गोवा

प्रभाकर पेठकर's picture
प्रभाकर पेठकर in कलादालन
11 Apr 2012 - 4:05 am

मालवण सोडता सोडता दोन अजब पाट्या नजरेस पडल्या. पहिली पाटी ही. काही अर्थबोध होईना.....

Pati

दूसरी पाटी ही. ह्याचा काही अर्थबोध गावकर्‍यांना झालेला दिसत नाहिए. अतिक्रमण विरोधी कायदेशिर पाटीच अतिक्रमणाने घेरलेली आहे.

Atikraman

मालवण सोडून निघालो तो दिवस शिमग्याचा होता.
कोंकणात शिमगा तसा मोठा सण. आठवडाभर चालतो. शिमग्याच्या निमित्ताने गावातील कलाकार मंडळी पौराणिक सोंगे घेऊन गावभर नाच/कार्यक्रम सादर करतात. एक गोष्ट जाणवली सोंगांचे मुखवटे-वेश पुर्वी सारखे थातूरमातूर नसून चांगल्या प्रतीचे होते.

हा नरसिंव्ह. तसा कुपोषित दिसत असला तर चेहर्‍यावरचा आवेश वाखाणण्याजोगा आहे.

Narasimha

सर्वात पहिला प्रयोग ग्रामदेवतेसमोर होतो. गायक, वादक आणि कलाकार मंडळी पुराणातील एकेक प्रसंगावर नृत्यनाट्य सादर करतात.

Shimga-2

वीर हनुमान....
Shimga-3

कलाकारांचे कौतुक करून मार्गस्थ झालो.

गोव्याच्या वाटेवर पुढचे ठिकाण लागले सावंतवाडी. हेच ते सावंतवाडीचे प्रसिद्ध तळे.
Sawantwadi

सावंतवाडीत राज्य परिवहन मंडळाच्या आगाराकडून बेळगावकडे जाणार्‍या रस्त्यावर आहे भालेकर ह्यांची प्रसिद्ध खानावळ. मत्स्यप्रेमींनी अगदी न चुकवावे असे श्रद्धास्थान. जेवणाची इतकी ओढ लागली होती की छायाचित्र काढायचे राहून गेले. इथे जेवून तृप्त मनाने गोव्याकडे प्रस्थान ठेवले.

गोव्याचा फेसाळता समुद्र किनारा.

Goa-Kinara-1

Goa-Kinara-2

शांत सावल्या आणि अथांग सागर.......

Goa-Kinara-3

नयनरम्य गोवा.

Goa-Kinara-4

शांतादूर्गाच्या वाटेवर कवी पद्मश्री बा. भ. बोरकरांचे निवासस्थान लागते.

Borkar-Res-1

एकूणातच कोंकणातील आणि गोव्यातील रस्ते वनश्रीने नटलेले. प्रवास कसा संपतो कळत नाही. प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचलो शांतादूर्गा मंदिरात.

Shanta-Durga-1

मंदीर आतूनही एकदम स्वच्छ आणि नेटके आहे.

Shanta-Durga-2

शांतादूर्गाचे दर्शन घेऊन परतीच्या वाटेला लागलो. येताना आंबोली मार्गे आलो. आंबोली घाटही मोठा निसर्गरम्य आहे.

Amboli-Ghat-1

घाटात एके ठिकाणी धबधबा आहे. सध्या पाणी नाही पण पावसाळ्यात पर्यटकांची झुंबड उडते. पूर्वी एकच टपरी होती चहाची आता १०-१२ झाल्या आहेत. ह्या वेळी बहुतेक टपरी धारी मराठी दिसले. बरे वाटले.

Amboli Ghat 2

समाप्त.

प्रवास

प्रतिक्रिया

फोटो आणि वृत्तांत आवडला

५० फक्त's picture

11 Apr 2012 - 7:43 am | ५० फक्त

छान आले आहेत फोटो, दोन वर्षापुर्वी गेलो होतो या ठिकाणी त्याची आठवण झाली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Apr 2012 - 7:53 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फोटो मस्तच.

-दिलीप बिरुटे

स्पंदना's picture

11 Apr 2012 - 8:41 am | स्पंदना

..ह्या वेळी बहुतेक टपरी धारी मराठी दिसले. बरे वाटल....

खरच? मागच्या वेळी तो माझ्याशी हिंदी बोलला म्हणुन मी झापला होता त्याला, म्हंटल तू इथे उभाराहुन तुझ हिंदी का म्हणुन झोडणार? जिथे धंदा करायचा ती भाषा वापरना..जरा चिड चिड झाली पण गेले वाटत ते बिहारी मग.

बाकि दोन्ही धागे खुप एंजॉय केले. मी दोन वर्षा पुर्वी फिरुन आलेय. जरा आठवणी ताज्या झाल्या.

प्रभाकर पेठकर's picture

11 Apr 2012 - 10:01 am | प्रभाकर पेठकर

होय aparna akshay. मी प्रथम ह्या स्थळाला भेट दिली होती (२००२ साली) तेंव्हा फक्त एकच टपरी होती. तिथे मराठी माणूस होता. नंतर २०१० साली गेलो तर पाहिलं कि एका टपरीच्या ठिकाणी १० टपर्‍या उभ्या राहिल्या आहेत आणि त्या सर्व भय्या लोकांनी अतिक्रमित केलेल्या होत्या. वाईट वाटले. पण तिथे काय घडले देवास ठाऊक ह्या वेळी पुन्हा बहुतेकजणं मराठी दिसत होते. आनंद वाटला.
त्या स्थळी येणारी तरूण मंडळी मात्र बेजबाबदारपणे वागताना दिसतात. त्या धबधब्यात, तो धो धो कोसळत असताना, अनेक पर्यटक भिजण्यासाठी थेट वर पर्यंत डोंगरात चढतात. तो चढ धोकादायक आहे पण ठिक आहे, मुलं मजा करीत असतात, त्यातील थरार अनुभवत असतात. पण तिथे बसून दारू प्यायची आणि रिकाम्या बाटल्या त्या धबधब्यातील दगडांवर फेकून फोडायच्या हे पाहिलं तेंव्हा वाईट वाटलं. असो. काळ बदलला आहे. काही बदल चांगले आहेत तर काही वाईट.

प्रचेतस's picture

11 Apr 2012 - 8:50 am | प्रचेतस

सुंदर फोटो.
गोवा फारच झटपट उरकलेला दिसतोय.

प्रीत-मोहर's picture

11 Apr 2012 - 9:52 am | प्रीत-मोहर

ऐसाच्च बोलती हय!!!

प्रभाकर पेठकर's picture

11 Apr 2012 - 10:04 am | प्रभाकर पेठकर

होय वल्ली साहेब.
सोबत मित्र होता त्याला सुट्टी नव्हती. त्यामुळे २ दिवसांत परतावं लागलं. तसही, ज्या कामासाठी गेलो होतो ते काम उरकण्यात एक दिवस गेला. पर्यटनासाठी एकच दिवस मिळाला. एका दिवसात काय होतय? गोव्यात कमीतकमी ८ दिवस पाहिजेत.

जेनी...'s picture

11 Apr 2012 - 8:57 am | जेनी...

फोटो खूप छान ,:)

काका फोटो मस्तच पण ईतके कमी टाकलेत ?
अजुन पहायला आवडले असते :)
आम्ही गोव्याला गेलो तेव्हा तर किती फोटो काढू अन किती नको असे झालेले होते आम्हाला
वास्को द गामा (गाव), म्हापसा , ओल्ड गोवा ,तिथले चर्चेस , मंदीरे , बिचेस , वेगवेगळया आकाराचे शंख-शिंपले ,फॉरेनर्स्,निग्रो अगदी सगळ्याना बंदीस्त करुन आणले होते क्यामेरात .
असो..... जुन्या आठ्वनी जाग्या झाल्या :)

प्रभाकर पेठकर's picture

11 Apr 2012 - 12:55 pm | प्रभाकर पेठकर

धन्यवाद पूजा पवार आणि पियुशा.

पियुशा,

गोवा निवांत पाहण्यासाठी ७-८ दिवस मुक्काम करायला पाहिजे. ह्यावेळी ते जमले नाही. पुढच्या वेळी तसा प्रयत्न राहील.

वा मस्त फोटो.. स्मरणरंजनाचा आनंद मिळाला.. दोनच महिन्यापूर्वी झाला आहे हाच रुट.

सावंतवाडीला साधले मेसलाही जा एकदा. शुद्ध शाकाहारी हाटेलात उत्तम गरमागरम जेवणासहित घावणे चटणीसुद्धा. फोटोतील तळ्यावरुन डाव्या गल्लीत एक मिनिटाच्या अंतरावर आहे.

मालवणला नेहमीच्या बीचखेरीज एक कोळीवाडा आहे तिथे एकदम खास लँडस्केप आहे. सूर्यास्ताला तिथे फार सुंदर दृश्य दिसतं. मुख्य म्हणजे कोणीही तिथे येत नाही. शांत निवांत जागा एकदम.

प्रभाकर पेठकर's picture

11 Apr 2012 - 12:51 pm | प्रभाकर पेठकर

धन्यवाद गविसाहेब.

गोव्याच्या वाटेवर पत्रादेवी सीमेच्या आधी उजव्या हाताला एक 'सावली' की तत्सम नांवाची झोपडी सदृष टपरी आहे (५-६ पायर्‍या चढून जावे लागते). तिथे घावणे आणि काळ्या वाटाण्याची उसळ मिळते. अप्रतिम.

पुढच्या खेपेस साधले मेसला नक्कीच भेट देईन.

एकंदर सुट्टीत मस्त मजा केलेली दिसतेय. :)

(अजुन गोवा न पाहिलेला अभागी.)

प्यारे१'s picture

11 Apr 2012 - 3:32 pm | प्यारे१

आता फेणी पण नाही... :(

डब्बल अभागी!

इरसाल's picture

11 Apr 2012 - 5:12 pm | इरसाल

मी तिसरा अभागी.

सुन्दर फोटो.पुराण़कालिन नाट्काचे फोटो आवडले.आणखी टाकायला हव्र होते.

प्रेरणा पित्रे's picture

11 Apr 2012 - 3:11 pm | प्रेरणा पित्रे

फोटो आवडले. गोव्याच्या बर्याच आठवणी जाग्या झाल्या. या पाव्साल्यात जायलाच हवे. :)

दिपक's picture

11 Apr 2012 - 5:28 pm | दिपक

काका आमच्या वाडीएक जाऊन इल्लात तुम्ही. मोती तलाव बघुन बरा वाटला. सांवतवाडीत ’लाड भोजनगृहात’ पण छान जेवण मिळता. ४थो फोटु बघुन दशावतारी नाटक पाहिलय ता आठवला.
आवडले आमका फोटो :-)

प्रभाकर पेठकर's picture

11 Apr 2012 - 6:27 pm | प्रभाकर पेठकर

जाई., ५० फक्त, प्रा. डॉ. दिलीप बिरुटे, aparna akshay, वल्ली, प्रीत-मोहर, गणपा, प्यारे१, इरसाल, किचेन, प्रेरणा पित्रे आणि दिपक आपल्या सर्वांच्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

गोव्याची सफर आवडली. हे असे फोटो पाहिले की अगदी तिथे जाऊन आल्यासारखं वाटतं.
सावंतवाडीचे तळे पाहून किती वर्षं होऊन गेली होती.

पैसा's picture

11 Apr 2012 - 10:25 pm | पैसा

मालवणचे सोंगांचे फोटो तर फारच आवडले!

मस्त आणि आटोपशीर.... आवडलीत...

अमृत

सहज's picture

14 Apr 2012 - 12:23 pm | सहज

फोटो क्रमांक ७ ते १० आवडले.

मी कस्तुरी's picture

18 Apr 2012 - 11:25 am | मी कस्तुरी

फोटो आणि वृत्तांत आवडले.... :)

प्रभाकर पेठकर's picture

18 Apr 2012 - 12:21 pm | प्रभाकर पेठकर

रेवती, पैसा, अमृत, सहज आणि मी कस्तुरी. तुम्हा सर्वांच्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

@पैसा, ती सोंगं प्रत्यक्षातही फार निरागस आणि उत्साही होती. शिवाय, त्यांच्या अप्रतिम मुखवट्यांनी त्यांना एकदम व्यावसायिक पातळीवर नेऊन ठेवले होते. पूर्वी पाहिलेले मुखवटे ओबडधोबड, रंग उडालेले फार गरीब दिसणारे होते. आता सुधारणा दिसत आहे. गाणी आणि नाच पारंपारिकच होते त्याला सिनेमातल्या 'चीप' गाण्यांच्या चाली नव्हत्या हे विशेष कौतुकास्पद.

ऋषिकेश's picture

18 Apr 2012 - 2:03 pm | ऋषिकेश

वा! छान सफर!
कोकण-मालवण-गोव्यासारखा लँडस्केप नाही!

सफरीचे फटू आवडलेच मात्र फटूंसोबत जरा अधिक विस्ताराने सफरनामाही आला असता तर दुधात साखरच पडली असती