शांततेवर लोंबणारा हा दोर कसला?
ज्याचा पीळ ओळखीचा आहे
भास ओळखीचा आहे
माने भोवतालीचा पेड
माझा आकांत भोवरा आहे ?
ह्या शांततेचा स्पर्श
किती मुखांनी बोलतो
जिभेत दुधारी पात्यांचा
दंशात उमरल्या दातांचा
माझा एकांत, जबडा आहे ?
शांततेच्या यमदूतांनो
हृदयाचे माझ्या संपलेत कधीच ठोके
मोकळ्या देहातले पैंजण कसे
स्वतःतच रमले आहे?
शांततेच्या टोकावरती
तीक्ष्ण हत्यारी राने
काळजास फाडणारी त्यांना
चांदण्यांची धार आहे ?
प्रतिक्रिया
10 Apr 2012 - 10:40 am | अभिष्टा
सुंदर :-)
10 Apr 2012 - 11:49 am | स्पा
अप्रतिम....
12 Apr 2012 - 6:35 pm | शैलेन्द्र
( :) )
/_/\_\
तुझी विद्वत्ता दिवसोंदिवस वाढतच चाल्लिये रे..
10 Apr 2012 - 12:05 pm | परिकथेतील राजकुमार
ओ का ठो कळाले नाही.
माफी.
कविताग्रस्त
परा
10 Apr 2012 - 12:42 pm | यकु
काहीही ** कळले नाही. :(
12 Apr 2012 - 4:44 pm | प्यारे१
धनंजय ने अतिशय अभ्यास करुन ** साठी 'शष्प' असा शब्द मिळवून दिला आहे.
वापर रे यक्क्या!
12 Apr 2012 - 5:20 pm | यकु
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =))
=))
च्यामारी प्यार्या, हलकट माणसा!*
*चांगला शब्द सुचवूनही हलकट माणसा का म्हटले गेले आहे याचे स्पष्टीकरण देण्यास सदर प्रतिसादक बांधिल नाही :p ;-)
10 Apr 2012 - 1:07 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
परा भाऊ, तुम्ही इथे आलात यातच त्या रचनाकाराचे यश आहे. ;)
11 Apr 2012 - 12:23 am | पैसा
मला पण काही कळलं नाही. मा. मन्या फेणे, या कवितेचा अर्थ सांगा अशी जाहीर विनवणी करते.
श्री. पेशवा, तुमची ही कविता मला खरंच कळली नाही. थोडी पूर्वपीठिका किंवा यामागचा विचार सांगाल का?
12 Apr 2012 - 4:37 pm | मूकवाचक
_/\_
12 Apr 2012 - 5:38 pm | मुक्त विहारि
शांततेवर लोंबणारा हा दोर कसला?
ज्याचा पीळ ओळखीचा आहे
भास ओळखीचा आहे
माने भोवतालीचा पेड
माझा आकांत भोवरा आहे ?
वरिल कडवे , हे मि. पा. वर येणार्या असंख्य धाग्यांसाठी आहे....
ह्या शांततेचा स्पर्श
किती मुखांनी बोलतो
जिभेत दुधारी पात्यांचा
दंशात उमरल्या दातांचा
माझा एकांत, जबडा आहे ?
हे कडवे कवळी असलेल्या माणसांसाठी आहे....बघा ना मऊ भात खातांना आपल्या तोंडातुन "मचमच" असा आवाज येतो का? म्हणुनच तो "ह्या शांततेचा स्पर्श".....
शांततेच्या यमदूतांनो
हृदयाचे माझ्या संपलेत कधीच ठोके
मोकळ्या देहातले पैंजण कसे
स्वतःतच रमले आहे?
वरिल कडवे हे धाग्यांना प्रतिसाद न मिळालेल्या कर्त्याचे मनोगत आहे....
शांततेच्या टोकावरती
तीक्ष्ण हत्यारी राने
काळजास फाडणारी त्यांना
चांदण्यांची धार आहे ?
आणि हे शेवट्चे कडवे हे विडंबन काराला उद्देशुन म्हणालेले आहे.....
थोडक्यात सारांश असा.....
मी एक म्हातारा (म्हणजे अनुभवी ) असुन, मी सध्या कवळी वापरत आहे...(म्हणजे नविन तंत्रज्ञानाचा वापर करत आहे)...इतरांना थोडे ज्ञान मिळावे म्हणुन मी हा एक धागा टाकुन पण लोक त्याला प्रतिसाद का देत नाही आहेत बरे? आणि दिलाच तर त्याचे विडंबन करुनच का देत आहेत बरे?....
बघा किती साधे आणि सरळ आहे....
12 Apr 2012 - 5:46 pm | कवितानागेश
हा शांततेवर लोंबणारा दोर घेउन ,
अजून पीळ देउन देउन,
एक दिवस जबडा
दाबून टाकणार आहे.
ज्या ज्या मुखात शांतता नांदते,
तिथल्यादुधारी पात्यांचा जिभेनी,
एकांतात दातांमध्ये तोच दोर,
पीळ देउन देउन अडकवणार आहे.
त्याच दोराच्या टोकाला,
जड्शीळ शांतता बांधून
लंबकाप्रमाणे वापरुन,
यमदूतांच्या हृदयाचे ठोके पैंजण घालून मोजणार आहे!
शांततेला शार्पनरनी तीक्ष्ण टोक काढून
इथल्याच कागदावर फराफरा
मेंदू जी कुरतडेल भराभरा
अशी कविता चांदण्यात बसून,
पहिल्या धारेची पित पित
छापणार आहे, छापणार आहे.... छापतच रहाणार आहे!
---------------------------------------------------
जय हिंद, जय महारष्ट्र!
12 Apr 2012 - 5:49 pm | यकु
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =))
=))
खी: खी: खी: खी: खी: ख्या: ख्या: ख्या:
मुंबईत माझ्यासाठी जॉब शोधणे!! एवढ्या मोठ्याने हसलेलं पाहून हे लोक मला हाकलण्याच्या तयारीला लागले आहेत..
12 Apr 2012 - 5:53 pm | मुक्त विहारि
पहिल्याच कडव्याला जे स्मित हास्य करत हसायला लागलो ते थेट, स्मित, खो-खो आणि पोट धरुन व सगळ्यात शेवटी गडबडा लोळायला लागलो...
हे असे काही लिहु नका हो.....बॉसला खुप वाईट वाटते असे आम्ही हसायला लागलो की....उद्या आम्हाला कामावरुन काढुन टाकले तर?....
12 Apr 2012 - 6:00 pm | मूकवाचक
=))
12 Apr 2012 - 7:38 pm | बिपिन कार्यकर्ते
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
12 Apr 2012 - 6:13 pm | परिकथेतील राजकुमार
पट्टकन प्राण सोडतील ग ते.
म्हणजे मग त्यांना वरती सोडायला तुलाच जावे लागेल.
12 Apr 2012 - 8:15 pm | पैसा
मुक्तविहारी, तुम्ही जगात कशाचाही अर्थ लावून दाखवाल! =)) =))
आणि माउली! अपण साक्षात माउली, काय बोलावे!!
=)) =)) =)) =))
13 Apr 2012 - 1:04 am | पेशवा
सर्व प्रतिसादकांचे आभार! विडंबनातुन कवीतेचा अर्थ समजवून घेण्यासाठी व देण्यासाठी ज्यांनी कष्ट घेतले त्यांचे विशेष कौतूक वाटले ... :-)
17 Apr 2012 - 1:38 pm | प्रीत-मोहर
=)) =)) अगगगग माउ जान लोगी क्या?