटते

रमताराम
Wed, 05/23/2012 - 17:36 नवीन
डी-५ ची शक्यता कमी आहे. प्याद्यांची मारामारी झाल्यावर आनंदचा वजीर डी-६ मधे येऊन बसेल. तसेच एफ मधील घोडा मोकळा असल्याने बोरिसच्या आयसोलेटेड प्याद्यावर तिघांचे प्रेशर राहील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

सुरुवातीपासून लक्ष आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 05/23/2012 - 17:26 नवीन
डावावर आणि तुम्हा दोघांच्या विश्लेषणावरही लक्ष आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

आनंद आज जरा जास्तीच

चतुरंग
Wed, 05/23/2012 - 17:33 नवीन
वेळ घेतोय. १४ खेळ्यांनाच ४७ मिनिटे झालीत. टाईमप्रेशरमधे यायला नको शेवटी!
  • Log in or register to post comments

आनंदनं

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 05/23/2012 - 17:35 नवीन
उंट द्यायचे काही खास कारण ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

उंट देऊन

रमताराम
Wed, 05/23/2012 - 17:39 नवीन
बोरिसच्याच प्याद्याला मधे यायला भाग पाडून मागे बसलेल्या हत्तीचे सी पट्टीवरील नियंत्रण संपुष्टात आणले. याउलट आपला हत्ती नि वजीराच्या सहाय्याने स्वतःच ती पट्टी बळकावली. यात आनंदचा वजीर सी पट्टीत आल्याने एफ पट्टीतील घोडाही हलता झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

असंय होय ते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 05/23/2012 - 17:48 नवीन
धन्स.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

रंगाशेट

रमताराम
Wed, 05/23/2012 - 17:49 नवीन
आता डी-५ थोडी आणखी कमकुवत होते आहे असे वाटते का? आनंद घो(डी)-ई५ असा फोर्क मारू शकतो. बोरिसचा वजीर ई-४ मधे येऊ शकत नसल्याने त्याला ई-२ किंवा थेट एच-३ अशी माघार घ्यावी लागेल. अन्य काही पर्याय दिसतात का? ई-३ ला घो(एफ)-जी-४ हे उत्तर डेडली असेल.
  • Log in or register to post comments

बरोबर

चतुरंग
Wed, 05/23/2012 - 17:58 नवीन
डी ५ ने काळा वजीर डी६ मधे हलणार. जागेची उपल्ब्धता विरुद्ध मोहर्‍यांचे विकसित असणे असा तिढा काळ्यासमोर आहे. पांढर्‍याचे मध्यातले वर्चस्व तो मोहर्‍यांच्या समन्वयाने भरुन काढायचा प्रयत्न करतोय. आनंद एच ६ खेळला. उंटाला हुसकावून लावणे. बोरिस उंट एच४ ला जाईल असे दिसते म्हणज एनंतर जी ३ ला ठाणे लावता येईल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

केवळ कौतुक भावनेनी हा प्रकार

जे.पी.मॉर्गन
Wed, 05/23/2012 - 18:06 नवीन
केवळ कौतुक भावनेनी हा प्रकार बघतोय ! आपल्याला ह्या खेळातलं घंटा काही कळत नाही पण हा खेळ खेळणार्‍या आणि आवडणार्‍यांचं अचाट कौतुक वाटतं ! "एकदा बघू तरी च्यायला काय प्रकार आहे ते" म्हणून ५-७ वेळा प्रयत्न केला पण काहीच झेपलं नाही. पण ही लढत एक उत्सुकता म्हणून बघतोय. तुमचं विश्लेषणही वाचतो आहेच! लगे रहो दोस्तों | फकस्त आत्ता काही वेळापूर्वी त्या फिडेच्या साईटचा कॉमेंटेटर "I am slightly stunned" म्हणाला ! ते कसं काय असतं बुवा? एक तर पूर्ण हलून जा ऑर निवांत राहा! ;) पण हा भारी प्रकार आहे!
  • Log in or register to post comments

हा हा!

चतुरंग
Wed, 05/23/2012 - 18:15 नवीन
स्लाईटली स्टन्ड!! हे लै भारी!!! हे म्हणजे मला "खेळी झेपली नाही" असं असावं बहुदा! ;) जेपी, सचिन जितका तुमचा देव तितकाच आमचा विशी हा देव! आम्ही तिकडे पूजा बांधतो आणि इकडेही! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जे.पी.मॉर्गन

कार्पोव, कास्पारोव, विशी

जे.पी.मॉर्गन
Wed, 05/23/2012 - 18:39 नवीन
कार्पोव, कास्पारोव, विशी वगैरे लोकं लै भारी आहेत असं गुढघ्यायेवढा असल्यापासून ऐकत होतो... म्हटलं "विशी आक्रमक खेळतो" म्हणजे नक्की काय करतो बघुया म्हणून एक सामना टेकू देऊन बघायला बसलो तर हा महामानव आपला एका पंजात हनुवटी रुतवून थंड डोक्यानी मोहरे हलवत होता. म्हटलं जाऊदे आपलं कामच नाही. पण 'स्लाव्ह', 'सिसिलियन बचाव', 'नाजदॉर्फ, 'किंग्ज इंडियन' वगैरे शब्द ऐकल्यावर ज्या काही गुदगुल्या होतात त्यांचं श्रेय मात्र नि:संशयपणे विशीला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

फकस्त आत्ता काही वेळापूर्वी

रमताराम
Wed, 05/23/2012 - 18:19 नवीन
फकस्त आत्ता काही वेळापूर्वी त्या फिडेच्या साईटचा कॉमेंटेटर "I am slightly stunned" म्हणाला ! ते कसं काय असतं बुवा? एक तर पूर्ण हलून जा ऑर निवांत राहा! :). चं.प्र. देशपांडे यांचं एक नाटक आहे 'ढोलताशे' म्हणून. त्यातही असंच वाक्य होतं. कुणीसं म्हणतं 'मलाही हळूहळू त्याच्या वागण्याचा धक्का बसायला लागला आहे.' त्यावर अजित भुरे म्हणतो 'हळूहळू बसतो तो धक्का नसतो, धक्का असा जोरात बसतो.' :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जे.पी.मॉर्गन

उंटाने घोडा

चतुरंग
Wed, 05/23/2012 - 18:07 नवीन
मारणेही फारसे चांगले दिसत नाही. कारण दुसरा घोडा तिथे येऊन बसतो!
  • Log in or register to post comments

काळा वजीर डी६ मधे आलाय . डी५

चतुरंग
Wed, 05/23/2012 - 18:19 नवीन
काळा वजीर डी६ मधे आलाय . डी५ चे प्यादे पुढे ढकलावे की नाही या विचारात बोरिस आहे. आता बोर्डाच्या मध्यात गळू अगदी ठसठसते आहे एखादी खेळी आणि ते फुटून वाहायला लागणार आहे! ;)
  • Log in or register to post comments

तुम्ही लोक कुठे पाहताय? ती

भडकमकर मास्तर
Wed, 05/23/2012 - 18:24 नवीन
तुम्ही लोक कुठे पाहताय? ती रशियन साईट झैराती दाखवतएय कधीची
  • Log in or register to post comments

हो

चतुरंग
Wed, 05/23/2012 - 18:27 नवीन
आता झैराती आहेत पण त्यावरच्या दुव्यावर पट आणि अ‍ॅनालिसिस दिसतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

हुदिनी

रमताराम
Wed, 05/23/2012 - 18:31 नवीन
अ‍ॅनालिसिसच्य दुव्यावर क्लिक करा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

काळी घोडी मस्त जागा धरुन बसली आहेत!

चतुरंग
Wed, 05/23/2012 - 18:34 नवीन
डी ५ किंवा सी५ दोन्ही खेळणे अवघडच आहे. बघू काय होते.
  • Log in or register to post comments

सी५!

चतुरंग
Wed, 05/23/2012 - 18:41 नवीन
अपेक्षित मारामारी होऊन काळा हत्ती पुढे आला. बोरिस एक प्यादे कमी आहे. आता वजीर विरुद्ध दोन हत्ती अशी लढत होणार.
  • Log in or register to post comments

ड्रॉ कडे निघालाय डाव बहुधा!

चतुरंग
Wed, 05/23/2012 - 18:47 नवीन
बघूयात अंदाज चुकतोय का!
  • Log in or register to post comments

आनंदचे

रमताराम
Wed, 05/23/2012 - 18:50 नवीन
दोन घोडे मध्यपटावर बोरिसच्या वजीराला कसे नाचवतात या तर्क करणे अवघड आहे. घोड्यांच्या पोजिशन्सचा तर्क करणे अवघड असते. आनंद एखादा आउट ऑफ द हॅट फोर्क मारून बोरिसला चकित करू शकतो. दोन घोडे एन्डगेममधे. ते ही मध्यपटात मोकळे.... बोरिस बी केअरफुल. :)
  • Log in or register to post comments

ग ळू फु ट ले ग ळू फु ट ले ग

भडकमकर मास्तर
Wed, 05/23/2012 - 18:53 नवीन
ग ळू फु ट ले ग ळू फु ट ले ग ळू फु ट ले ग ळू फु ट ले ग ळू फु ट ले
  • Log in or register to post comments

बरोबरी

रामपुरी
Wed, 05/23/2012 - 19:05 नवीन
होणार असं वाटतंय
  • Log in or register to post comments

ए प्ट्टीतली प्यादी आहेत तोपर्यंत डावातला

चतुरंग
Wed, 05/23/2012 - 19:14 नवीन
असमतोल टिकून राहणार आणी डाव बरोबरीत सुटण्याची शक्यता नाही. बोरिस ए प्यादे रेटणार आणो घोड्याला डावात येऊ देण्यापासून जितके लांबवता येईल तितके बघणार.
  • Log in or register to post comments

एंडगेम

चतुरंग
Wed, 05/23/2012 - 19:18 नवीन
खेळण्यात दोघेही वाकबगार आहेत. आनंद तर अगदी गेलेल्या पोझीशन्स वाचवण्यासाठी प्रसिद्ध आहे! अतिशय बारकाईने प्रत्येक पोझीशन अ‍ॅनालाईज करणे महत्त्वाचे. अनेक शक्यतांनी भरलेला डाव!
  • Log in or register to post comments

काळा राजा प्याद्यांचा तट करुन बसणार!

चतुरंग
Wed, 05/23/2012 - 19:20 नवीन
आणि तटाभोवती घोडा फिरवत ठेवून वजिराला दूर ठेवायला बघणार. एकदा का वजिराने प्याद्यांच्य तटाला भोक पाडले की डाव अवघड होणार आनंदला!
  • Log in or register to post comments

या शक्यतांमु ळे ड्रॉ

भडकमकर मास्तर
Wed, 05/23/2012 - 19:22 नवीन
या शक्यतांमु ळे ड्रॉ लगेच व्हायचा नाही... वाट पहावी लागेल...
  • Log in or register to post comments

आयच्यान

रमताराम
Wed, 05/23/2012 - 19:23 नवीन
इतक्या शक्यता समोर आहेत की त्यातली नक्की कुठली हे वीर उचलतात याचा तर्क करताना बीपीची गोळी घ्यायची वेळ आली. :)
  • Log in or register to post comments

राजा

मिहिर
Wed, 05/23/2012 - 19:37 नवीन
आनंदने राजा एच ७ वरून जी ७ आणि नंतर पुन्हा एच ७ असा का हालवला? मला कारण कळले नाही!
  • Log in or register to post comments

हाहाहा... गेल्फंड

भडकमकर मास्तर
Wed, 05/23/2012 - 19:45 नवीन
हाहाहा... गेल्फंड ईइतका वेळ खातोय की आता खुर्च्या, आर्ट ग्यालरी.. आवडते कलाकार चित्रकार अशी चर्चसुरिरू झालीय...
  • Log in or register to post comments

With kings facing each other,

रमताराम
Wed, 05/23/2012 - 20:14 नवीन
With kings facing each other, I have my heart is in my mouth.
  • Log in or register to post comments

वजीर आठव्या पट्टीत!

चतुरंग
Wed, 05/23/2012 - 20:18 नवीन
आनंद सॉलिड डिफेन्स करतोय! बोरिस वेळात मागे पडलाय. साडेदहा विरुद्ध अडीच मिनिटे.
  • Log in or register to post comments

आनंद

चतुरंग
Wed, 05/23/2012 - 20:27 नवीन
घोड्याचा वापर करण्यात अतिशय चतुर आहे हे पुन्हा एकदा सिद्ध होतंय! बोरिसला त्याचा बचाव भेदणं अशक्य दिसतंय.
  • Log in or register to post comments

चला

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 05/23/2012 - 20:29 नवीन
एकट्या वजीराला फिरवून फिरवून बोरीस आज दमून गेला. आता पुढे काय ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

दोघे रिझल्टसाठी कष्ट करताहेत

भडकमकर मास्तर
Wed, 05/23/2012 - 20:31 नवीन
दोघे रिझल्टसाठी कष्ट करताहेत हे पाहून आनंद वाटतो आहे... आम्हाला आनंदचे पारडे जड वाटते आहे बुवा... ते वेळाचे काय झले नक्की?
  • Log in or register to post comments

>>>>ते वेळाचे काय झले

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 05/23/2012 - 20:33 नवीन
>>>>ते वेळाचे काय झले नक्की? वेळ वाढवून देतात की काय कोणास ठाऊक. वेळ तर बोरीसच्या हातून केव्हाच गेली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा