बंडखोरी...!

वेणू's picture
वेणू in जे न देखे रवी...
18 Apr 2012 - 12:33 pm

वावरणारा प्रत्येक मनुष्य,
एक ठिणगी!!
प्रत्येकात एक ज्वाला,
खोल आत दडलेली,
अवकाश निव्वळ ठिणगीने पेट घेण्याचा,
भडका ठरलेलाच!

अश्या लाखो ठिणग्या,
अवती-भवती वावरणार्‍या...
अचानक सगळ्यांनी पेटून उठावं
एकेच दिवशी, एकाच वेळी...!
मग,
ह्या पृथ्वीला, इतर ग्रहांना, आकाशगंगेला-
ह्या प्रचंड उर्जेचा भार पेलवेल??

आकाशाची पृथ्वीशी असलेली
क्षितीजावरची घट्ट वीण, उसवेल ताडकन!
आणि झेपावेल पृथ्वीच, आकाशगंगेबाहेर!

तिचा नवा सूर्य शोधण्याकरिता...!!

-वेणू
वेणूसाहित्य http://venusahitya.blogspot.com/

कविता

प्रतिक्रिया

चाणक्य's picture

18 Apr 2012 - 12:49 pm | चाणक्य

नाही आवडली विशेष.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

18 Apr 2012 - 3:44 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

कल्पना मस्त आहे, मांडणीत गडबड झाली.
पण तरी आवडली.

चौकटराजा's picture

18 Apr 2012 - 5:31 pm | चौकटराजा

ही मिपावर आधारलेली कविता वाटतेय ! प्रतिकात्मक दिसतेय !
कविता आहे बरोबर !

वेणू's picture

18 Apr 2012 - 7:08 pm | वेणू

नाही, ही मिपावर आधारित नाही.
चाणक्यजी, मि.का, चौ.राजा आभारी आहे, प्रतिसादासाठी :)