आमचे प्रेरणास्थळ
......
गालावरच्या पिंपल्सचे जुनेच डाग अजून मिटत नाहीत,विटत नाहीत ,विरत नाहीत
डाळी एवढ्या आलेल्या पुळिची विल्हेवाट कशी लावतात ?
' पू 'वाने गच्चून भरलेल्या पुळिकडे बघताना
थोडी आंबे हळद ,आणि चंदन उगाळून लावावसं वाटत आहे
ताजी म्हणावी अशी पुळि आता उरली नाही
तुकतुकित म्हणावे असे तर आता ' गाल ' पण उरले नाहीत
फेस पॅक ,विको टर्मरिक ,बोरोलिन ह्यांचा वर खर्च
पिकत चाललेल्या पुळिला आज लेप लावणार कि नाही?
रात्र उलटताना पुन्हा त्याच पुळी कडे लक्ष जाते
आराश्यातनं तीच बघण ,अन जीवाच्या आकांताने फुगण
कधीही फुटेल अश्या अवस्थेत मरुन मरून जगण ..
पार्लरची वाट धरतात मग वणवण भटकणारे पाय,
दिसू लागतो आजूबाजूचा प्रत्येक क्लीन चेहेरा सुंदर
ऐकू येत त्यांच्या बोलण्यात स्वतःच स्वताहाचं केलेलं कौतुक
अश्यावेळी सांगा हि पुळी कुठे लपवू ?
कुणाकडे मागू पुळी वरच औषध ? :(
गालावरच्या ह्या पुळिला आज एकवीस दिवस झालेत तरीही
आरश्यासमोर जाताना असे वाटत आहे ,
उद्याच्या दिवसात ती स्वताहून पिकून फुटण्या आधी
मिळाली थोडी आंतरिक शक्ती तर
तर
.
.
.
.
.
.
.
.
पुळी पचकन दाबून फोडावी म्हणते :P
( पहिलाच प्रयत्न आहे ,चु.भु.दे.घे.):(
प्रतिक्रिया
9 Apr 2012 - 9:03 pm | प्रचेतस
पूजा..आता तू सुद्धा!!!
जमलंय :)
9 Apr 2012 - 9:11 pm | गणामास्तर
हे विडंबन टाकून अ.आ. च्या शिष्या शोभलात हो अगदी.
9 Apr 2012 - 9:37 pm | अत्रुप्त आत्मा
@पुळी पचकन दाबून फोडावी म्हणते >>> या एका लाइअनवर आमचा हसुन हसुन शिरच्छेद झाला आहे असे समजावे...
व्वा...व्वा... बालिके... चांगलाच ग-धडा गिरवलास
पहिल्या यशस्वी विडंबना खातर विद्वान बालिका पुजा हिला आत्माराम विडंबन विद्यापिठाची स्कॉलरशिप जाहिर करणेत येत आहे.... ;-)
10 Apr 2012 - 8:40 am | प्रचेतस
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावक: ।
न चैनं क्लेदयन्तापो न शोषयति मारुत: ||
संभ्रमात पडल्या गेले आहे.
10 Apr 2012 - 9:02 am | अत्रुप्त आत्मा
@संभ्रमात पडल्या गेले आहे. >>> ह्हा ह्हा ह्हा...! पडुन रहा... ;-)
10 Apr 2012 - 8:55 am | जेनी...
आत्माराम विडंबन विद्यापिठाची स्कॉलरशिप
( येथे मिस्स वर्ड प्रमाणे दोन्हि हातानि तोंड लपवुन घेवुन आश्चर्य आणि जबडा तानुन आनंद व्यक्त करणारि स्मायलि कल्पावि )
:
10 Apr 2012 - 9:05 am | अत्रुप्त आत्मा
@येथे मिस्स वर्ड प्रमाणे >>> ही स्पर्धा कधी भरते..? मिस्स वर्ड ची..? यात शब्द गहाळ होत असावेत बहुतेक ;-)
10 Apr 2012 - 9:07 am | प्रचेतस
आत्म्याचा जर शिरच्छेद होऊ शकत असेल तर वर्ल्ड चा वर्ड का बरे होऊ शकत नाही. :P
10 Apr 2012 - 9:16 am | अत्रुप्त आत्मा
@तर वर्ल्ड चा वर्ड का बरे होऊ शकत नाही. >>> ही (शब्दांची) घेतलेली बाजू आंम्हाला पटली ;-)
10 Apr 2012 - 9:18 am | जेनी...
गुर्जि शब्द गहाळ आहे कि अक्षर गहाळ आहे? :-o
काय ते नीट ठरवुन सांगा बघु :P
10 Apr 2012 - 9:24 am | अत्रुप्त आत्मा
काय ते नीट ठरवुन सांगा बघु >>> अक्षराचा गाळ,त्यात शब्द गहाळ :-p
9 Apr 2012 - 11:12 pm | पक पक पक
:bigsmile: :bigsmile: :bigsmile:
जय पुजादेवी.....